Maharashtra Breaking News LIVE 4 February 2025 : लोकसभेत धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संबोधन
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 4 फेब्रुवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES
-
भारतासारख्या बहुधार्मिक देशात यूसीसी फायदेशीर नाही: मौलाना फिरंगी
मौलाना खालिद रशीद फिरंगी महाली म्हणाले, ‘भारतासारख्या बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक देशात यूसीसी फायदेशीर नाही. आपल्या देशाच्या संविधानात प्रत्येक समुदायाला त्यांचे वैयक्तिक कायदे वापरण्याचे स्वातंत्र्य आहे. म्हणूनच आम्हाला असे वाटते की UCC कुठेही लागू होऊ नये आणि सध्या अस्तित्वात असलेली व्यवस्था सुरू राहावी. गुजरातमध्ये यूसीसी लागू करण्यासाठी सुरू असलेल्या तयारीवर त्यांनी हे विधान केले आहे.
-
‘…त्यांना गरिबांबद्दल बोलणे कंटाळवाणे वाटेल’, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
जे गरीब लोकांच्या झोपड्यांमध्ये फोटो सेशन करतात त्यांना गरिबांबद्दल बोलणे कंटाळवाणे वाटेल. समस्या ओळखता येत नाही आणि नंतर दुर्लक्ष करता येत नाही. समस्या देखील सोडवावी लागेल. आमचा प्रयत्न समस्या सोडवण्याचा आहे आणि आम्ही समर्पणाने प्रयत्न करतो, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.
-
-
आम्ही गरिबांना खोट्या घोषणा दिल्या नाहीत, आम्ही खरी सेवा दिली – नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आमच्या सरकारने घोषणा दिल्या नाहीत तर खऱ्या अर्थाने गरिबांची सेवा केली. पाच दशके खोट्या घोषणा दिल्या गेल्या. हे समजून घेण्यासाठी उत्कटता लागते. मोठ्या दुःखाने सांगावे लागत आहे की काही लोकांकडे हे नाही.
-
लोकसभेत धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संबोधन
लोकसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संसदेत चर्चा होत आहे. या चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधन करत आहेत. यावेळी त्यांनी तिसऱ्यांदा संधी दिल्याप्रकरणी जनतेचे आभार मानले.
-
पुण्यात आता आरओ प्लांटच्या पाण्याचे नमुनेही दुषित आढळले
पुणे मनपाच्या तपासणीत 30 पैकी 19 आरओ प्लांटचे पाणी अशुद्ध असल्याचं आढळले आहे. जीबीएस आजाराने पुण्यात आक्रमण केले असताना ही धक्कादायक बाब उघड झाली आहे
-
-
दुहेरी हत्याकांड पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांच्या ड्युटी वेळेत बदल
दुहेरी हत्याकांड पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या ड्युटीत बदल आता पहाटे 4 ऐवजी सकाळी 6 वाजता ड्युटी सुरू होणार
-
शिवसेना नेते अशोक धोडी हत्या प्रकरणातील कार सापडली
अशोक धोडी हत्या प्रकरणात मोठी अपडेट आली आहे, 16 दिवसानंतर फरार आरोपींची स्कॉर्पिओ कार पोलिसांनी राजस्थान येथून हस्तगत केली आहे.
-
-
2 वर्षात मुंबई खड्डेमुक्त, प्रदुषणमुक्त होणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन
“मुंबईकरांना दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मुंबईतील रस्ते कॉंक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. 2 वर्षात मुंबई खड्डेमुक्त, प्रदुषणमुक्त होणार. मुंबईचा वेगाने विकसीत होत आहे. कोळीवाड्यांच्या विकासासाठी 25 कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यामुळे विरोधक टीका करत असतील तर करू द्या कारण त्यांना टीका आणि आरोप करण्याशिवाय दुसरं काम नाही. ” असं म्हणतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. तसेच यंदाचा अर्थसंकल्प हा दिलासा देणारा असल्याचं त्यांनी म्हटलं.
-
“आम्ही शांत बसलो म्हणजे…” धनंजय मुंडेंचं खोचक शब्दात अंजली दमानियांना उत्तर
“माझं राजकीय आयुष्य माय-बाप जनतेवर अवलंबून आहे. मुख्यमंत्र्यांचे अधिकार दमानियांकडे आहेत का? आम्ही शांत बसलो याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असा होत नाही. हत्येच्या आरोपींना फासावर लटकवणं ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. असं म्हणत धनंजय मुंडेंनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच अंजली दमानियांच्या आरोपांवर मुंडेंनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
-
अंजली दमानियांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचा पलटवार
अंजली दमानियांचे एकतरी आरोप सिद्ध झालेत का?, आरोपींचा खून झाला असं म्हणणं खोटारडेपणा आहे. माझ्यावर ज्यांनी आरोप केले त्यांना शुभेच्छा, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी अंजली दमानियांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिल आहे.
-
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं व्हॉट्सॲप हॅक
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं व्हॉट्सॲप हॅक झाल्याचं समोर आलं आहे. पीएम किसान योजनेच्या बनावट ॲपच्या माध्यमातून व्हॉट्स ॲप हॅक झाल्याची माहिती आहे. कोकाटे यांचं व्हॉट्सॲप हॅक झाल्याचं लक्षात येताच तातडीनं ॲप डिलीट करण्यात आलं आहे. सकाळी पावणे अकरा दरम्यान हा प्रकार घडला.
-
धुळे महापालिकेचा प्रशासकीय बजेट सादर
धुळे महापालिकेचा प्रशासकीय बजेट सादर करण्यात आला आहे. समिती समोर 822 कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. प्रशासनातील प्रत्येक विभाग प्रमुखांना कुठल्या पद्धतीचा बदल करायचा त्याबद्दल सुचना करावी, असं आवाहन आयुक्त दगडे पाटील यांनी केलं आहे. प्रामुख्याने मालमत्ता करासंदर्भात 36 टक्क्याहून 30% मालमत्ता कर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील नागरिकांना कुठल्याही पद्धतीचा खराचा बोजा पडणार नाही याची अर्थसंकल्पात तरतूद आहे. तसेच महापालिकेच्या उत्पन्नात वाढ कशी होईल यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही करण्यात आली आहे.
-
संतोष देशमुख हत्या प्रकरण, आरोपी वाल्मीक कराड याची न्यायालयीन कोठडी आज संपणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याची न्यायालयीन कोठडी आज संपणार आहे. थोड्याच वेळात कारागृह प्रशासनाकडून रिमांड अर्ज दाखल केला जाणार आहे. विशेष मकोका न्यायालयात रिमांडवर स्वाक्षरी होणार आहे. त्यामुळे पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी वाढण्याची शक्यता आहे.
-
बीडमध्ये ठेवीदारांचा जिल्हाधिकारी कचेरीवर आक्रोश मोर्चा
ठेवीदारांनी बीडमध्ये जिल्हाधिकारी कचेरीवर आक्रोश मोर्चा काढला आहे. ज्ञानराधा मल्टिस्टेट आणि साईराम मल्टिस्टेट कडून आर्थिक फसवणूक प्रकरणी बुडविण्यात आलेले पैसे परत मिळावेत, या मागणीसाठी ठेवीदारांकडून जिल्हाधिकारी कचेरी समोर ठिय्या आंदोलन केलं जात आहे. या ठिय्या आंदोलनात हजारो ठेवीदार सहभागी झाली आहेत.
-
जालनाकरांनी घेतले योगाचे धडे
जालना शहर महानगरपालिका आणि पतंजली योग शिबिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जालना शहरातील कल्याणराव घोगरे स्टेडियमवर आज पासून योग शिबिराला प्रारंभ झाला.पहिल्याच दिवशी शेकडो नागरिकांनी या शिबिरात सहभाग नोंदवत योग आणि प्राणायाम चे मोफत धडे घेतले.
-
धनंजय मुंडे पालकमंत्री असताना भ्रष्टाचार
बीड जिल्ह्यात दोन वर्षात बोगस बिले उचलण्यात आले. याची तक्रार पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार अजित दादानी चौकशी समिती नेमली आहे. हा सर्व भ्रष्टाचार धनंजय मुंडे पालकमंत्री असताना झाला होता, असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला.
-
शिवसंग्राम स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत
नांदेड, परभणी, हिंगोली आणि वाशिम असा आमचा संघटन बांधणीचा दौरा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या दौऱ्याची आखणी करण्यात आल्याची माहिती ज्योती मेटे यांनी दिली आहे.
-
सर्व मंत्र्यांना जनता दरबार घेण्याचे निर्देश
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संकल्पनेतून सर्व मंत्री यांना जनता दरबार घेण्याचे निर्देश दिल्याचे योगेश कदम यांनी सांगितले. मंत्रालयात अनेकांन येणं शक्य होतं नाही. मंत्र्याना थेट भेटता यावे यासाठी या जनता दरबाराचे आयोजन केले. सोमवार मंगळवार आणि बुधवार असा तीन दिवस जनता दरबार असणार आहेत. आमच्या खात्यासंबधित लोकांचे प्रश्न एकूण त्यावर तातडीने उपाययोजना केली जाते, असे ते म्हणाले.
-
दमानिया यांच्या आरोपांची गांभीर्याने कारवाई करा
अंजली दमानिया यांच्या आरोपांची गांभीर्याने कारवाई करा, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.
-
धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला
थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्यापूर्वी धनंजय मुंडे अजित पवार यांच्या भेटीला पोहचले आहे. कोणत्या मुद्दावर चर्चा होत आहे, हे समोर आलेले नाही.
-
जातिवाचक वस्त्या व रस्त्यांची नावे बदलणार
जळगाव शहरातील जातिवाचक वस्त्या व रस्त्यांची नावे बदलण्यात येणार आहे. जातीवाचक वस्त्या व रस्त्यांची नावे बदलवून त्याजागी थोर राष्ट्रपुरुषांची नावे देण्याचा निर्णय जळगाव महापालिकेने घेतला आहे. प्रशासनाने महानगरपालिका क्षेत्रातील जातीवाचक वस्त्यांचे व रस्त्यांचे सर्वेक्षण केले आहे.
-
गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे खाणं धक्कादायक – मनोज जरांगे पाटील
गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे खाणं धक्कादायक, राज्यातील जनतेला रस्त्यावर उतरावं लागेल – अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेवर केलेल्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया.
-
अंजली दमानियांचे धनंजय मुंडेंवर घणाघाती आरोप
कॉटन स्टोरेज बॅग 6 लाख 18हजार घेतल्या. काही दिवसापूर्वी आयसीएआय नावाची संघटना आहे. त्यांनी 20 बॅगा घेतल्या, 577रुपयाला. पण मुंडेंनी टेंडरमधून 1250 रुपयाला घेतल्या – अंजली दमानिया
-
मेटाल्डे हाइड हे पीआयए कंपनीचं प्रोडक्ट, बल्कमध्ये स्वस्त मिळतं. 817 रुपयांचं प्रोडक्ट मुंडेंनी 1275 रुपयांना विकत घेतलं
मेटाल्डे हाईड गोगलगायीचा प्रादूर्भाव झाल्याने कापूस आणि सोयीबीनचं नुकसान होतं. मेटाल्डे हाइड हे पीआयए कंपनीचं पेटेंटेड प्रोडक्ट आहे. बल्कमध्ये घेतल्यावर स्वस्त मिळतं. रिटेलमध्ये आता या प्रोडक्टचा दर 817 रुपयाला मिळतंय. पण कृषी मंत्री मुंडेंनी 1275 रुपयाला विकत घेतलं. एकूण 1 लाख 96 हजार 441 किलो विकत घेतलं – अंजली दमानिया
-
नॅनो युरिया, नॅनो डीपीएच्या खरेदीत 88 कोटींचा भ्रष्टाचार – अंजली दमानियांचा आरोप
नॅनो युरिया, नॅनो डीपीएच्या खरेदीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार, मुंडेंनी 90 रुपयांची नॅनो युरिआची बाटली 220 रुपयांना घेतली. खरेदी तब्बल 88 कोटींचा घोटाळा – अंजली दमानियांचा आरोप
-
धनंजय मुंडेंनी अजित पवार, एकनाथ शिंदेंची सही मिळवून स्किम राबवली – अंजली दमानिया
धनंजय मुंडेंनी अजित पवार, एकनाथ शिंदेंची सही मिळवून स्किम राबवली – अंजली दमानियांचा आरोप.
-
डीबीटी डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्स्फर सरकारने काढली होती. या योजना लोकांपर्यंत पोहोचत नाही – अंजली दमानिया
डीबीटी डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्स्फर सरकारने काढली होती. या योजना लोकांपर्यंत पोहोचत नाही. लाभार्थीपर्यंत पोहोचत नाही. त्यात भ्रष्टाचार होतो. म्हणून सरकारने काही सूचना केल्या. सरकारने जीआर काढला – अंजली दमानिया
-
कृषीमंत्री शेतकऱ्यांचे पैसे कसे खातो याचे पुरावे सादर करणार – अंजली दमानिया
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची पत्रकार परिषद सुरू. कृषीमंत्री शेतकऱ्यांचे पैसे कसे खातो याचे पुरावे सादर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
-
Maharashtra News: खिचडी घोटाळा, ठाकरे गटाच्या सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर
खिचडी घोटाळा, ठाकरे गटाच्या सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर… मुंबई हायकोर्टाने 1 लाखाच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर केला आहे… खिचडी घोटाळ्यातील आरोपी सूरज चव्हाणांना दिलासा…
-
Maharashtra News: शिवरायांबद्दल वाटेल ते विधान कशी करतात? – भुजबळ
शिवराय आग्र्यातून मोठ्या शिताफीने सुटले.. शिवरायांबद्दल वाटेल ते विधान कशी करतात? मी सर्वसामान्यांमध्ये काम करणारा माणूस… असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे.
-
Maharashtra News: टेरेस घोटाळा प्रकरण – युक्रेनियन अभिनेता, सीईओला न्यायालयीन कोठडी
टेरेस घोटाळा प्रकरण – युक्रेनियन अभिनेता, सीईओला न्यायालयीन कोठडी… मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी… युक्रेनियन अभिनेत्याला मलाडमधून तर सीईओला लोणावळ्यातून अटक…
-
नारायणगडाचे महंत आज मस्साजोगला येणार
“नारायणगडाचे महंत आज मस्साजोग येथे येणार आहेत, मी त्यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो, तेंव्हा भेट झाली नाही. ते आज भेटीसाठी येणार आहेत. विष्णू चाटेने मोबाईल टाकून दिलाय, त्या मोबाईलमध्ये या संघटित गुन्हेगारीचे जाळे कुठपर्यंत आहे त्याचे पुरावे आहेत” असा दावा धनंजय देशमुख यांनी केला.
-
सोलापुरात पाच वर्षीय मुलाला जीबीएसची लागण
सोलापुरातील पाच वर्षीय मुलाला जीबीएस संशयित आजाराची लागण. शहरातील एका खाजगी रुग्णालयात मुलावर उपचार सुरू. सोलापूर जिल्ह्यातील जीबीएस संशयित रुग्णांची संख्या सहावर. संशयित सहा जीबीएस रुग्णांपैकी एक मयत तर तिघांवर उपचार सुरू. सोलापूर जिल्ह्यात आशाताई आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जीबीएस रुग्णांच्या शोध मोहिमेला सुरुवात.
-
सोनिया गांधी यांच्या विरोधात संसदेत विशेषाधिकार नोटीस
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या विरोधात संसदेत विशेषाधिकार नोटीस. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे भाजपने दिली नोटीस. सोनिया गांधी यांच्यासोबतच खासदार पप्पू यादव यांच्याविरोधातही दिली नोटीस. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभा सभापती जगदिप धनखड यांना लिहिलं पत्र. राष्ट्रपती महिलेचा या दोघांनी अपमान केल्याचा भाजपचा आरोप.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत बोलणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी 5 वाजता लोकसभेत बोलणार. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर लोकसभेत बोलणार. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कालच्या भाषणात केलेले आरोप. सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींबद्दल केलेल्या विधानावर मोदी काय बोलणार याची उत्सुक्ता.
-
पुणे- व्हिडिओ काढण्याचा वादातून बारमध्ये दोन गटात हाणामारी
पुणे- व्हिडिओ काढण्याचा वादातून बारमध्ये दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्याच्या वादातून मुंडवा येथील लोकल बारमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी करणाऱ्या दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने या बारचा खाद्य परवाना रद्द करण्यात आला आहे.
-
नाशिक- भुजबळ समर्थक दिलीप खैरे यांचे शहरात लावलेले बॅनर चर्चेत
नाशिक- भुजबळ समर्थक दिलीप खैरे यांचे शहरात लावलेले बॅनर चर्चेत आले आहेत. दिलीप खैरे यांच्याकडून लावण्यात आलेल्या वाढदिवसाच्या बॅनरवरून अजित पवार आणि राष्ट्रवादी गायब आहे. भुजबळांचे कट्टर समर्थक आणि समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून दिलीप खैरे यांची ओळख आहे. खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर भुजबळांसोबत नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत. नाराज भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
-
पुणे- जिल्ह्याला 100 नव्या लालपरी मिळणार
पुणे- जिल्ह्याला 100 नव्या लालपरी मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात ठाणे, धाराशिव, पालघर आणि बुलढाण्याला बस मिळाल्या. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या स्वमालकीच्या बसेस ताफ्यात येत आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ठाणे, धाराशिव, पालघर आणि बुलढाणा या विभागांना बसेस मिळालेल्या आहेत. नव्या दोनशे बस दाखल झाल्या असून, त्यांचे पासिंगचे काम सुरू आहेत. येत्या पंधरा दिवसात पुणे विभागात 100 नव्या लाल परी दाखल होतील अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
-
पुणे- सहकारनगर परिसरात गुरुवारी पाणी बंद
पुणे- सहकारनगर परिसरात गुरुवारी पाणी बंद असेल. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येत्या गुरुवारी पर्वती येथील एच एल आर गोल आणि चौकोनी टाकीच्या जलवाहिनीची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे या टाकीवरून काही भागास केला जाणारा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे.
-
पुणे- जीबीएसच्या पाच रुग्णांची वाढ
पुणे- जीबीएसच्या पाच रुग्णांची वाढ झाली असून रुग्णसंख्या 163 वर पोहोचली आहे. तर अतिसाराचे 168 रुग्ण आहेत. जीबीएसच्या संशयित रुग्णांपैकी 32 रुग्ण पुणे महापालिका हद्दीतील, 86 समाविष्ट गावातील, 18 पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील, 19 रुग्ण ग्रामीण हद्दीतील तर आठ इतर जिल्ह्यातील आहेत.
-
मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक सकाळी तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली होती. डोंबिवली, दिवा आणि मुंब्र्यादरम्यान बिघाड झाला होता. त्यामुळे दहा ते बारा मिनिटे मध्य रेल्वे उशिराने धावत आहेत.
पुण्यात जीबीएसच्या पाच रुग्णांची वाढ झाली असून रुग्णसंख्या आता 163 वर पोहोचली आहे. तर अतिसाराचे 168 रुग्ण आहेत. जीबीएसच्या यादीत पाच रुग्णांची वाढ झाली असून जीबीएसच्या संशयित रुग्णांपैकी 32 रुग्ण हे पुणे महापालिका हद्दीतील, 86 समाविष्ट गावातील, 18 पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील, 19 रुग्ण ग्रामीण हद्दीतील तर आठ इतर जिल्ह्यातील आहेत. तर शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी जिल्हा पोलीस प्रशासन आणि शिर्डी ग्रामस्थांसमवेत बैठक घेतली. सोमवारी उशिरापर्यंत ही बैठक होती. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गडीलकर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, उपविभागीय दंडाधिकारी माणिक आहेर यांच्यासह शिर्डीच्या प्रमुख ग्रामस्थांसमवेत विखे पाटलांनी बैठक घेतली. शिर्डीच्या दुहेरी हत्याकांडानंतर विखे पाटलांकडून घटनेच्या संदर्भात आढावा घेण्यात आला. शिर्डी शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाला कठोर पावलं उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
Published On - Feb 04,2025 8:15 AM