AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE 10 June 2025 : अमरावतीतील ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख सुनील खराटे भाजपाच्या वाटेवर?

| Updated on: Jun 11, 2025 | 8:06 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 10 जून 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 10 June 2025 :  अमरावतीतील ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख सुनील खराटे भाजपाच्या वाटेवर?
फाईल फोटो

मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सकाळी लोकलच्या दारात उभं राहून प्रवास करणारे 13 प्रवासी खाली पडले. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले. या घटनेनंतर रेल्वेनं खबरदारी म्हणून वळण मार्गावर वेग कमी केला आहे. असं असलं तरी असंख्य रेल्वे प्रवासी अजूनही फूटबोर्डवर उभं राहून प्रवास करताना दिसले. अपघात नेमका कसा झाला, हे अस्पष्ट असतानाच मुंबईतील सर्वच लोकलचे दरवाजे स्वयंचलित करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. अपघातात जखमी झालेल्या चार रुग्णांवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सर्जरी होणार आहे. नऊ जणांवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज, ठाण्यातील सिव्हिल रुग्णालय आणि ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज कळवा रुग्णालयात असलेल्या सात जखमींपैकी चार जखमींवर शस्त्रक्रिया होणार असून यासाठी 16 डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून मिळत आहे. तर उर्वरित जखमींना सूज असल्याने ती सूज उतरल्यानंतर त्यांच्यावर देखील शस्त्रक्रिया करणार असल्याची माहिती देखील डॉक्टरांकडून मिळत आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Jun 2025 06:51 PM (IST)

    एसीबीने मनीष सिसोदिया यांना चौकशीसाठी दुसरी नोटीस पाठवली

    दिल्ली भ्रष्टाचार विरोधी (एसीबी) शाखेने वर्गखोल्यातील घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 20 जून रोजी चौकशीसाठी दुसरे समन्स पाठवले आहे. यापूर्वी 9 जून रोजी मनीष सिसोदिया यांनी काही कारणास्तव हजर राहण्यास नकार दिला होता.

  • 10 Jun 2025 06:38 PM (IST)

    सरकारने राष्ट्रीय सुरक्षा वर्तुळ कडक केले आहे: संरक्षण मंत्री

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, गेल्या अकरा वर्षांत, अंतर्गत सुरक्षेबाबत असो किंवा बाह्य शत्रूंपासून सुरक्षेबाबत असो, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आमच्या सरकारने राष्ट्रीय सुरक्षा वर्तुळ मजबूत आणि कडक केले आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रत्येक मुद्द्यावर आम्ही सरकारचा दृष्टिकोन आणि कृतीची पद्धत दोन्ही बदलली आहे.

  • 10 Jun 2025 06:26 PM (IST)

    देशातील पूर व्यवस्थापनाच्या तयारीबाबत अमित शहा यांनी घेतली मोठी बैठक

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्ली येथे देशातील पूर व्यवस्थापन तयारीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. त्यांनी देशातील पुराचा धोका कमी करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा आढावाही घेतला.

  • 10 Jun 2025 06:14 PM (IST)

    अमरावतीतील ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख सुनील खराटे भाजपाच्या वाटेवर?

    आमदार रवी राणा यांच्या विरोधात विधानसभा निवडणुक लढवणारे अमरावतीतील ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख सुनील खराटे हे रवी राणा यांच्या सोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला गेले आहेत. उद्धव ठाकरेंचे विश्वासु असलेले अमरावतीतील सुनील खराटे यांचा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.  चंद्रशेखर बावनकुळे, सुनील खराटे,आणि आमदार रवी राणा यांचा एकत्रित फोटो व्हायरल होत आहे.

  • 10 Jun 2025 06:02 PM (IST)

    पत्नीसोबत पतीनेही केली वडाची पूजा, सात जन्मी हीच पत्नी मिळू दे अशी प्रार्थना

    परळी : सात जन्म हाच पती मिळावा असं म्हणत आजचा वट सावित्री पौर्णिमेला महिला वडाच्या झाडाच पूजन करतात. आज गावाखेड्यात शहरामध्ये हा सण महिला मोठया उत्सहात साजरा करत आहेत. मात्र परळीत ऐश्वर्या व विद्या शिरसाट या जोडप्याने एकत्र वट वृक्षाचं पूजन करत पुढील सात जन्म हीच पती-पत्नी मिळावी यासाठी वडाची पूजा केली आहे.

  • 10 Jun 2025 05:55 PM (IST)

    संतोष लड्डा दरोडा प्रकरणी आतापर्यंत 17 आरोपींना अटक

    संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा पडल्या प्रकरणी आतापर्यंत 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे,

    एन्काऊंटर मध्ये ठार झालेला आरोपी अमोल खोतकर याच्या बहिणीकडे चौकशी केली असता,

    तिने सांगितल्या वरून, अमोल ने एका गाडीच्या डिक्की मध्ये दोन बॅग ठेवल्या आहेत,

    अशी माहिती दिली आणि त्या गाडीच्या दिग्गी मध्ये 30 किलो चांदी आढळून आली आहे,

    या दरोड्यामधील चोरी गेलेले साडेपाच किलो सोने शंभर टक्के रिकव्हर केले जाईल

  • 10 Jun 2025 05:29 PM (IST)

    उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका, विश्वासू नेता भाजपात जाणार?

    अमरावती ब्रेकिंग

    आमदार रवी राणा यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवणारे अमरावतीतील ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख सुनील खराटे रवी राणा यांच्या सोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला.

    उद्धव ठाकरेंचे विश्वासु असलेले अमरावतीतील सुनील खराटे यांचा भाजपमध्ये प्रवेश

    चंद्रशेखर बावनकुळे, सुनील खराटे,आणि आमदार रवी राणा यांचा एकत्रित फोटो व्हायरल..

  • 10 Jun 2025 05:27 PM (IST)

    अहिल्यानगातील जिल्हा रुग्णालयातून आरोपी फरार

    अहिल्यानगर
    जिल्हा रुग्णालयातून आरोपी फरार..
    जीवे मारण्याचा प्रयत्न आणि विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला सुनील लोखंडे असे आरोपीचे नाव
    जिल्हा रुग्णालयात गेल्या सहा दिवसांपासून होता उपचारासाठी दाखल..
    उपचार सुरू असताना बंदोबस्तासाठी असलेल्या गार्ड आणि हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांची नजर चुकून पळाला आरोपी..
    तत्कालीन पोलीस उपाधीक्षक संदीप मेटके यांच्यावर केला होता आरोपीने गोळीबार..
    तेव्हापासून नगर शहरातील कारागृहात होता शिक्षा भोगत..
  • 10 Jun 2025 05:03 PM (IST)

    ‘अजित पवार निधी देत नाही असं काहीजण म्हणतात, मी पैसे खिशात घेऊन बसतो का?’ शिंदेंच्या शिवसेनेवर अजितदादांचे अप्रत्यक्षपणे वक्तव्य

    अजित पवार यांनी भाषण करताना शिंदेंच्या शिवसेनेवर नाराजी व्यक्त करत अप्रत्यक्षपणे खोचक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, ” अजित पवार निधी देत नाही असं काहीजण म्हणतात, मी पैसे खिशात घेऊन बसतो का? सगळ्या गोष्टीचं सोंग करता येतं पण पैशांचं सोंग करता येत नाही.” असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

  • 10 Jun 2025 04:49 PM (IST)

    अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन, कार्यक्रमातून अजित पवार लाइव्ह

    अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन असून अजित पवार जनेशी संवाद साधत आहेत. ते म्हणाले की, “राष्ट्रवादी पक्ष शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा आहे. त्या विचारावर आमचा पक्ष पुढे जात आहे. काही लोक विचारतात तुम्ही भाजपसोबत गेला. 2019 रोजी आपण शिवसेनेसोबत सरकार केलं होतं. त्यावेळी देखील काही तडजोड केली होती. शेवटी विरोधी पक्षात बसून, घोषणा करून, आंदोलन करून, मोर्चे काढून चालत नाही. आपण साधू संत नाही. आपण लोकांना दिशा दाखवणारे लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि त्यातून बेरजेचं राजकारण करणारे आहोत.”असं म्हणत दादांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

  • 10 Jun 2025 04:36 PM (IST)

    शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक, अन्नत्याग आंदोलन

    शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आज पहिल्यांदा प्रशासनाकडून कडू यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली आहे. उपविभागीय महसूल अधिकारी सौ. मिन्नू पी. एन. व तिवसा तहसीलदार मयूर कडसे बच्चू कडू यांच्या आंदोलन स्थळी दाखल झाले आहेत. बच्चू कडू यांच्या प्रकृतीबाबत प्रशासनाने पहिल्यांदाच विचारपूस केली.

  • 10 Jun 2025 04:13 PM (IST)

    जयंत पाटलांचे प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचे संकेत, नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची पवारांना विनंती

    जयंत पाटलांचे प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचे संकेत असून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची पवारांना विनंती केली आहे. जयंत पाटलांनी नम्रपणे सत्कार नाकारला आहे. याआधीही अजित पवारांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाबद्दल आक्षेप घेतला होता.

  • 10 Jun 2025 03:13 PM (IST)

    पुणे – मुंबई महामार्गावर बालेवाडी येथे मोठी वाहतूक कोंडी

    राष्ट्रवादी अजित पवार गटाचा वर्धापन दिन बालेवाडी येथे पार पडत असून त्यामुळे पुणे – मुंबई महामार्गावर मोठी बालेवाडी येथे वाहतूक कोंडी झाली आहे. गेल्या दोन तासापासून वाहने अडकून पडली असून  शाळेची मुलं आणि सामान्य नागरिकांना मनस्ताप झाला आहे.

  • 10 Jun 2025 02:55 PM (IST)

    संपलेल्या माणसांना मला संजीवनी द्यायची नाही- नारायण राणे

    ‘मला त्यांच्या कुठल्याच प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही. मला त्यांच्या कुठल्याच प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही. मी त्यांना अनेक वर्ष ओळखत आहे. संपलेल्या माणसांना मला संजीवनी द्यायची नाही. त्यांच्यात काय दम आहे ते मी पाहिलं. ते ठाकरे यांची बाजू लावून धरतात की नाही मला नाहीत नाही’ असे नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

  • 10 Jun 2025 02:44 PM (IST)

    तृतीयपंथी बांधवांनी उत्साहात साजरी केली वटपौर्णिमा

    धुळे शहरात वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने तृतीयपंथीय एकत्र आले आहे. त्यांनी आई काळू देवी माता मंदिरामध्ये वडाची पूजा केली आहे. जन्मोजन्मी मातेची आणि गुरुची सेवा करण्याची संधी देवीने भक्तांना द्यावी अशी प्रार्थना यावेळेस तृतीयपंथी यांनी केली

  • 10 Jun 2025 02:21 PM (IST)

    माजी आमदार ज्ञानेश्वर ढोणे पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

    अमरावतीचे माजी आमदार ज्ञानेश्वर ढोणे पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश केला आहे. बाळासाहेब भवन येथे एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

  • 10 Jun 2025 01:59 PM (IST)

    बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा

    काँगेसचे नेते माजी मंत्री विश्वजित कदम ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा बच्चू कडू यांच्या बेमुद्दत अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा मिळाला आहे. विश्वजीत कदम यांनी फेसबुक पोस्ट लिहत दिला बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा तर ओमराजे निंबाळकर यांनी पाठिंब्याचं पत्र दिलं. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस सरकारकडून अजूनही दखल नाही.

  • 10 Jun 2025 01:50 PM (IST)

    धुळ्यात तृतीयपंथीयांकडून वडाची पूजा

    सातजन्मी हाच पती मिळू दे म्हणून महिला वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करतात, परंतु धुळ्यात तृतीयपंथी बांधवांनी सुद्धा मोठ्या उत्साहात वट पौर्णिमा साजरी केली. धुळे शहरात वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने तृतीयपंथीयांनी एकत्र येत आई काळू देवी माता मंदिरामध्ये वडाची पूजा केली.

  • 10 Jun 2025 01:40 PM (IST)

    नारायण राणे यांची टीका

    एकत्र येऊ द्या, चांगलं नांदू द्या. लोकांना बंधू- प्रेम दाखवून द्या. एकत्र आले तरी राजकारणात काही फरक पडणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका समोर असल्याने ते हालचाली करतात. काही फरक पडणार नाही. कोणत्याही पक्षाला, मी राज ठाकरे यांना काही सल्ला देऊ शकत नाही असे नारायण राणे म्हणाले.

  • 10 Jun 2025 01:27 PM (IST)

    कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी शपथ

    जगप्रसिद्ध जळगावच्या अंमळनेर मधील मंगळ ग्रह मंदिरावर कौटुंबिक हिंसाचार व विवाह संदर्भातल्या अनिष्ट प्रथा संदर्भात सामूहिक शपथ घेण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंगळग्रह मंदिरावर दर्शन घेण्यासाठी आलेल्या हजारो भाविकांनी हुंडा यासह विवाह समारंभातील अनिष्ट प्रथा तसेच कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी शपथ घेतली.

  • 10 Jun 2025 01:20 PM (IST)

    विरोधी बाकावर आपण प्रामाणिक काम केले- शरद पवार

    आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आहे. विरोधी बाकावर आपण प्रामाणिक काम केले असे शरद पवार कार्यक्रमात म्हणाले. त्यांनी यावेळी सहकाऱ्यांचे कौतुक केले. त्यांच्या कष्टामुळे राष्ट्रवादी उभी राहिल्याचे ते म्हणाले.

  • 10 Jun 2025 01:10 PM (IST)

    शरद पवारांना आर आर पाटील यांची आठवण

    ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आजच्या वर्धापन दिनाच्या भाषणात आर आर पाटील यांची आठवण काढली. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा उल्लेख ही त्यांनी केला.

  • 10 Jun 2025 01:01 PM (IST)

    कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा पक्ष – शरद पवार

    जयंत पाटलांनी अर्थमंत्री म्हणून 10 वर्ष काम केलं. शरद पवारांनी पक्ष स्थापनेत बोलताना सहकाऱ्यांचा कौतुक केलं. राष्ट्रवादी पक्ष सामान्य कुटुंबातल्या तरुणांना संधी देतो. कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. सामान्य माणसाला संधी मिळाली की तो कर्तुत्व दाखवू शकतो असं शरद पवार म्हणाले.

  • 10 Jun 2025 12:59 PM (IST)

    लक्ष्मण हाके यांचा अजितदादांवर पुन्हा हल्ला

    राष्ट्रवादीला धनगर समाजाचे एवढे पित्त का आहे असा सवाल हाके यांनी केला आहे. महाराष्ट्रातल्या दलित चळवळी कोणी फोडल्या? कामगार चळवळी कशा संपवल्या? शेतकरी संघटनेचे तुकडे कोणी केले? ऊसतोड मजुरांचे शोषण कोणी केले? असे सवाल लक्ष्मण हाके यांनी फेसबुक पोस्टद्वारे केले आहेत.

  • 10 Jun 2025 12:58 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेचा पाठिंबा मिळाला – शरद पवार

    लोकांची सेवा करायची संधी दिली. एक संदेश दिला. प्रशासन चालवायला सामान्य कुटुंबातल्या प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळाली तर तो कर्तुत्व दाखवू शकतो, राज्य चालवू शकतो. अनेकांची नाव सांगता येतील असं शरद पवार पक्ष स्थापनेच्या 26 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

  • 10 Jun 2025 12:55 PM (IST)

    कोयत्याचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार

    गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तरुणाच्या विरोधात एका महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार केली म्हणून ३० वर्षांच्या तक्रारदार महिलेचे राहत्या घरातून कोयत्याचा धाक दाखवून अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला.

  • 10 Jun 2025 12:18 PM (IST)

    नाव राष्ट्रवादी आणि काम जातीवादी – लक्ष्मण हाके

    “शरद पवारांनी संकटात साथ देणाऱ्या मित्रांची परतफेड शेंडगे घराण्याचे राजकारण संपवून केली तर छगनरावजी भुजबळ असो की प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे, लक्ष्मण माने हे नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत हेलकावे घालत राहिले. नाव राष्ट्रवादी आणि काम जातीवादी” असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय.

  • 10 Jun 2025 11:27 AM (IST)

    कर्जमाफीसाठी प्रहार कार्यकर्त्यांचे आणि शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

    शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ प्रहार कार्यकर्त्यांचे आणि शेतकऱ्यांकडून जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातील विश्रोळी धरणात जलसमाधी आंदोलन सुरु आहे.

  • 10 Jun 2025 11:15 AM (IST)

    पंढरपूर शहर आणि परिसरात जोरदार पावसाला सुरुवात

    पावसाने गेली काही दिवस उसंत घेतली होती. मात्र त्यानंतर आता पावसाने पंढरपूर शहर आणि परिसरात कमबॅक केलं आहे. 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस बरसतोय. पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दमदार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे.

  • 10 Jun 2025 11:12 AM (IST)

    येऊ का कणकवलीत? प्रकाश महाजन याचं नारायण राणेंना थेट आव्हान

    प्रकाश महाजन विरुद्ध नारायण राणे यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. वयाच्या 73 व्या वर्षी प्रकाश महाजन यांनी राणेंविरोधात दंड थोपाटले आहेत. येऊ का कणकवलीत? असं म्हणत महाजन यांनी राणेंना थेट आव्हान दिलं आहे. तसेच कणकवलीत जिथे बोलवाल तिथे मी येईन, असंही महाजन स्पष्ट म्हणाले आहेत. महाजनांनी नितेश राणेंवर टीका केली होती. त्यानंतर नारायण राणे यांनी 9 जून रोजी सोशल मीडिया पोस्टद्वारे सुनावलं होतं. त्यानंतर आता महाजन विरुद्ध राणे यांच्यात थेट वाद पाहायला मिळत आहे.

  • 10 Jun 2025 10:53 AM (IST)

    तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील माजी नगरसेवक विनोद गंगणेला न्यायालयाकडून पुन्हा पोलीस कोठडी

    तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरणी माझी नगरसेवक गंगणे यांस सुनावणी दरम्यान कोर्टाच्या आवारातून करण्यात आली होती अटक…  पोलीस कोठडी संपल्याने धाराशिव जिल्हा न्यायालयात केले होते हजर… धाराशिव न्यायालयाने गंगणे यांस पुन्हा 12 जून पर्यंत दिली पोलिस कोठडी… ड्रग्स प्रकरणात सुनावणी दरम्यान पोलिसांच्या भूमिकेवर न्यायाधीशांनी ओढले ताशेरे… तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील अटक आरोपींची संख्या 20, तर अजूनही 17 आरोपी फरार असल्याची माहिती…

  • 10 Jun 2025 10:40 AM (IST)

    मुंब्रा रेल्वेस्थानाकातील 4 प्रवाशांच्या मृत्यू दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेवरील लोकल प्रवासाचा प्रश्न ही ऐरणीवर

    पश्चिम रेल्वेवरील नालासोपारा रेल्वेस्थानक हा प्रवाशांच्या सर्वात मोठ्या गर्दीचे रेल्वे स्थानक आहे. अनेक प्रवासी हे आपला जीव मुठीत घेऊन, दारावर लोंबकळत जीवघेणा प्रवास करत असतात… त्यामुळे रेल्वे प्रशासनाने नालासोपारा रेल्वेस्थानाकात स्वतंत्र लोकल चालू कराव्यात अशी मागणी प्रवासी करत आहे.

  • 10 Jun 2025 10:27 AM (IST)

    चंद्रहार पाटलानं स्वार्थासाठी बेईमानी केली – संजय राऊत

    ज्या माणसाठी प्रतिष्ठा पणाला लावली तोही गेला… अपक्ष लढला असता तर 5 हजार मत पडली नसती.. आर्थिक लाभापोटी सर्व काही सुरु आहे… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे…

  • 10 Jun 2025 10:15 AM (IST)

    रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी बागासह इतर बागांच प्रचंड नुकसान

    हिंगोली याठिकाणी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी बागासह इतर बागांच प्रचंड नुकसान झालं आहे.

  • 10 Jun 2025 10:05 AM (IST)

    मुंब्रा रेल्वे दुर्घटना प्रकरणी मनसेचा धडक मोर्चा…

    मुंब्रा रेल्वे दुर्घटना प्रकरणी मनसेचा धडक मोर्चा… गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत मनसेचा मोर्चा सुरु… अविनाश जाधव यांच्यासह ठाणेकर, रेल्वे प्रवासी मोर्चात सहभागी

  • 10 Jun 2025 09:58 AM (IST)

    राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे स्वागत

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा २६ वा वर्धापन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे साजरा होत आहे. बालगंधर्व रंगमंदिरा समोर ढोल ताशाच्या गजरात येणाऱ्या कार्यकर्त्यांचं स्वागत केलं जात आहे.

  • 10 Jun 2025 09:47 AM (IST)

    बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरु

    बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलन तिसरा दिवसीही सुरु आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसह 17 मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ आज चांदूर बाजरमध्ये 50 पेक्षा अधिक कार्यकर्ते आणि शेतकरी मुंडन आंदोलन करणार आहे.

  • 10 Jun 2025 09:27 AM (IST)

    मध्य रेल्वे सेवा 15 ते 20 मिनिटे उशिराने

    कल्याण ते सीएसटीकडे जाणारी स्लो ट्रॅकवर मध्य रेल्वे सेवा 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहे. यामुळे मुंब्रा रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे.

  • 10 Jun 2025 09:08 AM (IST)

    पाच लाखांचे बियाणे जप्त

    यवतमाळच्या बाभुळगावात तालुक्यातील गवंडी येथे प्रतिबंधित 5 लाख 16 हजारांचे 400 बियाण्यांचे पॅकेट कृषी विभाग आणि पोलिसांनी जप्त केला. यावेळी तिघांना अटक केली असून दोन वाहनास एकूण 12 लाख 16 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

  • 10 Jun 2025 09:00 AM (IST)

    अमरावती- बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस

    अमरावती- बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी सह 17 मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ आज चांदुर बाजारमध्ये 50 पेक्षा अधिक कार्यकर्ते आणि शेतकरी मुंडन आंदोलन करणार आहेत.

  • 10 Jun 2025 08:50 AM (IST)

    जालना जिल्ह्याच्या विविध भागात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी

    जालना जिल्ह्याच्या विविध भागात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असलं तरी मात्र दुसरीकडे जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाल्याने शेतकरी खरीप हंगामातील लागवड आणि पेरण्या करण्यात व्यस्त असल्याचं दिसून येत आहे.

  • 10 Jun 2025 08:40 AM (IST)

    नाशिककरांकडून विमान सेवेची उच्चांकी गगन भरारी

    गतवर्षभरात तीन लाखापेक्षा अधिक प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला. ओझर विमानतळावरून शनिवारी 1334 नागरिकांनी प्रवास केला. नाशिक विमानतळावरून दिल्ली आणि बंगळुरू जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत अधिक वाढ झाली आहे.

  • 10 Jun 2025 08:30 AM (IST)

    मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमींवर सर्जरी

    मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील अपघातात जखमी झालेल्या चार रुग्णांवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सर्जरी होणार आहे. नऊ जणांवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज, ठाण्यातील सिव्हिल रुग्णालय आणि ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज कळवा रुग्णालयात असलेल्या सात जखमींपैकी चार जखमींवर शस्त्रक्रिया होणार असून यासाठी 16 डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून मिळत आहे.

  • 10 Jun 2025 08:20 AM (IST)

    मुंब्रा रेल्वे अपघातानंतर खबरदारी म्हणून वळण मार्गावर रेल्वेचा वेग कमी

    सोमवारी मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातानंतर रेल्वेने खबरदारी म्हणून वळण मार्गावर वेग कमी केला आहे. मात्र दुसरीकडे रेल्वे प्रवासी अजूनही फूटबोर्डवर उभे राहून प्रवास करताना दिसत आहेत.

Published On - Jun 10,2025 8:38 AM

Follow us
भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी
भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी.
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला.
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक...
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक....
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान.
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ.
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं.
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.