Maharashtra Breaking News LIVE : मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यातून स्टील बाहेर आल्याने उबाठा गट आक्रमक
Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

आमदार निवासात निकृष्ट जेवण दिल्याने संजय गायकवाडांनी राडा केला आहे. आकाशवाणी आमदार निवासातील कर्मचाऱ्याला गायकवाडांनी फटकावलं आहे. संजय गायकवाडांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला चांगलंच फटकावलं आहे. निकृष्ट आणि वास येणारी डाळ दिल्याने ते संतापले आहेत. “दहा-दहा दिवसांचं जेवण मिळतं, मग अशा लोकांची पूजा करायची का? मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये वारंवार तक्रार देऊनही यांना कळत नसेल तर आम्हाला आमच्या स्टाईलने उत्तर द्यावं लागेल. आज विधान भवनात हा विषय मांडणार,” अशा शब्दांत त्यांनी राग व्यक्त केला. तर दुसरीकडे मनसे नेते अविनाश जाधव हे ठाण्यातून मुंबईकडे रवाना झाले आहेत. संघटनात्मक बैठक असल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ते जात आहे. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलण्यास टाळलंय. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आदेश पाळत बोलण्यास टाळलंय. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
ब्रम्हपुरी तालुक्यातील शाळांना उद्या सुट्टी
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात उद्या शाळांना सुट्टी
जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि कॉलेज यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उद्या सुट्टी
गोसेखुर्द प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
जिल्ह्यातील पूर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता
या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शाळांना उद्या सुट्टी
-
रस्त्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचं होम हवन आंदोलन
रस्त्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचं होम हवन आंदोलन
अपूर्ण रस्त्यासाठी रस्त्यावरच मांडली 51 होमांची पूजा
एकलारा ते मुखेड व एकलारा देगलूर रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी
रस्त्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक
-
-
पुण्यात पुन्हा पावसाला सुरुवात
पुण्यात पुन्हा पावसाला सुरुवात
शहरातील सर्वच भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू
पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर आज हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट
पुणे शहरासह पिंपरी -चिंचवडमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस
-
विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट
विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात पुढील तीन ते पाच दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
-
धाराशिव: उमरगा तालुक्यातील कवठा शिवारात जुगार अड्ड्यावर छापा, 13 जण ताब्यात
उमरगा तालुक्यात कवठा शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून तिरट खेळणाऱ्या 13 जणांना अटक करण्यात आली आहे. यावेळी 17 लाख 58 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांनी ही कारवाई केली.
-
-
श्रमिक महासंघाची शिर्डीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य श्रमिक महासंघाच्या वतीने शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. विविध क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
-
नालासोपारा: बायको सोडून गेल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
नालासोपाऱ्यात बायको सोडून गेल्याने तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. सुरज सैनिक नावाचा हा तरुण आचोळे पोलीस ठाण्याजवळील एका पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याच्या तयारीत होता. थोड्या वेळाने पत्नीला आणल्यानंतर तो खाली उतरला.
-
मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यातून स्टील बाहेर आल्याने उबाठा गट आक्रमक
17 वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्याची अजूनही प्रतिक्षा आहे. तर दुसरीकडे नव्याने करण्यात आलेल्या कामाचा दर्जा घसरल्याने उध्दव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. महामार्गावरील पेण तालुक्यातील निगडे ब्रीज आणि कासू परिसरात स्टील आणि लोखंडी सळ्या बाहेर आल्याने ठेकेदाराचा गलथान कारभार उघडकीस आलंय.यामुळेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक होऊन सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
संतप्त कार्यकर्त्यांनी यावेळी सरकार विरोधात घोषणा देत आपला राग व्यक्त केला. “बंद करा बंद करा खोटी आश्वासने बंद करा, लक्ष द्या लक्ष द्या गडकरी साहेब लक्ष द्या” अशा घोषणा यावेळेस देण्यात आल्या.
-
सोलापुरात भाजी विक्रेत्यांचा आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या
सोलापुरातील भाजी विक्रेत्यांकडून महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. गळ्यात भाजीच्या पेंडीचा हार घालत महापालिकेविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. पूर्व भागातील 70 फूट रोडवरील भाजी विक्रेते यावेळेस आपल्या न्याय हक्कासाठी आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
70 फूट रोड परिसरातून दुसऱ्या जागी स्थलांतरित केल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आलीय, असं भाजीविक्रेत्यांचं म्हणणं आहे.
-
पुरामुळे अडकलेल्या 4 जणांच सुरक्षित रेस्क्यू
हिंगणघाट तालुक्यातील चाणकी येथे पुरामुळे अडकलेल्या 4 जणांच सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलं आहे. चाणकी जुनी वस्ती येथे रस्त्याच्या कामाकरता हे 4 जण आले होते. मात्र पुरामुळे चार जण अडकले. त्यानंतर जवळपास 3 तासांच्या प्रयत्नांनी चारही जणांचं सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलं.
-
जळगाव: ज्याच्यावर अंत्यसंस्कार सुरु होते तोच घरी चालत आला
मृतदेह समजून अंत्यसंस्कार करण्याची तयारी चालू असताना तोच प्रत्यक्षात घरी चालत आल्याने मोठा गोंधळ उडाल्याची घटना जळगाव येथे घडली आहे.
-
इमारतीच्या २१ व्या मजल्यावर अडकलेल्या मजूराची १५ तासांनी सुटका
अंडर कंट्रक्शन बिल्डिंगमध्ये काम करत असलेला एक कामगार २१ व्या माळ्यावर १५ तास अडकून राहिला.विद्युत पुरवठा खंडित झाल्याने तो अडकून राहिला होता. १५ तासाच्या अथक प्रयत्नानंतर व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
-
गिरणी कामगारांना कुर्ला आणि धारावीत घरे द्यावीत – उद्धव ठाकरे
गिरणी कामगारांना कुर्ला आणि धारावीत घरे द्यावीत अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आझाद मैदानात गिरणी कामगारांचा आज मोर्चाला उपस्थित राहिलेल्या उद्धव ठाकरे यांनी विधानभवनातही पत्रकारांनी बोलताना ही मागणी केली.
-
अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलाला लिफ्टमध्ये मारहाण
अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलाला लिफ्टमध्ये मारहाण झाल्याची घटना घडली आहे. एका रहिवाशाने ५ लगावत घेतला मुलाच्या हाताचा चावा घेतल्याचे उघड झाले आहे. बाहेर भेटल्यावर चाकूने मारहाण केल्याचीही धमकी दिली आहे.या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
-
काँग्रेस नेते नाना पटोले यांचा भाजपा सरकारवर निशाणा
काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले, “केंद्र सरकारचा लोकशाही व्यवस्थेवर विश्वास नाही. म्हणूनच ते निवडणूक आयोगाशी संगनमत करून जिंकण्याचे मार्ग शोधत राहतात… आज महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने ज्या प्रकारे एका मजुराला मारहाण केली, त्यामुळे ते सत्तेच्या नशेत आहेत. त्यांनी जनतेचा सर्व भय गमावला आहे.”
#WATCH मुंबई (महाराष्ट्र): कांग्रेस नेता नाना पटोले ने कहा, “केंद्र की सरकार को लोकतांत्रिक व्यवस्था पर भरोसा नहीं है। इसलिए चुनाव आयोग के साथ मिलकर खुदको जिताने का रास्ता बनाते रहते हैं…आज महाराष्ट्र में सत्ता पक्ष के एक विधायक ने एक मजदूर को जिस तरह से मारा, इनपर सत्ता की… pic.twitter.com/jVu8sNKkOm
— ANI_HindiNews (@AHindinews) July 9, 2025
-
वडोदरा पूल दुर्घटनेबद्दल पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
गुजरातमधील पूल कोसळण्याच्या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. ट्विटरवरील त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “वडोदरा येथे पूल कोसळल्याने झालेल्या जीवितहानी ही दुःखद आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती माझे संवेदना. जखमींना लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो.”
-
26/11 प्रकरण: तहव्वुर राणाच्या न्यायालयीन कोठडीत 13 ऑगस्टपर्यंत वाढ
नवी दिल्लीतील विशेष एनआयए न्यायालयाने 26/11 मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याची न्यायालयीन कोठडी 13 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. राणाला या वर्षी एप्रिलमध्ये अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात आले होते. एनआयएने राणाविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यावर १३ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
-
राजस्थान: चुरूमध्ये हवाई दलाचे विमान कोसळले, पायलटचा मृत्यू
राजस्थानमधील चुरू येथे हवाई दलाचे विमान कोसळले आहे. रतनगड येथे ही दुर्घटना घडली. ढिगाऱ्यातून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
-
पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेशव्यवसाय, पोलिसांनी केली 18 मुलींची सुटका
पुण्यातील विमानतळ आणि बाणेर या ठिकाणी सुरू असलेल्या दोन स्पा सेंटरवर पोलिसांनी छापेमारी करून तब्बल 18 मुलींची सुटका केली आहे. यामध्ये विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या स्पा सेंटर मधून 16 मुली तर बाणेर पोलीस ठाण्याच्या आधी सुरू असलेल्या स्पा सेंटर मधून दोन अशा एकूण 18 मुलींची सुटका करण्यात आली. स्पा चालक आणि मॅनेजर आणि अजून त्यांचे काही साथीदार यांच्यावर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस उपयुक्त सोमय मुंडे यांनी दिली आहे.
-
हिंगणघाट तालुक्यात नदीला आलेल्या पुरात चारजण अडकली
हिंगणघाट तालुक्यातील चानकी येथे यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे चार लोक अडकल्याची घटना घडली आहे. जुन्या चानकी परीसरात चार जण अडकले आहेत. रस्त्याच्या कामाकरीता आलेले लोक तेथे झोपडी बांधून राहत होते. रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाली. नागरिकांना रेक्यू करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक पोहोचलं आहे. हिंगणघाट तहसीलदार आणी अधिकारीसुद्धा घटनास्थळी पोहोचले आहेत.
-
संजय गायकवाड यांनी केलेली मारहाण चुकीचं आहे, फडणवीसांची प्रतिक्रिया
संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीवर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. ” आमदारानं असं मारहाण करणं चुकीच आहे. त्याने चुकीचा संदेश जातो” असं म्हणत फडणवीसांनी संजय गायकवाडांच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
-
गिरणी कामगारांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा
मुंबईतील गिरणी कामगारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पात गिरणी कामगारांना मुंबईबाहेर न पाठवता त्याच ठिकाणी घरे द्यावीत, या मागणीसाठी आज मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पूर्णपणे पाठिंबा आहे.त्यांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे आझाद मैदानात उपस्थित आहेत. “आज आम्ही सर्व गिरणी कामगार आझाद मैदानात येतोय. शिवसेना तुमचीच आहे. शिवसेना तुमच्यासोबत आहे. आणि सोबतच राहणार आहे.” असही त्यांनी म्हटलं.
-
सुप्रिया सुळे थोड्या वेळात स्वारगेट पोलीस ठाण्यात देणार तक्रार
राज्य शासनाचे खोटे जी आर प्रकरणात देणार तक्रार… जनतेची दिशाभूल होत आहे जीआर प्रसारित करणाऱ्यांवर कडक कारवाई करा.. सुप्रिया सुळे स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन देणार तक्रार
-
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात पावसाचे पाणी साचल्याने भुयारी मार्ग बंद..
दरवर्षी पावसाळ्यात भुयारी मार्गात साचते पावसाचे पाणी.. सद्या पावसाचे पाणी साचल्याने भुयारी मार्गावरील वाहतूक बंद.. रेल्वे क्रॉसिंगमुळे धामणगाव शहर दोन विभागात वसले असताना भुयारी मार्गात पाणी साचल्याने नागरिकांना नाहक त्रास..
-
मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील मासूलकसा घाट मध्ये दरड रस्त्यावर कोसळली
गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील मासुलकसा घाट येथे रस्त्यावर दरड कोसळली असून दरड काढण्याचे काम सुरू आहे. तर दरड कोसळल्याने सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही. काल दुपारच्या सुमारास देखील दरड कोसळली होती. त्यानंतर आज पुन्हा दरड कोसळल्याने काही काळापर्यंत महामार्गाची वाहतूक विस्कळीत झाली होती…
-
दहिसर – मध्यरात्री 6-7 घरांवर कोसळलं झाड, अनेक जखमी
दहिसर पूर्वेकडील केतकी पाडा येथे काल मध्यरात्री 3 च्या सुमारास एक जुनं झाड 6-7 घरांवर पडलं. या पडझडीमुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत आणि अनेक लोक जखमी झाले आहेत.
घटनेनंतर स्थानिक माजी नगरसेवक बालकृष्ण ब्रीद यांनी सरकारकडे परिसरातील अनेक मोठी झाडे छाटण्याची आणि तोडण्याची मागणी केली.
-
आमदार निवास कॅन्टीनमध्ये अन्न व औषध प्रशासन (FDA) दाखल
आमदार निवासस्थानाच्या कॅन्टीनमधील निकृष्ट जेवण आणि मारहाणीच्या वादळानंतर आता अन्न व औषध प्रशासन (FDA) सक्रिय झाले आहे. एफडीएचे अधिकारी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये दाखल झाले असून, त्यांनी कॅन्टीनमधील सर्व गोष्टींची आणि अन्नाची कसून तपासणी सुरू केली आहे.
आमदार संजय गायकवाड यांच्या तक्रारीनंतर आणि मारहाणीच्या माहितीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, आता कॅन्टीनच्या अन्नसुरक्षेची पोलखोल होणार आहे.
-
नागपूरमध्ये पावसाचा जोर वाढला, सखल भागात साचलं पाणी
नागपूरमध्ये पावसाचा जोर वाढला, सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची उडाली त्रेधातिरपीट. जिल्हाधिकारी फील्डवर असून ते बारकाईने पाहणी करत आहेत. विविध भागांत अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरू आहे.
-
राज्यात त्यांच्याकडे आमदार आहेत पण राज्याचं काही खरं नाही – सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
राज्यात त्यांच्याकडे आमदार आहेत पण राज्याचं काही खरं नाही, कारण त्यांच्यात ताळमेळ नाहीये अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
मुख्यमंत्री आणि त्यांचा विभाग खूप अंतर आहे, असंही त्या म्हणाल्या.
-
मुंबईत जोरदार पावसाला सुरूवात
मुंबईतील अनेक भागांत सध्या जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. दादर, वरळी, लोअर परेल आणि माटुंगा येथे पावसाची हजेरी.
-
आमदारांच्या जीवाशी खेळू नका – संजय गायकवाड
“आमदारांच्या जीवाशी खेळू नका. कॅन्टिन मालकाकडून अनेकांच्या आरोग्याशी खेळ. निकृष्ट जेवणासंदर्भात याआधी सुद्धा तक्रार केली होती. दिवसभर 10 हजार जण कॅन्टिनमध्ये जेवतात. रात्री समितीच्या चेअरमनला देखील सांगितलं आहे. मी जे केलं ते मान्य आहे. मला त्याचा पश्चाताप नाही” असं आमदार संजय गायकवाड म्हणाले.
-
मरीन ड्राईव्ह पोलीस कॅन्टीनमध्ये दाखल
आमदार निवासातील ‘राडा’ प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस कॅन्टीनमध्ये दाखल. चौकशी सुरू. चौकशी अहवाल पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता.
-
शिक्षकांना सन्मान मिळावा अशी भूमिका शासनाने घ्यावी – शरद पवार
शिक्षकांवर मागण्यांसाठी संघर्ष करण्याची वेळ. शिक्षकांवर इतर सरकारी कामांचीही जबाबदारी असते. शिक्षकांना सन्मान मिळावा अशी भूमिका शासनाने घेतली पाहिजे असं शरद पवार म्हणाले.
-
आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनला शरद पवारांची भेट
आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनस्थळी शरद पवार दाखल. शरद पवार यांच्यासोबत आमदार रोहित पवार, खासदार निलेश लंके उपस्थित आहेत. अनुदानाच्या मागणीसाठी कालपासून आंदोलन सुरु आहे.
-
फक्त आमदारांना 50 कोटी मिळालेत, ठेकेदारांना नाहीत – संजय राऊत
“फक्त आमदारांना 50 कोटी मिळालेत. ठेकेदारांना 50 कोटी मिळालेले नाहीत. कॅन्टीनमध्ये भ्रष्टाचार आहे. टॉवेलवर जाऊन मारहाण करायची. मी आज सीएमना टि्वटरच्या माध्यमातून कळवलय. ही आपल्या राज्यातील कायदा-सुव्यस्था आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
-
गडचिरोलीत मुसळधार पाऊस, सर्वत्र पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत
गडचिरोली जिल्ह्यात सध्या निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, अनेक महत्त्वाचे मार्ग बंद पडले आहेत. गोसीखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे जिल्ह्यात वारंवार पूर येतो, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गोसीखुर्द धरणातून पाण्याचे नियोजनबद्ध विसर्ग करण्यात यावे, तसेच राज्य आणि केंद्र सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील पुराची उंची वाढवून पूर परिस्थितीतून कायमची मुक्तता करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. विशेषतः छोट्या पुलांमुळे वारंवार वाहतूक खंडित होते, त्यामुळे या पुलांची उंची वाढवणे आवश्यक असल्याचे स्थानिक सांगतात.
-
वाशिममध्ये पिसाळलेल्या कुत्र्याला १० जणांना चावा, दोन जण गंभीर
वाशिम जिल्ह्यातील मानोरा शहरात काल दुपारच्या दरम्यान एक पिसाळलेला कुत्रा नागरिकांवर धावून जाऊन चावा घेत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या एका तासाच्या कालावधीत तब्बल १० जणांना चावा घेतल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.तर इतर किरकोळ जखमी झाले होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते त्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्याचा हा हैदोस थांबवण्यासाठी नागरिकांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे
-
रघुवीर घाटात संरक्षक भिंत कोसळली, पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण रघुवीर घाटात संरक्षक भिंत कोसळल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या घाटात मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात, मात्र आता कोसळलेल्या भिंतीमुळे येथे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
-
नाशिक- पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गोदावरी दारणा आणि कादवा नदीचा पूर ओसरला
नाशिक जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गोदावरी दारणा आणि कादवा नदीचा पूर ओसरला आहे. मात्र पुराचं पाणी दाखल होत असल्याने निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून 32 हजार 960 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या पावसाच्या हंगामात नांदूर मधमेश्वर धरणातून आज सकाळी सहा वाजेपर्यंत 28 टीएमसी पाण्याचा जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदी पात्रात विसर्ग करण्यात आला.
-
सोलापुरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर आता गुन्हा दाखल होणार
सोलापुरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर आता गुन्हा दाखल होणार आहे. सोलापूर महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांनी दंड न भरल्यास संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार आहे. सोलापूर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी बैठकीत अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहेत.
-
वर्ध्यात मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर
वर्ध्यात रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसंच कोचिंग सेंटर्सला सुट्टी जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी आदेश दिले आहेत.
-
संघटनात्मक बैठकीसाठी मनसे नेते अविनाश जाधव हे ठाण्यातून मुंबईकडे रवाना
मनसे नेते अविनाश जाधव हे ठाण्यातून मुंबईकडे रवाना झाले आहेत. संघटनात्मक बैठक असल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ते जात आहे. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलण्यास टाळलंय. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आदेश पाळत बोलण्यास टाळलंय.
-
आकाशवाणी आमदार निवासातील कर्मचाऱ्याला संजय गायकवाडांनी फटकावलं
आमदार निवासात निकृष्ट जेवण दिल्याने संजय गायकवाडांनी राडा केला आहे. आकाशवाणी आमदार निवासातील कर्मचाऱ्याला गायकवाडांनी फटकावलं आहे. संजय गायकवाडांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला चांगलंच फटकावलं आहे. निकृष्ट आणि वास येणारी डाळ दिल्याने ते संतापले आहेत.
Published On - Jul 09,2025 8:43 AM
