Maharashatra News Live : बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचा मोठा तडाखा, 246 गावांना अतिवृष्टीचा फटका
Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

भाजप नेते गोपीचंद पडलकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयत पाटील यांच्यावर आक्षेपार्ह शब्दा, खालच्या स्तराला जात टीका केली. त्यानंतर राज्यातील वातावरण तापलं असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. सोमवारी राष्ट्रवादीतर्फे विराट आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. नवरात्रीला अवघे दोन दिवस बाकी असल्याने कल्याणच्या कुंभारवाड्यात मूर्तीकारांची धावपळ सुरू झाली आहे. देवींच्या मूर्तींना साड्या, डायमंड सजावट आणि अंतिम टचअप देण्याचे काम जोमात सुरू आहे. शेतकरी अनुदान,पिक विमा, नुकसान भरपाई यासह कृषी विभागातील योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना पीक पाहणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आज ई पीक पाहणी करण्याचा शेवटचा दिवस आहे मात्र याचे सर्वर डाऊन असल्याने आणि तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे शेतकऱ्यांना पीक पाहणे करण्यासाठी मोठा अडथळा येत आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचा मोठा तडाखा, 246 गावांना अतिवृष्टीचा फटका
गेल्या आठ दिवसात बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने मोठा तडाखा बसल्याचं समोर आलंय. प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार तीन लाख 55 हजार पाच हेक्टर जमीन बाधित झाली असून सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आणि इतर पिकं पाण्याखाली गेल्याने करपून गेली आहेत. तर हजारो हेक्टर जमीन आलेल्या पुरामुळे खरडून गेली आहे. 11 तालुक्यातील 246 गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून यामध्ये 112 जनावरं दगावली आहेत चार व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत बाधित झालेल्या क्षेत्रापैकी 20% क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले असून शेतकऱ्यांकडून आता तात्काळ मदत देण्याची मागणी होत आहे. -
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांचा पुराच्या पाण्यातून प्रवास
जालना जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाल असून, प्रशासनाने झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान पंचनाम्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांची कसरत पाहायला मिळत आहे. जालन्यातील भाटेपुरी गावात जाण्यासाठी कर्मचाऱ्यांना चक्क पुंडलिका नदीच्या पुराच्या पाण्यातून दोरीच्या साह्याने प्रवास करावा लागला आहे.
-
-
सांगोला तालुक्यातील महिम येथे ओढ्यात दोघे जण वाहून गेले
सांगोला तालुक्यातील महिम येथे ओढ्यात दोघे जण वाहून गेले
पाण्याचा प्रवाह वाढल्याने सोमनाथ विठ्ठल ऐवळे( वय 16 )आणि श्रीधर किरण ऐवळे (वय 10) हे महिम ओढ्यामध्ये गेले वाहून
कुटुंबासोबत नवरात्रीनिमित्त आले होते कपडे धुण्यासाठी, याचवेळी घडली घडना
माहिती मिळताच स्थानिकांकडून ओढ्यात शोध कार्य सुरू
-
आमदार क्षीरसागर यांच्याकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पहाणी
अतिवृष्टीने बीड जिल्ह्यातील 3 लाख 55 हजार 5 हेक्टर इतकी जमीन बाधित झाली आहे. आमदार सुरेश धस यांच्यानंतर आता आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून देखील दोन दिवसांपासून नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरू आहे. आज त्यांनी शिरूर कासार तालुक्यातील बरगवाडी, घुगेवाडी, धनगरवाडी, कसपटे वस्ती, रोकडेश्वर नगरसह इतर भागात आणि गाव परिसरात पाहणी केली. यावेळी आमदार क्षीरसागर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.
-
एसटी महामंडळात होणार 17,450 कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती
एसटी महामंडळात होणार 17,450 कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती
आठ हजार नवीन बसेस साठी होणार भरती
2 ऑक्टोबर रोजी सुरू होणार निविदा प्रक्रिया
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या तीनशेव्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
-
-
पत्रकार मारहाण प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कारवाईचे आदेश
नाशिक मारहाण प्रकरणाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून दोषींना ताबडतोब अटक करून कारवाई करण्याचे आदेश त्यांनी नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षकांना दिले आहेत.
-
जोगेश्वरी स्पोर्ट्स क्लब येथे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
जोगेश्वरी स्पोर्ट्स क्लब येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती मध्ये पदाधिकारी बैठकाचे नियोजन केले आहे. मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील 46 वॉर्ड च्या पदाधिकारी यांची बैठक घेणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चे बांधणी सुरु आहे.
-
उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांची तब्येत खालावली
जालन्यात दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 4 था दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. डॉक्टरांनी दीपक बोऱ्हाडे यांना उपचार घेण्याची विनंती केली असली तरी त्यांनी मात्र बोऱ्हाडे यांचा उपचार घेण्यास नकार दिला आहे. माझ्या आयुष्यातील हे शेवटचं आरक्षण आंदोलन असल्याचं दीपक बोराडे यांचे म्हटले आहे.
-
कुंभमेळा समितीत साधू संतांचा नक्की विचार करु – चंद्रशेखर बावणकुळे
सरकारची जी काही समिती असते ती प्रशासकीय समिती असते, ही समिती वीज, पाणी, रस्ते इतर मूलभूत सुविधा यांच्यासाठी आहे, काही सूचना आणि तक्रारी असतील तर त्यासाठी वेगळं वेगळी समिती आहे आणि त्यावर साधुसंतांचा नक्की विचार होईल, त्यामुळे आपण जेव्हा प्रशासकीय निर्णय घेतो तेव्हा त्यावर इतर लोकांचा विचार करणं योग्य होत नाही असे भाजपा नेते चंद्रशेखर बावणकुळे यांनी म्हटले आहे.
-
शिवभोजन थाळी योजनेसाठी 200 कोटी रुपये मंजूर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना सुरु केलेली शिवभोजन थाळी योजना महायुती सरकार सुरु ठेवणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. शिवभोजन थाळी योजनेसाठी 200 कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
-
परभणीत कौटुंबिक न्यायालयात आग
परभणीत कौटुंबिक न्यायालयात आग लागल्याची घटना घडना आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.न्यायालयातून न्यायाधिशांसह कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.
-
गोंदियातील डवकी ते पुराडा मार्गावर खड्डेच खड्डे, वाहनचालकांचे अतोनात हाल
गोंदियातील डवकी ते पुराडा मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहनचालकांचे अतोनात हाल होत आहे. या रस्त्याची सात वर्षांपासून दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे आहेत. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अपघात होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे तातडीने दखल घ्यावी आणि रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी केली जात आहे.
-
गोंदियात लाचखोर सहाय्यक अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात
गोंदियात लाचखोर सहाय्यक अधीक्षकाला एसीबीने रंगेहात अटक केली आहे. सहाय्यक अधीक्षक एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात सापडला. पेन्शनसाठी लाच मागणाऱ्या अधीक्षकाला चिचगडमध्ये एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. मनोज जांभूळकर असं या सहाय्य अधीक्षकाचं नाव आहे. या अधिक्षकाला ग्रामीण रुग्णालयातच अटक करण्यात आली.
सरकारी कर्मचाऱ्याकडून 1 लाख 50 हजार लाच मागितली होती. मात्र तडजोडीनंतर 1 लाख घेतले. त्यानंतर या अधीक्षकाला एसीबीने पकडलं.
-
मुंबई अहमदाबाद महामार्गावर मनसेचे आंदोलन
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पडलेल्या खड्ड्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडी मध्ये दोन वर्षाच्या चिमुरड्या चा मृत्यू झाल्यामुळे विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. विरारच्या खानीवडे टोलनाक्यावर मनसेचे आंदोलन सुरू झाले आहे. महामार्गावरील खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी, दोन वर्षाच्या चिमुरड्या चा मृत्यू याला महामार्ग प्रशासन आणि ठेकेदार आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा ही मागणी ही मनसेने केली आहे.
-
शिवसेना शिंदे गटाची राऊतांवर टीका
शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांची संजय राऊत, उद्धव ठाकरेंवर टीका केली. राऊतांवर बोलून मला माझी जीभ विटाळून घ्यायची नाही असे त्या म्हणाल्या.
-
मनसेचा ट्रॅफिक मार्च
ठाणे वाहतूक विभाग आणि जिल्हा प्रशासनाची नव्याने अधिसूचना जाहीर केली आहे. जड आणि अवजड वाहनांसाठी दिनांक 20 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर सकाळी सहा ते रात्री 11 आणि सायंकाळी पाच ते रात्री 11 वाजेपर्यंत वाहतूक बंदीबाबत अधिसूचना निर्गमित केली आहे. नव्याने सूचना जाहीर केल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे.
अधिसूचनाशी होळी करत निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांचा आज सायंकाळी पाच वाजता महानगरपालिके जवळ ट्राफिक मार्च आयोजित केला आहे. गेल्या काही दिवसापासून वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागत आहे त्यातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा दौरा रद्द केल्यामुळे येणाऱ्या काळात वाहतूक कोंडीचा प्रश्न भेटणार का असा सवाल मनसेकडून करण्यात येत आहे.
-
पुण्यात पोलिसांची मोठी कामगिरी
नाना पेठेतील आंदेकर टोळीचा मोरक्या बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर याच्या मालमत्ताचा पुणे पोलिसांकडून शोध सुरू आहे. पोलिसांनी आतापर्यंत या टोळीची २७ बँक खाती फ्रीज केली आहेत. या खात्यामध्ये नव्याने ५० लाख रुपयांची रक्कम आढळून आली आहे. पोलिसांनी यापूर्वी आंदेकर याच्या घरातून लाखो रुपये रोख, सोन्या चांदीची दागिने, १० पेक्षा अधिक साठेखत जप्त केले होते.
-
शेतकऱ्याचा पुत्र म्हणून मी येणार आहे तुम्ही पक्षाचे पुत्र म्हणून या..देखेंगे कोण जितता आहे
बच्चू कडू यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांचं आव्हान स्वीकारलं. 5 ऑक्टोबरला बच्चू कडू जळगावला जाणार आहेत. गुलाबराव तुम्ही कमळाच्या प्रेमात अडकले आहे..तुम्ही कमळावर एवढं प्रेम का करता गुलाब एवढं चांगलं असताना, असा टोलाही कडू यांनी लगावला. मंत्र्याचं कुठे एक गाव असतं. मंत्र्याचं अख्ख गाव महाराष्ट्र असतं. पाच ऑक्टोबरला मी जळगावला येतो वहा मिलेंगे शेतकऱ्याचा पुत्र म्हणून मी येणार आहे तुम्ही पक्षाचे पुत्र म्हणून या..देखेंगे कोण जितता आहे गुलाबराव पाटलाच्या घरी जाऊ त्यांच्या गावात जाऊ, असे कडू म्हणाले.
-
आंदेकर टोळीची 27 बँक खाती फ्रीज
नाना पेठेतील आंदेकर टोळीचा मोहोरक्या बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर याच्या मालमत्ताचा पुणे पोलिसांकडून शोध सुरू आहे. पोलिसांनी आतापर्यंत या टोळीची 27 बँक खाती फ्रीज केली आहेत. या खात्यामध्ये नव्याने 50 लाख रुपयांची रक्कम आढळून आली आहे. पोलिसांनी यापूर्वी आंदेकर याच्या घरातून लाखो रुपये रोख, सोन्या चांदीची दागिने जप्त केले होते.
-
गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनात आंदोलन
गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राज्यभर तीव्र संताप आणि आंदोलन सुरू असताना सांगलीमध्ये पडळकर समर्थकांकडून प्रति आंदोलन करण्यात आले आहे.गोपीचंद पडळकर यांच्या तीस फुटी पोस्टरला दुग्धभिषेक घालून गोपीचंद पडळकर यांचे समर्थन करण्यात आले आहे. शहरातील राम मंदिर येथे गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांकडून हे आंदोलन करण्यात आले आहे.
-
जळगाव जिल्ह्यात 13 ते 16 सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान
जळगाव जिल्ह्यात 13 ते 16 सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे मुक्ताईनगर,जामनेर आणि पाचोरा या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून नुकसानीची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. मुक्ताईनगर, जामनेर आणि पाचोरा या तीन तालुक्यांमध्ये 77 गावांमध्ये नुकसान झाले झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. एकूण 14 हजार 40 एवढे शेतकरी बाधित झाले असून 11 हजार 370 हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झालं आहे.
-
पीक कर्जाच्या नावावर किमान 100 शेतकऱ्यांची फसवणूक
जिवती तालुक्यातील कोलाम आदिवासी शेतकऱ्यांची पीक कर्जाच्या नावावर फसवणूक. किमान 100 शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज. माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी उघडकीस आणलं हे प्रकरण. शोभाताई फडणवीस या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सख्ख्या काकू असून चंद्रपूर जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आहेत. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतून या कोलाम आदिवासी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेलं पीक कर्ज.
-
अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील 60 पेक्षा अधिक डॉक्टर 25 दिवसांपासून संपावर…
200 पेक्षा अधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्या; डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे प्रचंड हाल… शासनाने अजूनही कुठलाही तोडगा न काढल्याने काँग्रेस आक्रमक सुपर स्पेशालिटी रुग्णालयासमोर आंदोलन सुरू… सरकारकडे डॉक्टरांचे नऊ कोटी रुपयांचे मानधन थकल्याने डॉक्टर गेले संपावर… डॉक्टरांच्या संपावर सरकारने तोडगा काढण्याची रुग्णांची आणि काँग्रेसची मागणी..
-
उमरगा अक्कलकोट मार्गावरील वाहतूक बंद
उमरगा तालुक्यातील बेळम येथील नदीला पूर आल्यामुळे उमरगा अक्कलकोट मार्ग बंद झाला आहे. पुलावरुन पाणी वहात असल्याने अक्कलकोटला जाणाऱ्या व येणाऱ्या एसटी बस बंद करण्यात आल्या आहेत. सकाळपासूनच दोन्ही बाजूस अनेक वाहने अडकली आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी ताटकळले आहेत.
-
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला सुरुवात
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती… विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर कार्यक्रमाचे अध्यक्ष… प्रमुख उपस्थिती म्हणून अवंतिका विद्यापीठ उज्जैनचे कुलपती पद्मश्री डॉक्टर संजय धांडे उपस्थित… स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा 28 वा दीक्षांत समारंभ थाटात सुरू…
-
शासनाने कुंभाच्या पार्श्वभूमीवर शिखर समितीसह कुंभमंत्री समिती जाहीर केल्यानंतर साधू महंतांमध्ये नाराजी
नाशिकसह त्रंबकेश्वर येथील साधू महंतांची तातडीची बैठक… त्र्यंबकेश्वर येथे सर्व आखाड्यांचे प्रमुख बैठकीला उपस्थित राहणार… यापूर्वी कुंभ प्राधिकरणात स्थान न मिळाल्याने साधू महंतांनी व्यक्त केली होती नाराजी… शासनाच्या समितीमध्ये स्थान न दिल्याने साधू महंत काय भूमिका घेतात याकडे लक्ष
-
कांदा बाजारभाव प्रश्नी प्रहार संघटना आक्रमक…
नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर रस्ता रोको आंदोलन. येवला तालुक्यातील एरंडगाव येथे रस्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा सहभाग. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो जेसीपी ला अडकवत घातल्या सडक्या कांद्याच्या माळा…
-
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण सकाळी 100% भरले
105 टीएमसी पाणी साठवण क्षमतेच्या कोयना धरणात 105 टीएमसी पाणीसाठा पुर्ण झाला. धरण 100 टक्के भरले असून धरणातून 5300 कयुसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. धरणात 7181कयुसेक पाणी आवक होत आहे.
-
बार्शी तालुक्यात काल आगळगाव, उंबरगे गावात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शेतात पाणीच पाणी
ढगफुटी सदृश पावसामुळे ओढ्याने अक्षरशः प्रवाह बदलल्याचं पाहायला मिळाले. आगळगाव परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसाने उंबरगे येथील हावळे ओढ्याला पूर आला. पूराचे पाणी ओढ्यामध्ये न सामावल्याने ओढ्याचे पाणी शेतकऱ्याच्या शेतात घुसले.
-
अमरावती जिल्ह्यात प्रशासनाच्या उदासीनतेचा शेतकऱ्याकडून अनोखा निषेध
खराब झालेल्या सोयाबीन पिकाचे पंचनामे न केल्याने कृषी विभागाच्या निष्क्रियतेवर संतापाचा उद्रेक. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील सुजातपूर गावचे शेतकरी दयाराम राठोड यांनी छापली निमंत्रण पत्रिका.
-
नाशिकमध्ये सिडको परिसरात मद्यधुंद मुलींचा राडा
नाशिकमध्ये सिडको परिसरात मद्यधुंद मुलींचा राडा. काय करताय तुम्ही असे विचारणाऱ्या एकाला मारहाण करण्यात आली. मध्यरात्री स्टेट बँक चौकात झालेल्या या गोंधळात मुलींची गुंडगिरी दिसून आली.
-
अमरावती – नवीन सोयाबीन बाजारपेठेत येण्यापूर्वीच सोयाबीनचे दर घसरले….
अमरावती- शेतकऱ्यांचे नवीन सोयाबीन बाजारपेठेत येण्यापूर्वीच सोयाबीनचे दर घसरले. महिन्याभरापूर्वी 4500 ते 4700 रुपये प्रति क्विंटल विकल्या जाणाऱ्या सोयाबीनचा आता 4000 ते 4300 रुपये प्रति क्विंटल दर आहे. क्विंटल मागे शेतकऱ्यांचे तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंतचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्याचे नवीन सोयाबीन बाजारपेठेत आल्यानंतर आणखी दर घसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडू शकतो.
-
पंढरपूर अमरावती बसचा वाशिम जवळ अपघात, पाच ते सहा प्रवासी जखमी
वाशिमच्या कळंब महाली गावाजवळ पंढरपूरहुन अमरावतीकडे जाणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला असून यामध्ये पाच ते सहा प्रवासी जखमी झालेत. टायर पंक्चर झाल्याने रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला बसने जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली
-
नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूंसाठी, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका – विहिंपच्या सूचना
नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूंसाठी, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका अशा सूचना विश्व हिंदू परिषदेने नागपुरातील गरबा आयोजनकांना दिल्या आहेत. आधार कार्ड तपासून मगच गरब्यासाठी प्रवेश द्यावा, मुस्लिम तरूण गरब्यात आल्यास त्यांना पोलिसांच्या ताब्यात देऊ असं विहिंपने म्हटलं आहे.
-
गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचे पडसाद, सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये आज बंदची हाक
गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचे सांगलीत तिसऱ्या दिवशीही पडसाद उमटत आहेत. सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये आज बंदची हाक देण्यात आली आहे. बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या शब्दांत टीका केली होती.
-
शेतकरी वर्गातून ई पीक पाहणी प्रणालीला मुदतवाढ देण्याची मागणी
शेतकरी अनुदान,पिक विमा, नुकसान भरपाई यासह कृषी विभागातील योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना पीक पाहणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आज ई पीक पाहणी करण्याचा शेवटचा दिवस आहे मात्र याचे सर्वर डाऊन असल्याने आणि तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे शेतकऱ्यांना पीक पाहणे करण्यासाठी मोठा अडथळा येत आहे.
त्यामुळे शासनाने पुन्हा एकदा पीक पाहणी प्रणालीला मुदतवाढ द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
Published On - Sep 20,2025 8:50 AM
