Maharashtra Breaking News LIVE 16 January 2025 : डोंबिवलीत संतापजनक घटना, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 16 जानेवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोठ्या थकबाकीदारांच्या एकूण 41 निवासी आणि बिगरनिवासी मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया कर संकलन विभागाने सुरू केली आहे. या मालमत्तांचा लिलाव 30 जानेवारीला होणार आहे. कर संकलन कार्यालयाने मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करून जप्त केल्या आहेत, तरीही मालमत्ताधारकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने त्या मालमत्तांचा लिलाव जाहीर केला आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात म्हणजेच भिमाशंकर परिसरात आता स्ट्रॉबेरीचं नवं क्लस्टर तयार होतंय. मागच्या दोन वर्षात येथील शेतकऱ्यांची आणि स्ट्रॉबेरी क्षेत्राची 10 पटीने वाढ झाली असून जवळपास 3 हेक्टरच्या वर स्ट्रॉबेरीची लागवड झाली आहे. डोंबिवलीतील रो हाऊसच्या नावाखाली 44 लाखाची फसवणूक. विकासक आणि दोन साथीदारांविरुद्ध विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांचा तपास सुरू.
LIVE NEWS & UPDATES
-
डोंबिवलीत संतापजनक घटना, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
डोंबिवलीतून संतापजनक घटना समोर आली आहे. शिकवणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणात शिक्षिकेच्या भावाला बेड्या ठोकल्या आहेत. वैभव जितेंद्र सिंग असे आरोपीचे नाव आहे.
-
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो समोर
मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो समोर आला आहे. आरोपी रात्री 2 वाजून 33 मिनिटांनी परतत असताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. आरोपीचा चोरीचा उद्देश असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबतची माहिती मुंबई पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी दिलीय.
-
-
गोंदियात पोलीस हेड काँस्टेबलने संपवलं जीवन, कारण काय?
गोंदियातून एक वाईट बातमी समोर आली आहे. पोलीस हेड कांस्टेबलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. नवेगावबांध येथील ओएपीमधील ही घटना आहे. आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही. मात्र ट्रान्सफर झाल्यामुळे आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
-
प्रयागराज कुंभमध्ये विश्व हिंदू परिषदेची मोठी सभा होणार
विश्व हिंदू परिषदेने (VHP) प्रयागराज कुंभमेळा संकुलात 24 ते 26 जानेवारी या तीन दिवसीय परिषदेचे आयोजन केले आहे. संत आणि धर्मगुरू यांच्याशी मार्गदर्शन व संवाद प्रस्थापित करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. पहिल्या दिवशी केंद्रीय मार्गदर्शक मंडळाची बैठक होणार असून, त्यात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
-
फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये फिरत असल्याची चर्चा
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची चर्चा आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून मुक्तीधाम परिसरात पाहणी करण्यात आली. व्हायरल होत असलेले फोटो कृष्णा आंधळेचे नाहीत असं स्पष्टीकरण कृष्णा आंधळे यांनी दिलं आहे.
-
-
प्लेसेस ऑफ वॉरशिप ऍक्ट 1991 वर काँग्रेसचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज
प्लेसेस ऑफ वॉरशिप ॲक्ट 1991 प्रकरणी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दाखल केलेल्या या याचिकेत कायद्याचा बचाव करत धर्मनिरपेक्षतेचे रक्षण करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. भारताची धर्मनिरपेक्ष रचना टिकवून ठेवण्यासाठी हा कायदा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. या प्रकरणाची सुनावणी 17 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात होणार आहे.
-
राज्य मंत्रिमंडळाची बैठक पाच वाजता, धनंजय मुंडे येणार नाहीत!
मंत्रिमंडळाच्या बैठकीचं संध्याकाळी पाच वाजता आयोजन करण्यात आलं आहे. कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत.
-
सैफवर केलेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो- आव्हाड
सैफ अली खान याच्यावर केलेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो. गेली अनेक वर्षे सैफ अली खान याला त्याच्या मुलाचे नाव तैमुर ठेवल्याने टार्गेट केलं जात आहे. धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसं? या दिशेने तापस होणं आवश्यक आहे.
-
सैफ अली खानच्या घरात शिरणाऱ्या चोराचं लोकेशन सापडलं- सूत्र
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराचं लोकेशन सापडल्याची माहिती आहे. आरोपी प्रभादेवीमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. आरोपी वांद्र्यात ट्रेनमधून सैफच्या घरी गेला होता अशी प्राथमिक माहिती आहे. आरोपीने शेजराच्या इमारतीवरून सैफच्या इमारतीवर उडी घेऊन आत घुसल्याची माहिती आहे.
-
राष्ट्रवादीची दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी
राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांची नावे या यादीत आहे.
-
शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम नाहीच…
जालना जिल्ह्यात मागील वर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी,पूरस्थिती आणि ढग फुटी सदृश्य पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांचं अतोनात नुकसान झालं होत.या नुकसानी पोटी शासनाने जिल्ह्यासाठी 412 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला मात्र एक महिन्यापेक्षा अधिक काळ उलटून गेला तरीही शेतकऱ्याच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली नाही.
-
आठव्या वेतन आयोगास मंजुरी
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी बातमी दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सविस्तर वाचा…
-
पुण्यात दोन मित्रांमध्ये गोळीबार
पुणे शहरात अपघाताबरोबर दोन मित्रांमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली. दोन मित्रांच्या चेष्टा मस्करीतून वाद झाला. त्यानंतर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला .त्या एक जखमी झाला आहे.
-
हल्ल्याला धार्मिक रंग तर नाही ना? -जितेंद्र आव्हाड
सलमान खान, बाबा सिद्दीकी यांच्यानंतर मुंबई पुन्हा हादरली आहे. सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर आता विरोधकांनी सरकारला घेरले आहे. या हल्ल्याला धार्मिक रंग तर नाही ना? अशी शंका जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.
-
तुरीचे विक्रमी पीक
नवीन हंगामातील तुरीची अद्याप बाजारात आवक झालेली नाही. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या प्रांतात तुरीचे विक्रमी पीक आले आहे. देशांतर्गत तुरीची मागणी 42 लाख टनांची आहे. यंदा तेवढे उत्पादन देशांतर्गतच होण्याची शक्यता आहे. शिवाय बाहेरील देशांतून सुमारे 10 लाख टन तूर आयातीचे करार झालेले आहेत. यामुळे तुरीचा साठा हा मागणीपेक्षा जास्तीचा होणार आहे.
-
3 वर्षांसाठी पदाधिकारी निवड करा -चंद्रकांत खैरे
भाजपा, काँग्रेस प्रमाणे 3 वर्षासाठी पदाधिकारी निवड करावी अशी विनंती उद्धव ठाकरे यांना करणार असल्याचे चंद्रकांत खैरे म्हणाले. सर्व पदाधिकारी यांची उद्धव ठाकरे यांनी मिटिंग घेतली. आता कोणीही शिवसेनामध्ये किंवा भाजप मध्ये प्रवेश करणार नाही. आम्ही कोणाशीही युती न करता महापालिका निवडणूक लढवणार आहोत, असे खैरे म्हणाले.
-
गावठी कट्ट्यातून मित्रावरच गोळीबार
मोबाईल गेम खेळताना दोन मित्रांमध्ये चेष्टा मस्करी आणि वाद झाल्यानंतर एका मित्राने दुसर्या मित्रा वर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली. सिंहगड कॉलेज परिसरात गुरूवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. गोळीबार करणाऱ्या तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
-
पुण्यात सुसाट कंटनेरचा थरार
पुण्यात सुसाट कंटनेरचा थरार, 10 ते 15 जणांना उडवले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. एकाचा पायच कापला गेला आहे.
-
आरोपीला प्रभादेवीतून अटक
सैफ अली खान याच्यावर हल्ला प्रकरणात एका संशयिताला प्रभादेवीतून अटक केल्याचे समोर आले आहे.
-
सैफ अली खान आयसीयूमध्ये
एकूण 6 जखम होत्या त्यातील 2 खोलवर गंभीर जखमा झाल्याचे समोर आले. त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. गंभीर जखम बघता शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती यशस्वी पार पडली. आता प्रकृती स्थिर असून सैफ यांना आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं असून 3 मुख्य डॉक्टरांची टीम तसेच अन्य काही डॉक्टरांची टीम त्यांची प्रकृती मॉनिटर करत आहे..प्रकृतीबाबत आता चिंतेची बाब नाही, असे लीलावती रुग्णालयातील उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
-
चाकण शिक्रापूर रोडवर भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना ठोकरले, एकाचा मृत्यू
भरधाव कंटेनर ट्रकने अनेक वाहनांना धडक दिल्याने एकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याची घटना चाकण शिक्रापूर रोडवर घडली आहे.
-
आरोपीला अटक करण्यासाठी 10 पोलीस पथकांची स्थापना – पोलीस अधिकारी
प्रथमदर्शनी चोर चोरीच्या उद्देशाने सैफ अली खान यांच्या घरी घुसल्याची माहिती असून त्याच्या शोधासाठी 10 पथकांची स्थापना करण्यात आल्याचे पोलीसांनी म्हटले आहे.
-
प्राथमिकदृष्ट्या चोरीसाठी चोर सैफच्या घरात शिरल्याचे स्पष्ट – पोलीस
सैफ अली खान यांच्या घरी चोरीसाठी चोर शिरल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
-
मंत्री धनंजय मुंडे वैद्यनाथाच्या दर्शनाला
मंत्री धनंजय मुंडे परळी वैद्यनाथाचे दर्शन घेऊन त्यांच्या कार्यालयाकडे रवाना झाले आहेत.
-
कालव्यातून होणारा बेकायदेशीर पाणी उपसा थांबवा; विखे पाटलांच्या सूचना
कालव्यातून होणारा बेकायदेशीर पाणी उपसा थांबवा, अशा सूचना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. डोंगळे, मोटार लावून पाणी चोरी थांबवावी. वेळ आल्यास जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाची मदत घ्या. टेलपर्यंत पाणी प्रथम पोहोचवा, अशा सूचना विखे पाटलांनी दिल्या आहेत.
-
सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्या मोलकरीणीची पोलिसांकडून चौकशी
वांद्रे पोलीस पथकाने सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्या मोलकरीणीला पोलीस ठाण्यात आणलं असून तिची चौकशी केली जात आहे. जेव्हा ती व्यक्ती घरात शिरली, तेव्हा मोलकरीणीने सर्वांत आधी त्याला पाहिलं आणि आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर त्यावेळी घरात उपस्थित असलेला सैफ अली खान तिथे पोहोचला.
-
सैफ अली खानवर शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून त्याची प्रकृती स्थिर
सैफ अली खानवर शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. सैफवर आरोपीने सहा वार केले होते. लिलावती रुग्णालयात सैफवर उपचार सुरू आहेत.
-
सैफ अली खानच्या हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने कसली कंबर
सैफ अली खानच्या हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने कंबर कसली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या आठ टीम तपासात जुंपल्या आहेत. एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक देखील तपास करत आहेत.
-
सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी एकूण 15 टीमकडून तपास
सैफ अली खानवरील हल्ल्याचा तपास करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या 8 टीम स्थापना करण्यात आली आहे आणि मुंबई पोलिसांच्या 7 टीम कार्यरत आहेत. सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी एकूण 15 टीम तपास करत आहेत.
-
मुलाचं नाव तैमुर ठेवण्यात आलं तेव्हापासून सैफ टार्गेटवर – जितेंद्र आव्हाड
“सैफ अली खानवरील हल्ला पूर्वनियोजीत कटाचा भाग असू शकतो. त्याला जीवे मारण्याच्या हेतूने हल्ला करण्यात आला असेल. मुलाचं नाव तैमुर ठेवण्यात आलं तेव्हापासून सैफला टार्गेट केलं जात आहे” असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. सैफ अली खान याच्या हल्ल्यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
-
सैफची लेक लिलावतीमध्ये दाखल; वडिलांच्या तब्येतीची विचारपूस
अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री अडीच वाजता वाजण्याच्या सुमारास चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटनेंन सर्वांनाच विचारात पाडलं आहे. अभिनेत्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याच्या तब्येतीबद्दल चाहते चिंतेत आहेत. पोलिसांकडून चाहत्यांना शांतता ठेवण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. तसेच आता सैफची लेक सारा अली खानही लिलावतीमध्ये दाखल झाली आहे.
-
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीच्या दरात घसरण, सर्वसामान्यांना दिलासा
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूरीचे दर घसरले आहेत. साडेतेरा हजार प्रतिक्विंटल इतका दर झाला आहे. त्यामुळे आता तूरडाळचे दर देखील कमी होत आहेत. जवळपास 40 रुपये इतका दर तूरडाळ मध्ये कमी झाला आहे.यामुळे तूर डाळीचे गगनाला भिडलेले दर आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहेत.
-
बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर
बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर. बारामतीमधील कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने दोन्ही नेते एकाच मंचावर आले आहेत. मात्र शरद पवार आणि अजित पवार यांची आसनव्यवस्था एकमेकांच्या शेजारी नाही. त्या दोघांच्या खुर्चीमध्ये अजित जावकर यांची खुर्ची ठेवण्यात आली.
-
जबरी चोरी आणि मोक्काच्या गुन्ह्यातील 6 महिन्यापासून फरारी असलेला आरोपीला गुन्हे शाखेने घेतले ताब्यात
पुणे जबरी चोरी आणि मोक्काच्या गुन्ह्यातील 6 महिन्यापासून फरारी असलेला आरोपीला गुन्हे शाखा, युनिट-4 ने ताब्यात घेतले. युनिट-4 चे पथक पेट्रोलिंग करत असताना आरोपी अक्षय सुरेश गायकवाड याला आंबेडकर पुतळा डीपी रोड औंध येथून ताब्यात घेण्यात आले .
-
लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्यासाठी वाट बघावी लागणार
लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्यासाठी वाट बघावी लागणार, मकर संक्रातीला हप्ता येण्याची शक्यता होती . मात्र जानेवारीचा हप्ता देण्याचा अद्याप कुठलाच निर्णय नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हप्ता देण्याचे निर्णय होतात मात्र अद्याप यावर निर्णय नाही.
-
सैफ अली खानवर हल्ला करणारी व्यक्ती ही रात्रभर घरात दबा धरून बसली होती.
सैफ अली खानवर हल्ला करणारी व्यक्ती ही रात्रभर घरात दबा धरून बसली होती. रात्री २ वाजता त्याचा घरातील महिला कर्मचाऱ्यांशी वाद सूरु असल्याचा आवाज सैफ यांना आला. तो बाहेर आला आणि त्या व्यक्तीने सैफवर हल्ला केला. हल्लेखोर हा घरातील महिला कर्मचाऱ्यांशी संबंधित होता का ? तो आत कसा आला? तो चोरी करण्यासाठी आला होता का ? याचा पोलिस तपास करत आहेत.
-
आज धुळे जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपणार
आज धुळे जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपणार आहे. जिल्हा परिषदेबरोबरच चारही पंचायत समितीचा कार्यकाळ आज संपणार आहे. धुळे जिल्ह्यातील धुळे शिरपूर शिंदखेडा साक्री पंचायत समितीचा कार्यकाळ संपणार आहे. प्रशासक जिल्हा परिषदेसह पंचायत समितीचे कामकाज पाहणार आहे. धुळे जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या वतीने मुदत वाढवून मिळवण्यासाठी महासभेत ठराव करण्यात आला होता. जोपर्यंत निवडणुका लागत नाही तोपर्यंत प्रशासन बघणार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे काम पाहणार आहेत.
-
भाजपकडून दिल्ली विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी प्रसारित
भाजपकडून दिल्ली विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी प्रसारित करण्यात आली. महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, पीयूष गोयल हे स्टार प्रचारक असणार आहेत. तसेच सर्व भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री स्टार प्रचारक असतील, अशी माहिती देण्यात आली आहे.
-
वांद्रे पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक सैफ अली खानच्या घरी दाखल, सीसीटीव्हीची तपासणी सुरु
वांद्रे पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक अभिनेता सैफ अली खानच्या घरी पोहोचले आहे. पोलिस सैफ अली खानच्या इमारतीतील सीसीटीव्ही आणि आजूबाजूच्या इमारतींचे सीसीटीव्ही तपासत आहेत. हल्लेखोर कोण होता, तो कुठून आला आणि त्याने कोणत्या उद्देशाने हल्ला केला, याबाबतची माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही.
-
Saif Ali Khan Attack : पोलिसांनी कोणाचे फोन घेतले ताब्यात
पोलिसांनी सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या आणि सुरक्षेचे काम करणाऱ्या लोकांचे मोबाईल जप्त केले आहेत. पोलिसांनी काही लोकांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले आहे.
-
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर उपचार करणारे डॉक्टर कोण?
“सैफ अली खानला मध्यरात्री 3.30 वाजताच्या सुमारास लिलावती रुग्णालयात आणलं गेलं. त्याच्या शरीरावर एकूण सहा जखमा होत्या आणि त्यापैकी दोन खोलवर झाल्या आहेत. एक जखम त्याच्या पाठीच्या कण्याजवळ आहे. आम्ही त्याच्यावर उपचार करत आहोत. न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि अॅनेस्थेटिस्ट निशा गांधी त्याच्यावर उपचार करत आहेत. सैफवर सर्जरी झाल्यानंतरच आम्ही अधिक माहिती देऊ शकू”, असं लिलावती रुग्णालयाचे सीईओ नीरज उत्तमणी यांनी स्पष्ट केलं.
-
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच्या प्रकृतीबद्दल अपडेट
घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला. त्याला उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास सैफवर झाला हल्ला. त्याच्या शरीरावर एकूण सहा जखमा होत्या आणि त्यापैकी दोन खोलवर आहेत.
-
नाशिक भाजपमध्ये पक्ष विरोधी काम करणाऱ्यांना पुन्हा पक्षात घेऊ नका मागणी
पक्ष विरोधी काम करणाऱ्यांना पुन्हा पक्षात घेऊ नका. भाजपातील निष्ठावंत पाठवणार मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना अहवाल. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडलेले अनेक लोक परतीच्या वाटेवर. विधानसभा निवडणुकीत विरोधात काम करणाऱ्यांना पुन्हा घेऊ नये. अन्यथा पक्षात असंतोष निर्माण होण्याची व्यक्त केली भीती.
-
भिमाशंकर परिसरात स्ट्रॉबेरीचं नवं क्लस्टर
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात म्हणजेच भिमाशंकर परिसरात आता स्ट्रॉबेरीचं नवं क्लस्टर तयार होतंय. मागच्या दोन वर्षात येथील शेतकऱ्यांची आणि स्ट्रॉबेरी क्षेत्राची 10 पटीने वाढ झाली असून जवळपास तीन हेक्टरच्या वर स्ट्रॉबेरीची लागवड झाली आहे
-
अमरावतीकरांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी
अमरावतीकरांना आता मिळणार दोन वंदे भारत एक्स्प्रेस. अमरावती ते पुणे आणि अमरावती ते मुंबई धावणार वंदे भारत एक्सप्रेस. याबाबतचा प्रस्ताव मध्य रेल्वेने केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठवल्याची माहिती. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास पश्चिम विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार.
-
Saif Ali khan Attack : सैफ अली खानवर चाकू हल्ला
घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्याची माहिती आहे. सध्या त्याला उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Published On - Jan 16,2025 8:11 AM





