AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मलायकामुळे आमच्या नात्यात..’; जॉर्जियाने केला अरबाज खानसोबत ब्रेकअपचा खुलासा

अभिनेता-निर्माता अरबाज खानची एक्स गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानीने नुकताच ब्रेकअपचा खुलासा केला आहे. या मुलाखतीत जॉर्जिया तिच्या आणि अरबाजच्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. त्याचसोबत तिने अरबाजची पूर्व पत्नी मलायका अरोराचाही उल्लेख केला.

| Updated on: Dec 02, 2023 | 8:56 AM
Share
मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानी हिने अरबाज खानसोबत ब्रेकअप झाल्याचा खुलासा नुकत्याच एका मुलाखतीत केला. अरबाजसोबत ब्रेकअप झालं असलं तरी माझ्या मनात त्याच्याविषयी नेहमीच भावना असतील, प्रेम असेल, असंही ती म्हणाली.

1 / 8
'पिंकविला' या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत जॉर्जिया म्हणाली की तिला आणि अरबाजला या गोष्टीची जाणीव खूप आधीपासूनच होती की त्यांचं नातं फार काळ टिकणार नाही. मलायका अरोराला घटस्फोट दिल्यानंतर अरबाज जॉर्जियाला डेट करू लागला होता.

2 / 8
"तो माझा सर्वोत्कृष्ट मित्र आहे आणि माझ्या मनात त्याच्याविषयी नेहमीच भावना असतील. मलायकासोबतचं त्याचं नातं कधीच आमच्या नात्यात अडथळा ठरला नव्हता. पण अरबाजची एक्स गर्लफ्रेंड म्हणून माझी ओळख करून दिली तर मला खूप वाईट वाटतं. मला अपमानित केल्यासारखं वाटतं", असं जॉर्जिया म्हणाली.

3 / 8
गेल्या काही महिन्यांपासून अरबाज आणि जॉर्जियाच्या ब्रेकअपविषयीच्या चर्चा सुरू होत्या. या दोघांना एप्रिल महिन्यात आयपीएल सामन्यादरम्यान एकत्र पाहिलं गेलं होतं. मात्र त्यानंतर ते कधीच एकत्र दिसले नाहीत. अखेर ब्रेकअपच्या चर्चांवर जॉर्जियाने शिक्कामोर्तब केला आहे.

4 / 8
अरबाजसोबतच्या नात्यात कधीच लग्नाचा विचार केला नसल्याचंही जॉर्जियाने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. "आम्ही खूप चांगले मित्र आहोत. पण लग्नाचा विचार आम्ही कधीच केला नाही किंवा करणारही नाही", असं ती म्हणाली होती.

5 / 8
अरबाज आणि जॉर्जिया हे 2017 पासून एकमेकांना डेट करू लागले होते. अरबाजने मलायकाला 2017 मध्येच घटस्फोट दिला होता. मलायका आणि अरबाजला अरहान खान हा मुलगा आहे. सध्या मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करतेय.

6 / 8
जॉर्जियाचा जन्म 1989 मध्ये इटलीतील मिलान याठिकाणी झाला. तिने मार्टिन, बजरंगपूर, नॉन स्टॉप धमाल यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तिने मॉडेलिंगद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली.

7 / 8
2017 मध्ये तिने 'गेस्ट इन लंडन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र अरबाज खानसोबतच्या नात्यामुळे ती सर्वाधिक चर्चेत आली. अरबाजसोबत ती लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचीही चर्चा होती.

8 / 8
Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक