Photo : गुगलनं ‘या’ अभिनेत्रीला घोषित केलं ‘क्रश ऑफ द इयर’

रश्मिका मंदाना आणि तिच्या सर्व चाहत्यांना गुगलनं मोठा सुखद धक्का दिला आहे.(Google names this actress ‘Crush of the Year’)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:52 PM, 23 Nov 2020
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयानं सगळ्यांवर भूरळ पाडणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी लोकप्रिय आहे.
आता रश्मिका आणि तिच्या चाहत्यांना गुगलनं मोठा सुखद धक्का दिला आहे.
चक्क सर्च इंजिन गुगलनं तिला 'नॅशनल क्रश ऑफ इंडिया 2020 फिमेल' घोषित केलं आहे.
आता गुगलवर नॅशनल क्रश सर्च केल्यानंतर रश्मिकाचं नाव समोर येतं. सोबतच रश्मिका आता ट्विटरवरसुद्धा ट्रेंड मध्ये आहे.
24 वर्षीय रश्मिका दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये खूप लोकप्रिय आहे. रश्मिकानं कन्नड, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येसुद्धा काम केलं आहे.
तिला खरी ओळख 'गीता गोविंदम' या चित्रपटातून मिळाली.
रश्मिकानं 2016 मध्ये 'किरीक पार्टी' या कन्नड चित्रपटातून कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटातील अभिनयासाठी तिचं फार कौतुक झालं होतं.