PHOTO : पुण्यात कोरोनाचं थैमान, शवागृहे भरली, ‘ससून’बाहेर नातेवाईकांची रीघ

पुण्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. ससून रुग्णालयाच्या शवागृहातून मृतदेह घेऊन जाण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:50 PM, 12 Apr 2021
1/4
पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय. रुग्णसंख्येसोबत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणंही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येतोय.
2/4
पुणे शहरात कालपर्यंत कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा 5 हजाराच्या पुढे गेलाय. आज पहाटेपासून दुपारपर्यंत ससून रुग्णालयाच्या शवागृहात 30 मृतदेह ठेवण्यात आले होते.
3/4
आपल्या आप्तांचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी ससून रुग्णालयाबाहेर नातेवाईकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
4/4
ससूनबाहेर रुग्णवाहिका आणि मृतांच्या नातेवाईकांची गर्दी रुग्णालय परिसरातील वातावरण मन सुन्न करणारं बनलं आहे.