AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटीतून एकटेच मुंबईच्या दिशेने कूच करणार

| Updated on: Sep 15, 2026 | 9:27 AM
Share

Maharashtra News LIVE : मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णायक आमरण उपोषणाचा आजचा 18 वा दिवस आहे. ते आज मुंबईच्या दिशेने अंतरवाली सराटीतून एकटेच कूच करणार आहेत. जरांगे यांच्या आवाहनानंतरही आम्ही मुंबईला जाऊच, यावर मराठा बांधव ठाम आहेत.

Maharashtra News LIVE : मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटीतून एकटेच मुंबईच्या दिशेने कूच करणार
Maharashtra News LIVE Image Credit source: Tv9

LIVE NEWS & UPDATES

  • 15 Sep 2026 09:27 AM (IST)

    ऋषी पंचमी निमित्त गोदाघाटावर भाविकांची गर्दी

    ऋषी पंचमी निमित्त गोदाघाटावर भाविकांची गर्दी. मात्र गोदाघाटावर सुरू असलेल्या सिंहस्थ कामांमुळे भाविकांची गैरसोय. प्रशासनाकडून भाविकांना स्नानासाठी पर्यायी जागेची व्यवस्था. ऋषी पंचमी निमित्त गोदा स्नानाला महत्त्व

  • 15 Sep 2026 09:22 AM (IST)

    आम्हाला साथ देणारे सहकारी आमच्यात नाहीत- शरद पवार

    शरद पवार म्हणाले की,  “आम्हाला साथ देणारे सहकारी आमच्यात नाहीत. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी मी पुण्यात आलो, तेंव्हा माझी त्यांच्यासोबत भेट झाली, ती शेवट पर्यंत सोबत लाभली. मावळ तालुक्यात त्यांनी समाजकार्य सुरु केलं. सरपंच, सभापती ते मंत्री असा त्यांचा प्रवास होता. अतिशय कर्तृत्ववान कामगिरी त्यांनी केली. पुणे-मुंबई हा प्रवास करताना वडगाव मावळ आलं की आम्ही मदन बाफना यांना भेटायचो, हे ठरलेलं होतं. मात्र आता यात खंड पडणार आहे. आता त्यांचे पुत्र वडिलांचा वारसा सांभाळतील. मदन बाफना यांच्या पुत्राच्या पाठीशी आम्ही कायम राहू.”

  • 15 Sep 2026 09:18 AM (IST)

    मदन बाफना हे अल्पसंख्याक घटकातुन आले- दिलीप वळसे पाटील

    दिलीप वळसे पाटील म्हणाले, “मदन बाफना हे अल्पसंख्याक घटकातुन आले…सर्वच समाजाबरोबर त्यांचा संपर्क राहिला… शेवटच्या क्षणापर्यंत हे सामाजिक कामासाठी कार्यरत राहिले…कुटुंब वसल्य ते होते त्यांच्यासोबत कौटुंबिक संबंध राहिले आहेत…बाफना कुटुंबीयांना दुःख हलकं करण्याची ईश्वर ताकद देवो…

  • 15 Sep 2026 09:12 AM (IST)

    १२ ज्योतिर्लिंगांची धावती यात्रा करणाऱ्या मोनूचे त्र्यंबकेश्वरमध्ये उत्स्फूर्त स्वागत

    आईच्या आरोग्यासाठी नवस; १२ ज्योतिर्लिंगांची धावती यात्रा करणाऱ्या मोनूचे त्र्यंबकेश्वरमध्ये उत्स्फूर्त स्वागत. आईच्या उत्तम आरोग्यासाठी नवस करत १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा धावत पूर्ण करण्याचा मोनूचा संकल्प. बिहारमधील धावपटू मोनूची देशभर पायांनी धावत अनोखी यात्रा. आतापर्यंत ८ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास. मोनूने आतापर्यंत ५ ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण केले. आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये मोनूचे उत्स्फूर्त स्वागत. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, कैलास मोरे आणि योगेश महाले यांनी केले स्वागत. मोनूने Sapkal Knowledge Hub मधील विद्यार्थ्यांशी साधला संवाद. स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता, MPSC विद्यार्थ्यांच्या समस्या आणि विविध प्रश्नांवर मोनूने व्यक्त केले मत. मेहनत, सातत्य आणि ध्येयावर विश्वास ठेवण्याचा विद्यार्थ्यांना संदेश. आईच्या आरोग्यासाठी सुरू केलेला मोनूचा प्रवास ठरतोय श्रद्धा, जिद्द आणि तरुणांसाठी प्रेरणेचा संदेश

  • 15 Sep 2026 09:08 AM (IST)

    मनोज जरांगे पाटील आज एकटेच मुंबईला रवाना होणार

    मनोज जरांगे पाटील आज एकटेच मुंबईला रवाना होणार… साधारणता अकरा वाजता जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना होणार…जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील सोबत राहणार शेकडोंच्या संख्येने पोलीस बंदोबस्त…. 3 उपविभागीय पोलीस अधिकरी, 10 पोलीस निरीक्षक,30 पोलीस उपनिरीक्षक..200 सहायक पोलिस उपनिरीक्षक,490 पोलीस कर्मचारी,होमगार्ड-265 SRPF -3 तुकडी.. एवढ्या मोठ्या प्रमाणावर राहणार जरांगे यांच्यासोबत बंदोबस्त… मुंबई जात असताना कुठलही आंदोलन होऊ नये,रास्ता रोको होऊ नये अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी

  • 15 Sep 2026 09:00 AM (IST)

    सानपाडामध्ये एका दुकानात सिलेंडर ब्लास्ट झालाय

    सानपाडामध्ये एका दुकानात सिलेंडर ब्लास्ट झालाय. पाच दुकानाचे मोठे नुकसान. दोन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • 15 Sep 2026 08:51 AM (IST)

    पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर महिलांचं सामूहिक अथर्वशीर्ष पठण

    पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर महिलांचं सामूहिक अथर्वशीर्ष पठण होणार आहे. अथर्वशीर्ष पठणासाठी महिलांची मोठी गर्दी जमली आहे. दरवर्षी ऋषीपंचमीच्या निमित्ताने गणेशोत्सवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर समोर अथर्वशीर्ष पठण केलं जातं. जवळपास 35 हजार पेक्षा जास्त अथर्वशीर्ष पठण करण्यासाठी महिलांची संख्या आहे.

  • 15 Sep 2026 08:38 AM (IST)

    ऊन-सावलीच्या खेळामुळे रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ

    या महिन्यात पावसाने उघडीप दिली असली तरी दिवसा कडकडीत ऊन पडतं आणि रात्रीच्या वेळी थंडी वाजते. या परस्पर विरोधी हवामानामुळे सध्या विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. त्याबरोबर आता गणेश उत्सव सुरुवात झाल्याने खरेदी आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी झाल्याने त्या माध्यमातून श्वसन विषयक आजार असल्याच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे.

  • 15 Sep 2026 08:24 AM (IST)

    कल्याण- डोंबिवलीत शिवसेना-भाजप संघर्षाला नवं वळण

    कल्याण- डोंबिवलीत शिवसेना-भाजप संघर्षाला नवं वळण मिळालं आहे. गणपत गायकवाड समर्थक माजी नगरसेवकानं शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपच्या पक्षप्रवेशानंतर शिवसेनेनं पलटवार केला. कल्याण पूर्वेत भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थक आणि भाजपचे माजी नगरसेवक अनंता पावशे शिवसेनेत दाखल झाले आहेत. शिवसेना संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांच्या पुढाकाराने धर्मवीर आनंद दिघे यांच्या आश्रमात पक्षप्रवेश झाला.

  • 15 Sep 2026 08:21 AM (IST)

    मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपचार घेण्यास दिला नकार

    मनोज जरांगे पाटील यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांचं पथक दाखल झालं होतं. मात्र आज पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी उपचार घेण्यास नकार दिलेला आहे. डॉक्टरांकडून उपचार घेण्याची विनंती करण्यात आली.

  • 15 Sep 2026 08:16 AM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णायक आमरण उपोषणाचा आजचा 18 वा दिवस

    जालना- मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णायक आमरण उपोषणाचा आजचा 18 वा दिवस आहे. ते आज मुंबईच्या दिशेने अंतरवाली सराटीतून एकटेच कूच करणार आहेत. जरांगे यांच्या आवाहनानंतरही आम्ही मुंबईला जाऊच, यावर मराठा बांधव ठाम आहेत. मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील आता तिसऱ्यांदा मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारल्याने मी एकटाच जाणार, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं केलं होतं.

गणेशोत्सव काळात ध्वनी प्रदूषणाच्या पातळीचे निरीक्षण करण्यासाठी राज्यातील 27 शहरांमध्ये एकूण 132 निरीक्षण केंद्रांवर ध्वनी पातळीचं निरीक्षण करण्यात येणार आहे. या निरीक्षणाचा कालावधी सायंकाळी सहा ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सहा तास राहणार आहे. 15 , 19, 20 आणि 25 सप्टेंबर 2026 या दिवशी करण्यात येईल. दुसरीकडे गणेशोत्सवात निर्माण होणाऱ्या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत तयार करत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. गेल्या वर्षी सुमारे 900 टन निर्माल्यापासून 90 टन खत तयार केलं होतं. यंदाही निर्माल्य संकलनासाठी वेगवेगळ्या भागांत 328 निर्माल्य कलश ठेवण्याची व्यवस्था पालिकेनं केली आहे. यासह राज्यातील, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Published On - Sep 15,2026 8:10 AM

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती