Happy b’day Rahul Dravid : द्रविडला भारतीय क्रिकेटची The Wall बनवणारे हे 5 रेकॉर्ड्स माहीत आहेत का?

राहुल द्रविड जवळपास दीड दशक भारताकडून क्रिकेट खेळला आहे. जेव्हा त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले तेव्हा त्याचे एक टोपण नाव होते जॅमी. पण, भारतीय क्रिकेटची 'भिंत' बनून त्याने त्या नावाला अलविदा केला. त्याने केलेल्या काही अप्रतिम विक्रमांमुळे त्याला 'द वॉल'चे बिरुद मिळाले.

1/7
राहुल द्रविड (Rahul Darvid) या नावाला जागतिक क्रिकेटमध्ये कोणत्याही ओळखीची गरज नाही. नवनव्या खेळाडूंमधील गुण ओळखून त्यांच्यातून चांगले क्रिकेटपटू घडवण्याची क्षमता द्रविडमध्ये आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटमधील विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तो भारत अ संघाचा प्रशिक्षक होता, एनसीएचा प्रमुखदेखील होता आणि सध्या तो टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे, जो सध्या केपटाऊनमध्ये भारतीय संघासोबत आहे. या सगळ्या भूमिकांपूर्वी राहुल द्रविड सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आहे, हे विसरुन चालणार नाही.

2/7
राहुल द्रविड जवळपास दीड दशक भारताकडून क्रिकेट खेळला आहे. जेव्हा त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले तेव्हा त्याचे एक टोपण नाव होते जॅमी. पण, भारतीय क्रिकेटची 'भिंत' बनून त्याने त्या नावाला अलविदा केला. त्याने केलेल्या काही अप्रतिम विक्रमांमुळे त्याला 'द वॉल'चे बिरुद मिळाले. त्या रेकॉर्ड्सबद्दल सांगण्यापूर्वी जाणून घ्या की, आज राहुल द्रविडचा 48 वा वाढदिवस आहे. द्रविडचा जन्म 11 जानेवारी 1973 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला.

3/7
मध्य प्रदेशात जन्मलेल्या आणि कर्नाटकात क्रिकेट खेळून मोठा झालेल्या द्रविडचे असे 5 रेकॉर्ड आहेत, जे त्याला खर्‍या अर्थाने जगासमोर भारतीय क्रिकेटची भिंत म्हणून प्रस्थापित करतात. यातील पहिला रेकॉर्ड म्हणजे त्याने कसोटी क्रिकेटच्या क्रीजवर घालवलेला वेळ. राहुल द्रविडने त्याच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत 44,152 मिनिटे म्हणजेच 735 तास 52 मिनिटे क्रीजवर घालवली आहेत, हा एक विश्वविक्रम आहे. यादरम्यान त्याने 164 सामन्यांमध्ये 52.3 च्या सरासरीने 36 शतकांसह 13,288 धावा केल्या आहेत.

4/7
कसोटी क्रिकेटमध्ये 30000 पेक्षा जास्त चेंडू खेळणारा राहुल द्रविड हा जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 31,258 चेंडूंचा सामना केला, जो एक विक्रम आहे.

5/7
कसोटी क्रिकेटच्या पहिल्या 286 डावात एकदाही गोल्डन डक न मिळवण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे.

6/7
द्रविडची ही भिंत केवळ क्रिकेटच्या 22 यार्डच्या परिसरातच नव्हती. तर ही भिंत क्षेत्ररक्षणातही होती. चेंडू ही भिंती ओलांडून क्वचितच पुढे जाऊ शकला असेल. त्यामुळे कसोटीत सर्वाधिक 210 झेल घेणारा बिगर-यष्टीरक्षक खेळाडू होण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

7/7
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील राहुल द्रविड हा पहिला खेळाडू आहे ज्याने 300 पेक्षा जास्त धावांची भागीदारी दोनदा केली आहे.

Published On - 10:50 am, Tue, 11 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI