AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Australia Highlight Score, 3rd ODI: रोहित शर्मा- विराट कोहलीचा धमाका, भारताने तिसरा सामना जिंकला

| Edited By: | Updated on: Oct 25, 2025 | 9:00 PM
Share

India vs Australia Highlight Score and Updates, 3rd ODI : सलग 2 सामन्यांसह मालिका गमावणाऱ्या टीम इंडियाचा या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात सन्मनाजनक विजय मिळवून शेवट गोड केला. रोहित शर्माने या सामन्यात नाबाद शतक, तर विराट कोहलीने नाबाद अर्धशतकी खेळी केली . या सामन्यात नेमकं काय घडलं होतं? ते या ब्लॉगद्वारे जाणून घ्या.

India vs Australia Highlight Score, 3rd ODI:  रोहित शर्मा- विराट कोहलीचा धमाका, भारताने तिसरा सामना जिंकला
Australia vs India 3rd Odi Live Score and UpdatesImage Credit source: Tv9

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा वनडे सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड केला. खरं तर दोन सामन्यात पराभव झाल्यानंतर मालिका गमावली होती. पण तिसऱ्या सामन्यात व्हाईटवॉशचं सावट होतं. भारताने नाणेफेकीचा कौल या सामन्यातही गमावला आणि वाटेला प्रथम गोलंदाजी आली. भारताने भेदक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला 236 धावांवर रोखलं आणि विजयासाठी 237 धावांचं आव्हान मिळालं. खरं तर 34 षटकानंतर एक चेंडूमुळे हे आव्हान देखील कठीण झालं होतं. पण रोहित शर्माचं शतक आणि विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने हे आव्हान सहज गाठलं. 38.3 षटकात एक गडी गमवून हे आव्हान पूर्ण केलं.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 25 Oct 2025 03:42 PM (IST)

    AUS vs IND Live Score Updates : भारताने तिसरा वनडे सामना जिंकला

    भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना जिंकला. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी विजयी भागीदारी केली. दोघांनी मिळून नाबाद 168 धावांची भागीदारी केली. या दोघांच्या खेळीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाला 9 गडी राखून पराभूत केलं. खरं तर पहिल्या दोन वनडे सामन्यात पराभव झाल्याने भारताने ही मालिका गमावली होती. पण तिसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवून व्हाईटवॉशपासून भारतीय संघाला वाचवलं. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी 236 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने 38.3 षटकात 1 गडी गमवून पूर्ण केलं.

  • 25 Oct 2025 03:19 PM (IST)

    AUS vs IND Live Score Updates : रोहित शर्माचा खणखणीत शतक, टीम इंडियाच्या विजयाच्या उंबरठ्यावर

    रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सिडनीमध्ये खणखणीत शतक झळकावलं आहे. रोहितचं हे ऑस्ट्रेलिया विरुद्धचं नववं शतक ठरलं आहे.

  • 25 Oct 2025 03:01 PM (IST)

    AUS vs IND Live Score Updates : विराटचं अर्धशतक, रोहितसह दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी

    सलग 2 सामन्यांमध्ये झिरोवर आऊट झाल्यानतंर विराट कोहली याने अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे. तसेच रोहित आणि विराट या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी केली आहे.

  • 25 Oct 2025 02:30 PM (IST)

    AUS vs IND Live Score Updates : रोहितचा तडाखा, ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दुसरं अर्धशतक

    टीम इंडियाचा स्टार ओपनर रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दुसरं अर्धशतक झळकावलं आहे. रोहितने 63 चेंडूत अर्धशतक ठोकलं आहे. रोहितच्या कारकीर्दीतील हे 60 वं अर्धशतक ठरलं.

  • 25 Oct 2025 02:07 PM (IST)

    AUS vs IND Live Score Updates : टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण, रोहित-विराट जोडी जमली

    टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत.  रोहित शर्मा आणि विराट कोहली जोडी जमली आहे. भारताने 16 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 102 रन्स केल्या आहेत. रोहित 43 विराट 22 धावांवर नाबाद खेळत आहे.

  • 25 Oct 2025 01:46 PM (IST)

    AUS vs IND Live Score Updates : टीम इंडियाला पहिला झटका, कॅप्टन शुबमन गिल आऊट

    ऑस्ट्रेलियाने रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही सलामी जोडी फोडली आहे.  जोश हेझलवूड याने कॅप्टन शुबमन गिल याला आऊट केलं. शुबमन गिल याने 26 बॉलमध्ये 24 रन्स केल्या.

  • 25 Oct 2025 01:42 PM (IST)

    AUS vs IND Live Score Updates : रोहित-गिल सलामी जोडीची अर्धशतकी भागीदारी, टीम इंडियाची कडक सुरुवाते

    रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली आहे. या सलामी जोडीने पहिल्या 10 ओव्हरमध्ये 68 धावा केल्या आहेत. रोहित 31 आणि शुबमन 24 धावांवर खेळत आहेत.

  • 25 Oct 2025 01:25 PM (IST)

    AUS vs IND Live Score Updates : रोहित-गिल जोडीची संयमी सुरुवात, 6 ओव्हरमध्ये 35 धावा

    रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने भारताला 237 धावांचा पाठलाग करताना संयमी सुरुवात करुन दिली आहे. या सलामी जोडीने 35 धावा केल्या आहेत. रोहित 17 तर शुबमन9 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे.

  • 25 Oct 2025 01:00 PM (IST)

    AUS vs IND Live Score Updates : टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात, रोहित-गिल मैदानात, विजयासाठी 237 धावांचं आव्हान

    टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलिया विजयासाठी दिलेल्या 237 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडियाकडून रोहित शर्मा आणि कॅप्टन शुबमन गिल ही सलामी जोडी मैदानात आली आहे. ही जोडीकडून भारताला मोठ्या भागीदारीची आशा आहे.

  • 25 Oct 2025 12:29 PM (IST)

    AUS vs IND Live Score Updates : ऑस्ट्रेलिया आलआऊट, 236 वर काम तमाम

    टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 46.4 ओव्हरमध्ये 236 रन्सवर ऑलआऊट केलं आहे. त्यामुळे टीम इंडियाला विजयसाठी 237 धावा करायच्या आहेत. ऑस्ट्रेलियसााठी मॅथ्यू रेनशॉ याने सर्वाधिक 56 धावा केल्या. तर टीम इंडियासाठी हर्षित राणा याने सर्वाधिक 4 विके्टस घेतल्या. आता टीम इंडिया हे विजयी आव्हान पूर्ण करत कांगारुंना विजयी हॅटट्रिक करण्यापासून रोखणार का? याकडे लक्ष असणार आहे.

  • 25 Oct 2025 12:19 PM (IST)

    AUS vs IND Live Score Updates : नॅथन एलिस आऊट, ऑस्ट्रेलियाला आठवा झटका

    प्रसिध कृष्णा याने नॅथन एलिस याला आऊट करत ऑस्ट्रेलियाला आठवा झटका देत या मॅचमधील पहलिी वैयक्तिक विकेट मिळवली आहे. नॅथनने 19 बॉलमध्ये 16 रन्स केल्या.

  • 25 Oct 2025 11:53 AM (IST)

    AUS vs IND Live Score Updates : मिचेल स्टार्क आऊट, ऑस्ट्रेलियाला सातवा झटका, टीम इंडियाचं जोरात कमबॅक

    टीम इंडियाने जोरदार कमबॅक केलं आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 18 धावांच्या मोबदल्यात 4 झटके दिले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा स्कोअर आता 7 आऊट 201 असा झाला आहे. टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियाच्या उर्वरित 3 विकेट्स किती झटपट घेते याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.

  • 25 Oct 2025 11:48 AM (IST)

    AUS vs IND Live Score Updates : ऑस्ट्रेलियाला सहावा झटका, मिचेन ओवन आऊट, टीम इंडियाचं जोरात कमबॅक

    टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला झटपट 2 झटके देत बॅकफुटवर ढकललं आहे. वॉशिंग्टन सुंदर याने मॅट रेनशो याला एलबीडब्ल्यू आऊट केलं. त्यांनतर हर्षित राणा याने मिचेल ओवन याला रोहित शर्मा याच्या हाती कॅच आऊट करत ऑस्ट्रेलियासा सहावा झटका दिला आहे.

  • 25 Oct 2025 11:41 AM (IST)

    AUS vs IND Live Score Updates : ऑस्ट्रेलियाला पाचवा झटका, मॅट रेनशॉ आऊट

    वॉशिंग्टन सुंदर याने मॅट रेनशॉ याला एलबीडब्ल्यू आऊट करत ऑस्ट्रेलियाला पाचवा झटका दिला आहे. रेनशॉ याने 58 बॉलमध्ये 56 रन्स केल्या. रेनशॉ याने या खेळीत 2 चौकार लगावले.

  • 25 Oct 2025 11:28 AM (IST)

    AUS vs IND Live Score Updates : काय कॅच घेतलाय, श्रेयस अय्यरकडून चाबूक झेल, एलेक्स कॅरी आऊट

    श्रेयस अय्यर याने उलट दिशने धावत एलेक्स कॅरी याचा अप्रतिम कॅच घेतलाय. श्रेयसने हर्षित राणा याच्या बॉलिंगवर 34 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर एक नंबर कॅच घेतलाय. कॅरीने 37 बॉलमध्ये 24 रन्स केल्या.

  • 25 Oct 2025 11:21 AM (IST)

    AUS vs IND Live Score Updates : मॅथ्यू रेनशॉचं पहिलंवहिलं अर्धशतक, 48 चेंडूत 50 धावा पूर्ण

    मॅथ्यू रेनशॉ याने 34 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर 1 धाव घेत अर्धशतक पूर्ण केलं आहे. रेनशॉ याने एकदिवसीय मालिकेतील पहिलंवहिलं अर्धशतक हे 48 चेंडूत पूर्ण केलं. ऑस्ट्रेलिया आता 200 धावांच्या दिशेने अग्रेसर आहे.

  • 25 Oct 2025 11:13 AM (IST)

    AUS vs IND Live Score Updates : प्रसिध कृष्णाकडून मोठी चूक, एलेक्स कॅरीला जीवनदान

    प्रसिध कृष्णा याने केलेल्या एका चुकीमुळे टीम इंडियाला चौथ्या विकेटला मुकावं लागलं आहे. प्रसिधने ऑस्ट्रेलियाच्या डावातील 30 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर एल्केस कॅरी याचा 8 धावांवर कॅच सोडला. आता प्रसिधची ही चूक भारताला किती महागात पडणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

  • 25 Oct 2025 10:46 AM (IST)

    AUS vs IND Live Score Updates : विराटकडून कडक कॅच, मॅथ्यू शॉर्ट आऊट, कांगारुंना तिसरा झटका

    टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला काही अंतराने आणखी एक झटका दिला आहे. वॉशिंग्टन सुंदर याने मॅथ्यू शॉर्ट याला आऊट केलं आहे. विराट कोहली याने मॅथ्यू शॉर्ट याचा सुंदर कॅच घेतला. शॉर्टने 41 बॉलमध्ये 30 रन्स केल्या.

  • 25 Oct 2025 10:16 AM (IST)

    AUS vs IND Live Score Updates : बापू, एक नंबर, कॅप्टन मिचेल मार्श क्लिन बोल्ड, ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका

    अक्षर पटेल याने भारताला दुसरी विकेट मिळवून दिली आहे. अक्षरने ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मिचेल मार्श याला बोल्ड केलं आहे. सिराजने ट्रेव्हिस हेड याला आऊट करत भारताला पहिली विकेट मिळवून दिली होती. त्यानंतर टीम इंडिया दुसऱ्या विकेटच्या शोधात होती. अक्षर पटेलने ड्रिंक्स ब्रेकनंतर 16 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर मार्शला बोल्ड केलं. मार्शने 41 धावा केल्या.

  • 25 Oct 2025 10:11 AM (IST)

    AUS vs IND Live Score Updates : कॅप्टन मिचेल मार्श अर्धशतकाच्या दिशेने, ऑस्ट्रेलियाच्या 15 ओव्हरनंतर 88 रन्स

    ऑस्ट्रेलियाने 15 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 88 रन्स केल्या आहेत. मॅथ्यू शॉर्ट 10 तर कॅप्टन मिचेल मार्श 41 धावांवर नाबाद खेळत आहेत. टीम इंडिया मार्शला अर्धशतकाआधी रोखणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.

  • 25 Oct 2025 09:47 AM (IST)

    AUS vs IND Live Score Updates : ऑस्ट्रेलियाला पहिला झटका, ट्रेव्हिस हेड आऊट, सिराजने सेट जोडी फोडली

    वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने ऑस्ट्रेलियाची ट्रेव्हिस हेड आणि मिचेल मार्श ही सलामी जोडी फोडली आहे. सिराजने 10 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर हेडला प्रसिध कृष्णा याच्या हाती कॅच आऊट केलं. हेडने 25 बॉलमध्ये 29 रन्स केल्या. या दोघांनी  61 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली.

  • 25 Oct 2025 09:29 AM (IST)

    AUS vs IND Live Score Updates : ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीची आश्वासक सुरुवात, 6 ओव्हरमध्ये किती धावा?

    मिचेल मार्श आणि ट्रेव्हिस हेड या सलामी जोडीने ऑस्ट्रेलियाला आश्वासक सुरुवात करुन दिली आहे. ऑस्ट्रेलियाने 6 ओव्हरमध्ये बिनबाद 31 धावा केल्या आहेत. हेड 17 आणि मार्श 7 धावांवर नाबाद खेळत आहेत. तर टीम इंडिया पहिल्या विकेटच्या शोधात आहे.

  • 25 Oct 2025 09:05 AM (IST)

    AUS vs IND Live Score Updates : सामन्याला सुरुवात,ऑस्ट्रेलियाची बॅटिंग, हेड-मार्श सलामी जोडी मैदानात

    ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. कॅप्टन मिचेल मार्श आणि ट्रेव्हिस हेड सलामी जोडी मैदानात आली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून या अंतिम सामन्यात बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 25 Oct 2025 08:37 AM (IST)

    AUS vs IND Live Updates : भारताचे अंतिम 11 शिलेदार

    भारताचे अंतिम 11 शिलेदार : शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (डब्ल्यू), वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णा.

  • 25 Oct 2025 08:35 AM (IST)

    AUS vs IND Live Updates : ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन

    ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, अ‍ॅलेक्स केरी (विकेटकीपर), कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, नॅथन एलिस, मिचेल स्टार्क, अ‍ॅडम झँपा आणि जोश हेझलवुड.

  • 25 Oct 2025 08:33 AM (IST)

    AUS vs IND Live Updates : ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

    ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकला आहे. कर्णधार मिचेल मार्श याने बॅटिंगचा निर्णय केला आहे. आता भारतीय गोलंदाज कांगारुंना किती धावांवर रोखतात? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

  • 25 Oct 2025 08:24 AM (IST)

    AUS vs IND Live Updates : टीम इंडियाला सिडनीत 9 वर्षांनी विजयी होण्याची संधी

    टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2008 साली पहिला एकदिवसीय सामना जिंकला होता. त्यानंतर भारताने कांगारुंवर याच मैदानात 2016 साली मात केली. आता टीम इंडियाला 9 वर्षांनंतर पुन्हा एकदा कांगारुंना लोळवण्याची संधी आहे.

  • 25 Oct 2025 08:24 AM (IST)

    AUS vs IND Live Updates : थोड्याच मिनिटांत टॉस, कोण जिंकणार?

    इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसर्‍या आणि अंतिम सामन्याला थोड्याच वेळात भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 8 वाजून 30 मिनिटांनी टॉस केला जाणार आहे.

  • 25 Oct 2025 08:15 AM (IST)

    AUS vs IND Live Updates : टीम इंडिया सिडनीत तिसरा वनडे विजय मिळवणार?

    टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघांची एकदिवसीय सामन्यात आमनेसामने येण्याची ही 20 वी वेळ आहे. याआधी उभयसंघात एकूण 19 लढती झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने या 19 पैकी सर्वाधिक 16 सामने जिंकले आहेत. तर भारताला केवळ 2 वेळाच विजय मिळवता आला आहे. तर एका सामन्याचा निकाल लागला नाही.

  • 25 Oct 2025 08:01 AM (IST)

    AUS vs IND Live Updates : वनडे सीरिजसाठी यजमान ऑस्ट्रेलिया टीम

    ऑस्ट्रेलिया टीम : मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रेव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, अ‍ॅलेक्स केरी (विकेटकीपर), कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, झेव्हियर बार्टलेट, मिचेल स्टार्क, अ‍ॅडम झँपा, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमन, जॅक एडवर्ड्स, नॅथन एलिस आणि बेन द्वारशुइस.

  • 25 Oct 2025 07:59 AM (IST)

    AUS vs IND Live Updates : वनडे सीरिजसाठी टीम इंडिया

    एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा, शुबमन गिल (कॅप्टन), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसीद कृष्णा, ध्रुव जुरेल आणि यशस्वी जैस्वाल.

  • 25 Oct 2025 07:54 AM (IST)

    AUS vs IND Live Updates : शुबमनच्या नेतृत्वात टीम इंडिया अंतिम सामना जिंकणार?

    एकदिवसीय कॅप्टन म्हणून आपल्या पहिल्याच मालिकेत शुबमन गिल याला काही खास करता आलं नाहीय. शुबमनच्या नेतृत्वात भारताचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभव झालाय. तसेच भारताने 3 सामन्यांची मालिकाही गमावलीय. आता टीम इंडियासमोर तिसरा सामना जिंकून लाज राखण्याचं आव्हान आहे. टीम इंडिया या सामन्यात कशी कामगिरी करते? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

Published On - Oct 25,2025 7:51 AM

Follow us
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.