Anjali Damania : कारच्या डॅशबोरवर फेकली नोटांची बंडलं; अंजली दमानियांकडून सतीश भोसलेचा नवा व्हिडिओ ट्विट
Anjali Damania Shared Satish Bhosale's Video : सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसलेचा आणखी एक व्हिडिओ अंजली दमानिया यांनी आज ट्विट केला आहे. यात सतीश भोसले हा गाडीत बसून नोटांची बंडल मोजून फेकत असल्याचं दिसत आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून सतीश भोसलेचा आणखी एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे. सतीश भोसले याच्यावर आजच्या आज एफआयआर दाखल करण्याची मागणी यावेळी दमानिया यांनी केली आहे. सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. सुरेश धस यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली पाहिजे, असंही अंजली दमानिया यांनी म्हंटलं आहे.
अंजली दमानिया यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर सतीश भोसले याचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यात सतीश भोसले हा गाडीत बसलेला असून नोटांचे बंडल तो गाडीत टाकत आहे. पुढच्या सीटवर बसलेला सतीश भोसले हा एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेले नोटांचे बंडल मोजत असल्याचं दिसत आहे. मोजल्यानंतर हे बंडल तो गाडीच्या डॅशबोर्डवर फेकत आहे. हा व्हिडिओ ट्विट करून दमानिया यांनी भोसलेवर कारवाईची मागणी केली आहे.
Published on: Mar 06, 2025 12:17 PM
