Operation Sindoor : निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेतली; कर्नल सोफिया कुरेशीं फोटो दाखवून इत्यंभूत माहिती सांगितली

Operation Sindoor : निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेतली; कर्नल सोफिया कुरेशीं फोटो दाखवून इत्यंभूत माहिती सांगितली

| Updated on: May 07, 2025 | 12:58 PM

Colonel Sophia Qureshi : ऑपरेशन सिंदूरनंतर, लष्कराकडून पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती देण्यात आली. यावेळी कर्नल सोफिया कुरेशी यांनी या ऑपरेशनचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवून भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारताने पाकिस्तानातील 9 ठिकाणांवरती एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यात भारताने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांना उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरनंतर, लष्कराकडून पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती देण्यात आली. यावेळी लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी या मोहिमेबाबत माहिती दिली आहे.

कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले होते. या कारवाईत 9 दहशतवाद्यांचे अड्डे लक्ष्य करून नष्ट करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आली. मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या लपण्याच्या आणि प्रशिक्षणाच्या ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. मरकज सुभानल्लाह हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय होते. येथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असे. कोणत्याही लष्करी ठिकाणाला लक्ष्य करण्यात आले नाही आणि नागरिकांची जीवितहानी झाली नाही, अशी माहिती लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी टार्गेट असलेली आणि ती ठिकाणे उद्ध्वस्त झाल्याचे फोटो देखील दाखवले.

Published on: May 07, 2025 12:58 PM