Crime News : महाराष्ट्रातल्या तरुणीची पतीकडून बंगरुळूत हत्या; आरोपीच्या वडिलांनी सांगितला सर्व घटनाक्रम

Crime News : महाराष्ट्रातल्या तरुणीची पतीकडून बंगरुळूत हत्या; आरोपीच्या वडिलांनी सांगितला सर्व घटनाक्रम

| Updated on: Mar 28, 2025 | 2:11 PM

Bengaluru Crime News : महाराष्ट्रातल्या तरुणीची बंगळुरूमध्ये पतीने हत्या केली आहे. त्यानंतर पत्नीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून हा आरोपी पती महाराष्ट्रात आला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

महाराष्ट्रातल्या तरुणीची बंगरुळूमध्ये पतीकडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर या तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून आरोपी पती महाराष्ट्रात आला. मृत तरुणीच्या आई वडिलांना देखील त्याने याबद्दल फोनवरून माहिती दिली. पोलिसांनी पुण्यातून आरोपी पतीला ताब्यात घेतलेलं आहे. आरोपी राकेश याने गौरीच्या पालकांना याबद्दल माहिती दिल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेण्याआधी स्वत: देखील विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

या संपूर्ण प्रकाराबद्दल आरोपी राकेश याच्या वडिलांनी टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं की, मृत गौरी त्यांची भाची आहे. राकेश आणि गौरीने घरच्यांच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केला होता. मात्र राकेश आणि गौरी यांच्यात सारखे भांडण व्हायचे. 2 दिवसांआधी देखील त्यांच्यात भांडण झालं होतं. त्यावेळी गौरीच्या आईने तिला समजावलं होतं. मात्र त्यानंतर देखील त्यांच्यात काल वाद झाला. रागाच्याभरात राकेशने गौरीच्या मानेवर आणि पोटात चाकूने वार करून तिची हत्या केली. हत्येनंतर राकेशने आपल्या वडिलांना आणि गौरीच्या पालकांना फोन करून आपण गौरीला संपवलं असल्याचं सांगितलं. तसंच आपण देखील आत्महत्या करणार असल्याचं कळवलं. यानंतर पालकांनी पोलिसात धाव घेतली.

Published on: Mar 28, 2025 02:11 PM