Mumbai Heavy Rain : मुंबईकरांनो… पुढचे 3 ते 4 तास धोक्याचे? झोडपणाऱ्या पावसादरम्यान मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून मोठी अपडेट

Mumbai Heavy Rain : मुंबईकरांनो… पुढचे 3 ते 4 तास धोक्याचे? झोडपणाऱ्या पावसादरम्यान मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून मोठी अपडेट

| Updated on: Aug 18, 2025 | 11:55 AM

मुंबई आणि उपनगरात होत असलेल्या मुसळधार पावसाने सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. अशातच हवामान खात्याकडून मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याने नागरिकांची चिंता वाढलीये

मुंबईसह उपनगरात पावसाचा हाहाःकार पाहायला मिळतोय. आज सकाळपासून अंधेरी, कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, गोरेगावसह मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस होतोय. अशातच पुन्हा एकदा हवामान विभागाने मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला केल्याने आज मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त वर्तवण्यात येत आहे. मुंबई आणि रायगड या भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुढील तीन ते चार तास मुंबई पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरू असून सकाळपासून मुंबईत पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचे पाहायला मिळतंय. या मुसळधार पावसाचा फटका मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकल ट्रेनला देखील बसला आहे. पावसामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गाची लोकल सेवा उशिराने धावत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. अशातच पुढील ३ तासांत रायगड आणि मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून पुढील तीन ते चार तास अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

Published on: Aug 18, 2025 11:46 AM