Operation Sindoor : दहशतवाद्यांचा ठावठिकाणा शोधण्यात एनआयएला अडचणी

Operation Sindoor : दहशतवाद्यांचा ठावठिकाणा शोधण्यात एनआयएला अडचणी

| Updated on: May 07, 2025 | 7:12 PM

Pahalgam Terror Attack Updates : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील दहशतवाद्यांना शोधण्यात अडचणी येत असल्याने एनआयएने आता पर्यटकांना आवाहन केलं आहे.

एकीकडे भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून एअरस्ट्राईक केलं आहे. तर दुसरीकडे पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील दहशतवाद्यांना शोधण्यात अद्यापही एनआयएला यश आलेलं नाही. हे अतिरेकी शोधण्यात अनेक अडचणी येत असल्याने आता एनआयएने दहशतवाद्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी हल्ल्याच्या दिवशीचे किंवा एक दिवस आधीचे फोटो, व्हिडीओ पाठवण्याचे आवाहन केलेले आहे. अधिकृत नंबर जाहीर करत एनआयएने पर्यटकांना हे आवाहन केलेलं आहे. 9695958816, 01124368800 हे नंबर आता एनआयएने जारी केलेले आहेत.

Published on: May 07, 2025 07:12 PM