Khawaja Asif : भारतानं कबरडं मोडलं अन् पाकिस्तान वठणीवर, पाक संरक्षणमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; आम्ही सर्व संबंध…

Khawaja Asif : भारतानं कबरडं मोडलं अन् पाकिस्तान वठणीवर, पाक संरक्षणमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; आम्ही सर्व संबंध…

| Updated on: May 14, 2025 | 4:55 PM

ख्वाजा आसिफ यांनी असे म्हटले की, पाकिस्तान अजूनही दहशतवादाने त्रस्त आहे. अफगाणिस्तान आणि सोव्हिएत युद्धादरम्यान पाकिस्तानने अमेरिकेसाठी दहशतवादाला पोसले.

दहशतवादाला प्रोत्साहन देत असूनही पाकिस्तानने नेहमीच ते नाकारले आहे. मात्र दहशतवादी हल्ले करून पाकिस्तान नेहमीच भारतावर हल्ला करत असल्याचे पाहायला मिळते. नुकताच पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला हे याचे ताजे उदाहरण आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला करारा जवाब देण्यात आला. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी झाल्यानंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आणि ऑपरेश सिंदूर अजून संपलं नसल्याचे ठणकावून सांगितले. अशातच दहशतवादासोबतच्या संबंधाबाबत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचे एक नवं विधान समोर आले आहे.

ख्वाजा आसिफ यांनी एका मुलाखतीत म्हटले की, पाकिस्तानचे पूर्वी दहशतवादी संघटनेशी संबंध होते, परंतु आता पाकिस्तानचे त्यांच्याशी कोणतेही संबंध नाही, सर्व संबंध तोडले, असे म्हटले आहे. पाकिस्तानात अजूनही दहशतवाद आणि दहशतवादी संघटना सक्रिय आहेत का? असा सवाल त्यांना करण्यात आला होता. त्यावर ख्वाजा आसिफ यांनी हे उत्तर दिले.

Published on: May 14, 2025 04:41 PM