Solapur MNS BJP Clash : मनसे पदाधिकाऱ्याची हत्या, थेट चाकूनं भोसकलं अन्… भाजप नेत्यावर गंभीर आरोप, सोलापुरात खळबळ

| Updated on: Jan 03, 2026 | 11:33 AM

सोलापूरमध्ये मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वादातून गुप्तीने भोसकून हत्या करण्यात आली आहे. नातेवाईकांनी भाजपचे माजी नगरसेवक शंकर शिंदे आणि त्यांच्या पत्नी शालन शिंदे यांच्यावर आरोप केला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाची तोडफोड केली असून, पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

सोलापूर येथे मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वादातून हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. सोलापूर महापालिका निवडणुकीतील तिकीट वाटपावरून हा वाद सुरू झाला होता. सरवदे यांच्या नातेवाईकांनी भाजपचे माजी नगरसेवक शंकर शिंदे आणि त्यांच्या पत्नी शालन शिंदे यांच्यावर हत्येचा आरोप केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेब सरवदे यांच्या वहिनी सोलापूरच्या प्रभाग क्रमांक २ मधून भाजपच्या तिकिटासाठी इच्छुक होत्या. मात्र, शंकर शिंदे यांच्या पत्नी शालन शिंदे यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे सरवदे यांच्या वहिनींनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शंकर शिंदे यांच्याकडून दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. अर्ज मागे घेतल्यानंतर जाब विचारण्यासाठी बाळासाहेब सरवदे त्यांच्या भावासह शंकर शिंदे यांच्या कार्यालयात गेले असता त्यांची गुप्तीने भोसकून हत्या करण्यात आली.

या घटनेनंतर संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी भाजपच्या शंकर शिंदे यांचे संपर्क कार्यालय फोडले. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले असून, सोलापूर शहरात तणाव वाढू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही घटना महाराष्ट्रासाठी चिंताजनक मानली जात आहे.

Published on: Jan 03, 2026 11:33 AM