Raj Thackeray | मुंबई महापालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्याशी भेट; राज ठाकरे स्पष्टच बोलले…

Raj Thackeray | मुंबई महापालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्याशी भेट; राज ठाकरे स्पष्टच बोलले…

| Updated on: Feb 20, 2026 | 2:33 PM

विरोधी पक्ष आणि राज्यकारभाराबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. ठाकरे म्हणाले की, “पूर्वी महाराष्ट्रात एक निकोप राजकारण होतं. निवडणुका झाल्या की सगळे एकमेकांना भेटायचे, काही बोलणं व्हायचं.” त्याचबरोबर ठाकरे यांनी विरोधी पक्षाने त्यांची भूमिका स्पष्टपणे पार पाडावी, असे म्हटले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ही भेट एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी नंदनवन बंगल्यात झाली. त्यावेळी शिंदे यांनी राज ठाकरे यांचा सत्कार केला. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चाही झाली. या भेटीत विविध राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचे समजते. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर ही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची पहिली भेट होती. यावर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा देखील रंगल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधी पक्ष आणि राज्यकारभाराबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. ठाकरे म्हणाले की, “पूर्वी महाराष्ट्रात एक निकोप राजकारण होतं. निवडणुका झाल्या की सगळे एकमेकांना भेटायचे, काही बोलणं व्हायचं.” त्याचबरोबर ठाकरे यांनी विरोधी पक्षाने त्यांची भूमिका स्पष्टपणे पार पाडावी. असे म्हटले, “जिथे सरकार चुकी करेल तिथे विरोधी पक्षाने ठणकावलं पाहिजे आणि उद्या आम्ही जरी सरकारमध्ये असलो तरी हीच भूमिका ठेवली पाहिजे.” ठाकरे यांनी पुढे सांगितले की, “राज्य अशाच पद्धतीने चालले पाहिजे तरच लोकांच्या हाताला काही गोष्टी लागतील, अन्यथा काहीही साध्य होणार नाही.”

Published on: Feb 20, 2026 02:33 PM