Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका

Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका

| Updated on: Apr 01, 2025 | 2:03 PM

Santosh Deshmukh Case Updates : कळंब येथील महिलेची हत्या होण्याआधी पोलिसांनी तपास करणं गरजेचं होतं, असं संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी म्हंटलं आहे.

धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार आहेत. कळंब येथील महिलेची हत्या होण्याआधी पोलिसांनी तपास करणं गरजेचं होतं, असं धनंजय देशमुख यांनी म्हंटलं आहे. बीड कारागृहातील परिस्थिती व्यवस्थित नाही, अशी प्रतिक्रिया देखील धनंजय देशमुख यांनी दिली आहे. कारागृहातील इतर आरोपींना दुसऱ्या ठिकाणी हलवलं. पण संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी एकाच जेलमध्ये असल्याचं देखील धनंजय देशमुख यांनी म्हंटलं आहे. जेल प्रशासनावर असलेल्या शंकेसाठी लेखी तक्रार देखील आम्ही केलेली आहे. मात्र त्याचं उत्तर अद्याप आलेलं नाही. आधीच्या आरोपींना हलवलं जातं आहे. पण या आरोपींना तिथेच ठेवलं जातं आहे याचं नेमकं गणित काय आहे? त्याच स्पष्टीकरण दिलं गेलं पाहिजे, अशी मागणी यावेळी धनंजय देशमुख यांनी केली आहे.

Published on: Apr 01, 2025 02:02 PM