पुण्याच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार नाही – अजित पवार

पुण्याच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार नाही – अजित पवार

| Updated on: Feb 12, 2022 | 12:07 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी पुण्याच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. किंबहूना या सेंटरच्या कामात कोणताही राजकीय सहभाग नव्हता, असा दावा केला आहे. अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

मुंबईभाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरच्या (jumbo covid centre) भ्रष्टाचारावरून रान माजवलं आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी पुण्याच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. किंबहूना या सेंटरच्या कामात कोणताही राजकीय सहभाग नव्हता, असा दावा केला आहे. अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. अजित पवार यांनी आज पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत पहिला विषय जम्बो कोविड सेंटरचा निघाला. त्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार या सेंटरच्या उभारणीत कोणताही घोटाळा झाला नाही. पारदर्शक काम झालं आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं.