Vaishnabi Hagawane Case : मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत; कसपटे कुटुंबाचं स्पष्टीकरण

Vaishnabi Hagawane Case : मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत; कसपटे कुटुंबाचं स्पष्टीकरण

| Updated on: May 28, 2025 | 7:58 PM

Vaishnavi Hagawane Case Updates : वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी न्यायालयात झालेल्या वकिलांच्या युक्तीवादावर स्पष्टीकरण दिलं आहे.

वैष्णवीचा मोबाईल कधीही काढून घेतलेला नाही, असं कसपटे कुटुंबाने म्हंटलेलं आहे. तसंच वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात असल्याचं देखील कसपटे कुटुंबाचं म्हणण आहे. आज न्यायालयात हगवणे कुटुंबाच्या वकिलाने केलेल्या युक्तिवादावर कसपटे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

वैष्णवी हगवणे नको त्या व्यक्तीसोबत बोलायची, त्याने नकार दिला असेल म्हणून वैष्णवीने आत्महत्या केली असा युक्तिवाद हगवणे यांच्या वकिलाने आज न्यायालयात केला आहे. तसंच प्लॅस्टिकच्या छडीने मरणं म्हणजे मारहाण होत नाही असंही वकिलांनी म्हंटलं आहे. त्यावर आता वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत. आम्हाला न्यायदेवतेवर आणि पोलिसांच्या तपासावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही कधीही तिचा मोबाईल काढून घेतला नव्हता. त्यांनी काढून घेतला असेल तर आम्हाला माहीत नाही. त्यांनी केलेल्या अनाठायी मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला एक बिल्डर गाठून त्याच्याकडून अॅडव्हान्स पैसे घ्यावे लागले होते. त्याबदल्यात आम्हाला आमची जमीन त्यांना द्यावी लागली, असा मोठा खुलासा यावेळी कसपटे यांनी केला आहे.

Published on: May 28, 2025 07:58 PM