Satish Bhosale News : खोक्याला पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला?

Satish Bhosale News : खोक्याला पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला?

| Updated on: Mar 12, 2025 | 6:58 PM

Satish Bhosale Crime News : आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसले हा शिरूर मारहाण प्रकरणात आरोपी आहे. गेल्या काही दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र आज बीड पोलिसांनी अखेर त्याला अटक केली आहे.

शिरूर मारहाण प्रकरणातील आरोपी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले हा अटक होण्यापूर्वी कुठे कुठे गेला होता. पोलिसांच्या जाळ्यात तो कसा अडकला? याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. 10 तारखेला सतीश उर्फ खोक्या भोसले याने टीव्ही9 मराठीला मुलाखत दिली होती. मुलाखतीनंतर सतीश छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्कामाला होता. 11 तारखेला बीड पोलिस सतीशचा शोध घेण्यासाठी त्याच्या मागावर निघाले. त्यावेळी खोक्या संभाजीनगरमध्येच नाव बदलून एका हॉटेलमध्ये राहात होता. त्यानंतर तो तिथूनच प्रयागराजच्या दिशेने रवाना झाला अशी माहिती सूत्रांनी दिली. 12 तारखेला स्थानिक एसपी यांची मदत घेत बीड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. सकाळी 8 वाजेच्या सुमारास पोलिसांनी त्याला अटक केली. आता त्याला विमानाने मुंबईत आणि तिथून रोडने बीडमध्ये आणणार आहेत.

Published on: Mar 12, 2025 06:58 PM