Eknath Shinde News : पुणे अत्याचार प्रकरणात एकनाथ शिंदेंची मोठी माहिती, म्हणाले..

Eknath Shinde News : पुणे अत्याचार प्रकरणात एकनाथ शिंदेंची मोठी माहिती, म्हणाले..

| Edited By: | Updated on: Feb 27, 2025 | 3:37 PM

Eknath Shinde On Swargate Crime Incident : पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आता प्रतिक्रिया दिली आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं.

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करेल, असंही शिंदेंनी सांगितलं. तसंच पुण्यातील अत्याचाराच्या घटनेत आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देखील आपण दिले असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये काल अत्याचार झाल्याची घटना घडली, त्यानंतर सर्व स्तरांतून या घटनेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील माध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हायला हवी असं त्यांनी म्हंटलं आहे. तसंच यासाठी सरकार प्रयत्न करेल असंही ते म्हणाले. पुण्यातील घटनेच्या तपासावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोघे स्वत: लक्ष ठेऊन आहेत. मी देखील पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो आहे, आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. लाडक्या बहिणींना एसटी बसमधून जास्तीतजास्त प्रवास करता यावा यासाठी आम्ही त्यांना तिकिटात 50 टक्के सवलत दिली आहे. मात्र अशा प्रकारे नराधम त्यांच्यावर अत्याचार करत असतील तर त्यांना फाशीची शिक्षा व्हायला हवी, त्यासाठी सरकार प्रयत्न करेल, असं यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Published on: Feb 27, 2025 03:37 PM