AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai-Thane Election Final Results 2024 Highlights : मुंबई-ठाण्याच्या निकालाचे सगळे अपडेट्स

| Edited By: | Updated on: Nov 24, 2024 | 9:31 AM
Share

Maharashtra Assembly Election Results 2024 Highlights Counting and Updates : मुंबई आणि ठाण्यात आज कुठला पक्ष बाजी मारणार? याची सगळ्यांनाच उत्सुक्ता आहे. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुंबईकर कोणासोबत आहेत? ते चित्र आजच्या निकालावरुन स्पष्ट होईल.

Mumbai-Thane Election Final Results 2024 Highlights : मुंबई-ठाण्याच्या निकालाचे सगळे अपडेट्स
Mumbai-Thane Election Result 2024

महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. एकूण 288 विधानसभा मतदारसंघात 4140 उमेदवार रिंगणात आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या निकालाकडे सगळ्यांच जास्त लक्ष आहे. मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत, तर ठाणे जिल्ह्यात 18 जागा आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्यातून येतात. त्यामुळे ठाण्याच्या निकालाकडे सगळ्यांच लक्ष आहे. मुंबईत 36 जागांसाठी एकूण 420 उमेदवार रिंगणात आहेत. मुंबई कोणाची ते उद्या स्पष्ट होईल. शिवसेना एकसंध असताना मुंबईवर ठाकरेंच वर्चस्व होतं. पण शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे की एकनाथ शिंदे, या प्रश्नाच उत्तर आज मिळेल. महाविकास आघाडीकडून मुंबईत उद्धव ठाकरे गट सर्वाधिक 22 जागांवर निवडणूक लढवत आहे. काँग्रेस, शरद पवार गट आणि समाजवादी पार्टी यांचे 11 उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना शिंदे गट 15 आणि भाजपाने 18 जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 Nov 2024 03:26 PM (IST)

    Mumbai Election Result 2024 : ठाणे जिल्ह्यात 18 जागा, कोण जिंकलं? जाणून घ्या

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात 18 जागांचा निकाल एका क्लिकवर, बघा तुमच्या मतदारसंघात कोण जिंकलं? इथे क्लिक करुन निकाल पहा

  • 23 Nov 2024 03:23 PM (IST)

    Mumbai Election Result 2024 : मुंबईत 36 जागा, कोण जिंकलं? जाणून घ्या

    मुंबईतल्या 36 जागांचा निकाल एका क्लिकवर, बघा तुमच्या मतदारसंघात कोण जिंकलं? इथे क्लिक करुन निकाल पहा

  • 23 Nov 2024 02:50 PM (IST)

    Shivdi Election Result 2024 : शिवडीचा निकाल जाहीर

    शिवडी विधानसभेत मतमोजणीच्या 19 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. अजय चौधरी हे 7140 मतांनी विजयी झाले आहेत. अजय चौधरी यांना 74890 मतं मिळाली. मनसेच्या बाळा नांदगावकर यांना 67750 आणि अपक्ष उमेदवार नाना आंबोले यांना 5925 मतं मिळाली.

  • 23 Nov 2024 01:44 PM (IST)

    Vikhroli Election Result 2024 : सुनील राऊत निवडणूक लढवत असलेल्या विक्रोळीचा निकाल जाहीर

    विक्रोळीत संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत निवडणूक लढवत होते. त्यांनी 15352 मतांनी विजय मिळवला आहे. सुनील राऊत यांना एकूण 65715 मतं मिळाली. शिवसेना शिंदे गटाच्या सुवर्णा कारंजे यांना 50363 आणि मनसेचे विश्वजीत ढोलम यांना 16716 मतं मिळाली.

  • 23 Nov 2024 01:40 PM (IST)

    Chandivali Election Result 2024 : चांदीवलीत दिलीप लांडे आघाडीवर

    शिवसेना शिंदे गटाचे दिलीप लांडे 21278 मतांनी आघाडीवर आहेत. 29 पैकी 12 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झालीय. काँग्रेसचे नसीम खान आणि मनसेचे महेंद्र भानुशाली यांचं आव्हान होतं.

  • 23 Nov 2024 01:33 PM (IST)

    Kalyan Rural Election Result 2024 : मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांची मोठी पिछेहाट

    राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार. कल्याण ग्रामीणमध्ये ते पिछाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाचे राजेश मोरे हे 43786 मतांनी आघाडीवर आहेत. उद्धव ठाकरे गटाचे सुभाष भोईरही पिछाडीवर आहेत. 32 पैकी 17 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली आहे.

  • 23 Nov 2024 01:28 PM (IST)

    Vikhroli Election Result 2024 : संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांची स्थिती काय?

    विक्रोळीत संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत आघाडीवर आहेत. 18 फेऱ्यांची मतमोजणी झाली आहे. ते 15705 मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या सुवर्णा कारंजे आणि मनसेचे विश्वजीत ढोलम पिछाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 01:23 PM (IST)

    Bhandup West Election Result 2024 : भांडूपमध्ये सुरु आहे काँटे की टक्कर

    भांडूप पश्चिमेला काँटे की टक्कर सुरु आहे. उद्धव ठाकरे गटाचे रमेश कोरगावकर हे फक्त 623 मतांनी पिछाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाचे अशोक पाटील यांना 44202 मत मिळाली आहेत. कोरगावकर यांना 43579 आणि मनसेच्या शिरीष सावंत यांना 12986 मतं मिळाली आहेत.

  • 23 Nov 2024 12:57 PM (IST)

    Mumbai Election Result 2024 : कांदिवली, चारकोप, मलबार हिलचा निकाल जाहीर

    कांदिवली पूर्व मधून भाजपचे अतुल भातखळकर, चारकोपमधून भाजपचे योगेश सागर विजयी झाले आहेत. मलबार हिलमधून भाजपचे मंगलप्रभात लोढा विजयी आहेत.

  • 23 Nov 2024 12:52 PM (IST)

    Mankhurd shivaji nagar Election Result 2024 : नवाब मलिक हरले

    मानखुर्द-शिवाजी नगरमधून समाजवादी पार्टीने अबू आझमी विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या नवाब मलिक यांचा त्यांनी पराभव केला.

  • 23 Nov 2024 12:51 PM (IST)

    Andheri East Election Result 2024 : अंधेरी पूर्वेला शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार विजयी

    अंधेरी पूर्वमधून मुरजी पटेल विजयी. मूळचे भाजपचे असलेले मुरजी पटेल यांनी निवडणुकीच्या तोंडावर तिकीटासाठी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला होता. उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा पराभव झाला आहे.

  • 23 Nov 2024 12:27 PM (IST)

    Worli Election Result 2024 : आदित्य ठाकरेंकडे निसटती आघाडी

    वरळी विधानसभा क्षेत्राच्या 7 फेऱ्यांची मतमोजणी झाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे 1047 मतांनी आघाडीवर आहेत. 7 फेऱ्यानंतर आदित्य यांना 25304 मतं मिळाली आहेत. मिलिंद देवरा यांना 24257 मतं मिळाली आहेत. संदीप देशपांडे यांना 10246 मत मिळाली आहेत.

  • 23 Nov 2024 12:24 PM (IST)

    Mahim Election Result 2024 : माहीमध्ये महेश सावंत यांच्याकडे किती आघाडी?

    माहीम विधानसभा क्षेत्राच्या 6 फेऱ्यांची मतमोजणी झाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत 7830 मतांनी आघाडीवर आहेत. 6 फेऱ्यानंतर सावंत यांना 19562 मत मिळाली आहेत. सदा सरवणकर यांना 11732 मतं मिळाली आहेत. अमित ठाकरे यांना 8269मत मिळाली आहेत.

  • 23 Nov 2024 12:19 PM (IST)

    Shivdi Election Result 2024 : शिवडीमध्ये कोण आघाडीवर?

    शिवडी विधानसभा क्षेत्राच्या 10 फेऱ्यांची मतमोजणी झाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे अजय चौधरी 9404 मतांनी आघाडीवर आहेत. 10 फेऱ्यानंतर चौधरी यांना 42619 मत मिळाली आहेत. मनसेच्या बाळा नांदगावकर यांना 33215 मतं मिळाली आहेत. नाना आंबोले यांना 3347 मत मिळाली आहेत.

  • 23 Nov 2024 12:01 PM (IST)

    Vandre West Election Result 2024 : आशिष शेलाराच्या मतदारसंघात काय स्थिती?

    वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात एकूण 5 फेऱ्यांची मतमोजणी झाली आहे.

    वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ

    अँड आशिष शेलार – 25,590

    आसिफ झकेरिया – 10,775

    आशिष शेलार याची आघाडी – 14,815

  • 23 Nov 2024 11:58 AM (IST)

    Chembur Election Result 2024 : चेंबूरमध्ये शिंदे गटाच्या उमेदवाराकडे निसटती आघाडी

    चेंबूरमध्ये आतापर्यंत सहाफेऱ्यांची मतमोजणी झाली आहे.

    उद्धव ठाकरे गटाचे प्रकाश फातरपेकर 14514

    शिवसेना शिंदे गटाचे तुकाराम काते- 14758

    माऊली थोरवे- 1313

    दीपक निकाळजे 4821

    तुकाराम काते निसटत्या फरकाने आघाडीवर

  • 23 Nov 2024 11:33 AM (IST)

    Vandre East Election Result 2024 : अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात कोण आघाडीवर?

    अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ नववी फेरी

    फहाद अहमद राष्ट्रवादी शरद पवार – २९५८५

    सना मलिक राष्ट्रवादी- २३१६६

    नवीन आचार्य मनसे – ११२२०

    सतीश राजगुरू वंचित २३९०

    फहाद अहमद – ६४१९ मतांनी आघाडीवर

  • 23 Nov 2024 11:32 AM (IST)

    Vandre East Election Result 2024 : वांद्रे पूर्व मतदार संघात कोण आघाडीवर?

    वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात सहा राऊंडची मतमोजणी झाली आहे.

    सहावा राऊंड

    झिशान सिद्धीकी – १३१४३

    तृप्ती सावंत – ७२०२

    वरूण सरदेसाई – १७४८६

    शिवसेना ठाकरे गटाचे वरूण सरदेसाई आघाडीवर

  • 23 Nov 2024 11:27 AM (IST)

    Wadala Election Result 2024 : वडाळा विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर

    मुंबईतून पहिला निकाल जाहीर झाला आहे. वडाळ्यात भाजपचे उमेदवार कालिदास कोळंबकर विजयी झाले आहेत. त्यांच्यासमोर उद्धव ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव आणि मनसेच्या स्नेहल जाधव यांचं आव्हान होतं.

  • 23 Nov 2024 10:36 AM (IST)

    Maharashtra Election Result 2024 : माझ्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला, कुछ तो गडबड हैं – संजय राऊत

    “माझ्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला, कुछ तो गडबड हैं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 56 जागा कोणत्या भरवशावर मिळतात?. अजित पवार यांना 40 च्या वर जागा मिळतात. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी असे काय दिवे लावले? इथे त्यांना 120 पेक्षा जास्त जागा मिळतात अशी प्रतिक्रिया निकालावर संजय राऊत यांनी दिली आहे.

  • 23 Nov 2024 10:18 AM (IST)

    Shivdi Election Result 2024 : शिवडीत बाळा नांदगावकर पिछाडीवर

    शिवडी विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे अजय चौधरी 6250 मतांनी आघाडीवर आहेत. मनसेचे बाळा नांदगावकर यांची पिछाडी वाढत चालली आहे.

  • 23 Nov 2024 10:17 AM (IST)

    Vandre Election Result 2024 : वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई आघाडीवर

    वांद्रे पूर्वमधून उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार वरुण सरदेसाई आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे झिशान सिद्दीकी 3839 मतांनी पिछाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 10:13 AM (IST)

    Mumbai Election Result 2024 : भांडूप, चारकोप, भायखळ्यात कोण आघाडीवर?

    भांडूप पश्चिममधून रमेश कोरगावकर आघाडीवर आहेत. चारकोपमधून योगेश सागर 20 हजारपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. भायखळ्यातून शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव 1108 मतांनी आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 10:01 AM (IST)

    Worli Election Result 2024 : वरळी, माहीम, दिंडोशीत कोण आघाडीवर?

    वरळीतही अटीतटीचा सामना सुरु आहे. आदित्य ठाकरे फक्त 696 मतांनी आघाडीवर आहेत. माहीममध्ये अमित ठाकरे, सदा सरवणकर पिछाडीवर आहेत. महेश सावंत आघाडीवर आहेत. दिंडोशीमधून सुनील प्रभू पिछाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 10:00 AM (IST)

    Shivdi Election Result 2024 : शिवडी विधानसभा मतदारसंघात काँटे की टक्कर

    शिवडी विधानसभा मतदारसंघात काँटे की टक्कर सुरु आहे. उद्धव ठाकरे गटाचे अजय चौधरी 1969 मतांनी आघाडीवर आहेत. मनसेचे बाळा नांदगावकर पिछाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 09:28 AM (IST)

    Shivdi Election Result 2024 : शिवडीत अजय चौधरी यांच्याकडे फार छोटी आघाडी

    शिवडीतून अजय चौधरी फक्त 356 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर मनसेच्या बाळा नांदगावकर यांचं आव्हान आहे.

  • 23 Nov 2024 09:23 AM (IST)

    Mahim Election Result 2024 : माहीममध्ये गणित बदललं, आता कोण आघाडीवर?

    माहीम विधानसभा मतदारसंघातून आता उद्धव ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी आघाडी घेतली आहे. मनसेच्या अमित ठाकरे आणि महेश सावंत यांच्या मतांमध्ये फार थोडा फरक आहे. अमित ठाकरे यांच्याकडे 2156 तर महेश सावंत यांना 2,270 मतं आहेत. सदा सरवणकर तिसऱ्या स्थानावर आहेत.

  • 23 Nov 2024 09:20 AM (IST)

    Mulund Election Result 2024 : मुलुंडमधून भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा आघाडीवर

    मुलुंडमधून भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा 4580 मतांनी आघाडीवर आहेत. लोकसभा निवडणुकीत मिहिर कोटेचा यांचा महाविकास आघाडीच्या संजय पाटील यांनी पराभूत केलं होतं.

  • 23 Nov 2024 09:16 AM (IST)

    Wadala Election Result 2024 : वडाळ्यात कालिदास कोळंबकर सुसाट

    वडाळ्यात भाजप उमेदवार कालिदास कोळंबकर यांनी दुसऱ्या फेरीत 5486 मतांची आघाडी घेतली आहे. त्यांच्यासमोर उद्धव ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव आणि मनसेच्या स्नेहल जाधव यांचं आव्हान आहे.

  • 23 Nov 2024 09:11 AM (IST)

    Worli Election Result 2024 : वरळीत आदित्य ठाकरे किती हजार मतांनी आघाडीवर ?

    वरळीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आदित्य ठाकरे हे 4 हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर मनसेच्या संदीप देशपांडे आणि शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा यांचं आव्हान आहे.

  • 23 Nov 2024 09:07 AM (IST)

    Malbar Hill Election Result 2024 : मलबार हिलमध्ये मंगलप्रभात लोढांकडे किती मतांची आघाडी?

    मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार मंगलप्रभात लोढा 3013 मतांनी आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 09:06 AM (IST)

    Dombivli Election Result 2024 : डोंबिवली, ठाणे शहरमध्ये कोण आघाडीवर?

    डोंबिवलीतून भाजप उमेदवार रवींद्र चव्हाण 2800 मतांनी आघाडीवर आहेत. ठाणे शहरमधून भाजप उमेदवार संजय केळकर आघाडीवर आहेत. बेलापूरमधून भाजपच्या मंदा म्हात्रे आघाडीवर आहे.

  • 23 Nov 2024 09:03 AM (IST)

    Kalwa-Mumbra Result 2024 : कळवा-मुंब्र्यातून जितेंद्र आव्हाड पुढे की मागे?

    कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आघाडीवर आहेत. 3 हजारपेक्षा जास्त मतांची आघाडी आहे. त्यांच्यासमोर अजित पवार गटाच्या नजीब मुल्ला यांचं आव्हान आहे.

  • 23 Nov 2024 09:01 AM (IST)

    Kalyan Election Result 2024 : कल्याण पूर्वमधून कोण आघाडीवर?

    कल्याण पूर्वमधून भाजपच्या सुलभा गायकवाड आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटातून बंडखोरी करणाऱ्या महेश गायकवाड यांचं आव्हान आहे.

  • 23 Nov 2024 08:56 AM (IST)

    Mumbai Election Result 2024 : मुंबईत कुठल्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर?

    मुंबईत भाजपचे उमेदवार 12 जागांवर आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गट 3 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 4 आणि उद्धव ठाकरे गट 5 जागांवर आघाडीवर आहे. मनसेचा उमेदवार एका जागेवर आघाडीवर आहे.

  • 23 Nov 2024 08:43 AM (IST)

    Nalasopara Election Result 2024 : क्षितीज ठाकूर पिछाडीवर

    नालासोपारा विधानसभा मतदारसंघात भाजपचे राजन नाईक पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत, तर क्षितीज ठाकूर पिछाडीवर आहेत. मतदानाच्या आदल्यादिवशी याच मतदारसंघात भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप झाला होता.

  • 23 Nov 2024 08:37 AM (IST)

    Mumbai Election Result 2024 : मुंबईत भाजपचे उमेदवार कुठल्या मतदारसंघात आघाडीवर

    विलेपार्ल्यातून भाजपचे उमेदवार पराग अळवणी आघाडीवर आहेत. सायन-कोळीवाड्यातून भाजपचे उमेदवार तमिल सेल्वन आघाडीवर आहेत. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अमित साटम आघाडीवर आहेत.घाटकोपर पश्चिममधून भाजपचे उमेदवार राम नाईक आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 08:34 AM (IST)

    Wadala Election Result 2024 : वडाळ्यात कोण आघाडीवर?

    वडाळा विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार कालिदास कोळंबकर आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 08:28 AM (IST)

    Mumbai Election Result 2024 : कांदिवली, दिंडोशी, भांडूप पश्चिमचा कल काय?

    कांदीवली पूर्वमधून भाजपचे अतुल भातखळकर, दिंडोशीमधून उद्धव ठाकरे गटाचे सुनील प्रभू आणि भांडूप पश्चिममधून उद्धव ठाकरे गटाचे रमेश कोरगावकर आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 08:26 AM (IST)

    Mumbai Election Result 2024 : चेंबूर, दहीसर, मुंबादेवीमध्ये कोण आघाडीवर?

    चेंबूरमधून उद्धव ठाकरे गटाचे प्रकाश फातर्पेकर, दहीसरमधून भाजपा उमेदवार मनिषा चौधरी आघाडीवर आहेत. मुंबादेवीमधून काँग्रेस उमेदवार अमिन पटेल आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 08:24 AM (IST)

    Mahim Election Result 2024 : माहीमचा पहिला कल हाती

    माहीममधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरे गटाच्या महेश सावंत यांचं आव्हान आहे.

  • 23 Nov 2024 08:22 AM (IST)

    Shivdi Election Result 2024 : शिवडीत कोण आघाडीवर?

    शिवडी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे अजय चौधरी आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर मनसेच्या बाळा नांदगावकरांच आव्हान आहे.

  • 23 Nov 2024 08:21 AM (IST)

    Magathane Election Result 2024 : मागाठणेत शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार आघाडीवर

    मागाठणे विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रकाश सुर्वे आघाडीवर आहेत. पोस्टल मतमोजणी सुरु आहे.

  • 23 Nov 2024 08:17 AM (IST)

    Malad Election Result 2024 : मालाडमध्ये अस्लम शेख आघाडीवर

    मालाडमधून काँग्रेसचे अस्लम शेख आघाडीवर आहेत. पोस्टल मतमोजणी सुरु आहे.

  • 23 Nov 2024 08:17 AM (IST)

    Dombivli Election Result 2024 : डोंबिवलीत कोण आघाडीवर?

    पोस्टल मतमोजणी सुरु झाली आहे. डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार रवींद्र चव्हाण आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 08:12 AM (IST)

    Vandre West Election Result 2024 : आशिष शेलारांच्या मतदारसंघात कोण आघाडीवर?

    पोस्टल मतमोजणी सुरु झाली आहे. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार आशिष शेलार आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 08:11 AM (IST)

    Kopri PachPakhadi East Election Result 2024 : मुख्यमंत्र्यांच्या कोपरी-पाचपाखाडीमध्ये कोण आघाडीवर?

    पोस्टल मतमोजणी सुरु झाली आहे. ठाण्याच्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 08:09 AM (IST)

    Vandre East Election Result 2024 : वांद्रे पूर्वमधून झिशान सिद्दीकी आघाडीवर

    पोस्टल मतमोजणी सुरु झाली आहे. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे झिशान सिद्दीकी आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 08:06 AM (IST)

    Worli Election Result 2024 : मुंबईत वरळीतून कोण आघाडीवर?

    पोस्टल मतमोजणी सुरु झाली आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून उद्घव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 08:06 AM (IST)

    Colaba Election Result 2024 : कुलाब्यातून कोण आघाडीवर?

    पोस्टल मतमोजणी सुरु झाली आहे. कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार राहुल नार्वेकर आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 07:55 AM (IST)

    Maharashtra Election Result 2024 : सर्वात आधी कुठल्या मतांची मोजणी होईल?

    सकाळी 8 वाजता आधी पोस्टल मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर EVM मधील प्रत्यक्ष मतमोजणी सुरु होईल. आजच्या निकालाकडे सगळ्या देशाच लक्ष लागलं आहे.

  • 23 Nov 2024 07:49 AM (IST)

    Thane Election Result 2024 : ठाण्यात किती जागा? मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

    ठाणे जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण 18 जागा आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: ठाण्यातून येतात. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या निकालाकडे सगळ्या राज्याच लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी-पाचपाखाडीतून उभे आहेत. त्यांच्यासमोर दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघेंच आव्हान आहे. त्याशिवाय कळवा-मुंब्र्यातून शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांच्या निकालाकडेही सगळ्यांच लक्ष आहे.

  • 23 Nov 2024 07:40 AM (IST)

    Mumbai Election Result 2024 : मुंबईत 36 जागांसाठी किती उमेदवार रिंगणात?

    मुंबईत विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत. या 36 जागांसाठी एकूण 420 उमेदवार रिंगणात आहेत. मुंबईत शिवसेना शिंदे गट, उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Published On - Nov 23,2024 7:38 AM

Follow us
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.