Maharashtra Breaking News LIVE : पंढरपूर: वारकऱ्यांना मारहाण, दोघांना अटक
Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणीच्या वेळी 71 वर्षीय वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सोमवारी घडला. राकेश किशोर असं या वकिलाचं नाव आहे. या प्रकारानंतर सरन्यायाधीशांनी न्यायालयाचं कामकाज सुरूच ठेवलंय तर बार कौन्सिलने तत्काळ या घटनेची दखल घेत किशोर यांची वकिलीची सनद रद्द केली. देशभरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायाधीश गवई यांच्याशी संवाद साधून हा प्रकार निंदनीय असल्याचं म्हटलंय. तर दुसरीकडे बिहारमधील विधानसभा निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी घोषणा केली. पंधरा वर्षांनंतर बिहारमध्ये दोन टप्प्यांत 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 14 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्याची माहिती केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
सरकारचं पॅकेज फसवं आहे – अंबादास दानवे
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 31 हजार कोटींपेक्षा जास्त पॅकेज जाहीर केले आहे. यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, सरकारचं हे पॅकेज फसवं आहे. 31 हजार 500 कोटी जे जाहीर केलेले आहेत, त्यातले 10 हजार कोटी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आहेत. 65 लाख हेक्टर जमिनीचं नुकसान या महाराष्ट्रात झालेलं आहे. आमची मागणी होती हेक्टरी शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मदत द्या, कर्जमुक्ती करा मात्र तो निर्णय झालेला नाही.
-
पिंपरी चिंचवड: आयुक्त शेखर सिंह यांची नाशिक येथे बदली, कुंभमेळ्याची जबाबदारी
पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची आज बदली नाशिक येथे झाली असून त्यांचा चार्ज मेट्रो चे व्यवस्थापक श्रावण हर्डीकर यांना देण्यात असल्याचा आदेश महापालिकेला प्राप्त झाला आहे. आयुक्त शेखर सिंह यांना नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
-
-
किरीट सोमय्या यांचे आय लव महादेव अभियान
किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून आय लव महादेव अभियान हाती घेण्यात आली आहे. कुर्ला येथील बीकेसी जंक्शन एलबीएस रोड येथे किरीट सोमय्या उपस्थित राहणार आहेत. याच ठिकाणी काही दिवसापूर्वी बाईक स्वार यांच्या गाडीवर आय लव मोहम्मद चे स्टिकर लावण्यात आले होते.
-
पंढरपूर: वारकऱ्यांना मारहाण, दोघांना अटक
पंढरपूरमध्ये तरुणांकडून वारकरी भक्तांना करण्यात आली होती. पहाटे पावणे पाच वाजता ही घटना घडली होती. मारहाण करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्वप्निल अहिरे आणि माऊली लोंढे अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस सध्या तिसऱ्या आरोपीच्या शोधात आहेत.
-
नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली
नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांची बदली
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिकच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती
तर कुंभमेळा आयुक्त म्हणून पिंपरी चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांची नियुक्ती
-
-
सरकारची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, पॅकेजवर बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया
पॅकेजमुळे समाधान नाही, अजून विदर्भ मराठवाडा बाकी आहे – बच्चू कडू
कर्जमुक्ती शिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही, बच्चू कडू यांचा इशारा
मेंढपाळ, मच्छिमार आणि दिव्यांग यांच्याही मागण्या महत्त्वाच्या आहेत
28 तारखेला संघर्ष अटळ आहे, बच्चू कडू यांचा इशारा
-
भायंदरमध्ये मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
ऑनलाईन फसवणूक करून मोबाईल चोरणारी टोळी गजाआड
भाईंदर पोलिसांची आंतरराज्यीय टोळीवर मोठी कारवाई
एकूण १०७ मोबाईल्स, ४ लाख रोख, असा ५०.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त
आतापर्यंत 7 आरोपी अटकेत, मुख्य आरोपी हार्डी ऊर्फ प्रिन्स सजनाणी छत्तीसगडमधून ताब्यात.
-
अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी, जळगावातील धक्कादायक प्रकार
जळगाव जिल्ह्यातील मेहरूण येथील स्मशानभूमीतून अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, छबाबाई पाटील असे मृत महिलेचे नाव असून, अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या डोके, पाय व हाताच्या अस्थी चोरून नेल्याची घटना घडली असून, या घटनेनं खळबळ उडाली आहे.
-
डोंबिवलीत सर्पदंश मृत्यू प्रकरणावर संतप्त नातेवाईक आणि नागरिक रस्त्यावर
डोंबिवलीत सर्पदंश मृत्यू प्रकरणावर संतप्त नातेवाईक आणि नागरिक रस्त्यावर उतरलेत. शास्त्रीनगर रुग्णालयातील निष्काळजीपणावर संतापाची लाट उसळली आहे. डोंबिवली पश्चिमेत केडीएमसीविरोधात ठिय्या आंदोलन करत भीक मागून अनोखा निषेध करण्यात आला. शिवसेना ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गटही या आंदोलनात सहभागी होत रस्त्यावर उतरले आहेत. संपूर्ण प्रकाराची तपासणी करून तसेच सीसीटीव्ही तपासून संबंधित दोषीवर कारवाई करणार अशी भूमिका प्रशासनाने स्पष्ट केली आहे.
-
पॅकेजने समाधान नाही अजून विदर्भ मराठवाडा बाकी आहे; सरकारने शेतकऱ्यांना केलेल्या मदतीवर बच्चू कडूंची नाराजी
सरकारने शेतकऱ्यांना केलेल्या मदतीवर बच्चू कडूंनी खरपूस समाचार घेतला. “पॅकेजने समाधान नाही अजून विदर्भ मराठवाडा बाकी आहे. फक्त नदीवरचेकाठ घेतलेले आहेत. कर्जमुक्ती शिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. मेंढपाळ, मच्छीपाड ,दिव्यांग यांच्याही महत्त्वाच्या मागण्या आहेत. 28 तारखेला संघर्ष अटळ आहे.” बच्चू कडू यांनी असं म्हणत सरकारला थेट इशाराच दिला आहे.
-
घोडबंदरवासियांना भेडसावत असणाऱ्या पाणी टंचाईविरोधात मनसे आक्रमक
घोडबंदररोडवरील उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातं असल्याने मनसे नेते अविनाश जाधव यांनी घोडबंदरवासियांनासह पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. पाणी पुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात टँकर माफिया सक्रिय असल्याचा मनसेनं आरोप केला आहे. ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागात वर्षानुवर्षे एकच अधिकारी बसत असल्याने बांधकाम व्यावसायिक आणि टँकर माफिया यांच्यात एकमताने अन् मुद्दाम करत असल्याचा अविनाश जाधव यांचा आरोप
-
धर्म धोक्यात येतो तेव्हा कोणीही शांत बसलं नाही पाहिजे : राकेश किशोर
‘धर्म धोक्यात येतो तेव्हा कोणीही शांत बसलं नाही पाहिजे असं राकेश किशोर यांनी म्हटलं आहे. आपल्या हिताचं रक्षण केलं पाहिजे.’ असं सर न्यायाधिशांवर हल्ला करणारे वकील राकेश किशोर यांनी म्हटलं आहे .
-
शेतकऱ्यांच्या मनासारखे झाले नाही तर आंदोलन – मनोज जरांगे पाटील
संपूर्ण कर्ज माफी आणि 70 हजार हेक्टरी भरपाई हवी अन्यथा आंदोलनावर आपण ठाम आहोत असे मराठा नेते मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या मनासारखे झाले नाही तर आंदोलन उभे राहिल असेही ते म्हणाले.
-
बीडच्या गेवराईत आरक्षणासाठी जीवन संपवले
बीडच्या गेवराई शहरातील ज्ञानदेव कोल्हे (वय-45) नामक तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या धनगर समाजाला एसटी प्रवर्गातुन आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून केल्याची चिट्टी त्याच्या खिशात आढळली आहे.
-
मंत्री छगन भुजबळ आझाद मैदानात उपोषणकर्त्यांना भेटणार
शिवा संघटने कायकर्त्याने राज्य सरकारने मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात काढलेल्या जीआर रद्द करण्यासाठी आझाद मैदानात 2 सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले आहे.राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे आज दुपारी 3.30 वा.उपोषणस्थळाला भेट देणार आहेत.
-
गोवंडी येथे नशा मुक्त अभियानाला सुरुवात
समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांच्या माध्यमातून आज गोवंडी येथे नशामुक्त रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या रॅलीमध्ये नशा मुक्तीचा संदेश देण्यात आला.
-
पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारचे ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज
पूरग्रस्त भागासाठी सरकारचे ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर झाले आहे. खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी ४७ हजार रूपये, तसेच नरेगाच्या माध्यमातून हेक्टरी ३ लाख रूपये दिले जाणार आहेत असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
-
धुळ्यातील अजनाळे गावात पोलिसांवर गावकऱ्यांकडून हल्ला
धुळ्यातील अजनाळे गावात पोलिसांसावर गावकऱ्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. संशयिताला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हा हल्ला करण्यात आला आहे. यात दोन पोलीस जखमी झाले आहेत. मारहाण करून पोलीस दोन लाख रुपये घेऊन गेले असा आरोप महिलेने केला आहे.
-
लातूरच्या औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना बँकांकडून नोटीस
लातूरच्या औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना बँकांकडून नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. विशाल करंडे या शेतकऱ्याला नोटीस पाठवल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. मनसेच्या शिवकुमार नागराळेंनी बँक अधिकाऱ्यांना जाब विचारला.
-
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान- मुख्यमंत्री
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. इतकंच काय तर घरांची पडझड झाली आहे. शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल यासाठी प्रयत्न सुरु आहे. शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहिला पाहीजे यासाठी प्रयत्न करत आहोत. 68 लाखांहून अधिक हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. 253 नुकसानग्रस्त तालुक्यात मदत केली जात आहे.
-
ठाकरेंच्या शिवसेनेकडून सोशल मीडियावर प्रबोधनकारांची पोस्ट
ठाकरेंच्या शिवसेनेकडून सोशल मीडियावर प्रबोधनकारांचा पोस्ट करण्यात आली आहे. ह्याच प्रबोधनकारी लेखणीचा महाराष्ट्राला गर्व असा या पोस्टचा आशय आहे. कस्तुरबा रुग्णालयातील प्रकरणानंतर ठाकरेंच्या शिवसेनेची ही पोस्ट समोर आली आहे.
ह्याच ‘प्रबोधनकारी लेखणी’चा महाराष्ट्राला गर्व आहे! pic.twitter.com/R8TCOLHS0A
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 7, 2025
-
अलिबागमध्ये खड्ड्यांच्या समस्येविरोधात शेकापचं आंदोलन
अलिबागमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे. या खड्ड्यांच्या त्रासाला कंटाळलेल्या नागरिकांसाठी शेकापनं ठिय्या आंदोलन केलं. आंदोलनामुळे अलिबाग पेण मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
-
दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा मशाल मोर्चा निघणार आहे. महागाई भत्ता, वेतनवाढीतील फरक यासह प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केलं जाणार आहे. मुंबईतील दादरमध्ये एसटी कर्मचारी निदर्शनं करणार आहेत.
-
नागपूर मनपा मुख्यालयात राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांनी खेळल्या गोट्या
नागपूर मनपा मुख्यालयात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी गोट्या खेळत आनोखं आंदोलन केलं. आपला बस कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.
-
वकिलावर कारवाई झाली पाहिजे: केंद्रीय मंत्री रामदास आठवले
सरन्यायाधीश बीआर गवई यांच्यावर एका वकिलाने वस्तू फेकल्याच्या घटनेबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, “हा संविधानाचा अपमान आहे आणि अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. आम्ही याचा निषेध करतो. ज्या वकिलाने हे केले आहे त्याच्यावर खटला चालवला पाहिजे.”
-
शिवसेना पक्षचिन्हाबद्दल उद्या नक्कीच एक निकाल येणार – असीम सरोदे
निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे पक्षचिन्ह प्रदान केले, ती प्रक्रिया मुळात चुकीची आहे, आक्षेपार्ह आणि बेकायदेशीरतेकडे जाणारी आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे त्यांनी फक्त चिन्ह देणं अपेक्षित होतं, पण शिवसेना ही एकनाथ शिंदेंची असाही एक निकाल देऊन टाकला आहे. जो त्यांच्या अख्यारित बसत नाही. ते त्यांच्या अधिकार क्षेत्राचे उल्लंघन ठरते. या दोन मुद्द्यांवर उद्या सुनावणी होणार आहे. हा युक्तीवाद लेखी स्वरुपात मांडण्यात आला आहे. त्यामुळे उद्या याबद्दलचे मौखिक स्वरुपात सुनावणी होईल. त्यानंतर एक निकालही जाहीर केले जाऊ शकतो, अशी माहिती असीम सरोदे यांनी म्हटले.
-
बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा, वर्ध्याच्या आर्वीत भव्य मोर्चा
बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे सकल बंजारा समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने आज भव्य मोर्चा काढण्यात आला. आर्वी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून या मोर्चाची सुरुवात झाली आणि तो उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ पोहोचला. या मोर्चाला मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला, ज्यात बंजारा समाजातील नागरिकांचा लक्षणीय सहभाग होता. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोर्चाच्या मार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
-
शिवसेनेत असताना वाघ असलेले कदम आता मांजर झाले, शिवसैनिक संतप्त
रामदास कदम यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे पंढरपूरमध्ये ठाकरे गटाचे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी रामदास कदम यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करत जोरदार निषेध व्यक्त केला. शिवसेनेत असताना वाघ असलेले कदम आता मांजर झाले आहेत, अशी बोचरी टीका कार्यकर्त्यांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. रामदास कदम यांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली असून, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
-
मराठा-कुणबी जीआरसंदर्भात राज्य सरकारला दिलासा
मराठा-कुणबी जीआरसंदर्भात राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे. मराठा-कुणबी जीआरला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे.
-
“महेंद्र फेल्यूअर दळवी”, शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांचा तीव्र निशाणा
रायगड जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी अलिबाग–मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.
-
परभणीत बंजारा समाजाकडून मोर्चाचे आयोजन
एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी परभणीत आज बंजारा समाजाकडून मोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चेकरी जमायला सुरुवात झाली आहे.
-
मी मुंबईकरांची माफी मागतो- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईत मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. मी त्याबद्दल मुंबईकरांची माफी मागतो. त्यांना वाहतूक कोंडीतून जावं लागतं. मेट्रो आणि टनेलचं काम सुरू आहे. या सर्व गोष्टी संपल्यावर आम्ही एक मंत्र तयार केला आहे. मुंबई इन ५९ मिनिट. मुंबईतून कोणत्याही कोपऱ्यात जाण्यासाठी ५९ मिनिटचं लागला पाहिजे. त्यामुळे जेव्हा ही कामं बंद होतील. तेव्हा १ मे रोजी महाराष्ट्र डे जाहीर करून सुट्टी देऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
पोलिसांचे बूट बदलणार- देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुम्ही चांगली गोष्ट सांगितलं. कुणी ही गोष्ट लक्षात आणून दिली नाही. पोलीस हेच बूट घालून कवायत करतात. तुम्हाला सांगतो. तुम्ही काही डिझाईन किंवा इनोव्हेशन सांगितलं तर आपण करू. तुम्ही अॅक्शन हिरो आहात. त्यामुळे तुम्हाला बूट कोणता वापरला पाहिजे हे माहीत आहे. तुम्ही सूचवा. आपण करू.
-
अवघ्या पाच तासात नाशिकमध्ये दुसरा खून
निवृत्त विस्तार अधिकारी मंगला घोलप यांचा त्यांच्या मुलानेच केला निर्घृण खून… धारधार शास्त्राने वार करत मुलानेच आईची केली हत्या.. संशयित मुलगा स्वप्नील घोलपला पोलिसांनी घेतले ताब्यात… खून का केला याची चौकशी सुरू… एक दिवसात दोन तर नऊ महिन्यात झाले ४५ खून
-
शिवभोजन केंद्र संचालकाची सहा महिन्यापासून अनुदान रडखळले…
शिवभोजन केंद्र संचालक आर्थिक अडचणीत… महायुती सरकार शिवभोजन योजना गुंडाळनार का ? अशी केंद्र संचालकांच्या मनात शंका… शासनाने शिवभोजन केंद्र संचालकांचे अनुदान द्यावे केंद्र संचालकांची मागणी… शासनाने शिवभोजन केंद्र सुरू ठेवावे ग्राहकांची मागणी
-
पंढरपुरात अज्ञात तरुणांकडून वारकरी भक्तांना मारहाण…
पहाटे पावणे पाच वाजता विठ्ठल मंदिरा बाहेर वारकऱ्यांना झाली मारहाण… अज्ञातानी दगडे भिरकावीत वारकऱ्यांचे फोडले डोके… तरुणांच्या हल्ल्यात काही वारकरी विठ्ठलभक्त जखमी : खाजगी रुग्णालयात उपचार सुरू… पुणे येथून आलेल्या विठ्ठल भक्तांना झाली मारहाण… आज्ञातांकडून विठ्ठल भक्त वारकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद……..
-
नाशिक पुन्हा एकदा खुनाने हादरले
नाशिक पुन्हा एकदा खुनाने हादरले. नाशिक रोडच्या जय भवानी रोड परिसरात पहाटेच्या सुमारास अमोल मेश्राम व्यक्तीची हत्या करण्यात आली. कोयत्याने वार करत हत्या, खुनाचे कारण अस्पष्ट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
-
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची तीन राज्यांना नोटीस
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांना नोटीस पाठवली. या तीन राज्यात कफ सिरपमुळे सर्वाधिका मृत्यू झाले आहेत. ‘कोल्डरिफ हे औषध बॅन करावं का याची माहिती घ्या ‘ असे आदेश देत 2 आठवड्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-
जीवघेणा प्रवास! ‘रिक्षा’ की ‘यमदूताची व्हॅन’?
जीवघेणा प्रवास! ‘रिक्षा’ की ‘यमदूताची व्हॅन’? कल्याणमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कल्याणमध्ये रिक्षा मध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची जीवघेणी कोंबाकोंबी सुरू आहे. एकाच रिक्षामध्ये 10 ते 15 चिमुकल्यांचा लोंबकळत जीवघेणा प्रवास! ..वाहन नियमांचे उल्लंघन; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे.
-
बारामती – सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मूक आंदोलन
बारामती – खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मूक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नही चलेगी, नही चलेगी, तानाशाही नही चलेगी, अशा आशयाचे फलक हातात घेऊन आंदोलन सुरू.
-
अभिनेता अक्षय कुमार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार
अभिनेता अक्षय कुमार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार आहे. फिक्कीच्या कार्यक्रमाला आज मुख्यमंत्र्यांची उपस्थिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर अक्षय कुमार राजकारणात सक्रीय असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतील
-
ठाण्यात चार महिन्यात 621 मलेरियाचे तर डेंगूचे 405 रुग्ण आढळले
या आजारांवर उपाय म्हणून डॉक्टर किवी,ड्रॅगन फ्रुट पपया व पपयांचा पाला खाण्याचा सल्ला देत असतात त्यामुळे फळांची मागणी वाढल्या असून त्यांचे भाव देखील वाढले.
-
ठाणे, कोपर रेल्वे स्थानकाला बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडणार
हायस्पीड रेल्वेमार्फत हा प्रस्ताव राबविण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना. मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन मार्गावर ठाणे जिल्ह्यातले म्हातार्डी रेल्वे स्थानक ठाणे, कोपर रेल्वे स्थानक तसेच तळोजा मेट्रोला कसे व्यवस्थित जोडता येईल हे पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले.
-
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून 50 लाख रुपयांच्या किटची पूरग्रस्तांना मदत
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून पूरबाधित कुटुंबीयांना 50 लाख रुपयांच्या मदतीचा हात. सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून 50 लाख रुपये किमतीचे 5000 किटस पूरग्रस्तांना होणार वाटप
-
वैध दारू तस्करीसाठी तस्करांची शक्कल
अवैध दारू तस्करीसाठी पीकअप गाडीमध्ये बनवले लक्षात न येणारे कंपार्टमेंट. पीकअप गाडीच्या मधल्या भागात लोखंडी कंपार्टमेंट तयार करून दारूची अवैध तस्करी. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हाती लागू नये, यासाठी अवैध दारू तस्करांची शक्कल
-
अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आर्थिक गुन्हे शाखेकडून झाली चौकशी.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी झाली. ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली. शिल्पा शेट्टीच्या घरी जाऊन आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशी केल्याची माहिती आहे. याआधी राज कुंद्राचीही चौकशी झाली.
-
जालन्यात मोसंबीचे दर 6 हजार रुपयांनी घसरले; आंध्र प्रदेशातून वाढली आवक
मोसंबीच्या उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या आणि विशेषतः मोसंबीला भौगोलिक नामांकन मिळालेल्या जालन्यातच मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहे. करण मागील महिन्यात 22 हजार रुपये प्रति टन विकत असलेली मोसंबी आता 16000 रुपयांवर आल्याने मोसंबीच्या दरात 6 हजार रुपयांनी घसरण झाली आहे. जालना जिल्ह्यातील मोसंबीला दिल्ली जयपूर वाराणसी यासह उत्तर भारतात मोठी मागणी असते परंतु आंध्र प्रदेशाची मोसंबी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दाखल झाले असल्याने जालन्यात मोसंबीचे भाव पडले आहेत.
-
नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस रस्त्यावर
नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नाशिक पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावर नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने पोलीस आक्रमक झाले आहेत. शहरातील रस्त्यांवर मद्यप्राशन करून धिंगाणा घालणाऱ्या, टवाळखोर,रेकॉर्ड वरील गुन्हेगार अशा टोळक्यावर कारवाई केली जात आहे.
-
नाशिक विमानतळावर पार्किंग हब विकसित करा; भुजबळांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
राज्य शासनाच्या विमानतळांना इंटरलिंक करण्याच्या धोरणांतर्गत नाशिक विमानतळ इथं विमान पार्किंग विकसित करा, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी पत्र लिहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. याआधी नाशिक विमानतळ येथे सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर धावपट्टी करण्याची देखील मंजुरी मिळाली आहे.
-
पहिलीपासून ते पाचवीपर्यंत एकच शिक्षक असल्याने गावकऱ्यांनी शाळेला ठोकले कुलूप
जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील हसनापूर या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मागील 1 वर्षापासून पहिली ते पाचवीपर्यंत शिकणाऱ्या 43 विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी एकच शिक्षक असल्याने हे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या 43 विद्यार्थ्यांचा सगळा भार एकाच शिक्षकांवर असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे जोपर्यंत शाळेवर कायम शिक्षकाची नियुक्ती करणार नाही तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नसल्याचा आक्रमक पवित्रा गावकऱ्यांनी घेतलाय.
-
कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना
यंदाच्या कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आला आहे. त्यांच्या हस्ते २ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजा पार पडणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
-
कांदिवलीमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी
काल रात्री कांदिवलीतील अभिलाख नगर भागात दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ज्यामध्ये एक जण जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत एक भाजप कार्यकर्ता जखमी झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपींचा शोध घेत आहेत.
-
तुळजाभवानीच्या 15 दिवस सुरू असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवाची आज होणार सांगता
22 सप्टेंबर रोजी घटस्थापनेने सुरुवात झालेला तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची आज अश्विन पौर्णिमेच्या विविध कार्यक्रमाने सांगता होत आहे. पंधरा दिवस सुरू असलेल्या महोत्सवानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांनी हजेरी लावली.
-
सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी काँग्रेसचं निषेध आंदोलन
सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न झाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेसच्या वतीने आज दुपारी २ वाजता वांद्रे इथल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निदर्शन आंदोलन करण्यात येणार आहे.
Published On - Oct 07,2025 7:58 AM
