Maharashtra Breaking News LIVE 13 February 2025 : राजन साळवी एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 13 फेब्रुवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

वाशिमच्या कारंजा शहरातील राठोड मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटलमध्ये लिंग निदान केलं जात असल्याच्या माहितीवरून आरोग्य विभागाच्या पथकानं रात्री छापा टाकला. पाच गर्भावती महिला गर्भलिंग निदान करताना आढळून आल्या. त्यामुळं आरोग्य विभागानं हे सोनोग्राफी मशीन सील केलंय तर गर्भनिदान करणाऱ्या डॉक्टर रजनी राठोड यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय. अमरावतीमधून शेकडो भाविकांना प्रयागराज येथे महाकुंभमध्ये नेल्याचे प्रकरण. अखेर आयोजक सुरज मिश्रा यांच्याविरुद्ध पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल. भाविकांची प्रयागराजमध्ये गैरसोय आणि भाविकांना वाऱ्यावर सोडून पळ काढल्याचा भाविकांनी केला होता आरोप. भाविकांनी सुरज मिश्राविरोधात केले होते अमरावती पोलीस आयुक्त कार्यालय परिसरात आंदोलन. गृहराज्यमंत्र्याच्या कार्यक्रमातही भाविकांनी घुसण्याचा प्रयत्न केला होता.
LIVE NEWS & UPDATES
-
शिवसेनेचे पुण्यातील मिशन टायगर रखडले
शिवसेनेचे पुण्यातील मिशन टायगर रखडले आहे. एका माजी आमदाराला एकनाथ शिंदे यांच्याकडून कमिटमेन्ट हवी असल्याने प्रवेशाला विलंब होत आहे. 25 माजी नगरसेवक आणि 3 माजी आमदार घेऊन ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत.
-
राहुल शेवाळे शिंदेंच्या भेटीसाठी
राहुल शेवाळे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहे. दिल्लीतील राजकीय रिपोर्ट ते शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना देणार आहेत.
-
-
आदित्य ठाकरे मुंबईकडे रवाना
आदित्य ठाकरे संजय राऊत संजय दिना पाटील मुंबईला रवाना झाले आहे. दिल्लीत आदित्य ठाकरे यांनी शिवसेना उबाठाच्या सर्व खासदारांची बैठक घेतली होती.
-
राजन साळवीसोबत वाद नाही- उदय सामंत
राजन साळवी यांच्यासोबत कोणताही वाद नाही, असे शिवसेना नेते उदय सामंत यांनी म्हटले आहे. राजन साळवी शिवसेना उबाठतून शिवसेनेत प्रवेश करत आहे. त्यावर उदय सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिली.
-
आदित्य ठाकरे यांनी घेतली खासदारांची बैठक
आदित्य ठाकरे यांनी घेतली शिवसेना उबाठा खासदारांची आज बैठक घेतली आहे. प्रत्येक खासदारांनी आपआसातला संवाद कायम ठेवण्याचा सल्लाही आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
-
-
ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांचा थोड्याच वेळात शिवसेनेत प्रवेश
ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेत आज ते पक्षप्रवेश करणार आहे .एकनाथ शिंदे यांच्या हस्ते साळवी यांचा सत्कार करत पक्ष प्रवेश होणार आहे.. ठाण्यातील टेंभी नाका आनंद आश्रम या ठिकाणी राजन साळवी आणि त्यांच्या सोबत इतर पदाधिकारी देखील पक्षप्रवेश करणार आहे
-
भारतीय जनता पार्टीचे मिशन पुणे महानगर पालिका
भाजपा कार्यकर्त्यांची रविवारी पुण्यात कार्यशाळा होणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा होत आहे.
-
तुळजापूर येथील कुलस्वामिनी सूतगिरणीला भीषण आग; लाखोंचं नुकसान
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील कुलस्वामिनी सूतगिरणीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सूतगिरणीतील कापसाच्या गाठींनी पेट घेतल्याने आग वाढल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नसून आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-
‘आमच्याकडून मैत्री कायमच राहणार’;केजरीवालांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरेंनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. “केजरीवालांनी केलेली काम जनतेला माहित आहेत. आमच्याकडून जी मैत्री आहे ती कायम राहिल” अस आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
-
‘शिवभोजन’ दुकान दार अडचणीत; उधार घेऊन केंद्र चालवण्याची वेळ
‘शिवभोजन’ दुकान दार अडचणीत आले असून पाच महिन्यांपासून अनुदान थकल्याचं म्हटलं आहे. गोंदिया जिल्ह्यात एकूण 53 ‘शिवभोजन’ केंद्रे आहेत. उधार-उसनवारी करुन केंद्र चालवण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याचं म्हटलं जातं.
-
ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी आज शिवसेनेत प्रवेश करणार
ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे. प्रवेशापूर्वी शिंदेंच्या निवासस्थानी सामंत बंधू आणि साळवींची बैठक पार पडली. सामंत बंधूंकडून राजन साळवींच्या पक्षप्रवेशाचं स्वागत केलंय.
-
राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडायला नको होती- भास्कर जाधव
“राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडायला नको होती. साळवी दुसऱ्या पक्षात जात आहेत याबाबत खेद वाटतोय. साळवींनी खंबीरपणे पाय रोवून उभं राहायला हवं होतं,” अशी खंत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.
-
पुणे विद्यापीठावर अभाविपकडून महामोर्चा
पुणे विद्यापीठावर अभाविपकडून महामोर्चा काढण्यात आला. अभाविप कार्यकर्त्यांनी विद्यापिठाच्या मुख्य इमारतीसमोर ठिय्या आंदोलन केलंय. विविध मागण्यांसाठी अभाविपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
-
आदित्य ठाकरे हे अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी दाखल
आदित्य ठाकरे हे अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी, अरविंद सावंत यांच्यासोबत आदित्य ठाकरे हे केजरीवालांच्या घरी दाखल झाले आहेत.
-
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी बोलावलेल्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्यावी, आदित्य ठाकरेंच्या सूचना
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी बोलावलेल्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्यावी, अशा सक्त सूचना आदित्य ठाकरे यांनी खासदारांना दिल्या आहेत. आदित्य ठाकरे यांच्या सूचनेने खासदार नाराज झाले आहेत. मंत्र्यांनी बोलावल्यानंतर जायला हवं, अशा शब्दांत खासदारांनी नाराजी बोलून दाखवली.
-
बजेटनंतरही सोलापुरात कांद्याचे दर घसरलेलेच पाहायला मिळत आहेत
बजेटनंतरही सोलापुरात कांद्याचे दर घसरलेलेच पाहायला मिळत आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक घटली तरीही भाव पडलेलेच आहेत. बाजार समितीत कांद्याला प्रतिकिलो केवळ 15 ते 25 रुपयापर्यंत भाव मिळतोय. दुसरीकडे मागील दीड वर्षात कांदा लिलावातून जवळपास 1140 कोटी रुपयांची उलाढाल झाली. त्यामुळे कांद्यासाठी राज्यातील नंबर दोनची बाजार पेठ म्हणून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती उदयाला आलीय.
-
एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारलं : राजन साळवी
शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे थोड्याच वेळात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राजन साळवी यांनी या पक्ष प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दुपारी 3 वाजता पक्षप्रवेश करणार आहे. सर्व सहाकाऱ्यांसह पक्षप्रवेश करणार आहे. एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारलं आहे, अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांनी टीव्ही9 मराठीला दिली.
-
खासदार संजय दिना पाटील आदित्य ठाकरे यांची घेणार भेट
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. खासदार संजय दिना पाटील आदित्य ठाकरे यांची भेट घेणार आहेत. संजय दीना पाटील थोड्याच वेळात भेटीसाठी पोहोचणार आहेत. संजय राऊत यांच्या निवासस्थानी ही भेट होणार आहे. आदित्य ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला होता. या कार्यक्रमाला संजय दीना पाटील हे देखील उपस्थित होते. महाराष्ट्राचा कार्यक्रम असल्याने मी उपस्थित असल्याचं संजय दीना पाटील यांनी म्हटलं. त्यामुळे आता ही भेट महत्त्वाची समजली जात आहे.
-
मुल तालुक्यातून वाघांची शिकार करणाऱ्या संशयित टोळीला अटक
चंद्रपुरातून मोठी बातमी समोर आली आहे. मुल तालुक्यातून वाघांची शिकार करणाऱ्या एका संशयित टोळीला अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपींच्या ताब्यातून शिकारीचे दोन लोखंडी फासे जप्त करण्यात आले आहेत. मुल बस स्टँड जवळच्या या संशयित आरोपींनी राहुटी उभारली होती. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केल्यावर संशयास्पद वस्तू आढळल्या. वन विभागाने दोन पुरुषांसह एका महिलेला ताब्यात घेतलं. आता आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. राजुरा येथे अजित राजगोंड याच्या अटकेनंतर जिल्हाभरात ठिकठिकाणी संशयित शिकाऱ्यांच्या विरोधात सर्च ऑपरेशन राबविले जात आहे.
-
आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेणं टाळलं?
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान त्यांनी दिल्लीत असूनही शरद पवार यांची भेट घेणं टाळलं असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र शरद पवार यांना भेटण्याबाबत आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज शरद पवार यांना भेटणार नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
-
भोंदू बाबाला नाशिकच्या ग्राहक न्यायालयाचा दणका
कानपुरमधील भोंदू बाबाला नाशिकच्या ग्राहक न्यायालयाने दणका दिला. पीडित महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी दंड ठोठावला आहे. ग्राहक न्यायालयाच्या निर्णयाचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्वागत केले आहे.
-
ऑपरेशन टायगरला वेग?
काल रात्री आयोजित केलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमाला खासदार संजय जाधव, नागेश आष्टीकर आणि संजय वाकचौरे हे उपस्थित होते. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड चर्चेचा विषय ठरली आहे.
-
माझं मौनव्रत आहे-छगन भुजबळ
फक्त ड्रायव्हर सोबत बोलायचं आहे.टीव्हीशी बोलायचं नाही. माझं मौनव्रत आहे. मी कुणाशीही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.
-
संजय राऊतांचा ज्योतिरादित्य शिंदेंवर जोरदार टीका
महाराज, इतिहास समजून घ्या. वीर महादजी शिंदे हे महान स्वाभिमानी मराठा योद्धा होते.त्यांच्या नावे पळपुट्यांना पुरस्कार देणे हा महादजी शिंदे यांचा अपमान आहे.एकनाथ शिंदे यांना जयाजीराव शिंदे यांच्या नावे पुरस्कार द्यायला काहीच हरकत नाही. महादजी यांनी दिल्ली पुढे लोटांगण घातले नाही असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.
-
सुदर्शन घुलेच्या आवाजाचा नमुना घेणार
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी सुदर्शन घुले याच्या आवाजाचे नमुने घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्याआधारे न्यायालयात सबळ पुरावे सादर करता येतील.
-
बुलेटस्वारावर धडक कारवाई
धाराशिव मध्ये वाहतुक शाखेच्या वतीने शहरात कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्या बुलेटचालकावर कारवाई करण्यात आली आहे.यामध्ये एक तासात 15 बुलेट ताब्यात घेण्यात आल्या असुन त्याचे नियमबाह्य सायलेन्सर काढुन टाकण्यात आले तर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे
-
सांगलीत खाद्य पदार्थाच्या गोदामाला भीषण आग
सांगलीत खाद्य पदार्थाच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. तर विदेशात पाठवण्यासाठीचा माल या आगीत नष्ट झाल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
-
राजधानी दिल्लीत आदित्य ठाकरे – राहुल गांधींची झाली भेट
राजधानी नवी दिल्लीमध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. काल रात्री दोघांची भेट झाली असून जवळपास अर्धा तास त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
मराठा समाज सर्व बघतोय -ज्योतिरादित्य शिंदे यांचे सूचक ट्विट
मराठा समाज सर्व बघतोय. बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श बाजूला सारून न केवळ हिंदुत्वाचा नाही तर मराठा स्वाभिमानाचा अपमान करणारे, मराठा सन्मान काय समजतील? असा टोला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला आहे.
-
जो खुद अपने समाज में जनाधार और सम्मान गंवा चुके हैं, वे दूसरों के सम्मान से कष्ट में हैं – ज्योतिरादित्य शिंदेंचा ट्विटमधून निशाणा
मराठा समाज सब देख रहा है! बालासाहेब ठाकरे के आदर्शों को ठुकराकर, न सिर्फ हिंदुत्व बल्कि मराठा स्वाभिमान का अपमान करने वाले लोग, मराठा सम्मान को क्या समझेंगे?
जो खुद अपने समाज में जनाधार और सम्मान गंवा चुके हैं, वे दूसरों के सम्मान से कष्ट में हैं। – असं ट्विट ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलं आहे.
मराठा समाज सब देख रहा है! बाला साहेब ठाकरे के आदर्शों को ठुकराकर, न सिर्फ हिंदुत्व बल्कि मराठा स्वाभिमान का अपमान करने वाले लोग, मराठा सम्मान को क्या समझेंगे?
जो खुद अपने समाज में जनाधार और सम्मान गंवा चुके हैं, वे दूसरों के सम्मान से कष्ट में हैं। https://t.co/ft1izpn3n8
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) February 13, 2025
-
अजित पवारांनी सुरेश धस यांना भेटीची वेळ दिली नाही – सूत्रांची माहिती
अजित पवारांनी सुरेश धस यांना भेटीची वेळ दिली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बीड जिल्हा नियोजन समितीतील तक्रारींबाबात धस हे अजित पवारांची भेट घेणार होते. मात्र भेटीची वेळ न मिळाल्याने धस हे बीडच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते.
-
पिंपरी चिंचवडच्या शाळेत बॉम्ब ? मेलमुळे खळबळ
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या बावधन मध्ये खासगी शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल पोलीस आयुक्तालयात मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी बीडीडीएस पथक आणि पोलीस दाखल झाले आहेत. घाबरून न जाण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. असे फेक मेल नेहमीच प्राप्त होतात, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
-
धाराशिवमध्ये कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्या बुलेटचालकांवर कारवाई, तासाभरात 15 बाईक्स ताब्यात
धाराशिव शहरात कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्या बुलेटचालकांवर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये तासाभरात तासात 15 बुलेट ताब्यात घेण्यात आल्या असून त्यांचे नियमबाह्य सायलेन्सर काढुन टाकण्यात आले . तसेच दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
-
कानपूरमधीलभोंदू बाबाला नाशिकच्या ग्राहक न्यायालयाचा दणका
कानपूरमधील भोंदू बाबाला नाशिकच्या ग्राहक न्यायालयाने दणका दिला आहे. पीडित महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी दंड ठोठावला.
ग्राहक न्यायालयाच्या निर्णयाचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून स्वागत करण्यात आलं आहे.
सिडकोतील महिलेने कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी भोंदूबाबाची मदत घेतली होती. भूतबाधा दूर करण्यासाठी पीडित महिलेकडून अडीच लाखांची रक्कम घेत ऑनलाईन पूजा केली होती. ग्राहक संरक्षण कायदा 2019 चा आधार घेऊन महिलेने ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती.
-
नमो सेंट्रल पार्कमुळे ठाणे महापालिका कोट्याधीश
नमो सेंट्रल पार्कमुळे ठाणे महापालिका कोट्याधीश. तब्बल 13 लाख 70 हजार पर्यटकांची भेट. पालिकेच्या तिजोरीत पर्यटकांच्या भेटीने वर्षभरात पार्कला या कालावधीत सहा कोटी पंधरा लाखाहून अधिक उत्पन्न मिळाले. पालिकेने बांधीव हस्तांतर विकास हक्काच्या माध्यमातून कोलशेत मध्ये सुमारे 20.5 एकर जागेवर नमो द ग्रँड सेंट्रल पार्कची उभारणी करण्यात आली आहे.
-
शिंदे साहेबांचा आशिर्वाद घेतला – राजन साळवी
“एकनाथ शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते. मागच्या काळात त्यांच्यासोबत मी जाऊ शकलो नाही. पण जाण्यासाठी निमित्त लागतं. ते निमित्त लागलं, मी या ठिकाणी आलो. शिंदे साहेबांचा आशिर्वाद घेतला” असं राजन साळवी म्हणाले.
-
शिर्डीत आज साई परिक्रमा महोत्सव
हजारोंच्या संख्येने भाविक परिक्रमा महोत्सवात सहभागी. साई नामाचा जयघोष, पारंपारिक वाद्याच्या तालात परिक्रमेस सुरूवात. शिर्डीच्या चोहोबाजुच्या सीमेवरून मार्गक्रमण करत पार पडणार परिक्रमा. शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेले चित्ररथावरील देखावे, ढोल-ताशांचा गजर अशा थाटात खंडोबा मंदिरापासून सकाळी 5.30 वाजता परिक्रमेस सुरूवात.
-
युती असेलच हे सांगता येत नाही, रत्नागिरी शिवसेना जिल्हाप्रमुख
“येणाऱ्या प्रत्येकाचं जोरदार स्वागत झालं पाहिजे ही शिंदे साहेबांची भूमिका आहे. नेत्यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. माजी आमदारांच्या पक्ष प्रवेशाला विरोध करणाऱ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल. जे जे शिवसेनेत प्रवेश करताहेत त्यांना प्रवेश दिलाच पाहिजे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय होईल माहिती नाही. युती असेलच हे सांगता येत नाही. अशा स्थितीत शिंदे साहेब आणि आपल्या नेत्यांना बळ दिलं पाहिजे” असं रत्नागिरी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित म्हणाले.
-
गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरवर छापा
वाशिमच्या कारंजा शहरातील राठोड मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटलमध्ये लिंग निदान केलं जात असल्याच्या माहितीवरून आरोग्य विभागाच्या पथकानं रात्री छापा टाकला. पाच गर्भावती महिला गर्भलिंग निदान करताना आढळून आल्या. त्यामुळं आरोग्य विभागानं हे सोनोग्राफी मशीन सील केलंय तर गर्भनिदान करणाऱ्या डॉक्टर रजनी राठोड यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय.
Published On - Feb 13,2025 8:13 AM





