AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashatra News Live : नाशिक: 22 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन

| Edited By: | Updated on: Nov 08, 2025 | 9:25 PM
Share

Maharashtra News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashatra News Live : नाशिक: 22 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन

बाबा सिद्दीकींच्या पत्नीनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हत्येचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची शेहझीन सिद्दीकी यांची मागणी आहे. या याचिकेत मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हत्येचे खरे गुन्हेगार पकडण्यात मुंबई पोलिसांना अपयश आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राष्ट्रवादीत रूपाली Vs रूपाली या वादाचा परिणाम स्वरूप पक्ष प्रवक्ता रुपाली ठोंबरे यांच्यावर पक्षाने शिस्तभंग नोटीशीचा बडगा उगारला. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर टीका करणं रूपाली ठोंबरे यांनी अखेर महागात पडल्याचं दिसत आहे.ब नावट कागदपत्र बनवून जमीन विक्रीचा घोटाळा करणाऱ्या एका व्यापाराला आर्थिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. जवळपास 50 कोटीच्या जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात आला. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Nov 2025 08:45 PM (IST)

    लोणावळा: बोरघाटात बर्निंग ट्रकचा थरार

    लोणावळ्या जवळील बोरघाट बर्निंग ट्रकचा थरार पहायला मिळाला. बोरघाटातील वाहतूक पोलीस चौकीच्या समोर ही घटना घडली. ट्रकला अचानक लागलेल्या आगीमुळे एकच गोंधळ उडाला होता. ट्रक वरील टपावर ठेवण्यात आलेल्या कापडाला आग लागल्याने संबंधित घटना घडली, परंतु चालकाने प्रसंगवधान राखत ट्रक मधल्या लेनवर लावल्याने मोठा अनर्थ टळला.

  • 08 Nov 2025 08:29 PM (IST)

    भंडारा: भाजपकडून उमेदवारीपूर्वीच प्रचाराला सुरुवात

    भंडाऱ्यात भाजपकडून उमेदवारीपूर्वीच प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. आजपासून डोअर टू डोअर मोहिमेचा शुभारंभ झाला आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरलेले नाहीत, मात्र प्रचार सुरू करण्यात आला आहे.

  • 08 Nov 2025 08:15 PM (IST)

    नाशिक: 22 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन

    चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबली येथे 22 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. सासरकडून हुंड्यासाठी मारहाण, शिवीगाळ आणि त्रासाला कंटाळून मोहिनी चंद्रकांत आहिरे हिने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. यानंतर संतप्त माहेरच्यांनी सासरच्या घरासमोरच अंत्यविधी केला.

  • 08 Nov 2025 07:03 PM (IST)

    जरांगे पाटील यांचे सहकारी नार्को टेस्टचा अर्ज घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात

    मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी पांडुरंग तारक हे नार्को टेस्टचा अर्ज घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले आहेत. धनंजय मुंडे यांनी नार्को टेस्ट करण्याचे आवाहन केल्यानंतर जरांगे पाटलांनी सुद्धा यासाठी तयारी दर्शवल्यानंतर आज त्यांचे सहकारी जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांना हा अर्ज सुपूर्द करणार आहेत.

  • 08 Nov 2025 07:00 PM (IST)

    जालना स्थानिक गुन्हे शाखेकडून मनोज जरांगे पाटलांच्या सहकाऱ्यांचे जबाब घेतले जाणार

    मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचं उघडकीस आल्यानंतर आता मनोज जरांगे यांचे सहकारी आणि तक्रारदार गंगाधर काळकुटेंसह अन्य सहकाऱ्यांचे जबाब जालना स्थानिक गुन्हे शाखेकडून नोंदवले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

  • 08 Nov 2025 06:54 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांनी उशीर केला – दादा भूसे

    उद्धव ठाकरे यांनी दौरा काढायला उशीर केला आहे. ज्या काळात अतिवृष्टीने शेतकरी बांधवांचे नुकसान झाले. तेव्हा आम्ही सगळे बांधावर जाऊन पाहणी केली. त्याचा अहवाल तयार करणे, निधी जिल्ह्याला वर्ग करणे. लवकरात लवकर निधी शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असे मंत्री दादा भूसे यांनी म्हटले आहे.

  • 08 Nov 2025 06:42 PM (IST)

    सांगलीमध्ये तब्बल एक महिन्यानंतर बेदाणे सौद्यांना सुरुवात

    तब्बल एक महिन्यानंतर सांगलीमध्ये बेदाणे सौद्यांना सुरुवात झाली आहे. सौद्याच्या पहिल्याच दिवशी बेदाण्याला 410 रुपये इतका उच्चांकी दर मिळाला आहे. दिवाळीनंतर सुरू झालेल्या सौद्यांमध्ये बेदाण्याच्या दराला 20 ते 25 रुपये इतका जादाचा दर मिळाला आहे. कमी प्रमाणात बेदाण्याची आवक झाली असली तरी सरासरी 300 ते 410 रुपये इतका बेदाण्याला दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

  • 08 Nov 2025 06:35 PM (IST)

    पक्ष काढणारी राज्यातील मी पहिली महिला – करुणा मुंडे

    राज्यातील मी पहिली अशी महिला आहे जिने पक्ष स्थापन केला आहे. पुरुषांनी काढलेले आठ पक्ष असून देखील एका महिलेला पक्ष काढावा लागत आहे.पैशासाठी मतदान करू नका.लोक मटण ,दारू पाजून पक्ष चालवत आहेत. एक पक्ष तर आई – वडिलांना जेल मधे टाकतो आहे अशी टीका करुणा मुंडे यांनी केली आहे.

  • 08 Nov 2025 06:16 PM (IST)

    सिरसाळ्यात मुंडे समर्थकांकडून धनंजय मुंडेंच्या फोटोला दुग्धाभिषेक

    सिरसाळ्यात मुंडे समर्थकांकडून धनंजय मुंडेंच्या फोटोला दुग्धाभिषेक

    मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केले आहेत गंभीर आरोप

    मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांनंतर धनंजय मुंडेंच्या फोटोला दुग्धाभिषेक

  • 08 Nov 2025 06:15 PM (IST)

    सांगलीत बेदाणे सौद्याला चांगला दर

    तब्बल एक महिन्यानंतर सांगलीत बेदाणे सौद्यांना सुरुवात झाली आहे.सौद्याच्या बेपहिल्याच दिवशी बेदाण्याला 410 रुपये इतका उच्चांकी दर मिळाला आहे. दिवाळीनंतर सुरू झालेल्या सौद्यांमध्ये बेदाण्याच्या दराला 20 ते 25 रुपये इतका जादाचा दर मिळाला आहे.कमी प्रमाणात बेदाण्याची आवक झाली असली तरी 300 सरासरी 300 ते 410 रुपये इतका बेदाण्याला दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण

  • 08 Nov 2025 05:50 PM (IST)

    निलेश घायवळ याच्यावर आणखी एक गुन्हा

    अहिल्यानगरमध्ये गुंड निलेश घायवळ याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामखेडमध्ये तरुणावर हल्ल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल केला गेला आहे. आरपीआय जिल्हाध्यक्ष सुनील साळवी यांच्या कुटुंबावर 24 ऑगस्टला हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 08 Nov 2025 05:33 PM (IST)

    दीपेश म्हात्रेंचा रविवारी भाजपमध्ये प्रवेश, राजकीय समीकरण बदलणार

    दीपेश म्हात्रेंचा उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समोर आलं आहे. रविवारी डोंबिवली जिमखान्यात पक्ष प्रवेश पार पडणार आहे. म्हात्रेंच्या प्रवेशामुळे कल्याण डोंबिवली महानगपालिकेतील राजकीय समीकरण बदलणार असल्याचं म्हटलं जात आहे.

    दीपेश म्हात्रेंचा भाजप प्रवेश उबाठा सोबतच एकनाथ शिंदे यांनाही मोठा धक्का मानला जातोय.  दीपेश म्हात्रे यांनी गेल्या वर्षी 4 माजी नगरसेवकांसोबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राम राम ठोकून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

    मात्र एकनाथ शिंदे पुन्हा म्हात्रे यांना त्यांच्या पक्षात घेण्यास प्रयत्न करत होते. मात्र रवींद्र चव्हाण यांनी दीपेश म्हात्रेचा पक्ष प्रवेशाचा मुहूर्त निश्चित करून एका दगडात दोन पक्षी मारल्याची जोरदार चर्चा सुरु झालीय.

  • 08 Nov 2025 05:30 PM (IST)

    धनंजय मुंडे यांच्या फोटोला समर्थकांकडून दुग्धाभिषेक

    परळी सिरसाळा येथे मुंडे समर्कांकडून धनंजय मुंडे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालण्यात आला. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर काल गंभीर आरोप केले होते. याला प्रत्युत्तर म्हणून धनंजय मुंडे यांनी देखील पत्रकार परिषदेच्याया माध्यमातून मनोज जरांगे यांना आवाहन दिले होते. त्यानंतर आता समर्थकांनी धनंजय मुंडेंच्या फोटोला दुग्धाभिषेक घालण्यात आला आहे.

  • 08 Nov 2025 04:55 PM (IST)

    राहुल गांधी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार का करत नाहीत? – राजनाथ सिंह

    केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “जर राहुल गांधींना बिहारमधील लोकांची मते चोरीला जात आहेत असे वाटत असेल तर ते निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार का करत नाहीत? मी त्यांना असेही विचारू इच्छितो की, सत्य सांगून राजकारण करता येत नाही का?”

  • 08 Nov 2025 04:36 PM (IST)

    आंबेडकरी कार्यकर्त्यांचा अजितदादांच्या कार्यालयावर मोर्चा

    आंबेडकरी कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला आहे. पुणे जिल्ह्यात जमिन माफियांच्या सुळसुळाटाचा आरोप करत हा मोर्चा काढण्यात आला. पार्थ पवारांवर एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी जोरकसपणे मांडली.

  • 08 Nov 2025 04:20 PM (IST)

    पुणे भ्रष्टाचाराचा अड्डा, मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी: सकपाळ

    महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे की, पुणे भ्रष्टाचाराचे केंद्र बनत आहे. हे सर्व संघटित गुन्हेगारीचे एक प्रकार आहे. सरकारने चौकशीसाठी बनावट केस रचली आहे. हे सरकार निर्लज्ज आहे आणि दलालांसाठी काम करत आहे. पुण्यासारख्या शहरात हा प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याची जबाबदारी घ्यावी.

  • 08 Nov 2025 04:06 PM (IST)

    संसदेचे हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबरपासून

    केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विटरवर हिवाळी अधिवेशनाबद्दल पोस्ट करत लिहिले की, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 1 डिसेंबर 2025 ते 19 डिसेंबर 2025 पर्यंत संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलावण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

  • 08 Nov 2025 04:00 PM (IST)

    जमिनीचा व्यवहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल, कारवाई नियमानुसारच: फडणवीस

    जमिनीचा व्यवहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्याचं तसेच कारवाई नियमानुसारच झाल्याचं असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच पार्थ पवारांवर गुन्हा दाखल न करण्याबाबतही फडणवीसांनी स्पष्टोक्ती दिली आहे.

  • 08 Nov 2025 03:49 PM (IST)

    मनोज जरांगेंच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त 4 पोलीस कर्मचारी तैनात

    मनोज जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यानंतर काही गोंधळ होऊ नये यासाठी मनोज जरांगेंच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त 4 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मनोज जरांगेंसह विरेंद्र पवार, गंगाधर काळकुटेंनाही नोटीस बजावण्यात आली आहे.

  • 08 Nov 2025 03:34 PM (IST)

    मनोज जरांगेंसह विरेंद्र पवार, गंगाधर काळकुटेंसह इतरांना पोलिसांची नोटीस

    मनोज जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. तसेच त्यांच्यासह विरेंद्र पवार, गंगाधर काळकुटेंसह अनेकांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. मार्च महिन्यात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी नोटीस बजावली आहे. जरांगेंना चौकशीसाठी 10 तारखेला पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • 08 Nov 2025 03:13 PM (IST)

    मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस

    मनोज जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मार्च महिन्यात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी नोटीस बजावली आहे. जरांगेंना चौकशीसाठी 10 तारखेला पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • 08 Nov 2025 02:50 PM (IST)

    ठाण्यातील सोसायटीतील लिफ्ट अचानक कोसळली

    ठाणे पुर्वेकडील कोपरी येथील सिद्धार्थनगर येथील बीएसयुपी योजनेच्या अष्टविनायक सोसायटीतील लिफ्ट अचानक कोसळल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या दुर्घटनेत एक गर्भवती महिला आणि काही मुले सुर्दैवाने बचावली आहे. घटनास्थळी कोपरीतील राजकिय तसेच सामाजिक कार्यकर्त्यानी भेट देऊन रहिवाश्यांना धीर दिला.

  • 08 Nov 2025 02:40 PM (IST)

    सरकारी जमीन हडपण्याचा प्रयत्न करत आहेत- एकनाथ खडसे

    सरकारी जमीन हडपण्याचा प्रयत्न काही वर्षापासून हेमंत गावंडे आणि त्याचे सहकारी करत आहे. ही जमीन 1883 पासून सरकारची आहे, त्या आधी ती पेशव्यांची जमीन होती. विध्वंस कुटुंब होते त्यांना पेशव्यांनी ही जमीन उदरनिर्वासाठी दिली होती. सरकारने नंतरच्या काळात ती जमीन पुन्हा आपल्या ताब्यात घेतली. 1920 ला ही जमीन कृषी प्रयोजनासाठी देण्यात आली असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

  • 08 Nov 2025 02:25 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील करणार नार्को टेस्ट

    मनोज जरांगे पाटील यांनी काल नार्को टेस्ट करण्यासाठी आपण तयार आहे आणि पहिला अर्ज मीच करणार असं सांगितलं नंतर आज त्यांनी अर्ज लिहिलेला आहे आणि त्यांचे सहकारी पांडुरंग तारख हे सदरील अर्ज घेऊन जालन्याच्या दिशेने रवाना झालेले आहे. पोलीस अधीक्षकांना हा अर्ज सुपूर्द करण्यात येणार आहे त्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री, ग्रह विभाग न्याय व विधी विभाग यांचा उल्लेख केलेला असल्यास जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे.

  • 08 Nov 2025 02:15 PM (IST)

    नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच सटाण्यात राजकीय तापमान चढले

    सटाणा नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरात राजकीय तापमान चांगलेच चढले आहे. नगराध्यक्षपद महिला राखीव असल्याने अनेक दिग्गजांचे राजकीय समीकरणच कोलमडले. युती किंवा आघाडीऐवजी सर्व पक्ष आपापले उमेदवार मैदानात उतरवतील, अशीही चर्चा

  • 08 Nov 2025 01:58 PM (IST)

    संजय शिरसाटांचा रोहित पवारांना टोला

    संजय शिरसाटांनी रोहित पवारांना टोला लगावला. मी जनरल स्टेटमेंट केले आहे. काही लोकांना राजकारणात किडा असतो. राजकारणात स्वतः न्यायमूर्ती आहे अस दाखवता. आता सुरू असलेल्या प्रकरणात त्यांनी बोलले नाही. त्यामुळे मी ट्विट केलं आहे. विद्वानांनी यावर बोलल पाहिजे. नको त्यावेळी बोलणाऱ्यांनी आता बोलल पाहिजे. सकारात्मक नकारात्मक काही का होत नाही त्यांनी बोललं पाहिजे असे शिरसाट म्हणाले.

  • 08 Nov 2025 01:50 PM (IST)

    उद्धव ठाकरेंसमोर शेतकरी मुलीचे गाऱ्हाणे

    परभणी दौऱ्यादरम्यान शेतकऱ्याच्या मुलीने उद्धव ठाकरेंसमोर गाऱ्हाणे मांडेल.पोशिंदा असून आम्ही उपाशी आहोत. खर्च निघत नाही, व्याजावर आम्ही पैसे काढले होते. आम्हाला 5, 6 हजार नको, केवळ शेती मलाला दर द्या. आमची दिवाळी गोड झाली नाही, शिक्षण मध्ये फ्री माफ म्हणले मात्र आम्हाला फिस भरावी लागली, कापसाला दर मिळत नाही, फी भरण्यासाठी कापूस 5 हजारांनी विकावा लागला. भयंकर अडचणी आहेत, महिलांसोबत मुलांचे शिक्षण मोफत करा. शिक्षणासाठी पेरणीसाठी सगळे दागिने गेले, व्याजाने आणलेलं पैसे कसे फेडायचे, आम्हाला हक्काचे शेतीमाल दर द्या अशी मागणी या मुलीने केली.

  • 08 Nov 2025 01:40 PM (IST)

    श्रेयवाद पेटला, सुनील राऊतांचा पुतळा पेटवला

    विक्रोळीमध्ये श्रेय वादावरून ठाकरे आणि शिंदे शिवसेना आमनेसामने दिसले. नव्याने बांधकाम सुरू असलेल्या महात्मा फुले रुग्णालय वरून सुनील राऊत विरुद्ध शिंदे गटाची युवासेनेचा संघर्ष पेटला. विक्रोळीतील महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाच्या पुनर्बांधणीवरून राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. 2014 मध्ये बंद पडलेलं हे रुग्णालय स्थानिक नागरिकांना आंदोलन केल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 500 बेडचा नवीन रुग्णालय बांधण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी या रुग्णालयाचे काम सुरू असून आठवडाभरापूर्वी आमदार सुनील राऊत यांनी पाहणी केल्याने शिंदे गटातील युवा सेना आक्रमक झाली.आज शिंदे गटाच्या युवा सेनेने कन्नमवार नगर परिसरात आंदोलन करत सुनील राऊत याचा पुतळा जळात आंदोलन केले.

  • 08 Nov 2025 01:30 PM (IST)

    धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक

    सोलापुरात मुंडे समर्थकांकडून धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपानंतर मुंडे समर्थकही आक्रमक दिसले. धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप निराधार असून केवळ राजकीय द्वेषातून हे आरोप केले जात असल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना आम्ही पत्र लिहिणार आहोत की जरांगे पाटलांच्या मागे कोणते काका आहेत याचा शोध घ्यावा, असे समर्थक म्हणाले.

  • 08 Nov 2025 01:15 PM (IST)

    प्रताप सरनाईक यांच्या विरोधात घोषणाबाजी

    स्थानिकांनी प्रताप सरनाईक यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. प्रताप सरनाईक चुकीच्या बाजूने जात होते आणि लोकांनी त्यांचा ताफा थांबवला. सध्या प्रताप सरनाईक मोठ्या कष्टाने येथून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. त्यांच्याविरोधात विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केला आहे.  मिरा भाईंदरमध्ये 200 कोटींची जमीन मंत्रिमहोदयांनी अवघ्या 3 कोटीत लाटल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

  • 08 Nov 2025 01:07 PM (IST)

    व्हेल माशाची दीड कोटी रुपयांची उलटी जप्त

    व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघा जणांना बीड पोलिसांनी अटक केली. या दोघांकडून दीड कोटी रुपये किमतीची वेल माशाची उलटी जप्त करण्यात आली असून त्यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेश शिंदे व विकास मुळे अशी या दोघांची नावे आहेत.. व्हेल माशाच्या उलटीला औषध निर्मितीत मोठे महत्त्व असून यामुळेच त्याची तस्करी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान आता या प्रकरणाची अधिक चौकशी बीडचे शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

  • 08 Nov 2025 12:54 PM (IST)

    अजित पवारांच्या मुलाला सोडून कोणाला फुकट नकोय – उद्धव ठाकरे

    अजित पवारांच्या मुलाला सोडून कोणाला फुकट नकोय. सोयाबीन विकल्यानंतर व्यापारी मलिदा खातात. आज संकट आहे म्हणून कर्ज मुक्तीची मागणी करतोय. माझा शेतकरी गुन्हेगार नाही. गुन्हेगार सगळे भाजप मध्ये आहेत. शेतकऱ्यांकडे ढुंकून पहायला वेळ नाही. मत चोरी करून सरकार आलय. मात्र त्यांचं काम आम्ही करतोय अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

  • 08 Nov 2025 12:38 PM (IST)

    कर्जमाफीबद्दल घोषणा प्रत्यक्ष कृती नाही – शरद पवार

    कर्जमाफीबद्दल घोषणा प्रत्यक्ष कृती नाही. व्हीव्हीपॅटने मतदान केल्यास शंका राहणार नाही. कुटुंब आणि राजकारण दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मनसेबाबत मविआने एकत्र बसून निर्णय घ्यावा, असं शरद पवार म्हणाले.

  • 08 Nov 2025 12:32 PM (IST)

    चौकशी करुन वास्तव समाजासमोर ठेवलं पाहिजे – शरद पवार

    पार्थ पवार पुणे जमीन व्यवहार प्रकरणात चौकशी करुन वास्तव समाजासमोर ठेवलं पाहिजे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पार्थ पवार प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे सौम्य भूमिका घेतली होती. त्यावर हे सुप्रिया सुळेंच व्यक्तिगत मत असू शकतं, असं शरद पवार म्हणाले.

  • 08 Nov 2025 12:24 PM (IST)

    कामगारांच्या पीकअप गाडीला भीषण अपघात

    खेड तालुक्यातील वाशेरे ते साकुर्डी रस्त्यावर कामगारांच्या पीकअप गाडीला भीषण अपघात. अपघातात 8 कामगार गंभीर जखमी.  अनेका जखमींची प्रकृती चिंताजनक. निर्मळवाडी येथे उतारावर रस्ता खराब असल्याने अपघात. जखमांनी उपचारासाठी खेड येथे हलविण्यात आले.

  • 08 Nov 2025 11:45 AM (IST)

    शिक्षकाच्या बदली विरोधात विद्यार्थ्यांचा अघोषित संप…

    नाशिकच्या निफाड तालुक्यातील कुंभारी येथील घटना… पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा अघोषित संपच्या माध्यमातील अनोखे आंदोलन… जोपर्यंत रमाकांत शिंदे सर परत येत नाही तोपर्यंत आम्ही शाळेत येणार नसल्याची विद्यार्थ्यांची भूमिका… दिवाळीच्या सुट्ट्या नंतर तीन ऑक्टोंबर पासून शाळेला सुरुवात… मात्र सहा दिवसानंतर ही विद्यार्थी शाळेत न आल्याने परिसरात शुकशुकाट… शिक्षक व पालकांनी समजूत काढली मात्र विद्यार्थी भूमिकेवर ठाम…

  • 08 Nov 2025 11:30 AM (IST)

    आमदार तानाजी सावंत यांनी काढली विरोधकांची औकात आणि लायकी

    जातीपातीहून राजकारण करत असल्याचा तानाजी सावंत यांनी विरोधकावर केला आरोप… भारतात राहतो तो मुस्लिम हिंदू मुस्लिम आहे. तो पाकिस्तान धार्जीनी नाही… आठरा पगड जात आणि बारा बलुतेदार महत्त्वाची… परंडा नगर परिषदेमध्ये आमदार तानाजी सावंत विरुद्ध माजी आमदार राहुल मोटे, भाजपाचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अशी लढत होण्याची शक्यता….

  • 08 Nov 2025 11:14 AM (IST)

    विक्रोळीमध्ये श्रेय वादावरून ठाकरे आणि शिंदे शिवसेना आमनेसामने!

    नव्याने सुरू असलेल्या महात्मा फुले रुग्णालय वरून राऊत विरुद्ध शिंदे गटाची युवासेनेचा संघर्ष पेटला… विक्रोळीतील महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाच्या पुनर्बांधणीवरून राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे…  बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील राऊत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युवा सेनेतील कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत…. 2014 मध्ये बंद पडलेलं हे रुग्णालय स्थानिक नागरिकांना आंदोलन केल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 500 बेडचा नवीन रुग्णालय बांधण्याचे आदेश दिले होते… त्यानंतर गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी या रुग्णालयाचे काम सुरू असून आठवडाभरापूर्वी आमदार सुनील राऊत यांनी पाहणी केल्याने शिंदे गटातील युवा सेना आक्रमक झाली..

  • 08 Nov 2025 10:50 AM (IST)

    मीरा रोड येथील कनकिया पोलीस ठाण्यात गुन्हेगाराचा धिंगाणा!

    मीरा रोड कनकिया पोलीस स्टेशन मध्ये भानगडीच्या प्रकरणात 4 मुलांना चोकशी साठी बोलावण्यात आले होते आणि त्यांना डिटेकशन खोलीत थांबवून ठेवण्यात आले होते त्या वेळेस तेथे कोणीही पोलीस उपस्थित न्हवते त्याचाच फायदा घेत त्या 4 मुलांनी पोलीस ठाण्याच्या खोलीत सिगारेट ओढताणाचा व्हिडिओ काढत रिल बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला

  • 08 Nov 2025 10:40 AM (IST)

    अंबादास दानवे यांचे मोठे विधान

    आपल्या गावात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आले आहेत, 4 दिवस झाले त्यांचा दौरा सुरू आहे. मराठवाड्यात अतिवृष्टी शेतीचे नुकसान झालं. उद्धवजींनी संभाजीनगरला दौरा सुद्धा काढला होता, परत आता संवाद दौऱ्यावर आलेत, असे अंबादास दानवे यांनी म्हटले.

  • 08 Nov 2025 10:30 AM (IST)

    12 आणि 13 तारखेला न. प. च्या उमेदवारांची यादी जाहीर करू- विजय वडेट्टीवार

    चंद्रपुरात नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने उमेदवार निवडी बाबत सविस्तर बैठक घेत चर्चा केली आहे.न. प. सदस्य पदासाठीची नावे निश्चित झाली असून आता थेट नगराध्यक्ष पदासाठीची चर्चा सुरू आहे. 12 आणि 13 तारखेला अंतिम यादी जाहीर करू अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली

  • 08 Nov 2025 10:20 AM (IST)

    उद्धव ठाकरे परभणीच्या मानवत तालुक्यातील ताड बोरगाव येथे दाखल,

    अंबादास दानवे चंद्रकांत खैरे, खासदार संजय जाधव सोबत आहेत. ताड बोरगाव येथे शेतकऱ्यांसोबत संवाद साधतील,

  • 08 Nov 2025 10:10 AM (IST)

    गोंदिया जिल्ह्यात महाविकास आघाडीचे नगरपरिषद

    नगरपंचायत निवडणुकीत होणार गठबंधन. लवकरच याबाबतीत अधिकृत होणार घोषणा. महाविकास आघाडीमध्ये बहुजन समाज पार्टीचा नगरपरिषदेत होणार समावेश. नगरपंचायत नगरपरिषदेमध्ये काँग्रेस गठबंधन यांच्या होणार विजय काँग्रेस नेते माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांची माहिती….

  • 08 Nov 2025 09:44 AM (IST)

    पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण – शीतल तेजवानी फरार?

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा जमीन गैरव्यवहार प्रकरण सध्या चर्चेत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या शीतल तेजवानी या फरा झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

  • 08 Nov 2025 09:32 AM (IST)

    विजय वडेट्टीवर यांचा मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप

    मंत्री प्रताप सरनाईक यांनी जमीन घोटाळा केल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.  सरनाईक यांनी ज्या जमिनीचा घोटाळा केल्याचा आरोप आहे ती जमीन मीरा भाईंदरमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.

  • 08 Nov 2025 09:12 AM (IST)

    कर्जबाजारी झालेल्या नोकरांनीच मालकाला लुटलं, 4 लाखांवर डल्ली

    छत्रपती संभाजीनगर –  कर्जबाजारीपणामुळे नोकरांनीच मालकाचे चार लाख रुपये चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिन्सी परिसरात हा सर्व प्रकार घडला असून पोलिसांनी अवघ्या 12 तासांतच आरोपींना पकडत या गुन्ह्याचा पर्दाफाश केला.

  • 08 Nov 2025 09:01 AM (IST)

    भंडाऱ्याच्या खापा गावात दोन गटात तुफान राडा, चौघे जखमी

    भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील खापा गावात सुरू असलेल्या मंडईच्या लावणी कार्यक्रमादरम्यान क्षुल्लक कारणावरून काही तरुणांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि त्यानंतर रामटेक – गोंदिया या राष्ट्रीय महामार्गावरील खापा चौकात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. त्यात चौघे जखमी झाले.

  • 08 Nov 2025 08:58 AM (IST)

    मुंबईत भारतातील पहिले ‘कांदळवन उद्यान’ डिसेंबरमध्ये खुलं होणार

    मुंबईत भारतातील पहिले ‘कांदळवन उद्यान’ डिसेंबरमध्ये खुलं होणारय  मुंबईतील गोराई परिसरातील ३० कोटी रुपये खर्चून साकारलेले भारतातील पहिले कांदळवन उद्यान डिसेंबर महिन्यात पर्यटकांसाठी खुले होणार आहे.  800 मीटर लांबीच्या उंच लाकडी मार्गावरून पर्यटकांना खारफुटीचं आणि निसर्गाचं मनमोहक दर्शन घेता येणार आहे. राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पर्यावरणीय पर्यटनाला नवी ओळख मिळणार असून, स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत

Published On - Nov 08,2025 8:58 AM

Follow us
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.