AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : कोलंबोत टीम इंडियाचा विजय नक्की! फॉलोऑननंतर श्रीलंकेचा असा आहे रेकॉर्ड

भारत श्रीलंका दुसरा कसोटी सामना निर्णायक स्थितीत आहे. पाचव्या दिवशी भारतीय संघ आरामात सामना जिंकेल अशी स्थिती आहे. पण पावसाने दगाफटका दिला तर सामना ड्रॉ होईल. पण श्रीलंका जिंकणार नाही. त्यांचा मागचा रेकॉर्डही तसाच आहे.

| Updated on: Aug 26, 2026 | 9:48 PM
Share
गॉल कसोटीनंतर कोलंबोमध्येही भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे.  श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात, भारतीय संघाने दमदार फलंदाजी आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर सामन्यावरील आपली पकड मजबूत केली आहे. पाचव्या दिवशी सामन्याचा निकाल अपेक्षित आहे. (Photo: Getty Image)

1 / 5
भारताने पहिल्या डावात 503 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावात श्रीलंकेला 290 धावा करता आल्या. त्यामुळे 214 धावांनी संघ पिछाडीवर पडला आणि  भारतीय संघाने फॉलोऑन दिला.  दुसऱ्या डावात श्रीलंकेने 6 गडी गमावले असून फक्त 16 धावांची आघाडी घेतली आहे. (Photo: ICC Twitter)

2 / 5
पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ सुमारे 45 मिनिटे लवकर संपला. त्यामुळे श्रीलंकेची धावसंख्या 6 गडी बाद 229 आहे. श्रीलंकेच्या हातात फक्त 4 विकेट असून पुन्हा एकदा संघाची जबाबदारी सोनल दिनुशावर आली आहे. शेवटच्या दिवशी भारतीय संघ विजयाच्या अगदी जवळ असेल. फक्त हवामानच श्रीलंकेला पराभवापासून वाचवू शकते. (Photo: ICC Twitter)

3 / 5
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात  श्रीलंकेला 27 वेळा फॉलोऑन मिळाला आहे. त्यापैकी 24 सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. तर फक्त तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. म्हणजेच एकही सामन्याचं चित्र विजयात बदलता आलेलं नाही. आता या इतिहासाची पुनरावृत्ती होणार निश्चित आहे. (Photo: ICC Twitter)

4 / 5
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताने श्रीलंकेला फॉलोऑन देण्याची ही एकूण नववी वेळ आहे. यापूर्वीच्या सर्व आठ सामन्यांमध्ये भारताने श्रीलंकेला फॉलोऑन देऊन धुळ चारली होती आणि प्रत्येक सामना जिंकला होता. आताही तशीच स्थिती आहे. (Photo: ICC Twitter)

5 / 5
Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...