Dhananjay Munde News : धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्त वाढवला

Dhananjay Munde News : धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्त वाढवला

| Updated on: Mar 07, 2025 | 10:33 PM

Dhananjay Munde Security : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात समोर आलेले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. आज सकाळपासूनच धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. सध्या ते सातपुडा निवासस्थानी आहेत. मुंडे यांनी आज सकाळपासून भेटीगाठी घेण्याचं देखील टाळलं आहे.

धनंजय मुंडे हे सध्या त्यांच्या सातपुडा येथील शासकीय निवासस्थानी असल्याचं सांगितलं जात आहे. आज सकाळपासून त्यांची भेट घ्यायला आलेल्या सर्वांना गेटवरच अडवण्यात आलेलं आहे. आज ते कोणाचीच भेट घेणार नसल्याचं सांगितलं जात आहे. तसंच त्यांच्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे.

Published on: Mar 04, 2025 12:43 PM