India vs South Africa, 2nd T20I Score Updates And Highlights: दक्षिण आफ्रिकेचा 51 धावांनी विजय, टीम इंडियावर मात
India vs South Africa, 2nd T20I Score and Highlights Updates In Marathi : टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून 5 सामन्यांच्या या मालिकेत 2-0 ने आघाडी घेण्याची संधी होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सामन्याचा वचपा काढला. दक्षिण आफ्रिकेने यासह मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.

दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला दुसऱ्या टी 20I सामन्यात 51 धावांनी शानदार विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत विजयाचं खातं उघडण्यासह 1-1 ने बरोबरी केली. दक्षिण आफ्रिकेने न्यू चंडीगडमध्ये आयोजित या सामन्यात टीम इंडियासमोर 213 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी क्विंटन डी कॉक याने सर्वाधिक 90 धावा केल्या. तर मिडल ऑर्डरमध्ये डेव्हिड मिलर आणि डोनोवन फरेरा या दोघांनी फटकेबाजी केली. तर प्रत्युत्तरात टीम इंडियाला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचं 19.1 ओव्हरमध्ये 162 रन्सवर पॅकअप केलं. टीम इंडियासाठी तिलक वर्मा याने सर्वाधिक 62 धावा केल्या. तर इतरांनी गक्षिम आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. दक्षिण आफ्रिकेसाठी ओटनील बार्टमॅन याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. क्विंटन डी कॉक हा मॅन ऑफ द मॅच ठरला.
LIVE Cricket Score & Updates
-
IND vs SA, 2nd T20I LIVE Score : दक्षिण आफ्रिकेचा 51 धावांनी विजय, टीम इंडियावर मात
दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर दुसऱ्या टी 20i सामन्यात 51 धावांनी मात केली आहे. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियासमोर 214 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र टीम इंडियाला 19.1 ओव्हरमध्ये 162 धावाच करता आल्या. दक्षिण आफ्रिकेने यासह हा सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली.
-
IND vs SA, 2nd T20I LIVE Score : एका ओव्हरमध्ये 2 झटके, शिवमनंतर अर्शदीप आऊट
ओटनील बार्टमॅन याने टीम इंडियाला एका ओव्हरमध्ये 2 झटके दिले आहेत. ओटनील याने शिवम दुबे याला क्लिन बोल्ड केलं. त्यानंतर अर्शदीप सिंह याला कॅच आऊट करत टीम इंडियाला आठवा झटका दिला आहे. दक्षिण आफ्रिकेने यासह आपला विजय निश्चित केला आहे.
-
-
IND vs SA, 2nd T20I LIVE Score : जितेश शर्मा आऊट, टीम इंडियाला सहावा झटका
टीम इंडियाने सहावी विकेट गमावली आहे. विकेटकीपर जितेश शर्मा आऊट झाला आहे. जितेश शर्मा याने 17 बॉलमध्ये 27 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे आता टीम इंडियाच्या विजयाची आशा धुसर झाली आहे.
-
IND vs SA, 2nd T20I LIVE Score : टीम इंडियाला पाचवा धक्का, हार्दिक पांडया बाद
टीम इंडियाला पाचवा धक्का बसला आहे. हार्दिक पांड्या दोन जीवनदान मिळाले होते. पण त्याचा फायदा घेऊ शकला नाही. त्याने 23 चेंडूत 20 धावा केल्या आणि बाद झाला.
-
IND vs SA, 2nd T20I LIVE Score : टीम इंडियाच्या 10 षटकात 4 गडी गमवून 84 धावा
टीम इंडियाने विजयी धावांचा पाठलाग करताना 10 षटकात 84 धावा केल्या. पण या धावांचा पाठलाग करताना 4 महत्त्वाच्या विकेट गमावल्या आहेत. भारताच्या हातात 6 विकेट असून 10 षटकात म्हणजेच 60 चेंडूत 133 धावांची गरज आहे.
-
-
IND vs SA, 2nd T20I LIVE Score : टीम इंडियाला चौथा झटका, अक्षर पटेल आऊट
ओटनील बार्टमॅन याने त्याच्या कोट्यातील तिसऱ्याच बॉलवर आपली पहिली विकेट घेत टीम इंडियाला चौथा झटका दिला आहे. बार्टमॅन याने अक्षर पटेल याला 21 रन्सवर कॅप्टन एडन मार्रक्रम याच्या हाती कॅच आऊट केलंय. त्यामुळे टीम इंडिया स्कोअर 7.3 ओव्हरमध्ये 4 आऊट 67 असा झाला आहे.
-
IND vs SA, 2nd T20I LIVE Score : टीम इंडियाला तिसरा झटका, कॅप्टन सूर्यकुमार यादव आऊट
कॅप्टन एडन मार्रक्रम याने घेतलेल्या अचूक रिव्हीव्यूच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने भारताला तिसरा झटका दिला आहे. सूर्यकुमार यादव याच्या बॅटला बॉल स्पर्श करुन गेला. विकेटकीपर क्विंटन डी कॉक यानेही कॅच घेतला. मात्र त्याला सूर्याच्या बॅटला बॉल लागल्याचं जाणवलं नाही. मातर्र कॅप्टन एडनने रिव्हीव्यु घेतला. या रीव्हीव्यूमध्ये बॅटला बॉलला लागल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे सूर्यकुमार यादव याला मैदानाबाहेर जावं लागलं. सूर्या 5 रन्सवर आऊट झाला.
-
IND vs SA, 2nd T20I LIVE Score : टीम इंडियाला दुसरा झटका, अभिषेक शर्मा आऊट, ओपनिंग जोडी माघारी
टीम इंडियाची सलामी जोडी दुसऱ्या ओव्हरदरम्यानच माघारी परतली आहे. उपकर्णधार शुबमन गिल पहिल्याच ओव्हरमध्ये गोल्डन डक झाला. त्यानंतर अभिषेक शर्मा दुसऱ्या ओव्हरमध्ये आऊट झाला. अभिषेकने 8 बॉलमध्ये 17 रन्स केल्या. मार्को यान्सेन याने अभिषेकला विकेटकीपर क्विंटन डी कॉक याच्या हाती कॅच आऊट केलं.
-
IND vs SA, 2nd T20I LIVE Score : शुबमन गिल गोल्डन डक, टीम इंडियाला पहिला झटका
विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिेने टीम इंडियाला पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला झटका दिला आहे. लुंगी एन्गिडी याने टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिल याला पहिल्याच बॉलवर आऊट केलं आहे. शुबमनला भोपळाही फोडता आला नाही.
-
IND vs SA, 2nd T20I LIVE Score : टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात, अभिषेक-शुबमन सलामी जोडी मैदानात, 214 धावांचं आव्हान
टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाकडून अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल ही सलामी जोडी मैदानात आली आहे. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियासमोर 214 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
-
IND vs SA, 2nd T20I LIVE Score : टीम इंडियासमोर 214 धावांचं आव्हान, दक्षिण आफ्रिका रोखणार?
दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियासमोर विजयासाठी 214 धावांचं आव्हान ठेवलं आहे. दक्षिण आफ्रिकेने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 213 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी क्विंटन डी कॉक याने सर्वाधिक 90 रन्स केल्या. तर डोनोवेन फरेरा 30, एडन मार्रक्रम 29 आणि डेव्हीड मिलर याने 20 रन्स केल्या. तर टीम इंडियासाठी वरुण चक्रवर्ती याने 2 विकेट्स मिळवल्या.
-
IND vs SA, 2nd T20I LIVE Score : तिलक वर्माचा कडक कॅच, डेवाल्ड ब्रेव्हिस आऊट, दक्षिण आफ्रिकेला चौथा झटका
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला चौथा झटका दिला आहे. अक्षर पटेल याने डेवाल्ड ब्रेव्हीस याला तिलक वर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. तिलक वर्मा याने क्लास कॅच घेत डेवाल्डला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. डेवाल्डने 10 बॉलमध्ये 14 रन्स केल्या.
-
IND vs SA, 2nd T20I LIVE Score : दक्षिण आफ्रिकेला तिसरा झटका, सेट क्विंटन डी कॉक रनआऊट, जितेश शर्माची कडक विकेटकीपिंग
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला तिसरा झटका दिला आहे. जितेश शर्मा याने वरुण चक्रवर्ती याच्या बॉलिंगवर कडक विकेटकीपिंग करत सेट असलेल्या क्विंटन डी कॉक याला रन आऊट केलं. क्विंटन डी कॉक याने 46 बॉलमध्ये 90 धावा केल्या.
-
IND vs SA, 2nd T20I LIVE Score : दक्षिण आफ्रिकेला दुसरा झटका, एडन मार्रक्रम आऊट
वरुण चक्रवर्ती याने दक्षिण आप्रिकेची सेट जोडी फोडली आहे. वरुण चक्रवर्ती याने कॅप्टन एडन मार्रक्रम याला अक्षर पटेल याच्या हाती 29 रन्सवर कॅच आऊट केलं. क्विंटन डी कॉक आणि एडन मार्रक्रम या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 47 बॉलमध्ये 83 रन्सची पार्टनरशीप केली.
-
IND vs SA, 2nd T20I LIVE Score : अर्शदीप सिंह काय हे? एका ओव्हरमध्ये तब्बल 7 वाईड
टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याने सामन्यातील 11 व्या ओव्हरमध्ये 7 वाईडसह एकूण 13 बॉल टाकले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला फुकटात 7 धावा मिळाल्या. तसेच अर्शदीप सिंह याला एकाच ओव्हरमध्ये 13 बॉल टाकावे लागले. दक्षिण आफ्रिकेच्या 11 ओव्हरनंतर 1 आऊट 108 असा स्कोअर झाला आहे. क्विंटन डी कॉक 70 आणि एडन मार्रक्रम 17 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे.
-
IND vs SA, 2nd T20I LIVE Score : क्विंटन डी कॉकचं अर्धशतक, टीम इंडिया विरुद्ध जोरदार कमबॅक
क्विंटन डी कॉक याने टीम इंडिया विरुद्ध जोरदार कमबॅक केलं आहे. डी कॉक पहिल्या टी 20i सामन्यात झिरोवर आऊट झाला होता. मात्र डी कॉकने दुसऱ्या सामन्यात 26 चेंडूत खणखणीत अर्धशतक झळकावलं आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर डी कॉकला आऊट करण्याचं आव्हान आहे.
-
IND vs SA, 2nd T20I LIVE Score : क्विंटन डी कॉकची फटकेबाजी, दक्षिण आफ्रिकेचं अर्धशतक पूर्ण
दक्षिण आफ्रिकेने पावर प्लेचा पूर्ण फायदा घेत दमदार धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेने 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 53 धावा केल्या आहेत. ओपनर क्विंटन डी कॉक याने दक्षिण आफ्रिकेला 50 पार पोहचवण्यात प्रमुख भूमिका बजावली. डी कॉक 34 आणि कॅप्टन एडन मार्रक्रम 7 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत. तर रिझा हेंड्रीक्स 8 रन्स करुन आऊट झाला.
-
IND vs SA, 2nd T20I LIVE Score : दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका, रिझा हेंड्रीक्स बोल्ड, वरुण चक्रवर्तीला विकेट
वरुण चक्रवर्तीने दक्षिण आफ्रिकेची सेट ओपनिंग जोडी फोडली आहे. वरुणने पाचव्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर रिझा हेंड्रीक्स याला 8 रन्सवर बोल्ड केलं. क्विंटन डी कॉक आणि रिझाने पहिल्या विकेटसाठी 38 रन्सची पार्टनरशीप केली.
-
IND vs SA, 2nd T20I LIVE Score : दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडीची वादळी सुरुवात
क्विंटन डी कॉक आणि रिझा हेंड्रिक्स या दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडीने चाबूक सुरुवात केली आहे. या दोघांनी पहिल्या 4 ओव्हरमध्ये झिरो आऊट 38 रन्स केल्या आहेत. क्विंटन डी कॉक 27 आणि रिझा हेंड्रिक्स 8 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.
-
IND vs SA, 2nd T20I LIVE Score : सामन्याला सुरुवात, दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग, क्विंटन डी कॉक-रीझा हेंड्रिक्स सलामी जोडी मैदानात
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी 20i सामन्याला सुरुवात झाली आहे. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी बोलावलं आहे , दक्षिण आफ्रिकेकडून रिझा हेंड्रीक्स आणि क्विंटन डी कॉक ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
-
IND vs SA, 2nd T20I LIVE Updates : दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन
रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक(विकेटकीपर), एडन मार्रक्रम(कॅप्टन), डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे, मार्को जॅनसेन, लुथो सिपामला, लुंगी एन्गिडी आणि ओटनील बार्टमन.
-
IND vs SA, 2nd T20I LIVE Updates : टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा(विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग.
-
IND vs SA, 2nd T20I LIVE Updates : टीम इंडियाने टॉस जिंकला, निर्णय काय?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी 20I सामना हा न्यू चंडीगडमधील मुल्लानपूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कॅप्टन सूर्यकुमार यादव याने फिल्डिंगचा निर्णय घेत दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
-
IND vs SA, 2nd T20I LIVE Updates : टी 20I सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका टीम
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), एडन मार्कराम (कॅप्टन), ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, मार्को जॅनसेन, केशव महाराज, ॲनरिक नॉर्टजे, लुथो सिपामला, लुंगी एन्गिडी, रीझा हेंड्रिक्स, कॉर्बिन बॉश, जॉर्ज लिंडे, टोनी डी झोर्झी, ओटनील बार्टमन आणि क्वेना माफाका.
-
IND vs SA, 2nd T20I LIVE Updates : टी 20I सीरिजसाठी टीम इंडिया
अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव(कॅप्टन), तिलक वर्मा, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा(विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा आणि कुलदीप यादव.
-
IND vs SA, 2nd T20I LIVE Updates : दक्षिण आफ्रिका भारताला सलग दुसऱ्या विजयापासून रोखणार
दक्षिण आफ्रिकेसाठी दुसरा टी 20i सामना हा फार महत्त्वाचा आहे. दक्षिण आफ्रिका या मालिकेत 0-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर हा सामना जिंकून मालिकेत 1-1 ने बरोबरी करण्याचं आव्हान असणार आहे.
Published On - Dec 11,2025 6:15 PM
