AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs RR Eliminator Score Updates and Highlights, IPL 2026 : सनरायझर्स हैदराबाद पराभूत, राजस्थान रॉयल्स क्वॉलिफायर 2 मध्ये

| Updated on: May 28, 2026 | 2:26 AM
Share

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals, Eliminator Indian Premier League 2026 Score and Updates In Marathi : राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभूत करुन क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश मिळवला. तर पराभवासह आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातून बुधवारी सनरायझर्स हैदराबादचा प्रवास संपला आहे.

SRH vs RR Eliminator Score Updates and Highlights, IPL 2026 : सनरायझर्स हैदराबाद पराभूत, राजस्थान रॉयल्स क्वॉलिफायर 2 मध्ये
SRH vs RR Eliminator IPL 2026 Live BlogImage Credit source: TV9

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) प्लेऑफ स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे मुल्लानपुरमधील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादवर एकतर्फी फरकाने मात करत क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे. तर हैदराबादचं पराभवासह 19 व्या मोसमातून बाजार उठला आहे. राजस्थानने हैदराबादसमोर 244 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र हैदराबादला 19.2 ओव्हरमध्ये 196 धावांपर्यंतच पोहचता आलं. हैदराबाद अशाप्रकारे पराभवासह स्पर्धेतून बाहेर झाली. आता आरसीबी विरुद्ध अंतिम फेरीत कोण खेळणार? याचा निकाल हा शुक्रवारी 29 मे रोजी लागणार आहे. क्वालिफायर 2 सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे. या क्वालिफायर 2 मध्ये राजस्थान रॉयल्ससमोर गुजरात टायटन्सचं आव्हान असणार आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 27 May 2026 11:24 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Score Updates : राजस्थान रॉयल्सने हैदराबादला नमवलं

    आयपीएल 2026 स्पर्धेच्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादला पराभूत केलं. राजस्थानने हैदराबादसमोर विजयासाठी 245 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण हे आव्हान हैदराबादला काही गाठता आलं नाही. राजस्थान रॉयल्सने हा सामना 47 धावांनी जिंकला. या पराभवासह सनरायझर्स हैदराबादचा स्पर्धेतील प्रवास थांबला आहे. तर राजस्थानने क्वॉलिफायर 2 मध्ये धडक मारली आहे. आता क्वॉलिफायर 2 मध्ये गुजरात टायटन्सशी लढत होईल.

  • 27 May 2026 11:11 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Score Updates : हैदराबादची नववा गडी बाद

    सनरायझर्स हैदाराबादला इशान मलिंगाच्या रुपाने नववा धक्का बसला. इशान मलिंगा 8 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. आता राजस्थान रॉयल्स विजयापासून एक विकेट दूर आहे. हा सामना राजस्थान रॉयल्सच्या हातून गेला आहे.

  • 27 May 2026 10:58 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Score Updates : हैदराबाद आठवा धक्का, सलिल अरोरा तंबूत

    हैदराबादला सलिल अरोराच्या रूपाने आठवा धक्का बसला आहे. सलिलने 21 चेंडूत 35 धावा केल्या आणि बाद झाला. हा सामना पूर्णपणे राजस्थानच्या पारड्यात झुकला असून विजयापासून दोन विकेट दूर आहेत.

  • 27 May 2026 10:46 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Score Updates : पॅट कमिन्स आऊट, हैदराबादला सातवा झटका

    सुशांत मिश्रा याने हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स याला आऊट करत हैदराबादला सातवा झटका दिला आहे. जोफ्रा आर्चर याने बाउंड्री लाईनवर पॅटचा क़डक कॅच घेतला. पॅटने 1 धाव करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

  • 27 May 2026 10:40 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Score Updates : नितीश कुमार रेड्डी माघारी, हैदराबादला सहावा झटका

    रवींद्र जडेजा याने दासुन शनाका याच्या हाती नितीश कुमार रेड्डी याला कॅच आऊट केलं आहे. नितीश कुमार रेड्डी याने 20 बॉलमध्ये 38 रन्स केल्या. नितीशने या खेळीत 2 सिक्स आणि 3 फोर लगावले.

  • 27 May 2026 10:18 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Score Updates : हेन्रिक क्लासेन आऊट, हैदराबादला पाचवा झटका, ऑरेंज आर्मी पराभवाच्या दिशेने

    यश राज पुंजा याने हेन्रिक क्लासेन याला आऊट करत हैदराबादला पाचवा झटका दिला आहे. यश राज पुंजा याने क्लासेनला एलबीडब्ल्यू केलं. क्लासेनने 10 बॉलमध्ये 18 रन्स केल्या.

  • 27 May 2026 10:06 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Score Updates : ट्रॅव्हीस हेड आऊट, हैदराबादला चौथा धक्का

    जोफ्रा आर्चर याने ट्रॅव्हीस हेड याला आऊट केलं आहे.  जोफ्राने हेडला बोल्ड केलं. हेडने  8 बॉलमध्ये 17 रन्स केल्या. हेड आऊट झाल्याने हैदराबादचा स्कोअर 4.4 ओव्हरमध्ये 4 आऊट 58 रन्स अशी स्थिती झाली आहे.

  • 27 May 2026 10:02 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Score Updates : स्मरण रवीचंद्रन आऊट, हैदराबादला तिसरा धक्का

    नांद्रे बर्गर याने हैदराबादला तिसरा झटका दिला आहे. बर्गरने स्मरण रवीचंद्रन याला आऊट केलं. स्मरणने 4 बॉलमध्ये 1 रन करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

  • 27 May 2026 09:54 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Score Updates : इशान किशन आऊट, जोफ्रा आर्चरकडून दुसरी शिकार

    जोफ्रा आर्चर याने सनरायझर्स हैदराबादला दुसरा आणि मोठा झटका दिला आहे. जोफ्राने इशानला डोनोवन फरेरा याच्या हाती कॅच आऊट केलं. इशानने 11 बॉलमध्ये 33 रन्स केल्या.

  • 27 May 2026 09:45 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Score Updates : अभिषेक शर्मा झिरोवर आऊट, हैदराबादला पहिला झटका

    जोफ्रा आर्चर याने राजस्थानला जबरदस्त सुरुवात मिळवून दिली आहे. आर्चरने हैदराबादचा ओपनर अभिषेक शर्मा याला झिरोवर आऊट केलं आहे. त्यामुळे हैदराबादची स्थिती 2 बॉलनंतर 1 आऊट 0 अशी झाली आहे.

  • 27 May 2026 09:41 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Score Updates : हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात, हेड-अभिषेक जोडी मैदानात

    सनरायझर्स हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. राजस्थान रॉयल्सने हैदराबादसमोर 244 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. हैदराबादकडून ट्रॅव्हीस हेड आणि अभिषेक शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली आहे.

  • 27 May 2026 09:26 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Score Updates : हैदराबादसमोर 244 धावांचं आव्हान, राजस्थान रॉयल्स रोखणार?

    राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादसमोर 244 धावांचं आव्हान ठेवलं आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 243 धावा केल्या. राजस्थानसाठी वैभव सूर्यवंशी याने 97 तर ध्रुव जुरेल याने 50 धावा केल्या. आता राजस्थान हैदराबादला 244 धावा करण्यापासून रोखणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 27 May 2026 08:57 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Score Updates : राजस्थानला चौथा झटका, कॅप्टन रियान पराग आऊट

    प्रफुल्ल हिंगे याने राजस्थानला चौथा आणि मोठा झटका दिला आहे. प्रफुल्लने रियान पराग याला 26 रन्सवर हेन्रिक क्लासेन याच्या हाती कॅच आऊट केलं.

  • 27 May 2026 08:45 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Score Updates : ध्रुव जुरेल अर्धशतकी खेळीनंतर आऊट, राजस्थानला तिसरा झटका

    ध्रुव जुरेल आयपीएल कारकीर्दीतील आपलं सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं. वैभवने फक्त 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. मात्र त्यानंतर वैभव दुसऱ्याच बॉलवर कॅच आऊट झाला. राजस्थानने यासह तिसरी विकेट गमावली.

  • 27 May 2026 08:32 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Score Updates : यशस्वी जैस्वाल आऊट, राजस्थानला दुसरा धक्का, सलामी जोडी माघारी

    सनराययझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला दुसरा झटका दिला आहे. शिवांग कुमार याने यशस्वीला अभिषेक शर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. यशस्वीने 29 बॉलमध्ये 29 रन्स केल्या.

  • 27 May 2026 08:21 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Score Updates : वैभव सूर्यवंशी 97 रन्सवर आऊट, राजस्थानला पहिला झटका

    प्रफुल्ल हिंगे याने अखेर वैभव सूर्यवंशी याला आऊट करत राजस्थानला पहिला झटका दिला आहे. प्रफुल्लने स्फोटक बॅटिंग करणाऱ्या वैभव सूर्यवंशी याला स्मरण रवीचंद्रन याच्या हाती कॅच आऊट केलं. वैभवने हैदराबाद विरुद्ध 29 बॉलमध्ये 12 सिक्स आणि 5 फोरसह 97 रन्स केल्या.

  • 27 May 2026 08:13 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Score Updates : वैभव-यशस्वीची सलामी जोडीची शतकी भागीदारी, हैदराबाद बेहाल

    वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीने राजस्थानला जबरदस्त सुरुवात मिळवून दिली आहे. या दोघांनी 7.2 ओव्हरध्ये शतकी भागीदारी केलीय. वैभव 77 आणि यशस्वी 25 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.

  • 27 May 2026 07:53 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Score Updates : वैभव सूर्यवंशीचा तडाखा, हैदराबाद विरुद्ध चाबूक अर्धशतक

    वैभव सूर्यवंशी याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चाबूक अर्धशतक झळकावलं आहे. वैभवने 16 चेंडूत हे अर्धशतक पूर्ण केलं. वैभवचं हे पाचवं अर्धशतक ठरलं.

  • 27 May 2026 07:49 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Score Updates : वैभव-यशस्वी सलामी जोडीची अर्धशतकी भागीदारी, राजस्थानची कडक सुरुवात

    वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीने अवघ्या 19 बॉलमध्ये अर्धशतकी भागीदारी करुन राजस्थानला चाबूक सुरुवात करुन दिली आहे. या भागीदारीत वैभवने 42 आणि यशस्वीने 8 धावांचं योगदान दिलंय.

  • 27 May 2026 07:32 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Score Updates : सामन्याला सुरुवात, राजस्थानची बॅटिंग, यशस्वी-वैभव सलामी जोडी मैदानात

    राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद एलिमिनेटर सामन्याला सुरुवात झाली आहे. हैदराबादने टॉस जिंकून राजस्थानला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. राजस्थानकडून यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी सलामी जोडी मैदानात आली आहे.

  • 27 May 2026 07:09 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Updates : राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन

    राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग (कर्णधार), डोनोवन फरेरा, दासून शनाका, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा आणि यशराज पुंजा.

  • 27 May 2026 07:08 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Updates : सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन

    सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, स्मरण रविचंद्रन, नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, एशान मलिंगा, साकिब हुसेन आणि प्रफुल हिंगे.

  • 27 May 2026 07:04 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live: हैदराबादचा राजस्थान विरुद्ध टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

    सनरायझर्स हैदराबादने एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध टॉस जिंकला आहे. हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स याने फिल्डिंगचा निर्णय घेत राजस्थानला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे आता राजस्थान किती धावांचा आकडा गाठणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 27 May 2026 06:55 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live: हैदराबाद-राजस्थानमध्ये एलिमिनेरटरचा थरार, थोड्याच वेळात टॉस, कोण जिंकणार?

    सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याला थोड्याच वेळात संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे. टॉस कोणता संघ जिंकणार? याचं थोड्याच वेळात उत्तर मिळणार आहे.

  • 27 May 2026 06:44 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live: राजस्थान रॉयल्स टीम

    राजस्थान रॉयल्स टीम : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रियान पराग (कर्णधार), डोनोवन फरेरा, शुभम दुबे, दासून शनाका, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, यशराज पुंजा, ब्रिजेश शर्मा, रवींद्र जडेजा, सुशांत मिश्रा, अमन राव पेराला, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, ॲडम मिलने, संदीप शर्मा, शिमरॉन हेटमायर, कुलदीप सेन, युधवीर सिंग चरक, क्वेना माफाका, लुआन-ड्रे प्रिटोरियस, इमानजोत सिंग चहल आणि विघ्नेश पुथूर.

  • 27 May 2026 06:42 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live: सनरायझर्स हैदराबाद टीम

    सनरायझर्स हैदराबाद टीम : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, स्मरण रविचंद्रन, नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, इशान मलिंगा, साकिब हुसेन, प्रफुल्ल हिंगे, अनिकेत वर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, हर्ष दुबे, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, कामिंदू मेंडिस, झीशान अन्सारी, जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, क्रेन्स फुलेत्रा, ओंकार तरमाळे, आरएस अंबरीश आणि अमित कुमार.

  • 27 May 2026 06:40 PM (IST)

    SRH vs RR, IPL 2026 Eliminator Live Updates : हैदराबाद-राजस्थान सज्ज, कोण जिंकणार?

    क्वालिफायर-2 फेरीत पोहचण्यासाठी थोड्याच वेळात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात महामुकाबला होणार आहे. विजयी संघ क्वालिफायर 2 साठी पात्र ठरेल. तर पराभूत संघाचं पॅकअप होईल.

Published On - May 27,2026 6:39 PM

Follow Us
जमत नसेल तर मी उपोषणाला बसतो; जरांगेंचा सरकारला थेट अल्टिमेटम
जमत नसेल तर मी उपोषणाला बसतो; जरांगेंचा सरकारला थेट अल्टिमेटम.
मान्सूनचे आगमन लांबणीवर?; हवामान खात्याने सांगितला धक्कादायक अंदाज
मान्सूनचे आगमन लांबणीवर?; हवामान खात्याने सांगितला धक्कादायक अंदाज.
नफ्याच्या हव्यासाने घेतले 14 जीव! विषारी दारूकांडामागचं काळं सत्य समोर
नफ्याच्या हव्यासाने घेतले 14 जीव! विषारी दारूकांडामागचं काळं सत्य समोर.
तुळजापुरात खुलेआम मटक्याचा बाजार!; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल
तुळजापुरात खुलेआम मटक्याचा बाजार!; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल.
NEET घोटाळ्यावर सुप्रीम कोर्टाचे NTA ला थेट प्रश्न.....
NEET घोटाळ्यावर सुप्रीम कोर्टाचे NTA ला थेट प्रश्न......
मनोज जरांगे पाटलांच्या भेटीपूर्वी विखे पाटलांचं मोठं विधान, उपोषणावर..
मनोज जरांगे पाटलांच्या भेटीपूर्वी विखे पाटलांचं मोठं विधान, उपोषणावर...
मोठी बातमी! मविआत जागावाटपावर शिक्कामोर्तब कोणता पक्ष किती जागा लढवणार
मोठी बातमी! मविआत जागावाटपावर शिक्कामोर्तब कोणता पक्ष किती जागा लढवणार.
14 जणांच्या मृत्यूनंतर रोहित पवार आक्रमक!; दारू अड्ड्यावर थेट धडक
14 जणांच्या मृत्यूनंतर रोहित पवार आक्रमक!; दारू अड्ड्यावर थेट धडक.
महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला फायनल; कोणाच्या वाट्याला किती जागा?
महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला फायनल; कोणाच्या वाट्याला किती जागा?.
राज्यसभेवर भुजबळांची नजर?; तिकीटासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली
राज्यसभेवर भुजबळांची नजर?; तिकीटासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली.