Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांचा घाईत, दबावात GR… भुजबळ ठाम, शासन निर्णयाविरोधात हायकोर्टात घेणार धाव

Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांचा घाईत, दबावात GR… भुजबळ ठाम, शासन निर्णयाविरोधात हायकोर्टात घेणार धाव

| Updated on: Sep 06, 2025 | 10:58 AM

हैद्राबाद गॅझेट संदर्भात सरकारच्या जीआर विरोधात कोर्टात जाण्यावर मंत्री छगन भुजबळ हे ठाम आहेत. मुख्यमंत्र्यांनी घाईत आणि दबावत निर्णय घेतला असून जीआर काढण्याची कल्पना सुद्धा दिलेली नव्हती असंही भुजबळ म्हणाले.

मंत्री छगन भुजबळ यांनी हैद्राबाद मॉडेलवरून विश्वासात घेतलं नाही असा आरोप सरकारवर केलाय. जीआरचा निर्णय मला माहिती नव्हता. मुख्यमंत्र्यांनी घाईत आणि दबावत निर्णय घेतल्याचं भुजबळ म्हणाले. उपसमितीने घेतलेला हा निर्णय हा मुख्यमंत्र्यांना माहिती होता. मात्र भुजबळ म्हणाले, मला माहिती नव्हता. स्पष्ट सांगतो ना की त्या उपसमितीचे लोक आणि मुख्यमंत्री यांच्या पलीकडे आणखीन कोणाला माहिती असेल उपमुख्यमंत्री मला माहित नाही. अशा एका स्फोटक परिस्थितीमध्ये तो हा निर्णय घेण्यात आलेला असं मी म्हटलं तर चूक ठरणार नाही. एका दबावपोटी घाईघाईमध्ये हे सगळे निर्णय झाले असं मला तरी वाटतं.

मराठा आरक्षणासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेमध्ये स्थापन केलेल्या मंत्रीमंडळाच्या उपसमितीनं गॅझेटवरून निर्णय घेतला. अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सल्लामसलत करूनच हा जीआर काढण्यात आला. आणि त्या जीआरवरून जरांगी यांनी मुंबईतलं आंदोलन संपवलं. पण मंत्री म्हणून कल्पना दिली नाही हे भुजबळांनी टीव्ही नाईनशी बोलताना सांगितलं. त्यामुळे आता जीआरवरून स्पष्टता आणण्यासाठी कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही असं भुजबळ वारंवार सांगतायत

Published on: Sep 06, 2025 10:54 AM