Sanjay Raut Press | संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना…

| Updated on: Mar 16, 2026 | 12:23 PM

मुंबईत गॅस आणि इंधन टंचाईची समस्या गंभीर होत चालली आहे. शहरात सुमारे 35 टक्के हॉटेल व्यवसाय बंद झाले आहेत, तर येत्या तीन-चार दिवसांत 75 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे खाद्यपदार्थांचे दर वाढत आहेत, तसेच कामगार गावाकडे परतत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या परिस्थितीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारला टोले लगावले.

मुंबईत गॅस आणि इंधन टंचाईची समस्या गंभीर होत चालली आहे. शहरात सुमारे 35 टक्के हॉटेल व्यवसाय बंद झाले आहेत, तर येत्या तीन-चार दिवसांत 75 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे खाद्यपदार्थांचे दर वाढत आहेत, तसेच कामगार गावाकडे परतत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या परिस्थितीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारला टोले लगावले. राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्राने खोटे बोलणे थांबवावे. लोकांना सत्य सांगावे. एक महिना पुरेल इतका इंधन आहे, गॅस टंचाई आणि इंधन टंचाईची वास्तविकता मान्य करावी.” त्यांनी इराणमधील युद्धाचा उल्लेख करत म्हटले की, बॉम्ब हल्ल्यांमुळे तेल विहिरींवर परिणाम होत आहे आणि ट्रम्पच्या वक्तव्यांचा संदर्भ देत केंद्र सरकारवर टीका केली. फक्त मोदींच्या नावाने प्रचार आणि धार्मिक भावना निर्माण करून गॅस टंचाई थांबणार नाही. एलपीजी गॅससाठी लोक रांगा लावत आहेत, परंतु सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यास सरकारकडे वेळ नाही. त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा या गंभीर विषयावर भूमिका घेण्याची, विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक करून दोन्ही विधिमंडळात चर्चा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. “लोकांची अवस्था गंभीर आहे, सरकारला त्याकडे लक्ष द्यावे,” असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला.

Published on: Mar 16, 2026 12:23 PM
Follow Us