AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता केव्हा मिळणार?

| Edited By: | Updated on: Aug 02, 2025 | 8:54 AM
Share

Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता केव्हा मिळणार?
फाईल फोटो

केंद्राकडून महाराष्ट्रातील 2 रेल्वे मार्गांना मल्टीट्रॅकिंगची मंजुरी मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगर ते परभणी आणि इटासरी ते नागपूर मल्टिट्रॅकिंगची ही मान्यता मिळाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधानांचे आभार मानले वंदे भारत रेल्वेचे चार डबे वाढवणार अनेक दिवसांची मागणी पूर्ण होणार आहे. सोलापूर-पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे चार डबे वाढवण्यात येणार असून त्यामुळे वंदे भारत मध्ये प्रवाशांची संख्या 312 ने वाढणार आहे. पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ठाकरे गटाचे तसेच काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. या पक्षप्रवेशाला मंत्री संजय राठोड देखील उपस्थित होते. यवतमाळचे तेजस ठाकरे यांचाही शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला. अक्कलकुवा तालुक्यातील अलीविहीर शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना साथीचे आजाराची लागण झाली. विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींना अधिक त्रास होत असल्याने अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला. सध्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर आहे. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Aug 2025 08:56 PM (IST)

    लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता केव्हा मिळणार?

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे. सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

  • 01 Aug 2025 08:43 PM (IST)

    संतापजनक, कंधार ग्रामीण रुग्णालयात उंदरांचा हैदोस

    नांदेडमधून संतापजनक प्रकार समोर आला आहे. कंधार ग्रामीण रुग्णालयात रुग्णाच्या अंगावर चक्क उंदरांचा वावर पाहायला मिळाला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी या प्रकाराची दखल घेतली. तर खाली पडलेलं अन्न खाण्यासाठी उंदीर आला असेल, असा अजब दावा रुग्णालय अधीक्षकांकडून करण्यात आला. या प्रकारामुळे त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

  • 01 Aug 2025 08:22 PM (IST)

    सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर प्रतिक्रिया, काय म्हणाले?

    सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. हिंदू आतंकवाद भासवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना फार मोठी चपराक बसली असल्याचं गोरे यांनी म्हटलं. हिंदू आतंकवाद भासवण्याचा प्रयत्न जो या निमित्ताने झाला होता त्याला फार मोठी चपराक बसली आहे. तसेच हिंदू कधी आतंकवादी होऊ शकत नाही, हेच कोर्टाच्या निकालातून सिद्ध झालं आहे, असंही गोरे यांनी नमूद केलं.

  • 01 Aug 2025 08:07 PM (IST)

    पुण्यातील सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी

    पुण्यातील सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे राजाराम पूल ते डीपी रोड 1 किलोमीटर पर्यंत वाहनाच्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहे. पुणे शहरात जागोजागी प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने अनेक ठिकाणी मिरवणुका सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीला झाली आहे.

  • 01 Aug 2025 07:56 PM (IST)

    इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान शनिवारी पाकिस्तानला भेट देणार

    इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान शनिवारी पाकिस्तानला भेट देणार आहेत. हा त्यांचा एक दिवसाचा दौरा असेल. दोन्ही देश द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करतील.

  • 01 Aug 2025 07:49 PM (IST)

    खासदार अशोक चव्हाण यांची बहीण स्नेहलता पाटील यांचे निधन

    माजी मंत्री भास्करराव पाटील यांच्या पत्नी व खासदार अशोक चव्हाण यांची बहीण स्नेहलता पाटील यांचे निधन झाले.  नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या 80 व्या वर्षी स्नेहलता पाटील यांचे निधन झाले. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका म्हणून स्नेहलता पाटील यांनी काम पाहीले आहे.  उद्या नांदेड येथील गोवर्धन घाट स्मशानभूमीवर त्यांच्यावर होणार अंत्यसंस्कार होणार आहेत.

  • 01 Aug 2025 07:29 PM (IST)

    जळगावात दोन दिवसानंतर जोरदार पावसाची हजेरी

    जळगावात दोन दिवसानंतर जोरदार पावसाची हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाच्या हजेरीने त्रेधातिरपीट उडाली. गेल्या दोन दिवसांपासून ऊन सावलीचा सुरू होता. पण आज जोरदार सरी कोसळल्या. जळगावात सखल भागात रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली. उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना आजच्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे. अद्यापही जळगाव जिल्ह्यात अनेक भागांत पुरेसा पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

  • 01 Aug 2025 07:17 PM (IST)

    साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची प्रकृती खालावली

    भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना तातडीने मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • 01 Aug 2025 07:15 PM (IST)

    कानपूरमध्ये रेल्वे अपघात, साबरमती जनसाधरण एक्सप्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले

    कानपूर देहर येथे साबरमती जनसाधरण एक्सप्रेस (15269) चे अनेक डबे रुळावरून घसरले आहेत. ही ट्रेन पंकी स्टेशनवरून भावपूरकडे जात होती. ट्रेन क्रमांक 4 वर प्रवेश करत असताना हा अपघात झाला. सुदैवाने, आतापर्यंत या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

  • 01 Aug 2025 06:55 PM (IST)

    चंद्रपूर: सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना फटकारले

    चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उखडलेल्या रस्त्यांच्या बाबतीत आज स्वतः दौरा करून अधिकाऱ्यांना फटकावले.चंद्रपूर -मुल ,चंद्रपूर -बामणी , चंद्रपूर- जाम या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना सवाल विचारला. देखभाल कालावधी पूर्ण होण्याच्या आधी हे सर्व रस्ते कंत्राटदाराकडून दुरुस्त करून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

  • 01 Aug 2025 06:45 PM (IST)

    मीरा भाईंदर: वाहतूक पोलिस सुनील चौधरींची विद्यार्थ्यांना मदत

    मीरा भाईंदरमध्ये बस बंदमुळे बस न मिळाल्याने विद्यार्थ्यांना त्रासाचा सामना करावा लागत होता. मात्र वाहतूक पोलीस सुनील चौधरी यांनी विद्यार्थ्यांची मदत केला. त्यांनी 20+ विद्यार्थ्यांना रिक्षातून शाळेत पाठवलं असल्याचे समोर आले आहे.

  • 01 Aug 2025 06:30 PM (IST)

    नाशिकमध्ये ‘एअरोनॉमिक्स 2025 चे आयोजन

    नाशिक शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई नाशिक मेट्रोच्या पुढाकाराने पर्यावरणपूरक नाशिकसाठी ‘एअरोनॉमिक्स 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. या अभियानात हवेचा दर्जा सुधारणे, स्वच्छ इंधनावर आधारित वाहतुकीस पाठबळ, औद्योगिक प्रदूषण नियंत्रण, कचरा व्यवस्थापन, वृक्षरोपण आदी उपक्रम राबवले जाणार आहेत.

  • 01 Aug 2025 06:19 PM (IST)

    पुणे: खड्ड्याने घेतला ज्येष्ठ नागरिकाचा जीव

    पुण्यातील औधं मधील रस्त्यावर मोठी वाहतूक सुरू असते, मात्र या ठिकाणी पाहिलं तर रस्त्यांची बांधणी चुकीची असल्याच समोर आलय. स्मार्ट सिटी अंतर्गत सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनवण्यात आला आहे मात्र या रस्त्यामध्ये काही त्रुटी पाहायला मिळत आहेत. सिमेंट काँक्रीट चा रस्ता आणि त्याच्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या गट्टू मध्ये मोठं अंतर पाहायला मिळत आहे. यामुळे झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा जीव गेला आहे.

  • 01 Aug 2025 04:55 PM (IST)

    महादेव मुंडे प्रकरणात आठ दिवस वाट पाहू – जरांगे

    महादेव मुंडे  प्रकरणात SIT गठीत केली त्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांचे आम्ही आभार मानले आहेत. आरोपी देखील अटक करतील अशी आशा आहे.  आठ दिवस वाट बघु.. एसपी साहेब आणि एसआयटी नेमकं काय करतात असे मनोज जरांंगे यांनी म्हटले आहे.

  • 01 Aug 2025 04:44 PM (IST)

    धान पिकाच्या बोनससाठी प्रहार कार्यकर्ते आणि शेतकरी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

    गोंदिया : धान पिकाच्या बोनसच्या मागणीसाठी प्रहार कार्यकर्ते आणि शेतकरी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करीत आहेत. 7 महिन्यांपासून बोनस न मिळाल्याने शेतकरी आणि प्रहार कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

  • 01 Aug 2025 04:32 PM (IST)

    मोदींच्या मंत्रीमंडळात गडकरी सर्वाधिक काम करणारे – फडणवीस

    देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील नितीन गडकरींचे गुण ओळखले असे कौतूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वाधिक काम करणार व्यक्तिमत्व दुसरं कोणीच नाही केवळ गडकरी असेही ते म्हणाले

  • 01 Aug 2025 04:13 PM (IST)

    काँग्रेस सोडायचे या माणसाने किती पैसे घेतले,गोरंट्याल यांच्यावर खोतकर यांची टीका

    काँग्रेस सोडायचे या माणसाने किती पैसे घेतले, त्याच उत्तर त्याने जनतेला दिलं पाहिजे अशी टीका कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशावर शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी केली आहे.

  • 01 Aug 2025 03:55 PM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काढले मंत्री चंद्रकांत पाटलांना चिमटे

    पुण्यातील एका कार्यक्रमात सूत्रसंचालन करणाऱ्या महिलेने मंचावर दोन दादा आहेत असं म्हटले. अजित दादा आणि दुसरे रोहित दादा. यावर अजित पवारांनी चंद्रकांत दादांना टोमणे मारले. तुम्ही अजून देखील पुणेकरांना पुण्याचे वाटत नाहीत त्यांना कोल्हापूरचेच वाटतात, असं म्हणून चिमटे काढले

  • 01 Aug 2025 03:40 PM (IST)

    यवतमध्ये सध्या सर्व दुकाने बंद

    यवतमध्ये स्थिती नियंत्रणात आली आहे. धार्मिक तेढ निर्माण झाल्याने दोन गटात तणाव दिसून आला. सध्या स्थिती पूर्वपदावर येत आहे. तर सध्या सर्व दुकाने बंद आहेत.

  • 01 Aug 2025 03:30 PM (IST)

    अजितदादांकडून नितीन गडकरी यांच्यावर स्तुती सुमनं

    हा एक अतिशय महत्त्वाचा पुरस्कार आहे आणि तो गडकरी साहेबांना दिला जातोय त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. लोकमान्य टिळकांच्या विचारांवर चालणारे नितीन गडकरींना हा पुरस्कार दिला जातो याचा आनंद आहे. गडकरी साहेब एक प्रयोगशील शेतकरी देखील आहेत. सतत नवीन नवीन माहिती घेण्याचा ते प्रयत्न करत असतात ते धडाकेबाज नेते आहेत . त्यामुळे देशभरात ते लोकप्रिय आहे देशात त्यांना गडकरी नाही तर रोडकरी म्हणून ओळखले जातात, असे कौतुक अजितदादांनी केले.

  • 01 Aug 2025 03:20 PM (IST)

    महादेव मुंडे यांना न्याय मिळावा

    महादेव मुंडे यांना न्याय मिळावा. 21 महिन्यानंतरही आरोपी सापडत नाहीत हि दुर्दैवी गोष्ट आहे. मनोज दादा जसं ठरवतील. जो आदेश देतील त्या प्रमाणे आम्ही आंदोलनामध्ये सहभागी होऊ, असे मत आमदार प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केले आहे.

  • 01 Aug 2025 03:10 PM (IST)

    आमदार संदीप क्षीरसागर यांचा मोठा आरोप

    वाल्मिक कराडच्या माध्यमातून आणलेले अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये जशास तसे आहेत, असा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. ओबीसी कुटुंबासाठी तुम्ही रस्त्यावर आहात याचा आम्हाला अभिमान वाटतोय असे ते म्हणाले.

  • 01 Aug 2025 03:00 PM (IST)

    अर्जुन खोतकर यांचा कैलास गोरंट्याल यांच्यावर हल्लाबोल

    महानगरपालिकेत शेवटच्या बैठकीत आर्थिक ठराव घेऊन मोठा भ्रष्टाचार केला. पाय खोलात गेल्याने गंभीर स्वरूपाची कारवाई होणार असल्याच्या भीतीने भाजपात गेले असा हल्लाबोल आमदार अर्जुन खोतकर यांचा कैलास गोरंट्याल यांच्यावर केला. मी स्थानिक आमदार असल्याने लोकांचा माझ्यावर विश्वास आहे त्यामुळे शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार असल्याचे खोतकर म्हणाले.

  • 01 Aug 2025 01:45 PM (IST)

    समुद्रकिनाऱ्यावर महिलेला आत्महत्या करण्यापासून वाचवले

    मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर ६५ वर्षीय महिलेला आत्महत्या करण्यापासून वाचवण्यात आले. आज सकाळी ११:३० वाजता, भागीरथी परब नावाची ६५ वर्षीय महिला आत्महत्या करण्यासाठी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर पोहोचली परंतु तिथे उपस्थित असलेल्या जीवरक्षकांनी वेळीच तिला वाचवले.

  • 01 Aug 2025 01:30 PM (IST)

    बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पडदा फार्स, पोलिसांची मोठी कारवाई

    बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा अहिल्यानगर तालुका पोलिसांनी पडदा फार्स केला आहे. जवळपास 60 लाखांच्या 500 रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. बनावट नोटा बनवण्यासाठी लागणारे डिजिटल प्रिंटर कागद आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.

  • 01 Aug 2025 01:15 PM (IST)

    चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगत झाडाझुडपांमध्ये

    जळगावच्या एरंडोल जवळ वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगत झाडाझुडपांमध्ये उलटल्याची घटना घडली आहे. बसच्या या अपघातामध्ये बसमधील एक जण जागीच ठार झाला असून वीस ते पंचवीस प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींमध्ये काही शाळकरी विद्यार्थ्यांचा देखील समावेश असून सर्व जखमींना उपचारासाठी एरंडोल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • 01 Aug 2025 12:52 PM (IST)

    सावली बारमधील ऑर्केस्ट्राची मान्यता रद्द

    सावली बारमधील ऑर्केस्ट्राची मान्यता रद्द. ही मान्यता पोलिस देतात. नियमांचा भंग झाल्याने ही मान्यता पोलिसांनी रद्द केलीये. बारमध्ये जेवण आणि मद्य सर्विस करण्याकरता दोन महिने बंदी घालण्यात आलीय. बार कारवाई झाल्यावर उत्पादन शुल्क नियमानुसार 15 दिवस ते 2 महिने बार पुर्णतः बंदचे आदेश काढले जातात.

  • 01 Aug 2025 12:36 PM (IST)

    निवडणूक आयोग भाजपसाठी मतांची चोरी करतोय – राहुल गांधी

    “निवडणूक आयोग भाजपसाठी मतांची चोरी करतोय. मी सर्व पुरावे देणार आहे” असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.

  • 01 Aug 2025 12:27 PM (IST)

    मालेगाव शहरात युवकाचा खून

    मालेगाव शहरातील नानावटी पेट्रोल पंपाजवळ रात्री सुमारे 12 वाजता खूनाची घटना. तीन अज्ञात इसम दुचाकीवर आले. उभ्या असलेल्या युवकावर प्राणघातक हल्ला. धारदार शस्त्र, लाकडी दांडे आणि चेहऱ्यावर दगड घालून निर्घृण खून. मृत युवकाचे नाव नितीन अर्जुन निकम. मालेगाव मनपा स्वच्छता विभागात कार्यरत आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.

  • 01 Aug 2025 12:12 PM (IST)

    कृषी मंत्री पदाची सर्वात पहिली ऑफर दादांनी मला दिलेली – छगन भुजबळ

    “कृषी मंत्री पदाची सर्वात पहिली ऑफर दादांनी मला दिली होती. मंत्री छगन भुजबळांचा नाशिकमध्ये गौप्यस्फोट. कृषी मंत्री ग्रामीण भागातील असला तर जास्त न्याय देऊ शकतो अशी माझी भूमिका होती. कुठलेही खाते लहान मोठे नसते, आपण काय काम करतो यावर अवलंबून असतं” असं छगन भुजबळ म्हणाले.

  • 01 Aug 2025 11:57 AM (IST)

    नांदेडच्या मारतळा जिल्हा परिषद शाळेत केरळ पॅटर्न

    शाळेत नो बॅकबेंचर्स उपक्रमाची अंमलबजावणी. आसन व्यवस्थेत यु टाईप बदल केल्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यक्त केले समाधान… गुणवत्ता वाढीस मदत होणार असल्याची मुख्याध्यापक रवी ढगे यांची माहिती…

  • 01 Aug 2025 11:40 AM (IST)

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमधून बीड कडे झाले रवाना

    परळी येथील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी यासाठी आज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बीड शहरात बैठक होणार आहे. या बैठकीला मनोज जरांगे पाटील हे स्वतः उपस्थित राहणार असून सर्व धर्मीय आणि सर्वपक्षीय ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. आज दुपारी साडेबारा वाजता या बैठकीला बीड शहरातील रामकृष्ण मंगल कार्यालयात सुरुवात होणार आहे.

  • 01 Aug 2025 11:25 AM (IST)

    मुलुंड पूर्व येथे होणाऱ्या प्रकल्पाला महाविकास आघाडी कडून विरोध

    आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणारी मुंबईतील धारावी झोपडपट्टीच्या पुनर्वसन मुलुंड पूर्व येथे होणार आहे….पुनर्वसनाला विरोध नसून प्रकल्पाला विरोध असल्याचे महाविकास आघाडी काँग्रेसचे प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी सांगितले आहे… या प्रकल्पामध्ये प्रकल्प बाधित जे लोक आहेत त्यांचं पुनर्वसन धारावीत नसून ते मुलुंड येथील मिठागर व अन्य या परिसरामध्ये होणार आहे त्यामुळेच मुलुंड मधील महाविकास आघाडीचे घटक पक्ष आता उपोषणाच्या माध्यमातून लोकांचं लक्ष वेधत आहेत … मुलुंडकरांच्या आधीच गैरसोयी मोठ्या प्रमाणात होत असताना अधिक बोजा मुलुंडकरांवर कशासाठी अशा विविध मागण्या घेऊन महाविकास आघाडी कडून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण मुलुंड पूर्व रेल्वे स्टेशन परिसरात करत आहे …या आंदोलनाला मुलुंड सह काँग्रेस ,शिवसेना ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि सपा पक्षाचा पाठिंबा दर्शविण्यात आला आहे…..

  • 01 Aug 2025 11:08 AM (IST)

    शिवशाही बस व ऑटो रिक्षा यांचा अपघात अपघातामध्ये रिक्षाचालक जागीच ठार

    परळी बीडहून नांदेड कडे जाणारी शिवशाही बस MH 09 0988 व आपे रिक्षा यांचा पांगरी कॅम्प या ठिकाणी अपघात झाला असून यामध्ये पांगरी कॅम्प येथील रिक्षा चालक श्रीनिवास राठोड हा जागीच ठार झाला आहे… यामध्ये रिक्षाचा चेंदामेंदा झाला असून रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे… मयत श्रीनिवास राठोड यांचे डेड बॉडी उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आली आहे

  • 01 Aug 2025 10:43 AM (IST)

    महादेव मुंडे हत्याप्रकरणी चार संशयितांची चौकशी सुरु

    बीडमध्ये महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणी चार संशयितांची चौकशी सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून ही चौकशी केली जात आहे. या संशयितांची ओळख सध्या गोपनीय ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी गोट्या गित्ते याला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक रात्रीच रवाना झाले आहे. या पथकाकडून अधिक तपास केला जात आहे.

  • 01 Aug 2025 10:38 AM (IST)

    लातूरमध्ये जोरदार पाऊस, उदगीरजवळील डोंगरशेळकी तलाव ओव्हरफ्लो

    लातूर जिल्ह्यातील उदगीरजवळ असलेला डोंगरशेळकी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. उदगीर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उदगीर नगर परिषदेने हा तलाव उभारला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे हा तलाव आता पूर्ण क्षमतेने भरला आहे.

  • 01 Aug 2025 10:26 AM (IST)

    तुळजाभवानी मंदिरातील संवर्धनाचे काम सुरु, मंदिरात धुळीचे साम्राज्य

    तुळजाभवानी मंदिरातील संवर्धनाचे काम सवानी कन्स्ट्रक्शनमार्फत सुरू असून, हे काम कोणत्याही सुरक्षा उपायांशिवाय केले जात असल्यामुळे भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मंदिराच्या शिळांची कापणी उघड्यावरच सुरू असल्यामुळे संपूर्ण मंदिरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. विशेषतः देवीच्या यज्ञ मंडपाच्या बाजूलाच हे काम सुरू असल्यामुळे भाविकांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे.

  • 01 Aug 2025 10:16 AM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्षांची वाहने जाळली

    बार्शीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष शांताराम जाधवर यांची दोन वाहने जाळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी गृहखात्याला प्रश्न विचारला आहे. त्यांनी माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मुलाचे नाव न घेता, एक महिन्यापूर्वी रणवीर राऊत आणि शांताराम जाधवर यांच्यात झालेल्या वादाचा व्हिडिओ पोस्ट करून या घटनेकडे लक्ष वेधले आहे. ‘जहागिरी गेली मात्र फुगिरी गेली नाही,’ असे म्हणत त्यांनी जळत्या गाड्यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. जाधवर यांची वाहने कोणी जाळली, या प्रश्नाचे उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे, अशी मागणी रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या घटनेची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 01 Aug 2025 09:49 AM (IST)

    जळगावातील जंगलात हत्येसंदर्भात धक्कादायक माहिती पुढे

    जळगावच्या अमळनेर तालुक्यातील जंगलात दोन महिलांच्या हत्या करणाऱ्या आरोपीचे इतरही अनेक महिलांशी फोनवरून संभाषण झाल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. आरोपीचे सिडीआर काढल्यानंतर त्याने अनेक महिलांशी संभाषण केल्याचे उघडकीस आले.

  • 01 Aug 2025 09:47 AM (IST)

    कृषीखाते मिळाल्यानंतर दत्तात्रय भरणे यांची पहिली प्रतिक्रिया

    कृषीखाते मिळाल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब, पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल या सर्वांनी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • 01 Aug 2025 09:37 AM (IST)

    कंधारमधील रूग्णालयातील धक्कादायक प्रकार उघड

    नांदेडच्या कंधारमधील शासकीय रूग्णालयातील धक्कादायक व्हिडीओ पुढे आला असून रूग्णाच्या अंगावर उंदीर फिरताना दिसत आहे.

  • 01 Aug 2025 09:21 AM (IST)

    पाऊस ओसरला

    हवामान विभागाने आज फक्त विदर्भात जोरदार पावसाचा इशार दिलाय. बाकी भागात तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे

  • 01 Aug 2025 09:06 AM (IST)

    मालेगाव बॉम्बस्फोट मोठी अपडेट

    2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. तपास यंत्रणेकडे आरोपींविरुद्ध पुरेसे ठोस पुरावे नाहीत. केवळ संशयाच्या आधारावर कुणालाही शिक्षा देता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश कोर्टाने दिले. आता न्यायालयाने महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकातील एका अधिकाऱ्याविरोधातील गंभीर आरोपांबाबत चौकशीचे आदेश दिले आहे.

  • 01 Aug 2025 08:52 AM (IST)

    माझा कधीही घात होऊ शकतो – रणजीत कासलेला भीती

    बडतर्फ पीएसआय रणजीत कासलेंचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. आपल्याला गोट्या गित्ते आणि श्री कराड यांच्या नावाने धमक्या येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर वाल्मीक कराड आतमधून माझी बेल कॅन्सल करण्यासाठी फोन करतोय असा दावा करत आपला महाराष्ट्र कुठे चाललाय? असा सवाल व्हिडिओतुन बडतर्फ पीएसआय रणजीत कासले यांनी उपस्थित केला आहे. माझा कधीही घात होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

  • 01 Aug 2025 08:38 AM (IST)

    पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्याने एका ज्येष्ठ नागरिकाचा बळी

    पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्याने एका ज्येष्ठ नागरिकाचा बळी घेतला. पुण्यातील औंध परिसरातील राहुल हॉटेलसमोर ही घटना घडली.  जगन्नाथ काशिनाथ काळे असं 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे.  रस्त्यावरुन जाताना रस्त्यावरील खड्ड्यामुळे गाडी घसरली अन् मागून आलेल्या कारखाली ते चिरडले गेले. या संपूर्ण अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय.

  • 01 Aug 2025 08:28 AM (IST)

    गडचिरोली वाया सिरोचा छत्तीसगडला जाणारा राष्ट्रीय महामार्ग आठ दिवसापासून जड वाहतुकीसाठी बंदच

    गडचिरोली वाया सिरोचा छत्तीसगडला जाणारा राष्ट्रीय महामार्ग आठ दिवसापासून जड वाहतुकीसाठी बंदच आहे.

    राष्ट्रीय महामार्गावर वीस फुटाची भिंत कोसळून ८ दिवस लोटले तरी दुरुस्ती कडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झालं आहे,  अशा तुटलेल्या राष्ट्रीय महामार्गाने जीव धोक्यात घालून नागरिक प्रवास करीत आहेत.

  • 01 Aug 2025 08:03 AM (IST)

    अनिल अंबानी यांना ईडीचं समन्स, सूत्रांची माहिती

    अनिल अंबानी यांना ईडीने समन्स बजावलं आहे अशी माहिती सूत्रांनील दिली आहे. 5 ऑगस्टला चौकशीसाठी बोलावल्याची माहिती देखील समोर येत आहे.

  • 01 Aug 2025 08:01 AM (IST)

    पुणे – कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या आस्थापना पालिकेच्या रडारवर, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या ठिकाणावर लक्ष

    पुणे-  कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या आस्थापना पालिकेच्या रडारवर, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या ठिकाणावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि कचरा वर्गीकरण न करणाऱ्या व्यावसायिकांना पालिका नोटीस बजावणार.

    पालिकेच्या प्रत्येक आरोग्य निरीक्षकांना रोज किमान 21 व्यावसायिक मिळकतींना भेट देण्याचे पालिकेकडून उद्दिष्ट

    शहरात व्यावसायिक मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे वर्गीकरण करत नाहीत आणि शहरात अस्वच्छता होती त्यामुळे पालिका नोटीस देऊन कारवाई करणार

  • 01 Aug 2025 07:54 AM (IST)

    वंदे भारत रेल्वेचे चार डबे वाढवणार, प्रवाशांना मोठा फायदा

    वंदे भारत रेल्वेचे चार डबे वाढवणार अनेक दिवसांची मागणी पूर्ण होणार आहे. सोलापूर-पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे चार डबे वाढवण्यात येणार असून त्यामुळे वंदे भारत मध्ये प्रवाशांची संख्या 312 ने वाढणार आहे. पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.

Published On - Aug 01,2025 7:53 AM

Follow us
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....