Maharashtra Breaking News LIVE 5 February 2025 : जालना जिल्ह्यातील 68 गावांमधील पाणी उपसा करण्यावर बंदी – जिल्हाधिकारी
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 5 फेब्रुवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

दिल्लीमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस असा तिरंगी सामना आहे. दिल्लीमध्ये विधानसभेच्या 70 जागा आहेत. मतदान सुरु झालं आहे. निकाल 8 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. यंदा दिल्ली निवडणुकीत 699 उमेदवार रिंगणात आहेत. दिल्लीत 13 हजार 766 मतदान केंद्र बनवण्यात आली असून 1.56 कोटी मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावतील. उत्तर भारतात पसरलेल्या थंडीमुळे मोसंबीची मागणी कमी झाली होती आणि त्याचाच फटका जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला होता. मात्र मागील महिनाभराच्या तुलनेत मोसंबीच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. थंडीचा कडाका कमी होताच आता मोसंबीची मागणी हळूहळू वाढू लागली आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मयंबा येथील श्री मच्छिंद्रनाथ संजीवनी समाधी मंदिराचा जीर्णोद्धाराचे भूमिपूजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मयंबा येथील श्री मच्छिंद्रनाथ संजीवनी समाधी मंदिराचा जीर्णोद्धार भूमिपूजन सोहळा होत आहे. आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नातून संजीवन समाधी मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे.
-
जालना जिल्ह्यातील 68 गावांमधील पाणी उपसा करण्यावर बंदी – जिल्हाधिकारी
उन्हाळ्याची चाहूल लागताच पिण्याच्या पाण्यासाठी नियोजन सुरू जालना जिल्ह्यातील 68 गावांमधील पाणी उपसा करण्यावर जिल्हाधिकारी श्रीकृष्ण नाथ पांचाळ यांनी बंदी घातली आहे.
-
-
देशमुख हत्यासारख्या घटना खपवून घेणार नाही, देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार भाष्य
संतोष देशमुख हत्येवर फडणवीस यांनी भाष्य केले आहे. अशा घटना खपवून घेणार नाही. मग तो कोणीही असो त्याला सोडणार नाही असेही देवेंद्र फडणवीस यांनी आष्टीत म्हटले आहे.
-
फडणवीसांना बाहुबली म्हणणाने मला शिवगामी म्हणायचे; पंकजा मुंडेंचा सुरेश धसांवर पलटवार
फडणवीसांबद्दल माझ्या मनात नेहमीच आदरभाव आणि ममत्वभाव आहे. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी फडणवीसांचे कौतुक केले. तसेच सुरेश धसांच्या टोल्यांवर पंकजा मुंडे यांनी पलटवारही केला. ” फडणवीसांना बाहुबली म्हणणाने मला शिवगामी म्हणायचे, मी सुद्धा मुख्यमंत्र्यांची लाडकी आहे. मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे त्यामुळे बोलणं एक आणि करणं एक हे माझ्या रक्तात नाही” असं म्हणत पंकजा मुंडेंनी सुरेश धसांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी भेदभाव करणार नाही. मी काम करताना जात-धर्म पाहत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आष्टी उपसा सिंचन योजनेचं उद्घाटन करण्यात आलं आहे.
-
फडणवीस माझ्यामागे दत्त म्हणून उभे; सुरेश धसांकडून मुख्यमंत्र्यांचं तोंडभरून कौतुक
“फडणवीस माझ्यामागे दत्त म्हणून उभे आहेत. फडणवीस म्हणजे ‘बिनजोड पैलवान’ आहेत. देशमुख हत्या प्रकरणात फडणवीसांची कणखर भूमिका सर्वांनाच आवडली”, असं म्हणत सुरेश धसांनी मुख्यमंत्र्यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. तसेच सुरेश धसांनी फडणवीसांचा ‘देवेंद्र बाहुबली’ असा उल्लेखही केला.
-
-
काहीजण बोलतात बीड जिल्ह्याची बदनामी होते; पंकजा मुंडेंसमोरच सुरेश धसांचं खोचक वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आष्टी उपसा सिंचन योजनेचं उद्घाटन करण्यात आलं आहे. कार्यक्रमाला अनेक मंत्र्यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. “जायकवाडीतून माझ्या मतदारसंघाला पाणी द्या”, अशी मागणी सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती केली आहे. आम्हाला फक्त फडणवीसांकडून अपेक्षा आहे असं म्हणत सुरेश धस यांनी फडणवीसांचा ‘देवेंद्र बाहुबली’ असा उल्लेखही केला. तसेच “मी निवडून आल्यानंतर आष्टी उपसा सिंचन योजनेचं 23 ‘टक्के काम झालं आहे. योजनेसाठी अनेकांनी मला दगडे मारली. दगडे मारणाऱ्यांची मी मने जिंकली आहेत” असं सुरेश धसांनी म्हणत त्यांनी स्वत:चं कौतुक केलं. दरम्यान सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंनाही भर कार्यक्रमात टोला लगावला. “काहीजण बोलतात बीड जिल्ह्याची बदनामी होते”, असं म्हणत पंकजा मुंडेंसमोरच धस यांनी हे वक्तव्य करत त्यांना खोचक टोला लगावला आहे.
-
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आष्टी उपसा सिंचन योजनेचं उद्घाटन; डोळ्यांच्या ऑपरेशनमुळे धनंजय मुंडेंची कार्यक्रमाला गैरहजरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आष्टी उपसा सिंचन योजनेचं उद्घाटन करण्यात आलं आहे. कार्यक्रमाला सुरेश धसांपासून अनेक मंत्र्यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र डोळ्यांच्या ऑपरेशनमुळे धनंजय मुंडेंची कार्यक्रमाला गैरहजरी आहे. मंत्री पंकजा मुंडे यांची मात्र कार्यक्रमाला उपस्थिती पाहायला मिळाली.
-
ठाकरे आणि भाजप कधीच एकत्र येणार नाहीत; संजय शिरसाटांनी स्पष्टपणेच सांगितलं
ठाकरे आणि भाजप एकत्र येण्याबद्दल बऱ्याच चर्चा सुरु असताना ठाकरे आणि भाजप कधीच एकत्र येऊ शकत नाही असं वक्तव्य शिवसेना नेता संजय शिरसाट यांनी केलं आहे. “ठाकरे गटाच्या काही लोकांमध्ये उतावीळपणा आला” असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्या संदर्भातही त्यांनी वक्तव्य केलं आहे. धनंजय मुंडेंबाबत काही निर्णय घ्यायचा असल्यास त्यांच्या नेत्यांनीच तो निर्णय घ्यावा. तसेच दमानियांकडे काही पुरावे असतील तर त्यांनी सरकारकडे द्यावेत, असही शिरसाट यांनी म्हटलं आहे.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आष्टी उपसा सिंचन योजनेचं उद्घाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीडम्ये आष्टी उपसा सिंचन योजनेचं उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळेस मोठ्या प्रमाणात बीडमधील जनेतेने उपस्थिती लावली. तसेच मंत्री पंकजा मुंडे, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित आहेत.
-
राहुल सोलापूरकर वादग्रस्त विधान, खासदार उदयनराजे पत्रकार परिषद घेणार
मोठी बातमी समोर आली आहे. राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी खासदार उदयनराजे पत्रकार परिषद घेणार आहेत. उदयनराजे या पत्रकार परिषदेत राहुल सोलापूरकरबाबत काय बोलतात? याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. अनेक संघटनांकडून आणि राजकीय पक्षांकडून निषेध केला जात आहे.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आष्टीत दाखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमधील आष्टीत दाखल झाले आहेत. आष्टी उपसा सिंचन योजनेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे उपस्थित असणार आहेत. मात्र धनजंय मुंडे डोळ्यांवरील ऑपरेशनमुळे या कार्यक्रमाला उपस्थित नसणार.
-
पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन
पुण्यात अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे. राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महारांजाबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे पुण्यात ठाकरे गटाकडून सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले आहेत.
-
संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर छापे
माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागानं छापा टाकला आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून इन्कम टॅक्स विभागाकडून ही छापेमारीची कारवाई सुरु आहे.
-
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज, प्रसिद्ध शिव व्याख्याते हभप शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या
मावळ- जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज आणि प्रसिद्ध शिव व्याख्याते हभप शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागचे कारण अस्पष्ट आहे. तीर्थक्षेत्र देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी देहूरोड पोलीस दाखल झाले आहेत.
-
शिरोळ तालुक्यातील शिवनाथवाडी गावातील 300 लोकांना अन्नातून विषबाधा
इचलकरंजी- शिरोळ तालुक्यातील शिवनाथवाडी गावातील 300 लोकांना अन्नातून विषबाधा झाली. या गावात काल दुपारी यात्रा झाली होती. विषबाधा झालेल्यांवर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल रात्रीपासून गावातील नागरिकांना त्रास होत आहे.
-
पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर बिडकीन येथे रास्ता रोको आंदोलन
पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर बिडकीन येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. तिरडी काढून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा निषेध केला जातोय. महामार्गावरील चितेगाव ते बिडकीन गावातील रखडलेल्या रस्त्याचे काम आणि धुळीमुळे नागरिकांना त्रास होत असल्याने हे आंदोलन करण्यात येत आहे. पैठण ते संभाजीनगर महामार्गाचे काम मागील बऱ्याच दिवसापासून बंद आहे. काम बंद असल्यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य आहे.
-
शिवभोजन थाळी योजना पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी छगन भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
नाशिक- शिवभोजन थाळी योजना पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी छगन भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. माजी मंत्री छगन भुजबळांनी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली. शिवभोजन थाळी ही योजना बंद केली जाणार असल्याची चर्चा असल्याने योजना प्रवर्त करून चालू ठेवण्यासाठी पत्र लिहिलं आहे. गरीब आणि गरजू नागरिकांसाठी शिवभोजन थाळी सुरु राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे भुजबळांनी लिहिलं आहे. शिवभोजन थाळीचा खर्च शासनासाठी नगण्य असल्याचा पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. शिवभोजनच्या दररोज २ लक्ष थाळीसाठी वार्षिक २६७ कोटी खर्च येतो.
-
जागतिक खो खो स्पर्धेतील विजेत्या संघातील खेळाडूंची मिरवणूक
जागतिक खोखो स्पर्धेतील विजेत्या संघातील अश्विनी शिंदेसह इतर खेळाडू व प्रशिक्षकांची धाराशिवमध्ये श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. शहरातील जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी खेळाडूंचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
-
घरवापसीच्या चर्चेला एकनाथ खडसेंकडून विराम
मी मतदार संघातील विकास कामासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो.भाजपमध्ये जाणं किंवा भाजपमध्ये प्रवेश करणे किंवा कुठलीही राजकीय चर्चा फडणवीस यांच्यासोबत झालेली नाही. पुन्हा भाजप घरवासीच्या चर्चेला एकनाथ खडसेंनी पूर्णविराम दिला.
-
गटारीत बसून अनोखा आंदोलन
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात गटारीत बसून अनोखा आंदोलन करण्यात आले. तळोदा नगरपालिकेच्या विरोधात नागरिक आक्रमक झाले. गटारीच्या घाण पाणीत बसून पालिकेच्या विरोधात निषेध आंदोलन केले.
-
आज जरांगे यांना रुग्णालयातून सुट्टी
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सहा दिवसांचे उपोषण केले. उपोषण सोडल्यानंतर त्यांना प्रकृतीच्या कुरबुरीवरून छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आज त्यांना सुट्टी होणार आहे.
-
कुणबी आणि मराठा एकच – मनोज जरांगे पाटील
कुणबी आणि मराठा एकच आहेत, आणि हे विदर्भ आणि खानदेश मधील मराठ्यांनी लक्षात ठेवावे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
-
ChatGPT-DeepSeek विषयी मोठा अलर्ट
ChatGPT-DeepSeek प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे. पण मोदी सरकारने एआयचा वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अलर्ट जाहीर केला आहे. वित्त मंत्रालयाने सरकारी कार्यालयातील लॅपटॉप, पीसी अथवा शासकीय इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये कोणत्याही एआय ॲपचा वापर न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे गोपनिय माहिती आणि डाटा चोरीचा धोका असल्याचे मोदी सरकारने स्पष्ट केले आहे.
-
पंतप्रधान मोदी शाही स्नानासाठी प्रयागराज संगमावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी शाही स्नानासाठी प्रयागराज संगमावर दाखल झाले आहेत.
-
महाकुंभ मेळ्यात थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींचं शाही स्नान
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज संगमावर. विशेष बोटीतून ते निघाले असून थोड्याच वेळात शाही स्नान करतील. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही आहेत.
-
संजय राऊत यांनी आधी हिंदू संस्कृती, अध्यात्म याचा अभ्यास करावा आणि मग त्यांनी डुबकी मारायला जावं
संजय राऊत यांनी आधी हिंदू संस्कृती, अध्यात्म याचा अभ्यास करावा आणि मग त्यांनी डुबकी मारायला जावं अशी टीका खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केली.
पंतप्रधान हे योगी पुरुष, अध्यत्मिक आहेत… ते कशाला निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जातील ? संजय राऊत यांनी काल चुकीची माहिती दिली. प्रयागराजमध्ये अतिशय चोख व्यवस्था आहे, कुठल्याही अफवांना बळी पडू नका, असेही गोपछडे म्हणाले.
-
पालघरच्या बोरशेती जंगलात शिकारीसाठी गेलेल्या एकाचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू
पालघरच्या बोरशेती जंगलात शिकारीसाठी गेले असता चुकून सहकाऱ्याकडूनच बंदुकीच ट्रिगर दाबलं गेल्याने दुर्घटना घडली आहे. बंदुकीची गोळी लागून एकाचा जागीच मृत्यू तर एक जण जखमी असल्याची माहिती . रमेश जाण्या वरठा या साठ वर्षीय इसमाचा मृत्यू . दुर्घटना घडल्यानंतर मृतदेह जमिनीत पुरून सहकारी पसार झाले होते , मनोर पोलीस ठाणे हद्दीतील घटना आहे.
मनोर पोलिसांकडून आठ जणांना ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे.
-
7 फेब्रुवारीला राज ठाकरे जाणार पंढरपूरला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पंढरपूरला जाणार आहेत. पंढरपूर तालुक्यातील करकंब गावात हॉटेल ग्रँडचं ते उद्घाटन करतील अशी माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली.
-
पुण्यातील बिबेवाडी, मार्केट यार्ड परिसरात दहशत माजवण्यासाठी तोडफोड करणाऱ्या आरोपींना पुणे पोलिसांचा सज्जड दम…..
पुण्यातील बिबेवाडी, मार्केट यार्ड परिसरात दहशत माजवण्यासाठी तोडफोड करणाऱ्या आरोपींना पुणे पोलिसांनी सज्जड दम दिला.
आम्ही सर्वसामान्य लोकांसोबत आहोत., नागरिकांनी कुठलीही मनामध्ये दहशत बाळगण्याचं कारण नाही. तोडफोड करणाऱ्या आरोपींवर कठोर मोक्कासारखी कारवाई करणार असे आश्वासन पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिलं.
-
Maharashtra News: राहूल सोलापूरकर यांच्या पुण्यातील घराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त….
अभिनेते राहूल सोलापूरकर यांच्या पुण्यातील घराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त… 5 पोलिस पिंजरा व्हॕनसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात… सोलापूर यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आलं होतं…
-
Maharashtra News: सोयाबीन विक्रीसाठी नाफेड खरेदी केंद्रावर वाहनांच्या रांगा
सोयाबीन विक्रीसाठी नाफेड खरेदी केंद्रावर वाहनांच्या रांगा… नाफेड खरेदी केंद्रावर शेतकरी चार दिवसापासून मुक्कामी… नाफेडद्वारे सोयाबीन खरेदीचा उद्या शेवटचा दिवस… सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी…
-
Maharashtra News: प्रयागराजमधील चेंगराचेंगरीच्या घटनेचा मुद्दा संसगेत मांडला – संजय राऊत
महाकुंभ सर्वांचा श्रद्धेचा विषय… प्रयागराजमधील चेंगराचेंगरीच्या घटनेचा मुद्दा संसगेत मांडला… चेंगराचेंगरीच्या घटनेमागचं कारण काय? महाकुंभमेळ्यात पुढील आठवड्यात जाणार… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
Maharashtra News: मिरा-भाईंदरमध्ये मनसेचे बॅनर बाजी मराठी भाषेसाठी आक्रमक भूमिका
मिरा-भाईंदरमध्ये मनसेचे बॅनर बाजी मराठी भाषेसाठी आक्रमक भूमिका… मराठीतच बोलायचं, नाहीतर आम्ही आहोतच!” असा स्पष्ट इशारा या बॅनरवर देण्यात आला आहे. मनसेनेच्या 145 विधानसभा अध्यक्ष संतोष शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली बॅनर झळकले आहेत.
-
धनंजय मुंडेंवर आज टीका करणार नाही
“धनंजय मुंडेंचा राजीनामा मी मागितलेला नाही. आज वादाचा विषय नको, मी परवा बोलेन. धनंजय मुंडेंवर आज टीका करणार नाही” असं सुरेश धस म्हणाले.
-
पुण्यात वाहन तोडफोडीच सत्र सुरुच
पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात 50 पेक्षा अधिक वाहनांची तोडफोड. दारुच्या नशेत तोडफोड केल्याची माहिती. पुण्यात वाहन तोडफोडीच सत्र सुरुच आहे.
-
तुळजाभवानी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याबाबत ट्रस्टची बैठक
तुळजाभवानी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याबाबत ट्रस्टची बैठक घेऊन निर्णय घेऊ. ड्रेस कोड लागू करण्याबाबत दोन्ही बाजूची मतं, इतर मंदिरातही ड्रेस कोड लागू. कायदेशीर आणि धार्मिक बाबींचा विचार करून निर्णय घेतला जाणार. मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची माहिती. मंदिर महासंघाकडून तुळजाभवानी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याची मागणी.
-
छत्रपती संभाजीनगरात दोन कोटींसाठी मुलाचे अपहरण
शहरातील एन-4 मध्ये रात्री 8.45 वाजताची घटना. खंडणीसाठी बिल्डरच्या 7 वर्षीय मुलाला उचलून नेलं. छत्रपती संभाजीनगरात दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांचा 7 वर्षीय मुलगा चैतन्य याचे कारमधून आलेल्या अज्ञातांनी अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी घटनेच्या 15 मिनिटांतच सुनील यांच्याशी संपर्क साधून खंडणीची मागणी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.
-
दिल्लीत मतदानाला सुरुवात
दिल्लीमध्ये विधानसभेच्या 70 जागा आहेत. मतदान सुरु झालं आहे. निकाल 8 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. यंदा दिल्ली निवडणुकीत 699 उमेदवार रिंगणात आहेत. दिल्लीत 13 हजार 766 मतदान केंद्र बनवण्यात आली असून 1.56 कोटी मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावतील.
Published On - Feb 05,2025 8:08 AM





