AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

कोल्हापूर महानगरपालिका

कोल्हापूर महापालिका

अखेर कोल्हापूरकर महापालिकेसाठी मतदान करण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोल्हापूरकरांना यंदा 20 प्रभागातून 81 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. महापालिकेत एकूण 4 लाख 91 हजार 711 मतदार आहेत. यात 2 लाख 49 हजार महिला तर 2 लाख 44 हजार पुरुष मतदार आहेत. 

कोल्हापूर महापालिकेतील सर्व उमेदवारांची अपडेट घेण्यासाठी आणि निवडणुकीची बित्तंबातमी जाणून घेण्यासाठी टीव्ही9 मराठी वेबसाईट, टीव्ही9 मराठी चॅनल आणि टीव्ही9 मराठी युट्यूब चॅनलला भेट द्या. 

कोल्हापूर महापालिकेबद्दल हे माहीत आहे का?

1) कोल्हापूर महापालिकेत एकूण किती प्रभाग आहेत?

- कोल्हापूर महापालिकेत एकूण 20 प्रभाग आहेत.

2) कोल्हापूर महापालिकेत किती सदस्य निवडून द्यायचे आहेत?

- कोल्हापूर महापालिकेवर एकूण 81 सदस्य निवडून द्यायचे आहेत.

3) कोल्हापूर महापालिकेत एकूण किती मतदार आहेत?

- कोल्हापूर महापालिकेत एकूण 4 लाख 91 हजार 711 मतदार आहेत. 

4) पालिकेतील पुरुष मतदारांची संख्या किती?

- यात पुरुष मतदारांची संख्या 2 लाख 44 इतकी आहे. 

5) महिला मतदारांची संख्या किती?

- तर महिला मतदारांची संख्या 2 लाख 49 इतकी आहे. 

कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम यांची निवड झाली आहे. पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अधिकृतपणे रुपाराणी निकम यांच्या निवडीची घोषणा केली. या निवडणुकीत रुपाराणी निकम यांना 46 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या सचिन शेंडे यांना 35 मतांवर समाधान मानावं लागलं.

मोठा ट्विस्ट... भाजप उद्धव ठाकरेंसोबत जाणार, काँग्रेस शिंदेंसोबत...

Mayor Election : महापालिका निवडणुकीनंतर आता महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र यासाठी अनेक ठिकाणी वेगवेगळे पक्ष एकमेकांसोबत जाण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मोठी बातमी! भाजपचं महापौरपद हुकलं? शिंदे करणार काँग्रेससोबत युती?

राज्यात महापालिका निवडणुकीनंतर आता सर्वच पक्षांकडून महापौर पदासाठी जुळवाजुळव सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना शिंदे गट काँग्रेससोबत युती करण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरच्या प्रभाग 5 मध्ये काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये प्रभाग क्रमांक पाचमध्ये काँग्रेसने एकतर्फी विजय मिळवला असून, त्यांचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच, प्रभाग 12 मध्ये भाजपचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. सोलापूरमध्ये भाजप 75 जागांसह आघाडीवर आहे. या निकालांमुळे दोन्ही शहरांतील राजकीय परिस्थिती स्पष्ट झाली आहे.

कोल्हापूरात भाजप - कॉंग्रेसमध्ये कॉंटे की टक्कर! कोण आघाडीवर?

महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक 2026 च्या सुरुवातीच्या कलांनुसार, कोल्हापूरमध्ये काँग्रेस 12 तर भाजप 10 जागांवर आघाडीवर आहे, जिथे कांटे की टक्कर सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेत 90 जागांपैकी भाजप-शिंदे युती 50 जागांवर आघाडीवर असून, ठाकरे बंधूंच्या पक्षांपेक्षा दुप्पट जागांवर त्यांनी यश मिळवले आहे.

नकारात्मक प्रचार करण्याचा प्रयत्न झाला पण त्याला पुणेकरांनी घरी बसवले

Pune Pimpri Chinchwad Kolhapur Ichalkaranji Solapur Sangli Election Results 2026 LIVE Counting in Marathi : राज्यातील 29 महापालिकांचे निकाल लागायला सुरूवात झाली आहे. आता पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर आणि सांगली या पश्चिम महाराष्ट्रातील सहा महापालिकांचा निकालही लागताना दिसत आहेत. पाच ते आठ वर्षानंतर या महापालिकांची निवडणूक झाली. त्याचे निकाल आज येत असून सर्वांना उत्सुकता आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. खासकरून या महापालिकेत भाजपची कामगिरी कशी होते? याकडे राज्याचे लक्ष लागले असून निकालाचे मिनिटा मिनिटाचे अपडेट जाणून घ्या.

करवीर नगरीत प्रभाग 19 -20 मध्ये कोण वाजवणार विजयी चौघडे ?

Kolhapur Municipal Corporation (KMC) Election Results 2026 LIVE Updates in Marathi : राज्यातील 29 महापालिकांसाठी काल मतदान झालं असून कोल्हापूर महानगरपालिकेसाठीही नागरिकांनी उत्साहाने मतदान केलं. यात प्रभाग 19 आणि 20 चाही समावेश असून इथे आता कोण विजयी पताका फडकावतं ते लौकरच कळेल. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात होईल. वाचू या प्रभागाची सविस्तर माहिती

कोल्हापूरच्या प्रभाग 18 मध्ये कोणाचं असणार वर्चस्व? वाचा सविस्तर निकाल

Kolhapur Municipal Corporation (KMC) Election Results 2026 LIVE Updates in Marathi : कोल्हापूर महानगरपालिक निवडणूक निकाल, प्रभाग क्रमांक 18 मध्ये कोणी गाजवलं वर्चस्व ? चुरशीच्या लढतीत कोणी मिळवला विजय ? निकाल अखेर समोर

अंबाबाईच्या आशीर्वादाने कोण उधळणार विजयाचा गुलाल, आज काय होणार ?

Kolhapur Municipal Corporation (KMC) Election Results 2026 LIVE Updates in Marathi : गेल्या अनेक दिवसांपासून प्रभाग 16 व 17 येथे प्रचाराचा, सभांचा नुसता धुरळा उडाला असून प्रचार आणि नतर मतदानाचा गोंधळ थंड झाला. आता विजयी उमेदवार कोण याची घोषणा कधी होते आणि कोणते उमेदवार जल्लोष करतात याकडे दोन्ही प्रभागातील नागरिकांच लक्ष लागलं आहे. विजयाचे ढोल कोण वाजवतात हे थोड्याच वेळात दिसेल.

करवीर नगरीत प्रभाग 13 ते 15 मध्ये कोणाच्या गळ्यात विजयाची माळ ?

Kolhapur Parbhani Municipal Corporation (PMC) Election Results 2026 LIVE Updates in Marathi : कोल्हापूर महापालिकेतील प्रभाग 13 ते 15 यासाठी काल मतदान झालं. मतमोजणीला थोड्याच वेळात सुरूवात होत असून निकालाचं चित्र स्पष्ट होईल.

दुबईत अडकलेले नागरिक अखेर मायदेशी परतले!
दुबईत अडकलेले नागरिक अखेर मायदेशी परतले!.
अमरावती हरभरा काढणीची लगबग; जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हरभऱ्याची पेरणी
अमरावती हरभरा काढणीची लगबग; जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हरभऱ्याची पेरणी.
कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह! परंपरा आणि संस्कृतीचं दर्शन
कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह! परंपरा आणि संस्कृतीचं दर्शन.
जावयाची गाढवावरुन मिरावणूक अन्...; काय आहे 90 वर्षांची परंपरा?
जावयाची गाढवावरुन मिरावणूक अन्...; काय आहे 90 वर्षांची परंपरा?.
चिपळूणच्या शिमगोत्सवात भास्कर जाधव यांनी नाचवली पालखी!
चिपळूणच्या शिमगोत्सवात भास्कर जाधव यांनी नाचवली पालखी!.
पुण्यात आज धुळवडीनिमित्त सुरक्षिततेसाठी मेट्रो सेवा बंद
पुण्यात आज धुळवडीनिमित्त सुरक्षिततेसाठी मेट्रो सेवा बंद.
दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी शिंदेंकडून विशेष विमान
दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी शिंदेंकडून विशेष विमान.
दादरमध्ये धुळवडीनिमित्ताने तरुणाईचा उत्साह
दादरमध्ये धुळवडीनिमित्ताने तरुणाईचा उत्साह.
संभाजीनगरमधील डॉक्टर दाम्पत्यासह दोन मुले अडकली दुबईत!
संभाजीनगरमधील डॉक्टर दाम्पत्यासह दोन मुले अडकली दुबईत!.
संदिपान भुमरेंकडून कार्यकर्ते, चिमुकल्यांसोबत रंगोत्सव साजरा
संदिपान भुमरेंकडून कार्यकर्ते, चिमुकल्यांसोबत रंगोत्सव साजरा.