Maharashtra New CM Government Formation LIVE : संजय राऊत यांची गिरे तो टांग उपर अशी स्थिती – नरेश म्हस्के

| Updated on: Nov 29, 2024 | 9:59 PM

Maharashtra Government Formation and New CM Oath Taking Ceremony LIVE - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालाला आता आठवडा होत आला आहे. तरी राज्याला अजून नवा मुख्यमंत्री मिळालेला नाही. त्यातच काल दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली असून त्यात प्रमुख मुद्यांवर चर्चा झाली. काल दिल्लीतील बैठकीनंतर आता मुंबईत महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. आज तरी मुख्यमंत्री कोण याचा सस्पेन्स संपतो का , नाव जाहीर होतं का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राजकारणाशी निगडीत सर्व बातम्यांचे अपडेट्स वाचण्यासाठी दिवसभार हा ब्लॉग फॉलो करा.

Maharashtra New CM Government Formation LIVE : संजय राऊत यांची गिरे तो टांग उपर अशी स्थिती - नरेश म्हस्के
महत्वाची बातमीImage Credit source: tv9

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अद्यापही राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव समोर आलेलं नाही. यासंदर्भात काल महायुतीच्या नेत्याची दिल्लीत बैठक झाली, अमित शहांशी चर्चा झाली. काल रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदावर दावा केला आहे. तर अजित पवारांना अर्थखात हवं आहे. दिल्लीतील बैठकीनंतर आता मुंबईत महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थितीत असणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्रि‍पदावर चर्चा होणार आहे. तसेच अमित शाहांनी दिलेल्या सूचना आणि निर्णयांबद्दल बैठकीत चर्चा केली जाईल. येत्या काही दिवसांत राज्यात मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा होऊन लवकरच शपथविधी होऊ शकतो. राजकारणासह क्रीडी, मनोरंजन व इतर क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 Nov 2024 05:58 PM (IST)

    डोंबिवली विधानसभेतील ईव्हीएमच्या दहा मशीनची होणार पुन्हा मोजणी

    डोंबिवली विधानसभेतील ईव्हीएमच्या दहा मशीनची पुन्हा मोजणी होणार आहे. ठाकरे गटाचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज करत चार लाख बहात्तर हजार रुपये जमा केले आहेत.

  • 29 Nov 2024 05:56 PM (IST)

    भांडण्याचा रागात बाळावर हल्ला

    बेलापूर गावात भांडण्याचा रागात बाळावर हल्ला करण्यात आला आहे. कुऱ्हाड घेऊन महिलेला मारायला गेलेला शेजाऱ्याने थेट 9 महिण्याच्या बाळावर हल्ला केला आहे. आरोपीला नवी मुबंईतील NRI पोलिसांनी अटक केली आहे.

  • 29 Nov 2024 05:55 PM (IST)

    वेल्डिंगच्या दुकानात तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ

    तळोदा शहरातील अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील वेल्डिंग शॉपच्या दुकानात संशयितरित्या तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हर्षल वर्कशॉपमध्ये एका कोपऱ्यात हा मृतदेह आढळून आला. घातपात की अपघात याचा तपास पोलीस करत आहेत. मयत तरुण धडगाव तालुक्यातील बिजरी येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती.

  • 29 Nov 2024 04:53 PM (IST)

    केजरीवाल यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

    दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत बोलताना केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. दिल्लीतील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर गृहमंत्री गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी केला. आपण चित्रपटांमध्ये जे पाहायचो तेच आज दिल्लीत घडत आहे.

  • 29 Nov 2024 04:44 PM (IST)

    उद्या बसपाची मोठी सभा होणार

    बसपा सुप्रीमो मायावती यांनी शनिवारी यूपी आणि उत्तराखंडच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. यामध्ये पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते आणि जिल्हाध्यक्षांचा समावेश असणार आहे. पक्ष आणि चळवळीच्या कामाचा आढावा घेतला जाईल. मायावती नेत्यांना पुढील मार्गदर्शक सूचनाही देतील.

  • 29 Nov 2024 04:26 PM (IST)

    कृष्ण जन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 9 डिसेंबरला सुनावणी होणार

    सुप्रीम कोर्टात 9 डिसेंबरला कृष्ण जन्मभूमी प्रकरणी सुनावणी होणार आहे. मुस्लीम पक्षाच्या याचिकेवर आज CJI म्हणाले की आम्ही या प्रकरणावर 9 डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता सविस्तर सुनावणी करू. याचिकेत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. हायकोर्टाने मथुरा कोर्टातून सर्व खटले स्वतःकडे वर्ग केले होते. तसेच, अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू बाजूची याचिका सुनावणीस योग्य मानली होती.

  • 29 Nov 2024 04:19 PM (IST)

    अजमेर शरीफ दर्गा वादावर मंत्री मदन यांचे वक्तव्य

    अजमेर शरीफ दर्गा वादावर राजस्थान सरकारचे मंत्री मदन दिलावर म्हणाले, मी या मुद्द्यावर काहीही बोलणार नाही, न्यायालयाने निर्णय घ्यायचा आहे. पण, सत्य हे आहे की औरंगजेब आणि बाबर यांनी अनेक मंदिरे पाडून मशिदी बांधल्या होत्या. तपासात सत्य बाहेर येईल

  • 29 Nov 2024 02:00 PM (IST)

    भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे झळकले 20 फुटी बॅनर

    भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे 20 फुटी बॅनर झळकले आहेत. परंडा तालुक्यातील सरणवाडी गावात अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहेत. महायुतीचे उमेदवार डॉ. तानाजी सावंत हे भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघात विजयी झाल्याबद्दल यांचंही बॅनरवर अभिनंदन केलं आहे. बॅनरच्या वरच्या भागात बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मागासवर्गीय विभाग सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला बॅनर लावलाय.

  • 29 Nov 2024 01:55 PM (IST)

    गोंदियातील खजरी गावाजवळ शिवशाही उलटली, 7 जणांचा मृत्यू

    गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ एसटी महामंडळाची शिवशाही बस उलटली आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त आहे. तर 15 ते 20 लोकं गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

  • 29 Nov 2024 01:50 PM (IST)

    “चंद्रकांत पाटील मंत्रिपदासाठी माझी शिफारस करतील”, अजित पवारांचे आमदार अण्णा बनसोडे यांना विश्वास

    “चंद्रकांत पाटील आणि माझे संबंध घरगुती असल्याने त्यांनी माझी भेट घेतली. मंत्रिपदाबाबत आज काही चर्चा झाली नाही. पिंपरीतील राष्ट्रवादीने आधीच अजित दादांकडे मागणी केलीय,” असं आमदार अण्णा बनसोडे म्हणाले.

  • 29 Nov 2024 01:41 PM (IST)

    पालघर जिल्ह्यातील चार विधानसभेच्या जागांवर फेरमतमोजणीची मागणी

    पालघर जिल्ह्यातील चार विधानसभेच्या जागांवर फेरमतमोजणीची मागणी करण्यात येत आहे. वसई, नालासोपारा, बोईसर, विक्रमगड मतदारसंघात फेर मतमोजणी होणार. हितेंद्र ठाकूर यांच्या बविआ पक्षाने वसई, नालासोपारा, बोईसर विधानसभेची फेर मतमतमोजणी करण्याची मागणी केली. तर विक्रमगडचे शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील भूसारा यांनीही फेर मतमोजणीची मागणी केली. चारही विधानसभामध्ये फेर मतमोजणीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांना पराभूत उमेदवारांनी पत्र दिले आहेत.

  • 29 Nov 2024 01:30 PM (IST)

    चंद्रकांत पाटलांनी हात जोडले, मुख्यमंत्रिपदावर प्रश्न येणार म्हणून बोलणं टाळलं

    पिंपरी चिंचवडमधल्या सर्वच जागा महायुतीने जिंकल्यानंतर आज भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार गटाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. पुण्यात कालच बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदी नवीन चेहराही असू शकतो असं विधान केलं होतं. त्याबाबत ते आज काय बोलणार अशी उत्सुकता असताना चंद्रकांत पाटील यांना याबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता पत्रकारांना हात जोडत निघून जाणं पसंत केलं.

  • 29 Nov 2024 01:20 PM (IST)

    सरकार स्थापनेबाबत शंभूराज देसाई काय म्हणाले?

    मुंबई : “आम्ही शिवसेना नेत्यांची मतं अमित शहांसह महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांसमोर मांडली आहेत. एकतर महायुतीचे नेते महाराष्ट्रात बैठक घेऊन ड्राफ्ट तयार करतील किंवा दिल्लीतील महायुतीचे ज्येष्ठ नेते यावर तोडगा काढतील. कालच्या बैठकीत निवडणुकीतील विजय, सरकार कसं बनवायचं, कोण काय भूमिका घेणार… यावर बैठकीत चर्चा झाली. 1-2 दिवसात अंतिम तोडगा निघेल’, असं शिवसेना नेते शंभूराज देसाई म्हणाले.

  • 29 Nov 2024 01:09 PM (IST)

    पाच-सहा जणांचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटणार- नाना पटोलो

    “ईव्हीएमविरोधात कोर्टात गेलो, दोन दिवसांत निकाल दिला. आमदार अपात्रतेचा निकाल कोर्टानं लवकर दिला नाही. पाच-सहा जणांचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटणार. निकाल लागून पाच-सहा दिवस झाले, अजून सरकार अस्तित्वात नाही,” असं नाना पटोले म्हणाले.

  • 29 Nov 2024 12:57 PM (IST)

    स्वाभिमानावर चर्चा करण्याची तुमची लायकी नाही – संजय शिरसाट

    “कुणी मान झुकवली हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. तुम्ही तर गुडघे टेकवले. स्वाभिमानावर चर्चा करण्याची तुमची लायकी नाही. भीक मागायला कटोरे त्यांच्या हातात आहे. आता यांच्या काटोऱ्यात भीक कुणी टाकली नाही. यांना आता भीक मिळणार नाही. उद्या ते कुणाचेही नाव घेतील” संजय राऊतांवर अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.

  • 29 Nov 2024 12:54 PM (IST)

    लाडकी बहिण योजनेचे निकष बदलणार का?

    ‘लाडकी बहिण’ योजना सुरु राहणार असल्याने राज्यातील महिलांसाठी आनंदाची बाब आहे. मात्र, या योजनेच्या निकषांमध्ये बदल होणार असल्याने काही महिलांची चिंता वाढू शकते तसेच महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रक्कमेत वाढ केली जाईल, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात ही योजना सुरु ठेवताना सध्याची 1500 रुपये रक्कमच महिलांना मिळत राहणार आहे. या रक्कमेत लगेच वाढ होण्याची शक्यता कमी आहे.

  • 29 Nov 2024 12:33 PM (IST)

    महायुतीची बैठक पुढे ढकलली का?

    मुंबईत होणारी महायुतीची बैठक पुढे ढकलण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. दोन दिवसानंतर दिल्लीवरून फोन आल्यानंतर बैठक होणार आहे. सरकार स्थापनेला अजून काही दिवस लागण्याची चिन्ह.

  • 29 Nov 2024 12:18 PM (IST)

    संजय राऊत यांची गिरे तो टांग उपर अशी स्थिती – नरेश म्हस्के

    “संजय राऊत यांची गिरे तो टांग उपर अशी परिस्थिती आहे. राज्य चालवण्यासाठी केंद्राची मदत लागत असते. हे सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे तळवे चाटत असतात. केवळ ते वाटेल ते बरळत असतात. दिल्लीच्या फेऱ्या मारणे अशी टीका चुकीची. एवढीच दिल्लीची लाज वाटत असेल तर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा द्यावा आणि मुंबईत बसावं” अशी खोचक टीका ठाण्याचे शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली.

  • 29 Nov 2024 11:52 AM (IST)

    काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक पार, महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर विचार मंथन

    नवी दिल्ली : काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक पार पडणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये काँग्रेसला मिळालेले अपयश आणि राष्ट्रीय पातळीवरती भूमिका निश्चित करण्यासाठी आज काँग्रेसकडून बैठक बोलवण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकरिणीची बैठक आज दुपारी काँग्रेस मुख्यालयात होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, महाराष्ट्रातून बाळासाहेब थोरात, चंद्रकांत हांडोरे, नसीब खान अभिनेते हे उपस्थित राहणार आहेत.

  • 29 Nov 2024 11:48 AM (IST)

    नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात बॅनरबाजी, देवयानी फरांदेंचा भावी मंत्री म्हणून उल्लेख

    नाशिक : नाशिकमध्ये देवयानी फरांदे यांच्या पदाधिकाऱ्यांनी भावी मंत्रीचे असे बॅनर लावले आहेत. हिंदू जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून देवयानी फरांदे यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात ही बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. हिंदुत्ववादी आमदार भावी मंत्री देवयानी फरांदे यांना हिंदूमय शुभेच्छा अशा आशय या बॅनरवर लिहिण्यात आला आहे.

  • 29 Nov 2024 11:43 AM (IST)

    महायुतीच्या बैठकीपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा

    महायुतीच्या बैठकीआधी चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे हे सकाळी ११ च्या सुमारास सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. सध्या चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बंद दाराआडच चर्चा सुरु आहे.

  • 29 Nov 2024 11:39 AM (IST)

    नालासोपाऱ्यातील ४१ इमारतींवर कारवाई, आजच अनेक इमारती होणार भुईसपाट

    विरार:- नालासोपारातील 41 इमारतींवर आज सलग दुसऱ्या दिवशी महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे नालासोपाऱ्यातील संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. काल नालासोपाऱ्यातील सात इमारती भुईसपाट केल्यानंतर आज सकाळपासून राहिवाशाना घराबाहेर काढण्याची कारवाही सुरू झाली आहे.

    नालासोपारा अग्रवाल परिसरातील ओम तुळशी या तीन मजली इमारती मधील 18 कुटुंब घराबाहेर काढण्यात आले आहे. ही इमारत आज दिवसभरात भुईसपाट करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून मिळाली आहे

  • 29 Nov 2024 10:58 AM (IST)

    मुंबई-अहमदाबाद महामार्गावर लांबच लांब रांगा

    मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबई कडून गुजरात कडे जाणाऱ्या वाहिनीवर वाडा खडकोना ते मेंढवन खिंडीपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. ही वाहतूक कोंडी होत असतानाच मुंबईकडून गुजरातच्या दिशेने जाणारी वाहने विरुद्ध दिशेच्या लेन वरून जात असल्याने गुजरात मुंबई वाहिनीवर ही वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

  • 29 Nov 2024 10:50 AM (IST)

    नाशिक शहरात हेल्मेट सक्ती

    दुचाकी चालकासह सहप्रवाशालाही हेल्मेट लागणारय गाडीवरील दोघांनी हेल्मेट न घातल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये दुचाकीस्वाराच्या पाठीमागे बसणाऱ्या सह प्रवाशाला हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे. नाशिक शहरात देखील दुचाकी वरील सह प्रवाशाला हेल्मेट लागणार आहे.

  • 29 Nov 2024 10:40 AM (IST)

    गटनेता पद निवडीसाठी 1 डिसेंबर रोजी बैठक

    भाजपाच्या गटनेता पद निवडीसाठी 1 डिसेंबर रोजी बैठक होणार आहे. त्यानंतर निरीक्षक मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याची घोषणा करणा आहे.

  • 29 Nov 2024 10:30 AM (IST)

    एकनाथ शिंदेंवर संजय राऊतांचा तिरकस बाण

    एकनाथ शिंदे संरक्षण मंत्री पद मागू शकतात. राष्ट्रपती उपराष्ट्रपती मागू शकतात. पण दिल्लीने डोळे वटारले तर त्यांच्याकडे काही पर्याय नसेल भाजपाला जे काम करून घ्यायचं होता ते झालेल आहे. महाराष्ट्र कमजोर करून झालेला आहे. भविष्यात यांचे पक्ष फुटले तर आश्चर्य वाटू नये, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

  • 29 Nov 2024 10:20 AM (IST)

    शिंदेंना सत्तेत ठेवले हीच मोठी गोष्ट- बच्चू कडू

    एकनाथ शिंदे यांना सत्तेत ठेवले हीच मोठी गोष्ट आहे, असा टोला बच्चू कडून यांनी लगावला. भाजपा त्यांना गृहमंत्रीपद देणार नाही, असे ते म्हणाले.

  • 29 Nov 2024 10:11 AM (IST)

    संजय राऊतांची अजित पवारांवर टीका

    अजित पवार कायम डेप्युटी सीएम आहेत. अजित पवार काल गॉगल वगैरे लावून फिरत होते. त्यांचा चेहरा लोकसभेनंतर उतरला होता. आता त्यांचे चेहरे फुलले आहेत. ईव्हीएम ची त्यांनी पूजा केली पाहिजे, असा टोला संजय राऊत यांनी अजित पवारांना लगावला.

  • 29 Nov 2024 10:00 AM (IST)

    मुंबईत प्रहारची बैठक सुरू

    बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार व प्रहार जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांची बैठक सुरू झाली. भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी, वाय. बी.चव्हाण सेंटर मुंबई येथे तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

  • 29 Nov 2024 09:58 AM (IST)

    बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार व प्रहार जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांची बैठक

    बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार व प्रहार जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांची बैठक सुरू झाली. भविष्यातील राजकिय वाटचालीसाठी, वाय. बी.चव्हाण सेंटर मुंबई येथे तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

  • 29 Nov 2024 09:52 AM (IST)

    चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये बेकायदेशीर डिझेलच्या साठ्यावर छापा

    चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये बेकायदेशीर डिझेलच्या साठ्यावर खेड तहसीलदार आणि राज्य दक्षता पथकाने छापा टाकला.  36 कंटेनर सह 3 हजार 600 लिटर डिझेलचा साठा जप्त करण्यात आला.

  • 29 Nov 2024 09:49 AM (IST)

    दिल्लीने डोळे वटारले की शिंदेंना गप्प बसावं लागेल – संजय राऊत

    राज्याच्या स्वाभिमानच्या गोष्टी महायुतीने करू नयेत. राज्यात कोणी काय करावं हे दिल्लीतून नरेंद्र मोदी, अमित शाह ठरवत आहेत. एकनाथ शिंदे काय किंवा अजित पवार त्यांचा स्वाभिमान राहिलेला नाही, दिल्लीने डोळे वटारले की ते शांत बसतात.

  • 29 Nov 2024 09:37 AM (IST)

    महायुतीच्य्या नेत्यांची आज मुंबईत पुन्हा बैठक, मंत्रीपद ठरणार

    काल दिल्लीत अमित साह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आज मुंबईत पुन्हा महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. देवेंद् फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत आजची बैठक पार पडणार असून त्यामध्ये खातेवाटपावर चर्चा होऊ शकते.

  • 29 Nov 2024 09:34 AM (IST)

    गृह खाते सोडण्यास भाजपचा नकार

    गृह, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्यासह काही महत्वाच्या खात्यांची एकनाथ शिंदे यांच्या कडून दिल्लीच्या बैठकीत मागणी करण्यात आली आहे. मात्र गृह खाते सोडण्यास भाजपने नकार दिला आहे.

    गृह, महसूल, ऊर्जा, ग्रामविकास, जलसंपदा,, गृह निर्माण, वन , ओबीसी मंत्रालय, पर्यटन , सामान्य प्रशासन ही खाती भाजप स्वतःकडे ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती.

    एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नगरविकास, सार्वजनिक बांधकाम ,उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक , पाणी पुरवठा , आरोग्य ,परिवहन, राज्य उत्पादन शुल्क ही खाती देण्यात येऊ शकतात.

Published On - Nov 29,2024 9:32 AM

Follow us
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.