AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील इतर आरोपींना जामीन

| Edited By: | Updated on: Jul 17, 2026 | 6:47 PM
Share

Maharashtra News LIVE Updates In Marathi : गोंदिया जिल्ह्यात गेल्या आठ नऊ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती मात्र रात्रीच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. देश-विदेश, महाराष्ट्र, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे वाचण्यासाठी दिवसभर पॉलो करा टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग..

Maharashtra News LIVE :  डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील इतर आरोपींना जामीन

LIVE NEWS & UPDATES

  • 17 Jul 2026 06:15 PM (IST)

    डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरण, नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या तीन समर्थकांनाही जामीन मंजूर

    डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती, या घटनेनं मोठी खळबळ उडाली, दरम्यान या प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आता या प्रकरणातील आणखी तीन जणांना देखील जामीन मंजूर झाला आहे.

  • 17 Jul 2026 05:52 PM (IST)

    राष्ट्रपती मुर्मू रविवारपासून 3 युरोपीय देशांच्या दौऱ्यावर जाणार

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू रविवारपासून (19-25 जुलै) तीन युरोपीय देशांच्या आठवडाभराच्या राज्या दौऱ्याला सुरुवात करतील. राष्ट्रपती 19 ते 25 जुलै, 2026 या कालावधीत मोल्दोव्हा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानियाला भेट देतील. हा दौरा तिन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या निमंत्रणावरून होत आहे. पूर्व युरोपसोबत भारताचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

  • 17 Jul 2026 05:45 PM (IST)

    डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील इतर आरोपींना जामीन

    डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणातील सर्व आरोपींना जामीन मिळाला आहे. रमेश म्हात्रेनंतर उर्वरित तिन्ही आरोपींना जामीन मिळाला आहे.

  • 17 Jul 2026 05:35 PM (IST)

    वंदे मातरम विधेयक सर्वप्रथम राज्यसभेत मांडले जाईल

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदे मातरम विधेयक सर्वप्रथम राज्यसभेत मांडले जाईल. गृहमंत्री अमित शाह हे विधेयक सादर करण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक, 2026, हे राष्ट्रीय प्रतीकांचा आणि राष्ट्रीय सन्मानाचा अपमान करणाऱ्या कृत्यांविरुद्धच्या दंडात्मक तरतुदी अधिक कठोर करण्यासाठी 1971 च्या कायद्यात सुधारणा करते. सरकारने राज्यांना शासकीय कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमचे अनिवार्य गायन/वादन बंधनकारक करणारे मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. आता, या अधिवेशनात त्याला कायदेशीर स्वरूप दिले जाईल.

  • 17 Jul 2026 05:20 PM (IST)

    एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीचे नाव बदलले

    केंद्रातील सत्ताधारी एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीचे नाव बदलून ‘मंगल मिलन’ असे ठेवण्यात आले आहे. ही बैठक सहसा संसदेच्या अधिवेशनादरम्यान मंगळवारी आयोजित केली जाते.

  • 17 Jul 2026 05:08 PM (IST)

    सुप्रिया सुळे यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली

    सलग विसाव्या दिवशी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद गट) खासदार सुप्रिया सुळे जंतर मंतर येथे पोहोचल्या होत्या. त्यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

  • 17 Jul 2026 04:54 PM (IST)

    कल्याण पूर्वेत प्रेयसी समोरच प्रियकराचा थरारक गेम

    कल्याणच्या आडीवलीत मध्यरात्री जुन्या वादातून पेंद्या भाईची चाकूने 12-13 वार करून निर्घृण हत्या केली आहे. प्रेयसीवरही जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हत्येच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या अर्जुन काळपांडे उर्फ पेंद्या भाईची अविनाश झा, गौरव उर्फ बॉम्बे आणि इतर चार साथीदाराने हत्या केली आहे, घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत.

  • 17 Jul 2026 04:40 PM (IST)

    नाशिक – दुगारवाडी धबधब्यावर वीस वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू

    नाशिक मधील पर्यटन स्थळांवरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुगारवाडी धबधब्यावर गेलेल्या वीस वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. अभिजीत नवनाथ पवार असे धबधब्यावर बुडून मृत्यू झालेल्या 20 वर्षीय युवकाचे नाव आहे.

  • 17 Jul 2026 04:24 PM (IST)

    ठाणे : मॅट्रिमोनिअल साईटवरून महिलांना लुटणाऱ्याला अटक

    एकट्या राहणाऱ्या श्रीमंत महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक शोषण व आर्थिक लूट करून वर्षभर फरार असलेल्या अनुज तिवारीला विष्णुनगर पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केली अटक आहे. या आरोपीवर दिल्ली, नवी मुंबई, अमरावतीसह विविध राज्यांमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

  • 17 Jul 2026 04:13 PM (IST)

    हिंगोलीत पावसाने मारली दडी, शेतकरी चिंतेत

    हिंगोली जिल्ह्यात मागच्या बारा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केली तेव्हापासून अद्याप पाऊसच नसल्याने पेरणीनंतर उगवलेली कोवळी पिके पाण्या अभावी सुकून जात आहेत.

  • 17 Jul 2026 03:55 PM (IST)

    सातारामधील पालखी स्थळावर प्रशासनाकडून जय्यत तयारी

    संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी फलटणची श्रीरामनगरी सज्ज झाली आहे. प्रशासनाकडून पालखीतळावरील स्वच्छता, शुद्ध पाणी, वैद्यकीय सुविधा, शौचालय आणि कडेकोट पोलीस बंदोबस्ताची जय्यत तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पालखी स्थळावर येणाऱ्या भाविकांसाठी बॅरिकेट्स लावण्यात आले असून बॉम्ब शोध पथकाकडून माऊलींच्या मुक्कामाच्या ठिकाणाची तपासणी केली जात आहे.

  • 17 Jul 2026 03:45 PM (IST)

    जालन्यात व्यापाऱ्याची पैशांची बॅग हिसकावून जबरी चोरी करणारे 4 आरोपी ताब्यात

    जालना शहरातल्या नवीन मोंढा परिसरात दुचाकीवरून चाललेल्या एका व्यापाऱ्याची बॅग हिसकावून पळून गेलेल्या 4 आरोपींना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून पकडण्यात आलं.आणि त्यांच्या ताब्यातून 4 लाख 81 हजार रोख रक्कम, एक दुचाकी 4 मोबाईल यासह इतर मिळून एकूण 5 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून या टोळीचे अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.

  • 17 Jul 2026 03:30 PM (IST)

    जादुटोणा व छळ प्रकरण; 5 जणांना ठाणे कापूरबावडी पोलिसांकडून ‘समजपत्र’

    जादुटोणा व छळ प्रकरण; ५ जणांना ठाणे कापूरबावडी पोलिसांकडून ‘समजपत्र’..गिरीजा राऊत छळ आणि जादुटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल…कापूरबावडी पोलिसांची मोठी कारवाई…

  • 17 Jul 2026 03:15 PM (IST)

    गौंडरे मार्गे बार्शी बस पुर्वी प्रमाणे सुरू करा, युवासेनेकडुन करमाळा बस आगारात ठिय्या आंदोलन

    करमाळा तालुक्यातील गौंडरे मार्गे बार्शी एसटी बस पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी युवासेनेकडून करमाळा बस आगारात ठिय्या आंदोलन करण्यात आले.हिवरे, हिसरे, कोळगाव येथील विद्यार्थी करमाळ्यात शिक्षणासाठी येतात मात्र साडेचारची बस उशिरा सहा–सात वाजता सुटत असल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 13 जुलै रोजी बस रात्री 8 वाजता लागल्याने विद्यार्थिनीला अंधारात स्मशानभूमीजवळून जावे लागल्याची घटना घडली. यानंतर संतप्त झालेल्या युवासेनेचे तालुका प्रमुख शंभुराजे फरतडे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थांनी करमाळा बस आगार प्रमुखाच्या कार्यालयात ठिय्या देत वेळापत्रक सुधारण्याची मागणी केली असून, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • 17 Jul 2026 03:00 PM (IST)

    नवनीत राणांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

    उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी नाव दिलं ते कधीच सोडलं ते जनाब ठाकरे आहेत, असा हल्लाबोल नवनीत राणा यांनी केला. जनाब उद्धव ठाकरे यांना आता रामरक्षाची आठवण झाली. अयोध्या राम मंदिर झाले तेव्हा तिथं का गेले नाहीत. जनाब उद्धव ठाकरे रामरक्षा नाही तर ते पक्षरक्षा करत आहेत. ते आणि त्यांचा मुलगा पक्षात राहिलं. आमची अमरावतीची संस्कृती आहे तुम्ही या आपण बसुन हनुमान चालीसा पठण करू, असे आवाहन राणा यांनी दिले.

  • 17 Jul 2026 02:50 PM (IST)

    स्टार रेटच्या मुद्द्यावर नाशिक महापालिकेतील महासभा वादळी

    नाशिक महापालिकेकडून युद्धजन्य परस्थिती मुळे महापालिकेच्या ठेकेदारांना स्टार रेटच्या माध्यमातून वाढीव निधी मिळाल्याचा आरोप होत आहे. कोट्यवधींचा निधी स्टार रेटच्या माध्यमातून मनपाच्या ठेकेदारांना दिल्याने लोकप्रतिनिधी आक्रमक झाले आहेत. महासभेत नगरसेवकांकडून महापौरांसह मनपा अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला.नाशिककरांना खड्ड्यात घालणाऱ्या मनपाच्या ठेकेदारांना स्टाररेटच्या माध्यमातून गिफ्ट दिल्याचा आरोप करण्यात आला.

  • 17 Jul 2026 02:40 PM (IST)

    लातूर मध्ये स्मार्ट मीटरची होळी

    स्मार्ट मीटरची होळी करीत लातूर मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले आहे. नागरिकांच्या सहमती शिवाय महावितरणने स्मार्ट मीटर बसवले आहेत. स्मार्ट मीटरमुळे बिलांमध्ये चार पटीने वाढ झाली आहे. आव्वाच्या सव्वा बिले येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून नागरिकांना होणारा त्रास थांबवा या मागणीसाठी मनसेने स्मार्ट मीटरची होळी करीत निषेध आंदोलन केले आहे.

  • 17 Jul 2026 02:30 PM (IST)

    खासदार ओमराजे निंबाळकर आणि ठाकरेंचे आमदार कैलास पाटलांचे एकत्र बॅनर

    उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदें सोबत गेलेले खासदार ओमराजे निंबाळकर आणि ठाकरेंचे आमदार कैलास पाटील यांचे धाराशिव मध्ये एकत्र बॅनर झळकले आहेत ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त हे बॅनर लावण्यात आले असून धाराशिव मध्ये फक्त ओके पॅटर्न म्हणत ओमराजे निंबाळकर यांना शुभेच्छा देण्यात आले आहेत .बॅनर वरती आम्ही दादा प्रेमी असेही लिहिण्यात आला आहे. ठाकरे शिवसेनेची साथ सोडल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे या वाढदिवसाला शिवसैनिकाकडून ही बॅनर बाजी करण्यात आली. दुसरीकडे आमदार कैलास पाटलांनी मात्र समाज माध्यमावरून ओमराजे निंबाळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे टाळल आहे.

  • 17 Jul 2026 02:20 PM (IST)

    खाजगी शिक्षक नेमलेली जिल्ह्यात पहिलीच जिल्हा परिषद शाळा

    धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील नाय चाकूर जिल्हा परिषद शाळेने एक वेगळाच उपक्रम राबवत शिक्षकांच्या कमतरतेवर अनोखा मार्ग काढला आहे. इंग्रजी माध्यमाचे शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी तीन खाजगी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यामध्ये गावातील महिला शिक्षकांचाही समावेश आहे. पहिली ते सातवीपर्यंत सुमारे 250 विद्यार्थी संख्या असलेली नाय चाकूर येथील जिल्हा परिषद शाळा परिसरातील नामांकित शाळा म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे, या तीन खाजगी शिक्षकांचे मासिक मानधन माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ लोकवर्गणीतून उचलत आहेत.या अनोख्या उपक्रमामुळे धाराशिव जिल्ह्यात खाजगी शिक्षकांची नियुक्ती करणारी नाय चाकूर ही पहिली जिल्हा परिषद शाळा ठरली आहे. शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेल्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  • 17 Jul 2026 02:10 PM (IST)

    बोगस एफडीए अधिकारी ताब्यात

    बोगस एफडीए अधिकारी बनून वसईत व्यापाऱ्याला सहा लाखाचा गंडा घालणाऱ्या भामट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विजय बबन जाधव असे व्यापाऱ्याला गंडा घालणाऱ्या भामट्याचे नाव आहे. वसईतील न्यू मुरबी स्वीट्स अँड फरसाण च्या दुकानात भेसळयुक्त खाद्यपदार्थ आहेत. मी एफडीए चा अधिकारी आहे. असे सांगून त्याने बोगस व्हिजेटींग कार्ड, आय कार्ड दाखवून व्यापाऱ्या ची फसवणूक केली होती. याबाबत माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याच भामट्यावर बोरिवली मध्येही असाच गुन्हा दाखल झाला होता. आता माणिकपूर पोलिसांनी त्याचा ताबा घेतला असून, त्याचा अधिकचा तपास माणिकपूर पोलीस करीत आहेत

  • 17 Jul 2026 02:01 PM (IST)

    कळवण येथील मोहनदरी आश्रम शाळा प्रकरणात तिघांना दणका

    कळवण येथील मोहनदरी आश्रम शाळा प्रकरणात मुख्याध्यापकांसह तिघांचे निलंबन करण्यात आले. अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याच्या प्रकरणाने राज्यात मोठी चर्चा झाली. मोहनदरी आदिवासी निवासी आश्रम शाळेतील धक्कादायक घटना घडली होती.

  • 17 Jul 2026 01:58 PM (IST)

    पंढरपुरात आषाढी वारीनिमित्त लगबग

    पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी वारीनिमित्त लगबग पाहायला मिळत आहेत. बुंदीचा लाडू बनवण्याची जय्यत तयारी सुरु आहे. दररोज 25 हजार लाडूंचं उत्पादन इथे होत आहे. संपूर्ण वारीमध्ये एकूण 20 लाख लाडू तयार होतात.

  • 17 Jul 2026 01:50 PM (IST)

    महाराष्ट्रातील शिरपेचात आणखी मानाचे तुरे

    प्रसिद्ध लोणावळा चिक्की आणि रेणुका मातेच्या तांबुलला जीआय टॅग मिळाला. महाराष्ट्रातील एकूण जीआय टॅग प्राप्त उत्पादनांची संख्या आता 50 वर पोहोचली आहे. आता यामुळे महाराष्ट्रासाठी आता ही अभिमानाची बाब आहे.

  • 17 Jul 2026 01:40 PM (IST)

    सेनेच्या प्रवकत्या शायना एनसी यांचं व्हॉट्सॲप अकाउंट हॅक

    सेनेच्या प्रवकत्या शायना एनसी यांचं व्हॉट्सॲप अकाउंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. शायना एनसी यांच्या व्हॉट्सॲपवरुन अज्ञातांकडून पैशांची मागणी होत आहे. यामुळे आता शायना एनसीसमोर नवीन अडचण उभी झाली आहे.

  • 17 Jul 2026 01:30 PM (IST)

    लाडकी बहिण योजनेवरुन रोहिणी खडसेंची सरकारवर टीका

    मोफत साडीची योजना बंद झाल्यानंतर रोहिणी खडसेंची सरकारवर टीका केली आहे. निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासने केली आणि आथा लाडक्या बहिणींच्या साड्या तुम्हाला परवडत नाही. आता आर्थिक तुटवडा हे कारण देत ही योजना बंद करता का अशी टीका रोहिणी खडेसींनी सरकारवर केली आहे.

  • 17 Jul 2026 01:20 PM (IST)

    मंत्री हसन मुश्रीफ यांनी पक्ष एकत्रीकरणावरही केले भाष्य

    मंत्री मुश्रीफ पक्ष एकत्रीकरणावर म्हणाले की, “शरद पवार यांच्या पक्षाला एनडीएमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट सांगितले की, एनडीएमध्ये चौथा पक्ष घेतला जाणार नाही आणि आमदारांना खासदार केले जाणार नाही. दोन्ही पक्ष एकत्र यावेत, याबाबत जयंत पाटील यांनी नकार दिला आहे. त्यामुळे भविष्यात काय होईल, हे सांगता येणार नाही.

  • 17 Jul 2026 01:10 PM (IST)

    मंत्री हसन मुश्रीफ यांची अर्थ खात्यावर प्रतिक्रिया

    अर्थ खाते निश्चितच राष्ट्रवादीला मिळणार आहे. आमच्या नेत्यांची बैठक झाली आहे. अर्थ खाते लवकर मिळावे यासाठी अमित शाह आणि मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहोत. असे विधान आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.  महायुतीमध्ये असे करून चालणार नाही. आम्ही काही वेगळे म्हणत नाही. युतीमध्ये जे पहिल्यापासून ठरले आहे, तेच व्हावे, अशी अपेक्षा आहे.

  • 17 Jul 2026 12:57 PM (IST)

    अर्थ खाते निश्चितच राष्ट्रवादीला मिळणार – हसन मुश्रीफ

    अर्थ खाते निश्चितच राष्ट्रवादीला मिळणार आहे. आमच्या नेत्यांची बैठक झाली आहे. अर्थ खाते लवकर मिळावे यासाठी अमित शाह आणि मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहोत असं मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.

  • 17 Jul 2026 12:48 PM (IST)

    जयकुमार गोरे आषाढी यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी वाखरीत दाखल

    अंगात ताप आणि हाताला सलाईनची सुई असतानाही सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आषाढी यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी थेट वाखरीत दाखल झाले. मुसळधार पावसामुळे मलपे ओढ्यावरील पूल खचल्याने आणि पालखीतळावर पाणी साचल्याने त्यांनी घटनास्थळी पाहणी केली.

  • 17 Jul 2026 12:34 PM (IST)

    देवरीतील राईस गोडाऊनला भीषण आग

    देवरीतील राईस गोडाऊनला भीषण आग लागली आहे. 42 धान लॉट असलेल्या गोदामाला मध्यरात्री आग लागली. मातेश्वरी राईस इंडस्ट्रीजमध्ये मध्यरात्री आग भडकली. 7 कोटींचं नुकसान झालं. अनेक अग्निशमन दलांची धाव. आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरू आहेत. महसूल विभागाकडून पंचनामा. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट.

  • 17 Jul 2026 12:22 PM (IST)

    मेंढपाळांचे अन्नत्याग आंदोलन

    मेंढ्यांसाठी वन चराई क्षेत्र मोकळे करुन द्यावे या मागणीसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेंढपाळांचे अन्नत्याग आंदोलन सुरू. मेंढपाळ आंदोलनकर्त्यांकडून आंदोलन स्थळी आणल्या मेंढ्या. मेंढ्यांसाठी वनचराई क्षेत्र उपलब्ध व्हावे या मागणीसाठी मेंढपाळांचं अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेंढ्या घेऊन आंदोलन. वनचराई हक्कासाठी धनगर समाजाचा एल्गार.

  • 17 Jul 2026 12:16 PM (IST)

    ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयवर शिवसेना ठाकरे गटाचा आक्रोश मोर्चा

    ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयवर शिवसेना ठाकरे गटाचा आक्रोश मोर्चा. दूषित आणि गढूळ पाण्याच्या विरोधात वागळे इस्टेट संत ज्ञानेश्वर नगर भागातील रहिवासी रस्त्यावरती. ठाकरे गटाचे एकमेव नगरसेवक शहाजी खुस्पे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन. ठाणे महानगरपालिका आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी.

  • 17 Jul 2026 12:08 PM (IST)

    तुकाराम मुंडे यांना ठेवले तर जीवनमान पाच वर्षांनी वाढेल – हसन मुश्रीफ

    “राज्यातून मुंबईला जाणाऱ्या दुधाच्या पुरवठ्यात 25 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे आमच्या गोकुळच्या दुधाला मोठी मागणी वाढली आहे, अशी मिश्कील टीका केली. सध्या पनीर दिसतच नाही. म्हणजे किती भेसळ करून लोकांच्या जीवनाशी खेळले जात होते. काही लोक भेटले. त्यांनी सांगितले. तुकाराम मुंडे यांना ठेवले तर आमचे जीवनमान पाच वर्षांनी वाढेल. पाच नाही तर दहा वर्षांनी वाढेल, असे मी लोकांना सांगितले. तुकाराम मुंडे यांच्यासारखे काम सर्व अधिकाऱ्यांनी केले पाहिजे. निदान जीवनावश्यक वस्तूंमध्ये भेसळ होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे” असं मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.

  • 17 Jul 2026 11:52 AM (IST)

    जिल्ह्यात व्हाट्सअप स्टेट्स ठेऊन मुलांसह शिक्षकांची आत्महत्या, मित्राला फोन करून दिली होती आत्महत्या करणार असल्याची माहिती

    व्हाटसऍपला स्टेट्स ठेऊन दोन मुलांसह जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने वरिष्ठान्ना दोष देत आत्महत्या केलीये. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील पुणे गाव परिसरातील आमदुरा घाटावरुन गोदावरी नदी पात्रात गाडी घालून चिमुकल्यासह आपली जीवनयात्रा संपवलीये. सुनील मोरे असं आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून ते हिमायतनगरच्या पोटा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कर्तव्यावर होते. एसडीआरएफच्या पथकाने कार आणि कार मधील तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर बाहेर काढले आहेत.  शिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुखाच्या जाचाला कंटाळलो असल्याचे व्हाट्सअपला ठेवलेल्या स्टेट्सलामध्ये शिक्षकाने म्हटलंय. शिक्षक सुनील मोरे हे भोकर तालुक्यातील बेंबर गावचे मूळ रहिवासी होते. त्यांच्या मुलीच सारा असं नाव असून मुलाचे सुमित असे नाव आहे. या घटनेने शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ माजली असून एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आपल्या चिमुकल्यासह आत्महत्या केल्याने नांदेड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • 17 Jul 2026 11:45 AM (IST)

    पंढरीच्या विठोबाच्या आषाढी वारीची तयारी सुरू

    पंढरीच्या विठोबाच्या आषाढी वारीची तयारी सुरू झाली. यातच विठोबाचा प्रसाद असणाऱ्या बुंदीचा लाडू तयार करण्यास आता वेग आला आहे. दररोज २५ हजार तर संपूर्ण वारीत 20 लाख लाडू तयार होणार आहेत. लाडू तयार करण्याचे काम आता मंदिर समितीच्या माध्यमातून सुरू आहे.

  • 17 Jul 2026 11:35 AM (IST)

    आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली

    आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. श्री विठ्ठल मंदिराच्या दर्शन रांगेत सुमारे ३० ते ३५ हजार भाविक उभे असून रांग सुमारे तीन किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे. दर्शनासाठी आठ ते दहा तासांचा कालावधी लागत आहे. दर्शन रांगेतील सातही पत्रा शेड भाविकांनी भरले असून मुखदर्शनासाठीही मोठी गर्दी होत आहे दर्शन रांगेत भाविकांना चहा, पाणी नाश्ता, जेवण,तसेच आरोग्याच्या ही सुविधा मंदिर समिती मार्फत देण्यात आलेले आहेत येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि त्वरित दर्शन व्यवस्था देण्यासाठी आता मंदिर समिती सज्ज झाली आहे

  • 17 Jul 2026 11:25 AM (IST)

    विठ्ठल दर्शन रांगेत सापांचा वावर; भाविकांमध्ये घबराट

    पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी पदस्पर्श दर्शन रांगेत पत्रा शेडजवळ साप आढळल्याने काही काळ भाविकांमध्ये घबराट पसरली. भाविकांनी तातडीने मंदिर समितीच्या सुरक्षा रक्षकांना माहिती दिल्यानंतर सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले. सर्पमित्रांनी सापांना सुरक्षितरीत्या पकडल्याने पुढील अनर्थ टळला. दर्शन व्यवस्था त्यानंतर सुरळीत सुरू ठेवण्यात आली.

  • 17 Jul 2026 11:13 AM (IST)

    अंधेरी ते विरार दरम्यान धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर

    अंधेरी ते विरार दरम्यान धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. चालत्या लोकलमध्ये काही जण एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अंधेरी रेल्वे स्थानकातून गुरुवारी रात्री 10 वाजून 48 मिनिटांनी सुटलेल्या विरार लोकलमध्ये हा प्रकार घडला. रेल्वेच्या इंडिकेटरवरील माहितीनुसार, दहिसर ते विरार रेल्वे स्थानकादरम्यान ही हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा मारहाणीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • 17 Jul 2026 10:49 AM (IST)

    मुंबई- गोवा महामार्गावरील कासोर्डे सर्व्हिस रोडला भगदाड

    मुंबई- गोवा महामार्गावरील कासोर्डे सर्व्हिस रोडला भगदाड पडला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासोर्डे भागात ही घटना घडली आहे. या प्रकाराने वाहनधरकांना वाहन जपून चालवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

  • 17 Jul 2026 10:33 AM (IST)

    रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्यासाठी मोहन भागवतांना पत्र – संजय राऊत

    संजय राऊत यांनी नागपुरात होणाऱ्या रामरक्षा आंदोलनावर भाष्य केलं. ‘विदर्भातील विविध भागातून कार्यकर्ते रामरक्षा आंदोलनात सहभागी होतील. रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्यासाठी मोहन भागवतांना पत्र पाठवलं आहे. राम मंदिरातील दान चोरीमुळे भक्तांच्या श्रद्धेला तडा गेला आहे, असे ते म्हणाले.

  • 17 Jul 2026 10:20 AM (IST)

    नांदेडच्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम बोगस असल्याचे उघड

    नांदेडमधील हदगाव तालुक्यातील शिबदरा येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम बोगस असल्याचे समोर आलं आहे. बंधाऱ्याचे बांधकाम लाथेने पडत असल्याने बंधाऱ्याच्या कामाचा दर्जा उघड झालाय. या कामावरून  सर्वसामान्य नागरिकांकडून जोरदार टीका केली जात आहे.

  • 17 Jul 2026 10:05 AM (IST)

    पवारांच्या एनसीपीकडून विलिनीकरणाची चर्चा बंद – सुनील तटकरे

    सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मोठं भाष्य केलं. तटकरे म्हणाले, ‘शरद पवारांच्या एनसीपीकडून विलिनीकरणाची चर्चा बंद झाली. अजितदादांच्या निधनानंतर राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत’.

  • 17 Jul 2026 09:50 AM (IST)

    काँग्रेसची महत्त्वाची बैठक संपन्न

    गोंदिया जिल्हा परिषदेच्या गटनेत्याच्या निवडीसाठी काँग्रेसची महत्त्वाची बैठक संपन्न. गोंदिया जिल्हा परिषदेला मिळणार नवा गटनेता. काँग्रेसचे गटनेते संदीप भाटिया हे विधान परिषद निवडणुकीत भाजपासोबत गेले होते…

  • 17 Jul 2026 09:40 AM (IST)

    म्यानमार मधील ओलिस ठेवलेल्या तरुणांच्याच्या सुटकेसाठी टास्क फोर्स

    बीडच्या पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडे असणार मोहिमेची जबाबदारी. टास्कफोर्स मध्ये असणार एटीएस,आयबी चे अधिकारी. थायलंड म्यानमार सीमेवर सायबर माफियांनी ओलीस ठेवलेल्या राज्यातील 25 तरुणांच्या सुटकेसाठी शासन आता ॲक्शन मोड मध्ये. राज्यातील सर्व तक्रारदार राज्यगृह विभाग व परराष्ट्र मंत्रालय यांच्यात समन्वय साधण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाने बीड पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली. या टास्क फोर्समध्ये एटीएस आणि आयबी चे अधिकारी देखील असणार आहेत.

  • 17 Jul 2026 09:30 AM (IST)

    कर्जासोबतच्या विमा क्लेमवरून HDFC लाईफ आणि चोलामंडलमच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा

    मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. विमा दावा नाकारल्याचा आरोप; पीडित कुटुंबाची फौजदारी तक्रार. केवळ एसएमएस पाठवून विमा क्लेम फेटाळल्याचा आरोप. पॉलिसीच्या अटी-शर्ती न सांगताच विमा विकल्याचा दावा. ग्राहक आयोगाच्या अंतरिम आदेशानंतरही कर्जवसुलीचा प्रयत्न?

  • 17 Jul 2026 09:25 AM (IST)

    एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा तूर्तास रद्द

    राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा तूर्तास रद्द. अकरा वाजता एकनाथ शिंदे महाराष्ट्र सदन इथल्या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावणार. काल एकनाथ शिंदे यांची जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या भेटीनंतर आज एकनाथ शिंदे नंदनवन या ठिकाणी महायुतीच्या काही वरिष्ठ नेत्यांची चर्चा करणार असल्याची माहिती

  • 17 Jul 2026 09:20 AM (IST)

    आठ-नऊ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाची हजेरी…

    गोंदिया जिल्ह्यात मागील आठ ते नऊ दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांबाबत शेतकरी चिंतेत होते…. पेरणी झाल्यानंतर भाताची पिके आणि पऱ्ह्यांना पावसाची नितांत गरज होती. मात्र, आज गोंदिया शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे…. काही भागात रिमझिम सरी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे…. जर येत्या काही दिवसांतही पावसाची साथ कायम राहिली, तर खरीप पिकांसाठी ही परिस्थिती लाभदायक ठरणार आहे…..

  • 17 Jul 2026 09:06 AM (IST)

    जालन्यात अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

    जालना शहरातल्या नवीन मोंढा परिसरात घर दाखविण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीला जाळ्यात ओढून त्याचे अश्लील फोटो काढत ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा चंदनझिरा पोलिसांनी पर्दाफाश केलाय,याप्रकरणी रील स्टार महिलेसह तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 3 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.महिलेने परतूर तालुक्यातल्या एका पीडित व्यक्तीला घर दाखविण्याच्या बहाण्याने जालन्यात बोलावून घेतले त्यानंतर 3 साथीदारांच्या मदतीने त्याला मारहाण करून त्याचे अश्लील फोटो काढत व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्या जवळ असलेले रोख 75 हजार आणि दोन तोळे वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या लुटल्या होत्या.दरम्यान या प्रकरणी या टोळीच्या विरोधात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

  • 17 Jul 2026 08:49 AM (IST)

    ओडिशा – पुरी येथील जगन्नाथ यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू

    ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली. यात 100 हून अधिक जखमी झाले तर दोन जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. रथयात्रेत 10 लाखांहून अधिक भाविक उपस्थित होते.

  • 17 Jul 2026 08:42 AM (IST)

    मनसेच्या मुंबई, ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची सकाळी होणार बैठक

    मनसेच्या मुंबई, ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची सकाळी बैठक पार पडणार आहे. शिवतीऱथ येथे आज सकाळी 10 वाजता ही महत्वाची बैठक होणार असून राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

  • 17 Jul 2026 08:38 AM (IST)

    गोंदिया – शाळेत जाण्यासाठी घरासमोर उभ्या असलेल्या मुलीवर कुत्र्यांचा हल्ला, मुलगी जखमी

    गोंदिया शहरात बेवारस मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.  सकाळी, शाळेत जाण्यासाठी घरासमोर उभ्या असलेल्या एका निष्पाप मुलीवर कुत्र्यांच्या कळपाने हल्ला करून तिला जखमी केले. मोकाट कुत्र्यांची दहशत शहरात पसरली आहे.

  • 17 Jul 2026 08:23 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यात पावसाळ्यात देखील पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा वापर सुरूच

    नाशिक जिल्ह्यात पावसाळ्यात देखील पिण्याच्या पाण्यासाठी टँकर वापरण्यात येत आहे.  जिल्ह्यात सव्वादोन लाखांहून अधिक नागरिक अजूनही टंचाईग्रस्त आहेत.  मुसळधार पावसानंतर नाशिकच्या पश्चिम भाग म्हणजे इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि कळवण तालुके टँकरमुक्त झाले. मात्र  पूर्व भागात अध्याप 70 हुन अधिक टँकरने पाणीपुरवठा  सुरू आहे.  येवला, नांदगाव आणि सिन्नर तालुक्यांत अद्याप टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

  • 17 Jul 2026 08:14 AM (IST)

    खासदार पार्थ पवार यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट

    राज्यसभेचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वर्षा निवासस्थानी पार्थ पवार हे मुख्यमंत्र्यांना भेटले.  दोनच दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे नेत सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. आता पार्थ पवार हेही मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले.

  • 17 Jul 2026 08:12 AM (IST)

    तीन दिवस पुराच्या पाण्यात अडकलेल्या ‘टॉमी’ची थरारक सुटका

    मावळ तालुक्यातील भांगरवाडी येथे पुराच्या पाण्यात तीन दिवस घराच्या पत्र्यावर अडकलेल्या ‘टॉमी’ या पाळीव कुत्र्याची शिवदुर्ग रेस्क्यू टीमने जीव धोक्यात घालून सुखरूप सुटका केली.  या बचाव मोहिमेदरम्यान टीमलाही मोठ्या संकटाचा सामना करावा लागला.

    भांगरवाडीतील कालेकर यांच्या घरामागे पुराच्या पाण्यामुळे ‘टॉमी’ हा कुत्रा तीन दिवस पत्र्यावर अडकून पडला होता. पावसात भिजत तो सतत मदतीसाठी ओरडत होता. अखेर त्याची सुखरूप सुटका करण्यात आली.

  • 17 Jul 2026 08:08 AM (IST)

    आईच्या कुशीतून ६ महिन्यांचा मुलगा गायब, कल्याण स्टेशनबाहेरील अपहरणाने खळबळ

    आईच्या कुशीतून ६ महिन्यांचा मुलगा गायब झाल्याचे उघड झाले. कल्याण स्टेशनबाहेरील थरारक अपहरणाने खळबळ माजली आहे.  दादरा नगर हवेली येथून आलेल्या महिलेला कल्याण कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील उड्डाणपुलाखाली झोप लागली. तेव्हाच चोरट्यांनी बाळाचे अपहरण केलं एवढंच नव्हे तर त्या महिलेचा मोबाईल फोनही लंपास केला.  पहाटे जाग आल्यानंतर बाळ बेपत्ता असल्याचे लक्षात येताच आईने आक्रोश केला. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिमुकल्या शोधासाठी पोलिसांची चार विशेष पथके सक्रिय झाली आहेत.  सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

  • 17 Jul 2026 08:04 AM (IST)

    विठुराया, एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री कर ! केडीएमसीच्या नगरसेवकाने घातलं साकडं

    विठुराया, एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री कर.. असं साकडं आषाढी वारीत कल्याण-डोंबिवलीचे नगरसेवक कुणाल पाटील यांनी घआतल्याचं समोर आलं.  कुणाल पाटील यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

बोनस बियाणे व खते या संदर्भात सरकार ॲक्शन मोडवर आलं आहे. 29 जून 2025 रोजी स्थापन केलेली पाच सदस्यीय तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती सरकारकडून बरखास्त करण्यात आली आहे. बोगस बियाणांच्या तक्रारी पाहता, पुन्हा एकदा तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती गठित करण्यात आली आहे. सात दिवसांच्या आत संबंधित जागेला भेटी देऊन त्यांची तपासणी करून त्याबाबतचा अंतिम अहवाल सादर करणार आहे. अर्नाळा येथील समुद्रात बुडालेल्या दोन मुलांचा शोध अद्यापही सुरूच आहे. भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर, अर्नाळा पोलीस , वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून मागच्या 20 तासांपासून शोधमोहिम सुरू आहे. – नंदुरबार जिल्ह्यात दीड महिना उलटूनही समाधानकारक पाऊस नाही; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. हवामान खात्याच्या अंदाजावर पेरणी केली; मात्र पावसाने पुन्हा दडी मारल्याने उगवलेली पिके धोक्यात सापडली आहेत. यासह देश-विदेश, महाराष्ट्र, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेटस या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

Published On - Jul 17,2026 8:03 AM

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक