Maharashtra News LIVE : अनुसूचित जातीचे उप वर्गीकरण घटना विरोधी – आनंदराज आंबेडकर
Maharashtra News LIVE : द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या उद्देशाने अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. ते परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पंतप्रधान मोदी यांची भेट घेतील. दुसरीकडे महागाईचा कहर कायम असून 10 दिवसांत तिसऱ्यांचा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे सामान्य नागरिक त्रस झाले आहेत. यासह महाराष्ट्र , देश-विदेश, मनोरंजन, बिझनेस, क्रीडा क्षेत्रातील महत्वाचे अपडेट्स वाचण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel price) दरात आज तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. आधी 15 मे रोजी पेट्रोलच्या दरात 3 रुपये वाढ झाली तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं. त्यानंतर चार दिवसांनी दोन्ही इंधन पुन्हा 86 पैसे आणि 83 पैशांनी महागली. आता दहा दिवसात तिसरी वाढ जाहीर करण्यात आली असून पेट्रोलचा प्रतिलीटर दर 87 पैसे तर डिझेलची किंमत 91 पैशांनी वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे पुण्यात काल झालेल्या पावसामुळे मेट्रोमध्ये पावसाच्या पाण्याची गळती झाली यामुळे मेट्रो प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला. महागाईचे सत्र सुरूच असून पुण्यात पालेभाज्यांमध्येही दरवाढ झाली आहे. कडाक्याचे ऊन, अवकाळी पाऊस आणि घटलेली आवक यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर 25 ते 50 टक्क्यांनी वाढले. टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीरच्या भावात मोठी वाढ झाली आहे. यासह महाराष्ट्र , देश-विदेश, मनोरंजन, बिझनेस, क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचता येतील. दिवसभार फॉलो करा TV9 मराठीचा हा ब्लॉग..
LIVE NEWS & UPDATES
-
पैठण तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा
पैठण तालुक्यातील रांजणगाव खुरी येथे उरुसादरम्यान अवकाळी पाऊस
दर्गा परिसरातील व्यापारी स्टॉल, रहाट पाळणे आणि खेळणी कोसळल्याने यात्रेत मोठा गोंधळ
अचानक आलेल्या वादळामुळे भाविकांची धावपळ
तंबू उडाले, व्यापाऱ्यांच मोठं नुकसान
सुदैवाने जीवित हानी टळली, पण पावसामुळे मोठं नुकसान
-
नांदेड जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस
नांदेड शहरासह विविध भागात आज जोरदार पाऊस झाला आहे, बारड येथे आठवडी बाजार सुरु असतांना अचानक आलेल्या वादळी वऱ्यासह पावसाने बाजारात खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांसह व्यापाऱ्यांची मोठी धावपळ झाली, ताडपऱ्या हवेने उडाल्याने बाजारातील हॉटेल मधील अन्नपदार्थ, किराणा दुकानातील व्यापाऱ्यांचे सामान भिजल्याने मोठं नुकसान झालं आहे.
-
-
अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता
पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा
अचानक आलेल्या पावसामुळे काही ठिकाणी नागरिकांची तारांबळ
-
शिरूर तालुक्यात पुन्हा पावसाची हजेरी
शिरूर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली आहे, शिरूर तालुक्यातील शिंदोंडी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे 100 केव्हीचे विद्युत रोहितयंत्र अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने त्या वेळी परिसरात शेतकरी व मजूर नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
-
नांदेड शहरासह विविध भागात मोठा पाऊस
नांदेड शहरासह विविध भागात मोठा पाऊस झाला आहे. बारड येथे आठवडी बाजार सुरु असताना अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसाने बाजार खरेदी करण्यासाठी नागरिकांसह व्यापाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. जोरदार हवेने ताडपत्र्या हवेने उडाल्याने बाजारातील हॉटेलमधील अन्नपदार्थ, किराणा दुकानातील व्यापाऱ्यांचे अन्न धान्य भिजले आहे.
-
-
अनुसूचित जातीचे उप वर्गीकरण घटना विरोधी – आनंदराज आंबेडकर
अनुसूचित जातीचे उप वर्गीकरण करणे घटना विरोधी आहे. आम्ही या उपवर्गीकरणाच्या विरोधात आहोत. एससीमध्ये ५८ जात आहेत, त्यातील ५७ विरोध करीत आहेक, राज्य सरकारने योग्य जबाबदारी पार पाडली असती तर उप वर्गीकरणाच्या गरजच पडली नसती असे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी म्हटले आहे.आंबेडकर समाज आणि मातंग समाजात दुही निर्माण केली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
-
ठाण्यात पेट्रोलपंप चालकांना मेलडी चॉकलेट वाटून काँग्रेसचे आंदोलन
ठाण्यात काँग्रेसने मेलडी चॉकलेट (melody) वाटत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उपरोधिक आंदोलन केले आहे. ठाण्यातील पेट्रोल पंपावर वाहनचालकांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेलडी चॉकलेट वाटले. काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे , युवक काँग्रेस ठाण्याचे मेहेर चौपाने यांच्यासोबत युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
-
नाशिक, पुणे,नागपूर आणि अहिल्यानगरात डिफेन्स कॉरिडॉर – फडणवीस
नाशिक, पुणे,नागपूर आणि अहिल्यानगरात डिफेन्स कॉरिडॉर उभे करण्याची विनंती आपण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगरातील एका कार्यक्रमात सांगितले.
-
जळगाव – अधिकाऱ्याचे सचिवांवर गंभीर आरोप
महिला व बालकल्याण विकास विभागाचे सचिव राजेश गायकवाड यांच्यावर जळगावचे जिल्हा महिला व बालकल्याण विकास अधिकारी रफिक तडवी यांनी गंभीर आरोप केले आहे. राजेश गायकवाड महिला व बालकल्याण विभागाच्या महिला तसेच पुरुष अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ, बदल्यांसाठी आर्थिक व्यवहार तसेच त्रास देत असल्याचा आरोप लेखी तक्रारीत करण्या आला आहे.
-
रायगड : हापूस आंब्याचे दर कोसळले बागायतदार संकटात
हापूस आंब्याचे दर कोसळले असल्याने रायगडातील बागायतदार संकटात सापडले आहेत. 1500 रुपयांची हापूसची पेटी थेट 300 रुपयांवर आली आहे. आवक वाढल्याने आणि मागणी घटल्याने दर घरसले असल्याने कोकणातील आंबा उत्पादकांची चिंता वाढली आहे.
-
अमरावती शहरात उष्णतेची लाट कायम, नागरिक हैराण
सलग अकराव्या दिवशी अमरावती शहरात उष्णतेची लाट कायम आहे. आज आणि उद्या उष्णतेचा अमरावती जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आजही अमरावतीचा पारा 46 च्या अंशाच्या पुढे आहे. त्यामुळे महापौर श्रीचंद तेजवानी यांच्याकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
-
जालन्यापाठोपाठ अंबड तालुक्यात तहसीलदार आणि पुरवठा विभागाची छापेमारी
जालना तालुक्यातील खरपुडी गावात किराणा दुकानात केलेली कारवाई ताजी असतानाच त्या पाठोपाठ आता अंबड तालुक्यात देखील विविध ठिकाणी तहसीलदार विजय चव्हाण आणि पुरवठा अधिकारी किरण कुमार खांडेभराड यांच्या पथकाने अचानक छापेमारी केली. या छापेमारी मध्ये एकूण 100 लिटर डिझेलचा साठा जप्त करण्यात आला आहे. इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रशासनाकडून अवैध पेट्रोल आणि डिझेल विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून किराणा दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.
-
विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही- उदय सामंत
ही सरकारने निर्माण केलेली कृत्रिम टंचाई नाही. विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही. इराण अमेरिका युद्धामुळे हे संकट निर्माण झालयं. राष्ट्रीय संकटात राजकारण करणे आणि पंतप्रधानांना बदनाम करणे ही घाणेरडी प्रवृत्ती. राष्ट्रीय संकटाचा सामना सर्वांनी एकत्रपणे केला पाहिजे असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.
-
चासकमान धरणाच्या बॅकवॉटर परिसरात मोठा अपघात
खेड तालुक्यातील चासकमान धरणाच्या बॅकवॉटर परिसरात मोठा अपघात घडला आहे. माती वाहतूक करणारा एक ट्रक रात्रीच्या अंधारात उलटल्याची घटना समोर आली असून, थोडक्यात हा ट्रक पाण्यात जाण्यापासून बचावला आहे.
-
दीड महिन्यानंतर धुळे जिल्ह्याचा तापमानाचा पारा चाळीस अंशाच्या खाली
तब्बल दीड महिन्यानंतर धुळे जिल्ह्याचा तापमानाचा पारा चाळीस अंशाच्या खाली आला आहे. काही अंशी तापमान कमी झाले असले तरी शहरात उकाडा वाढला आहे. वाढलेल्या उकळा मुळे नागरिक त्रस्त
-
शेवगावमध्ये जायभाय कुटुंबातील सात जणांना अन्नातून विषबाधा
अहिल्यानगरमधील शेवगाव येथील एकाच कुटुंबातील सात जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे.बाजारातून आणलेल्या आंब्याचा रस खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली असल्याचे समोर आले आहे. रुग्णांना चक्कर येणे आणि तोल जाण्याचा त्रास सुरू आहे.
-
संपूर्ण कोचिंग क्लास क्षेत्र बदनाम होत आहे
नीट पेपरफुटी प्रकरणामुळे संपूर्ण कोचिंग क्लास क्षेत्र बदनाम होत असल्याची भावना व्यक्त करत, दोषींवर कठोर कारवाईची मागणी कोचिंग क्लासेस वेल्फेअर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रने केली आहे. संघटनेचे अध्यक्ष सतीश देशमुख आणि पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात निवेदन देत काही महत्त्वाच्या मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत.
-
राजनाथ सिंह यांचं शिर्डी विमानतळावर आगमन.
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं शिर्डी विमानतळावर आगमन. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले स्वागत. विमानतळावरून शिर्डी साई मंदिराकडे रवाना. साई समाधीचे दर्शन घेतल्यावर MIDC मध्ये कार्यक्रमस्थळी पोहचणार. राजनाथ सिंह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विखे पाटील उपस्थित.
-
मला कॅबिनेट मंत्रीपदाचा शब्द देऊन राज्यमंत्री केलं – बच्चू कडू
“मला कॅबिनेट मंत्रीपदाचा शब्द देऊन राज्यमंत्री केलं. ठाकरेंनी माझ्याऐवजी गडाख यांना कॅबिनेट मंत्री केलं. आमच्या मतांमुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात. त्यांच्याबद्दल आस्था, आदर आहे” असं बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडूंना घरी बोलवून मंत्री केलं ही माझी चूक झाली असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं.
-
उद्धव ठाकरे आम्ही सात अपक्ष सोबत राहिल्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात – बच्चू कडू
“आम्ही घरी येऊन तुम्हाला पाठिंबा दिला मुख्यमंत्रीपदासाठी. आम्ही पाठिंबा दिला नसता तर चित्र वेगळं दिसलं असतं. तुम्ही आधी आम्हाला मंत्री केलं नाही. पण आम्ही सात अपक्ष सोबत राहिल्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात” असं बच्चू कडू म्हणाले.
-
शहाजापूर येथील पेट्रोल पंप पुन्हा सुरु
थोड्या वेळापूर्वी स्टॉक संपला म्हणून बंद केलेला शहाजापूर येथील पेट्रोल पंप पुन्हा सुरु करण्यात आला. पालकमंत्र्यांनी पाहणी केली तेव्हा बंद होता पंप. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी कारवाईच्या सूचना दिल्यानंतर पंप पुन्हा सुरू. थोड्याच वेळात दाखल होणार जिल्हा पुरवठा अधिकारी. चौकशी करून पंपावर करणार कारवाई.
-
डिझेल घेण्यासाठी पंपावर ड्रम घेऊन शेतकऱ्यांची रांग
शिरपूर येथे डिझेल मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त,डिझेल घेण्यासाठी पंपावर ड्रम घेऊन शेतकऱ्यांची रांग. खरीप हंगाम सुरू झाला असून मशागतीला ट्रॅक्टरचा वापर करावा लागतो आहे. मात्र डिझेल उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप. ट्रॅक्टर द्वारे मशागत करावी लागत असल्याने ट्रॅक्टरला लागणाऱ्या डिझेल साठी शेतकरी ड्रम मध्ये डिझेल घेऊन जात आहेत. मात्र कमी प्रमाणात डिझेल भेटत असल्याने शेतकऱ्यांची नाराजी. डिझेल आणि पेट्रोलचे दर देखील वाढल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना आर्थिक फटका.
-
पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीबंदी
पनवेल महानगरपालिकेकडून आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय… 25 मे पासून जलकुंभनिहाय निर्णय लागू होणार… नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन…
-
पुढील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी पालिकेचा निर्णय
नवी मुंबईत सोमवारपासून 10 टक्के पाणी कपात… आठवड्यातून दोन दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार… मोरबे धरणातील पाणीसाठ्यात घट झाल्यानं निर्णय
-
नाशिकच्या काही भागात उद्या पाणीपुरवठा बंद
नाशिक शहरातील सातपूर आणि नाशिक पश्चिम विभागात आज पाणीपुरवठा बंद… मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामांमुळे पाणी बंद… पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन…
-
एकनाथ शिंदेंनी मला खडसावलं नाही- संजय शिरसाट
एकनाथ शिंदेंनी मला खडसावलं नाही. समज देणं हा एकनाथ शिंदेंचा अधिकार आहे. आदेश म्हणून आम्ही त्यांच्या सूचना मानतो- शिरसाट
-
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर शहरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांची तुफान गर्दी
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर शहरालगत असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांनी तुफान गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.ट्रॅक्टर चालकांसह काही शेतकरी रात्रीपासून तर काही शेतकरी सकाळपासूनच टँकर येण्यापूर्वीच या पंपावर हातामध्ये कॅन घेऊन तासनतास रांगेत उभा असल्याचं दिसून आलं,सध्या खरीप हंगामाच्या मशागतीचा काळ असल्याने प्रत्येक पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळून येत असल्याचं पाहायला मिळालं,सकाळपासूनच हे शेतकरी मशागतीच्या कामांना डिझेल घेण्यासाठी दाखल झाले असून प्रचंड उन्हाच्या तडाख्यातही उपाशीपोटी तासनतास उभा राहण्याची वेळ येत आहे.त्यामुळे सरकारने इतर वाहनांना कमी डिझेल देऊन शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य द्यावे अशी मागणी रांगेत उभा असलेल्या काही शेतकऱ्यांनी केली
-
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात फक्त पाच गाड्या…
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वंदे भारत ट्रेनने शिर्डीत पोहचले. डिफेन्स क्लस्टरच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिर्डीत दाखल झाले. मुंबईतून वंदे भारतने प्रवास करत मुख्यमंत्री शिर्डीत दाखल झाले. शिर्डी रेल्वे स्थानकावरून हॉटेल सन अँड सँडकडे रवाना झाले. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात फक्त पाच गाड्या आहेत.
-
‘इनाम निर्मूलन कायदा’ तात्काळ मागे घ्या
हिंदू देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला घालणारा ‘इनाम निर्मूलन कायदा’ तात्काळ मागे घ्या. अन्यथा राज्यव्यापी जनआंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र मंदिर महासंघाने सरकारला दिला आहे. नाशिक येथील प्रमुख मंदिरांच्या विश्वस्तांनी ही भूमिका जाहीर केली आहे. मंदिरांच्या जमिनी आणि हक्कांबाबत संताप व्यक्त केला आहे. सरकारने निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
-
पिंपरी चिंचवड शहरातील रावेत मध्ये कुत्री वर लैंगिक अत्याचार
पिंपरी चिंचवड शहरातील रावेत मध्ये कुत्रीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमरात कैद झाली आहे. राजेंद्र शाहू नामक व्यक्तीवर रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राजेंद्र शाहू हा 19 मे च्या रात्री अर्ध नग्न अवस्थेत फिरत असल्याचे फिर्यादीने पाहिले, तो काही तरी संशयास्पद हालचाल करत होता. त्यावेळी आरोपी राजेंद्र शाहू याने एका कुत्रीला पकडून तिच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून आले, याप्रकरणी श्वानप्रेमी प्रथमेश कांबळे यांनी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे
-
भोंदूबाबाच्या वेशात चोरी ; रांजणगावातील चोरटा सीसीटीव्हीत कैद
रांजणगाव परिसरातील कामगारांच्या राहत्या रुममध्ये भोंदूबाबाच्या वेशात आलेल्या चोरट्याने प्रवेश केला. कामगार गाढ झोपेत असताना चोरट्याने पंधराशे रुपयांची रोख रक्कम आणि मोबाईल लंपास केला.सकाळी चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये भोंदूबाबाच्या वेशातील संशयित चोरटा स्पष्टपणे कैद झाला.भोंदूबाबाचा वेष परिधान करून चोरट्याने संशय टाळण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरू करण्यात आला.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल-डिझेलचा किती साठा उपलब्ध?
छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल आणि डिझेल संदर्भातील 22 मे 2026 चा स्टॉक रिपोर्ट समोर आला आहे… या अहवालानुसार शहरात पेट्रोलचा एकूण साठा 21 लाख 78 हजार लिटर होता… त्यापैकी 6 लाख 61 हजार लिटर विक्री झाली असून सध्या 15 लाख 17 हजार लिटर पेट्रोल शिल्लक आहे… तर 7 लाख 65 हजार लिटर पेट्रोल ट्रान्झिटमध्ये असल्याची माहिती आहे. तर डिझेलचा एकूण साठा 25 लाख 80 हजार लिटर होता… त्यापैकी 12 लाख 72 हजार लिटर डिझेलची विक्री झाली… सध्या 13 लाख 8 हजार लिटर डिझेल उपलब्ध असून 12 लाख 55 हजार लिटर डिझेल ट्रान्झिटमध्ये आहे… दरम्यान, काही पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा दिसत असल्या तरी शहरात मोठ्या प्रमाणात इंधन साठा उपलब्ध असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. मात्र अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नसल्यामुळे पंप बंद असल्याचे सुद्धा दुसरीकडे पाहायला मिळतात.
-
हर्षवर्धन सपकाळ हटाव
सोलापुरात काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांविरोधात आक्रमक दिसले. हर्षवर्धन सपकाळ हटाव काँग्रेस बचाव असा बॅनर दाखवत कार्यकर्त्यांनी निषेध केला. सोलापूर पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारणीतील निवडीवरून काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत.
-
शिक्रापूरमध्ये खळबळ! ; नदीपात्रात जिवंत नवजात अर्भक आढळले
शिक्रापूर परिसरातील नदीपात्रात पुरुष जातीचे जिवंत नवजात अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. आज सकाळच्या सुमारास स्थानिक नागरिकांना नदीकाठावर बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत नवजात अर्भक जिवंत असल्याचे निदर्शनास आले.घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अर्भकाला ताब्यात घेतले. प्राथमिक उपचारासाठी अर्भकाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अर्भकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.हे अर्भक नदीपात्रात कोणी आणि कोणत्या कारणातून टाकले याबाबत पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला असुन या अमानवी प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
-
वादळी पावसाने मेंढपाळांचे कंबरडे मोडले ; लाखणगावात पशुधनासह संसार उघड्यावर
लाखणगाव परिसरात झालेल्या वादळी पावसाने मेंढपाळांच्या वाड्यांची दुरवस्था केली. ताडपत्र्या उडाल्याने संसार उघड्यावर आले तर अनेक शेळ्या-मेंढ्या दगावल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. उन्हाच्या तीव्र झळांमध्ये पशुधन सांभाळणाऱ्या मेंढपाळांसमोर आता पावसाचे संकट उभे ठाकले. चारा, धान्य आणि घरगुती साहित्य भिजल्याने महिलांसह लहान मुलांचे हाल वाढले.पावसामुळे चिखल आणि ओलसर वातावरण निर्माण झाल्याने पशुधन आजारी पडलेत त्यामुळे नुकसानग्रस्त मेंढपाळांनी प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी केली.
-
प्रशांत जगताप, दिप्ती चवधरी यांच्याकडे काँग्रेस पुणे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी
प्रशांत जगताप, दिप्ती चौधरी यांच्याकडे काँग्रेस पुणे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीमध्ये पदग्रहण समारंभ काँग्रेस भवनमध्ये पार पडणार आहे. पुणे पूर्व विभागाची जबाबदारी प्रशांत जगताप यांच्याकडे तर पुणे पश्चिम विभागाची जबाबदारी दिप्ती चौधरी यांच्याकडे देण्यात येणार आहे.
-
जळगाव जिल्ह्यात पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ
जळगाव जिल्ह्यात पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. जळगावमध्ये पेट्रोलच्या दरात आज 90 पैसे तर डिझेलच्या दरात 94 पैसे एवढी वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर प्रतिलिटर 110 रुपये 44 पैसे तर डिझेलचे दर 97 रुपये 1 पैशांवर पोहोचले आहेत. जळगाव मध्ये गेल्या दहा दिवसात पेट्रोलच्या दरात एकूण 4 रुपये 94 पैसे , डिझेलच्या दरात 4.99 पैसे एवढी वाढ झाली आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात झालेली दरवाढ यांना परवडणारी असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्यांनी व्यक्त केली आहे. एकीकडे दर वाढत आहेत तर दुसरीकडे पेट्रोल डिझेलची टंचाई यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर त्यांनी सांगितलं.
-
डिझेल भाववाढीमुळे धाराशिव मध्ये वाहन चालक-मालकांचा आंदोलनाचा इशारा
डिझेल भाववाढीमुळे धाराशिव मध्ये वाहन चालक-मालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आठ दिवसांत दोन वेळा डिझेल भाव वाढल्याने वाहन चालक मालक आक्रमक झाले आहेत. वाहतुकीमध्ये डिझेल खर्च जास्त आणि नफा कमी राहत असल्याची वाहन मालकांची खंत आहे. वाढलेले डिझेल भाव तात्काळ कमी करा अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
-
मुक्ताईनगरच्या कु-हा काकोडा परिसरात दोन दिवसांपासून पेट्रोल डिझेलची टंचाई कायम.
कु-हा काकोडा येथे द्वारका किसान पेट्रोल पंपावर रात्रीपासून पेट्रोल डिझेल घेण्यासाठी मोठी गर्दी लागल्या रांगा. सर दुसऱ्या एस आर पेट्रोल पंपावर देखील इंधनपुरवठा नाही. नागरिकांचे मोठे हाल. किती कामे करायची कशे दरवाढ कितीबी होऊ द्या डिझेल पुरवठा आम्हाला द्या -शेतकरी. द्वारका पेट्रोल पंपाचे मालक सांगताय शिस्त नाही ग्राहकांचा गोंधळ उडतो त्यामुळे ग्राहकांनी सहकार्य करायला हवं पोलिसांकडून मदत नाही-
-
निबे ग्रुपच्या संरक्षण उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन
शिर्डीच्या औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या निबे ग्रुपच्या संरक्षण उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन देशाचे संरक्षणमंत्री यांच्या हस्ते होणार असून मुख्यमंत्री यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच सुरू होत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात १५५ मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचे उत्पादन होणार असून वर्षाला तब्बल पाच लाख तोफगोळे तयार करण्याची क्षमता या कारखान्यात आहे. विशेष म्हणजे संपूर्ण उत्पादन तंत्रज्ञान आणि कच्चा माल स्वदेशी आहे. अवघ्या एका वर्षात उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे शिर्डी परिसरात संरक्षण उद्योगाचे मोठे जाळे निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.
-
वसई विरार पोलिसांची मोठी कारवाई 35 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट
मिरा-भाईंदर, वसई-विरार परिमंडळ १ पोलिसांनी तब्बल ६५ लाख रुपये किमतीचा जप्त केलेला अवैध मुद्देमाल DCP राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली नष्ट केला आहे. यामध्ये १७५ गुन्ह्यांशी संबंधित ५० लाख रुपयांची ४,००० लीटर अवैध दारू आणि १५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा बुलडोझर फिरवून नष्ट करण्यात आला. सार्वजनिक आरोग्य आणि कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी हे धडक पाऊल उचलले आहे. परिमंडळ १ चे DCP राहुल चव्हाण या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली ही मोठी कारवाई अवैध व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडणारी ठरली आहे.
-
मुंबईत अनेक भागात पावसाचा हजेरी, ढगाळ वातावरण..
भारतीय हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यात उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला. दुसरीकडे मुंबईच्या काही भागात सकाळी पावसाला सुरूवात झाली. ढगाळ वातावरणही बघायला मिळत आहे. राज्यात कुठे पाऊस तर कुठे उष्णता अशी स्थिती निर्माण झाली.
-
धाराशिवमध्येही डिझेलचा तुटवडा, वाहनधारकांची फरपट
धाराशिवमध्येही डिझेलचा तुटवडा असल्याने वाहनधारकांची फरपट होत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात ही डिझेलचा तुटवडा, पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड लागले . एकीकडे डिझेलचे भाव वाढले तर दुसरीकडे डिझेल पुरवठा सुरळीत नसल्यामुळे वाहनधारकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
-
विधानपरिषदेच्या जागावाटपसाठी भाजप-शिवसेनेत खलबतं – सूत्रांची माहिती
विधानपरिषदेच्या जागावाटपसाठी भाजप-शिवसेनेत खलबतं होणार आहेत.. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण , मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
वांद्रे गरीब नगर – कारवाईचा पाचवा दिवस
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वांद्रे पूर्वेतील गरीब नगरमध्ये सुरू असलेली रेल्वेची अतिक्रमणविरोधी मोहीम आज पाचव्या दिवशी अंतिम टप्प्यात पोहोचलीय. बुलडोझर आता थांबला असला तरी हाताने ढिगारे हटवण्याचं काम सुरू आहे.
-
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील सावरगाव गावात भीषण पाणीटंचाई
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील सावरगाव गावात भीषण पाणीटंचाई. गावातील जलस्त्रोत आटल्याने हंडाभर पाण्यासाठी चिमुकल्या मुलींवर दोन किलोमीटर पर्यंत पायपीट करण्याची वेळ आली. गावात नळ योजना आली, मात्र नळाला पाणी येत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
-
हिंगोली-डिझेल घेण्याच्या लागलेल्या रांगेवरून दोन गटात काल तुफान हाणामारी
हिंगोली-डिझेल घेण्याच्या लागलेल्या रांगेवरून दोन गटात काल सायंकाळी तुफान हाणामारी झाली. कळमनुरी तालुक्यातील आराटी फाटा येथील पेट्रोल पंपा वरिल प्रकार, हाणामारीचा व्हिडीओ आज सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हाणामारीत काही जण जखमी झाल्याची माहिती जखमींवरती उपचार सुरू असून हाणामारी करणाऱ्या तिघांविरुद्ध कळमनुरी पोलिसात कार्यवाही करण्यात आली.
-
पेट्रोल डिझेलचे दर वाढले, छत्रपती संभाजीनगर इथे नवे दर काय ?
देशभरात पेट्रोल डिझेलचे दर वाढले असून छत्रपती संभाजीनगर येथील दरही समोर आलेत.
पेट्रोल 90 पैसे प्रति लिटर दराने वाढले, शहरात पेट्रोल नवे दर 110.44 रुपये इतके आहे. तर डिझेल 94 पैसे प्रति लिटर दराने वाढले, 97.01 रुपये डिझेलचे नवीन दर आहेत.
-
मुंबई – पेट्रोल डिझेल दरवाढीचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसायला सुरूवात
मुंबई पेट्रोल डिझेल दरवाढीचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसायला सुरुवात झाली आहे. मुंबईतील प्राचीन मुंबादेवी जलेबीवाला यांनी खाद्य पदार्थांच्या दरात वाढ केली आहे. फापडा , जलेबीच्या दरात प्रती किलो 40 ते 50 रुपयांची वाढ झाली असून इतर खाद्य पदार्थांच्या किंमतीतही ५० रुपयांची वाढ झाली आहे. ट्रान्सपोर्ट वाढू नये यासाठी सरकारने तोडगा काढावा अशी ग्राहकांची मागणी आहे.
मात्र दरवाढीचा फटका बसतोय, त्यामुळे पदार्थांच्या दरात वाढ केल्याशिवाय पर्याय नाही अशी प्रतिक्रिया दुकानदारांनी दिली आहे.
-
पेट्रोलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ, सर्वसामान्यांना मोठा दणका
गेल्या 10 दिवसांत पेट्रोल डिझेलच्या दरांत तिसऱ्यांदा वाढ झाली असून आज पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महागलंय. देशभरातसह महाराष्ट्रातही इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या खिशावर मोठा भार पडणार आहे.
Published On - May 23,2026 8:57 AM
