Maharashtra News live : शरद पवार चार दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर
देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

मराठा आरक्षणात आता कोल्हापूर गॅझेटची एंट्री झाली आहे. तर मराठा आरक्षण जीआर हा ओबीसींना धक्का देणारा असल्याचे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. ओबीसी समाजाने मोर्चा काढण्याची गरज नसल्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठा आरक्षणाचा जीआर हा कायद्याच्या चौकटीत असल्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले. त्यामुळे आता ही लढाई न्यायालयासह रस्त्यावर दिसून येऊ शकते. उपराष्ट्रपती सी. राधाकृष्णन हे आज शपथ घेतील. राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून काही भागांना पावसाने तडाखा दिला. येत्या दोन दिवसात कोकण-गोवा आणि मराठवाड्यावर आभाळमायासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारपासून पावसाचा तडाखा अनेक भागांना बसू शकतो. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू येथे बंदची हाक देण्यात आली आहे. यासह राज्यातील इतर अनेक घडामोडी वाचा येथे.
LIVE NEWS & UPDATES
-
परळ प्रभादेवी ब्रिज आज रात्री बारा वाजता पाडण्यात येणार
मुंबईतील परळ प्रभादेवी ब्रिज आज रात्री बारा वाजता एमएमआरडीए कडून तोडण्यात येणार आहे, या पार्श्वभूमीवर कोणीतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.
-
दक्षिण सोलापूर तालुक्यात जोरदार पाऊस, तलाव ओव्हर फ्लो
दक्षिण सोलापूर तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे तलाव ओव्हर फ्लो
होटगी तलावातील मासे पाण्यासह रस्त्यावर
चिमुकल्यांसह मोठ्यांची मासे पकडण्यासाठी गर्दी
तलावातील पाणी रस्त्यावर, रस्ता जलमय
-
-
शिरुर कासारमध्ये आज ओबीसींची महाएल्गार सभा
शिरूर कासार तालुक्यातील शिंगारवाडी फाटा येथे ओबीसी महाएल्गार सभा ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे दाखल नगर-पाडळसिंगी रोडवर ओबीसी बांधव मोठ्या संख्येने दाखल -जेसीबीतून पुष्पवृष्टी करून लक्ष्मण हाके यांचं केलं जाणार स्वागत आजच्या सभेत लक्ष्मण हाके काय बोलणार याकडे लक्ष
-
कल्याणच्या गांधारी परिसरात महिला चोरट्यांचा सुळसुळाट
कल्याणच्या गांधारी परिसरात महिला चोरट्यांचा सुळसुळाट
ग्राहक बनून आल्या आणि १५ हजारांचे कपडे केले लंपास
घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, पोलिसांनी अजूनही केला नाही गुन्हा दाखल
पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यानं दुकानदारांमध्ये संताप
-
नांदेड शहरात मुसळधार पावसाची हजेरी
नांदेड शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. नांदेड शहरालगतच्या आसना पुलाखाली तर अक्षरशः तळं साचलं असून, पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
-
-
सोलापूर: मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरले
दक्षिण सोलापूर तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरून वाहू लागले आहेत. होटगी तलावातील मासे पाण्यासह रस्त्यावर आल्याने स्थानिक नागरिक मासेमारीचा आनंद घेतला. यावेळी नागरिकांची गर्दी पहायला मिळाली.
-
शरद पवार चार दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे चार दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. शनिवार ते मंगळवार सकाळपर्यंत ते नाशिकमध्ये असणार आहेत. ते शनिवारी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी आहेत. रविवारी पक्षाच्या बैठकीसह कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. सोमवारी नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
-
वाशिम जिल्ह्यात दोन दिवसांच्या विश्रांती नंतर जोरदार पाऊस
वाशिम जिल्ह्यात दोन दिवसांच्या विश्रांती नंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. वाशिम, मानोरा, मालेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मागील दोन महिन्यांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे शेतमालाचे नुकसान होत आहे.
-
मुंबई विमानतळावर विमानाचे इमरजेंसी लँडिंग
मुंबई विमानतळावर स्पाइज जेटचे इमरजेंसी लँडिंग करण्यात आले आहे. अचानक मुंबई विमानतळावर फोन आला की स्पाइसजेटच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले आणि त्यानंतर काही काळासाठी काही उड्डाणे थांबवण्यात आली.
-
शीळ फाटा परिसरात अनधिकृत बांधकामावर कारवाई
ठाणे महानगरपालिकेने दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या शीळ फाटा परिसरात अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू केली आहे
-
कुर्डू प्रकरणात राजकारण करायची गरज नाही- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
कुर्डू प्रकरणात अजित पवार यांचे नाव मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावरून अजित पवार नाराज आहेत का ?? असा प्रश्न राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना विचारले असता तसं काही नाही कुर्डू प्रकरणात राजकारण करायची गरज नसून दादांचा आवाजच मोठा आहे. म्हणून ते तसे बोलले असे बाबासाहेब पाटील म्हणाले.
-
नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी खासदार संजय राऊत यांची घेतली भेट
नाशिक शहरातील विविध प्रश्न आणि अवैध धंदे , शहरातील कायदा सुव्यवस्था याच्यावर मनसे व ठाकरे गटाने काढलेल्या मोर्चा काढला. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण.
-
संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, संजय निरुपम यांची मुंबई पोलिसांकडे मागणी
शिंदे शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशई मागणी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे. मी काल वर्सोवा पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. मी आज मुंबई पोलीस आयुक्तांना भेटून त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केल, अशी माहिती संजय निरूपम यांनी दिली.
-
नाशिक पोलीस आयुक्त मनसे आणि ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीला
नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक मनसे आणि ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीला पोहचले आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक शासकीय विश्रामगृह येथे दाखल झाले आहेत. नेत्यांनी कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा घेऊन मोर्चात सवाल उपस्थित केला होता. तर राहुल धोत्रे खून प्रकरणातील संशयित आरोपी उद्धव निमसे फरार असल्यानं राऊतांनी गंभीर आरोप केले होते. भाजप माजी नगरसेवक उद्धव निमसे शासकीय बंगल्यात लपल्याचा संजय राऊतांनी दावा केला होता. या भेटीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
-
मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवण्याची ईमेलवर आलेली धमकी खोटी
मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवण्याची ईमेलवर आलेली धमकी खोटी असल्याचं स्पष्ट झालं आहे. तपासणी केल्यानंतर काहीही संशयास्पद सापडल नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
-
बाबासाहेबांनी घटना ज्या समाजासाठी लिहिली तोच समाज आज दुसरीकडे तोंड वर करून चाललाय : नागराज मंजुळे
बाबासाहेबांनी घटना ज्या समाजासाठी लिहिली तोच समाज आज दुसरीकडे तोंड वर करून चाललाय, असं विधान सुप्रसिद्ध दिग्दर्शक कलाकार नागराज मंजुळे यांनी सांगलीत केलं. सांगलीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महाकवी वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंती निमित्त पहिल्या शाहिरी लोककला संमेलनाचे आयोजन करण्यात आलं होतं. या शाहिरी लोककला संमेलनाचे उद्घाटन नागराज मंजुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
-
बच्चू कडू यांचे 19- 20 सप्टेंबरला उपोषण
बच्चू कडू यांचे 19- 20 सप्टेंबरला गाडगे महाराज यांच्या गावी उपोषण होणार आहे. तर 28 सप्टेंबरला बुटीबोरीला यात्रा करणार आहेत.
-
राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षण जाहीर
राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाचे प्रवर्ग जाहीर झाले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींचे आरक्षण जाहीर झाले आहे.
-
मोबाईल हॅककरुन Flipkart वरून मोबाईल खरेदी
मोबाईल हॅक करून OTP च्या माध्यमातून Flipkart वरून मोबाईल खरेदी करणाऱ्या दोघा आरोपींना भाईंदर पोलिसांनी अटक केली आहे.
-
संजय राऊत यांच्यावर कारवाई करा – शिवसेनेच्या शिष्टमंडळाची मागणी
चिथावणीखोर वक्तव्य करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर कारवाई करा अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे केली आहे.
-
नितेश राणे यांचे समर्थक मनोज राणे यांचा शिवसेनेत प्रवेश
भाजपाचे मंत्री नितेश राणे यांचे मीरा भाईंदर मधील खंदे समर्थक मनोज राणे यांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शिंदे गटात प्रवेश
-
परळी आठ दिवसाच्या नंतर पुन्हा परळी तालुक्यात पावसाचे आगमन
आठ दिवसानंतर पुन्हा पावसाची परळी तालुक्यात हजेरी लागली आहे… या पावसामुळे शेती पिकांना मोठा फायदा होणार आहे… उकड्यापासून नागरिकांना थोडा का होईना दिलासा मिळणार आहे…
-
ईमेलद्वारे मुंबई हायकोर्टाला धमकी…
ईमेलद्वारे मुंबई हायकोर्टाला धमकी देण्यात आली आहे… रजिस्टर ऑफिसमध्ये मेलवर धमकी आल्याची माहिती मिळत आहे. सध्या मुंबई हायकोर्ट संपूर्ण पणे खाली केले जात आहेत.. सर्व वकिलांना बाहेर जाण्यास सांगितले आहे.. आता पोलिसांचे एक पथक या ठिकाणी उपस्थित झाले आहे.. पोलीस सर्वांना बाहेर काढत आहेत …
-
मंत्रालया समोरून जाणारी 650 mm ची पाईपलाईन फुटली
मंत्रालया समोरून जाणारी 650 mm ची पाईपलाईन फुटली आहे. पाईपलाईन जेव्हा फुटली तेव्हा या संपूर्ण परिसरामध्ये पाणी साचलेलं होतं सध्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू आहे. या पाईपलाईनच्या माध्यमातून आंबेडकर नगर इथल्या झोपडपट्ट्यांना पाणीपुरवठा केला जात होतं. पाईपलाईन फुटल्यामुळे पुढील काही तास कपडे आंबेडकर नगर या भागातल्या आसपासच्या परिसरामध्ये पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती सध्या दिली जाते आहे…
-
सार्वजनिक मिरवणुकीत डॉल्बी, डीजे नकोच पुण्यात कलावंत ढोल ताशा पथकाच्या कलाकारांची मागणी
सार्वजनिक उत्सवांतील मिरवणुकांमध्ये वाढत्या डॉल्बी आणि साउंड सिस्टिम्सच्या विरोधात पुण्यातील कलावंत ढोल ताशा पथकाच्या कलाकाराकडून आता मोहीम राबविण्यात येणार आहे.. उत्सव मिरवणुकांमध्ये DJ ला बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी आता मराठी कलाकारांकडून पुण्यात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे .. येत्या रविवारी पुण्यात विशेष मोहीम राबवण्यात येणार असून या मोहिमेमध्ये अनेक मराठी कलाकार सहभागी होणार आहेत. डॉल्बी आणि साऊंड वापरावर प्रशासनाने बंदी आणावी यासाठी, या मोहिमेतील संकलित स्वाक्षऱ्या आणि निवेदन लवकरच माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल अशी माहिती कलाकार सौरभ गोखले याच्याकडून देण्यात आली..
-
लातूर – ओबीसी आरक्षण संपल्याच्या भावनेतून तरूणाची आत्महत्या, छगन भुजबळ, धनंजय मुंडेंनी घेतली शोकाकुल कुटुंबियांची भेट
लातूर – ओबीसी आरक्षण संपल्याच्या भावनेतून रेणापूरच्या भरत कराड या 35 वर्षांच्या युवकाने जीव संपवलं. छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांवी शोकाकुल कराड कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.
-
पुणे – सार्वजनिक मिरवणुकीत डॉल्बी, डीजे नकोच – कलावंत ढोल ताशा पथकाच्या कलाकारांची मागणी
पुणे – सार्वजनिक उत्सवांतील मिरवणुकांमध्ये वाढत्या डॉल्बी आणि साउंड सिस्टिम्स च्या विरोधात पुण्यातील कलावंत ढोल ताशा पथकाच्या कलाकाराकडून आता मोहीम राबवण्यात येणार आहे. उत्सव मिरवणुकांमध्ये DJ ला बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी आता मराठी कलाकारांकडून पुण्यात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे . येत्या रविवारी पुण्यात विशेष मोहीम राबवण्यात येणार असून या मोहिमेमध्ये अनेक मराठी कलाकार सहभागी होणार आहेत.
-
मंत्रालया समोरून जाणारी पाईपलाईन फुटली, पाणी साचल्याने नागरिकांचे हाल
मंत्रालया समोरून जाणारी 650 mm ची पाईपलाईन फुटली. प्रेशर इतकं जास्त होतं की मंत्रालया समोरचा रस्ता खचला.
पाईपलाईन जेव्हा फुटली तेव्हा या संपूर्ण परिसरामध्ये पाणी साचलेलं होतं सध्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू आहे. या पाईपलाईनच्या माध्यमातून कपडे आंबेडकर नगर इथल्या झोपडपट्ट्यांना पाणीपुरवठा केला जात होतं.
पाईपलाईन फुटल्यामुळे पुढील काही तास कपडे आंबेडकर नगर या भागातल्या आसपासच्या परिसरामध्ये पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती दिली जात आहे.
-
महादेवी हत्तीण प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी
महादेवी हत्तीण प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. महादेवी हत्तीणीला वनतारामधून परत पाठवावं यासाठी राज्य सरकार आणि मठाच्या वतीने कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. आम्ही यासंदर्भात वनताराशी बोलू असं सरकारी वकिलांनी म्हटलं आहे.
-
वर्धा जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस, वर्धा – राळेगाव मार्गावरील वाहतूक सकाळपासून ठप्प
वर्धा जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. देवळी तालुक्यातील सरूळ शिवारात यशोदा नदीला पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत आहे. वर्धा – राळेगाव मार्गावरील वाहतूक सकाळपासून ठप्प झाली आहे. तसेच हिंगणघाट तालुक्यात अल्लीपुर – अलमडोह मार्गावरील वाहतूक पुरामुळे ठप्प असून पूर ओसरण्याची प्रतिक्षा आहे.
-
नागपूर – मानकापूर परिसरात स्कूलबसचा भीषण अपघात
नागपूर – मानकापूर परिसरात स्कूलबसचा भीषण अपघात झाला असून 7 विद्यार्थी जखमी झाले आहेत. या अपघातानंतर नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी उड्डाणपुलावरील वाहतूक रोखत घोषणाबाजी केली.
-
छत्तीसगडमध्ये पोलीस आणि माओवादी यांच्यात चकमक, १० माओवादी ठार
छत्तीसगडमधील गरियाबंद जिल्ह्यात काल दुपारपासून पोलीस आणि माओवादी यांच्यात चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत छत्तीसगड पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी जवळपास दहा माओवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ठार झालेल्या माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यापासून रोखण्यासाठी माओवादी जोरदार प्रतिहल्ला करत आहेत, ज्यामुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. आज सकाळी साडेसातच्या सुमारास पुन्हा चकमक सुरू झाली असून, ती अद्यापही सुरू आहे. माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेणे हे सध्या सुरक्षा दलांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे.
-
धाराशिवमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून खासदार ओमराजे निंबाळकरांविरुद्ध कॅम्पेन
धाराशिवमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर कॅम्पेन सुरु केले आहे. ‘धन्यवाद खासदार ओम! आम्हाला कळालं’ अशा आशयाच्या पोस्ट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मागील काही दिवसांपासून भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या गटांमध्ये सोशल मीडियावरून संघर्ष सुरू आहे. राणाजगजितसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या या मोहिमेवर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात या पोस्ट्सबद्दल विविध चर्चा आणि तर्कवितर्क लावले जात आहेत.
-
धाराशिवमधील कला केंद्र रात्री उशिरापर्यंत सुरु, कारवाई का होत नाही, सर्वसामान्यांचा आरोप
बार्शी येथील कला केंद्रातील नर्तिकेच्या प्रेमप्रकरणात एका उपसरपंचाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, आता धाराशिव जिल्ह्यातही कला केंद्रांसंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ एका सामान्य व्यक्तीने पोलिसांशी केलेल्या संवादाचा आहे, ज्यात तो रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कला केंद्रांवर कारवाई का केली जात नाही, अशी विचारणा करत आहे. वेळेचे बंधन पाळले जात नसतानाही ही लोकनाट्य कला केंद्रे चालूच कशी आहेत, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. सूत्रांनुसार, धाराशिवमध्ये काही ठिकाणी विनापरवाना आर्केस्ट्रा सुरू आहेत. या व्हायरल व्हिडिओमुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नियमांचे उल्लंघन होत असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.
-
राहुरी तालुक्यात नगर-मनमाड महामार्गावर पुन्हा अपघात, दोघांचा मृत्यू
राहुरी तालुक्यात नगर-मनमाड महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. रात्री उशिरा एका अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असताना, सकाळी पुन्हा झालेल्या अपघातात आणखी एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे वारंवार होणाऱ्या या अपघातांनी संतप्त झालेले नागरिक अखेर रस्त्यावर उतरले. त्यांनी राहुरी येथे नगर-मनमाड महामार्ग अडवून जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही सहभाग घेऊन नागरिकांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. नागरिकांचा संताप महामार्गाच्या खराब स्थितीमुळे असून, त्यांनी प्रशासनाकडे तातडीने यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
-
बीडमध्ये कुणबी प्रमाणपत्र काढण्याच्या प्रक्रियेला वेग
बीड जिल्हा प्रशासनाने कुणबी प्रमाणपत्र काढण्याच्या प्रक्रियेला वेग दिला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या निर्णयानुसार, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळावं यासाठी गावोगावी कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार हे काम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी थेट गावांमध्ये जाऊन लोकांना प्रमाणपत्र काढण्याची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगत आहेत. यामध्ये आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कसा भरायचा याची माहिती दिली जात आहे.
-
NDA च्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा, आनंदाचा – एकनाथ शिंदे.
NDA च्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा, आनंदाचा. सीपी राधाकृष्ण यांचा दिमाखदार सोहळा पार पडला. राष्ट्रवादीच्या वतीने प्रफुल पटेल उपस्थित होते. अजितदादांचा रायगडमध्ये नियोजित कार्यक्रम होता असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
-
हनी ट्रॅप प्रकरणाच पुढे काय झालं? -बाळा नांदगावकर
“लोकांच्या अपेक्षांचा भंग झाला तर मोर्चा काढावा लागतो. हनी ट्रॅप प्रकरणाच पुढे काय झालं?. नाशिकमधील कायदा-सुव्यवस्था बिघडलीय. राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. शाळेच्या आजूबाजूला ड्रग्ज विक्री सुरु आहे” अशी टीका मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली.
-
महाराष्ट्रामध्ये ॲक्शनला रिएक्शन नक्कीच मिळेल – लक्ष्मण हाके
“मुळात इथले राजकारणी मराठा आरक्षणाच्या संदर्भात खोटं बोलत आहेत. वास्तव पाहता कुणामध्येही डेरिंग धाडस नाही. महाराष्ट्रामध्ये ॲक्शनला रिएक्शन नक्कीच मिळेल.मग ती लोकशाही मार्गाने असेल ही जबाबदारीने सांगतो.आम्ही मोर्चे काढून आंदोलने करू. पण आम्ही महाराष्ट्रातल्या ओबीसीचा आवाज बुलंद करू. ओबीसी जर जागा झाला तर हे आमदार खासदार अर्थमंत्री कारखानदार नेते राहणार नाहीत” असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले.
-
मराठा समाजातील आजी माजी लोकप्रतिनिधीना भुजबळांचा मोठा सवाल
ओबीसी आरक्षण हवं असल्यास तुम्हाला इतर सवलती आणि आरक्षण नको का ?. SEBC १० टक्के, EWS १० टक्के आणि खुल्या वर्गातील आरक्षण नको का ?. अशिक्षित लोकांकडून अपेक्षा नाही, सुशिक्षित लोकांनीच उत्तर द्यावी,भुजबळांची मागणी. भुजबळांच्या मागणीने मराठा समाजातील आजी माजी नेत्यांची कोंडी होण्याची शक्यता. नवी मागणी करतांना भुजबळांचा अशिक्षित म्हणत मनोज जरांगेंना टोला.
-
सीपी राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ
देशाचे 15वें उपराष्ट्रपती म्हणून सीपी राधाकृष्णन यांनी आज शपथ घेतली. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात दिसले.
-
उपराष्ट्रपतीपदाचा शपथविधी सोहळा सुरु
राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपतीपदाचा शपथविधी सोहळा सुरु झाला आहे. सी.पी.राधाकृष्णन देशाचे नवनिर्वाचीत उपराष्ट्रपती आहेत. ते याआधी महाराष्ट्राचे राज्यपाल होते. नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी.सुदर्शन यांचा पराभव केला होता.
-
उपराष्ट्रपतीपदाचा शपथविधी सोहळा सुरु
राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपतीपदाचा शपथविधी सोहळा सुरु झाला आहे. सी.पी.राधाकृष्णन देशाचे नवनिर्वाचीत उपराष्ट्रपती आहेत. ते याआधी महाराष्ट्राचे राज्यपाल होते. नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी.सुदर्शन यांचा पराभव केला होता.
-
छत्तीसगड राज्यात काल दुपारपासून चकमक सुरू -सध्या आता ही चकमक सुरू आहे
या चकमकीत काल छत्तीसगड पोलिस व सीआरपीएफ या जवानांनी जवळपास दहा माओवाद यांना ठार मारले. ठार झालेल्या माओवाद्यांचे शव पोलिसांना आणण्यासाठी चकमक करून आळा घालत आहेत माओवादी. छत्तीसगड राज्यातील गरीयाबंद जिल्ह्यातील चकमक सुरू
-
नाशिकमध्ये आंदोलन
नाशिक मध्ये शिवसेना सक्रिय आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा नाशिक मध्ये जनतेच्या प्रश्नावर ती आवाज उठवत असते. नाशिक पवित्र धार्मिक स्थान आहे नाशिक मध्ये कुंभमेळ्याचा आयोजन केलं जातं नाशिक श्रीरामाच्या नावाने ओळखले जाते तसेच नाशिक हे कुसुमाग्रज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने ओळखले जाणारे देखील शहर आहे आज नाशिकमध्ये जी अवस्था आहे जी परिस्थिती झालेली आहे त्याच्या विरोधात या आधी देखील आंदोलनाला झाली
-
मंत्री जयकुमार गोरे यांनी छगन भुजबळ यांचे कान टोचले
पद्धतीची वक्तव्य जबाबदार व्यक्तींनी टाळली पाहिजेत. शासन म्हणून सामाजिक सलोखा राखणे आपले काम आहे
-
वाहतूक कोंडीच्या विरोधात घोडबंदरवासीय रस्त्यावर उतरणार
रोडची परिस्थिती, खड्डे, वाहतूक कोंडी आणि अवजड वाहनांमुळे निर्माण झालेली बिकट अवस्थेमुळे घोडबंदर रोडवरील नागरीक हैराण. या समस्येसंदर्भात जस्टिस फॉर घोडबंदर रोड संस्था आणि नागरीक रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आनंद नगर सिग्नल येथे रस्त्याच्या कडेला बोर्ड घेऊन शांतपणे बसणार
-
शेतकऱ्याचा टरबूज दुबईला
धुळे तालुक्यातील कावठी शिवारात राहणाऱ्या समाधान शिंदे या शेतकऱ्याने सहा लाखाचे टरबुजाचे उत्पन्न घेतले. दोन एकर जमिनीत 40 टन टरबूजाचे उत्पादन घेतले. त्यांचा टरबूज आता दुबईला निर्यात होणार आहे.
-
नाशिक येथील शिवसेना आणि मनसेच्या आंदोलनाचा टीझर रिलीज
नाशिक येथील शिवसेना आणि मनसेच्या आंदोलनाचा टीझर संजय राऊत यांच्या कडून प्रसिद्ध करण्यात आला. आज शिवसेना आणि मनसे यांचे नाशिक येथे आंदोलन करण्यात येणार आहे.
-
मंचरमध्ये मशिदीचा भाग कोसळला
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात रस्त्याच्या कामा दरम्यान मशिदीखाली सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान मशिदीचा काही भाग कोसळला. यामध्ये भुयारासारखी रचना दिसून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. या घटनेनंतर हिंदू संघटनांनी या भुयाराचा तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे मुस्लिम संघटनांनी मशिदीच्या झालेल्या नुकसानीवर आक्षेप घेत, ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.
-
“आम्ही इथले भाई” म्हणत दुकानदाराला मारहाण
पुण्यातील औंध परिसरात टोळक्याचा धुमाकूळ दिसून आला. आम्ही इथले भाई म्हणत दुकानदाराला मारहाण केली. दुकानदाराला मारहाण करत अल्पवयीन मुलांची गुंडागिरी दिसून आली. घटनेतील ४ ही आरोपी अल्पवयीन आहेत.अल्पवयीन आरोपींनी दहशत पसरवण्यासाठी दुकानाची तोडफोड केली.
-
कुर्डू मुरूम उपसा प्रकरणात मोठा खुलासा
कुर्डू मुरूम उपसा प्रकरणाच्या अहवालावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया समोर आली. कुर्डू मध्ये झालेला मुरूम उपसा हा बेकायदेशीर होता त्याबाबतचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे. त्या ठिकाणी जी काम मंजूर झाली होती त्याची मुदत संपलेली होती तसेच उत्खनन करण्यासाठी कोणतेही परवानगी घेतलेली नव्हती, असे ते म्हणाले.
-
छगन भुजबळ लातूर दौऱ्यावर
मंत्री छगन भुजबळ यांनी नियोजीत येवला दौरा रद्द केला आणि ते आज लातूर दौऱ्यावर जात आहेत. रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावात जाऊन ते आत्महत्याग्रस्त कुटुंबियाची भेट घेणार आहे. ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ मांजरा नदीत भरत महादेव कराड यांनी आत्महत्या केल्याचं समोर आल्यानंतर मंत्री भुजबळ दौऱ्यावर आहेत.
Published On - Sep 12,2025 8:32 AM
