Pradeep Patwardhan: नाटकांवर नितांत प्रेम करणारा हरहुन्नरी कलाकार हरपला; प्रदीप पटवर्धन यांचा नाटक अन् नोकरीचा किस्सा

नाटक, चित्रपट, मालिका अशा सर्वच क्षेत्रात अभिनेते प्रदीप पटवर्धन दिसले तरी सर्वांत जास्त ते नाटकातच गुंतले. उषा पटवर्धन या त्यांच्या आई. त्यांनी एके काळी मराठी रंगभूमी आपल्या अभिनयाने गाजवली होती.

Aug 09, 2022 | 12:30 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Aug 09, 2022 | 12:30 PM

नाटक, चित्रपट, मालिका अशा सर्वच क्षेत्रात अभिनेते प्रदीप पटवर्धन दिसले तरी सर्वांत जास्त ते नाटकातच गुंतले. उषा पटवर्धन या त्यांच्या आई. त्यांनी एके काळी मराठी रंगभूमी आपल्या अभिनयाने गाजवली होती. तरीसुद्धा बिन भरवशाचं, अस्थिर क्षेत्र म्हणून त्यांच्या मनात कायम नाटकाविषयी भिती राहिलेली.

1 / 5
प्रदीप यांनी गिरगावच्या आर्यन हायस्कूलमधून शालेय शिक्षण घेतलं. आईकडून मिळालेली अभिनयाची देणगी त्यांनी शाळेतही दाखवून दिली होती. सिद्धार्थ महाविद्यालयात शिकत असतानाही त्यांनी महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये अभिनयासाठी असलेले प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले होते.

2 / 5
पुरस्कार, प्रमाणपत्र एका मागोमाग घरात येत असताना त्यांची आई मात्र फारशी खूश नव्हती. नाटकाशिवाय आर्थिक बळ देणाऱ्या कामावर त्यांची प्रचंड निष्ठा होती. मग स्पर्धेत आजमावता यावं यासाठी प्रदीप यांनी मिळेल ते काम केलं. अशा स्थितीतच त्यांना रिझर्व्ह बँकेची नोकरी मिळाली.

3 / 5
बँकेत नोकरी करतानाच त्यांनी अंतर बँक स्पर्धेत भाग घेतला आणि पुरस्कार पटकावला. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांची बँकेतली नोकरी गेली. तरीही विरंगुळा म्हणून ते नाटक करत राहिले. अशा स्थितीतच अभिनेते अमोल पालेकर यांच्या ते नजरेत आले. त्यांनी प्रदीप यांची विचारणा केली आणि त्यांच्याच मदतीने बँक ऑफ इंडियामध्ये प्रदीप यांना नोकरी लागली.

4 / 5
नाटकाला नाक मुरडणाऱ्या आईने केवळ नाटकानेच ही नोकरी तुला मिळवून दिली, त्यामुळे नोकरीबरोबर नाटकही कर असा आत्मविश्वास त्यांना दिला. मोरूची मावशी या त्यांच्या नाटकाने सबंध महाराष्ट्राला झपाटून टाकलं होतं. याच नाटकाने त्यांना अनेक मराठी चित्रपट मिळवून दिले.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें