AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI : अमेरिकन डॉलरला धोबीपछाड! RBI चा धाडसी निर्णय काय? सोन्यावर काय परिणाम होणार

RBI Big Decision : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाला बळ देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रुपयाला बुस्टर डोस मिळण्याची शक्यता आहे. पण त्याचा सोन्याच्या किंमतीवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. काय आहे तो निर्णय?

| Updated on: Oct 30, 2025 | 2:56 PM
Share
भारतीय रिझर्व्ह बँकेने अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता आरबीआय परदेशात ठेवलेले सोने परत भारतात आणणार आहे. सध्या सोन्याच्या साठ्यांपैकी 65 टक्के भाग हा भारतात आहे. तर ऊर्वरीत परदेशात आहे.

1 / 7
रशियाने परकीय चलन साठ्यावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताने त्या दिशेने पाऊल टाकले आहे. आरबीआयचा हा निर्णय केवळ धोरणात्मकच नाही तर भारताच्या आर्थिक स्वावलंबनासाठीचे एक पाऊल आहे.

2 / 7
काही वृत्तानुसार, सप्टेंबर 2025 पर्यंत आरबीआयकडे एकूण 880 टन सोने होते, त्यापैकी 576 टन, म्हणजेच सुमारे ६५%, आता भारतात सुरक्षित आहे. चार वर्षांपूर्वी हा आकडा केवळ 38 टक्के इतका होता. याचा अर्थ आरबीआयने गेल्या 4 वर्षांत 280 टन सोने देशात परत आणून इतिहास रचला आहे.

3 / 7
चालू आर्थिक वर्षात  (एप्रिल-सप्टेंबर 2025) आरबीआयने परदेशातून 64 टन सोने देशात परत आणले. आरबीआयच्या एकूण परकीय चलन साठ्यात आता सोन्याचा वाटा 13.92 टक्के इतका आहे. हा साठा मार्च महिन्यात 11.7 टक्के इतका होता. यापूर्वी रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीचा मोठा वाटा हा बँक ऑफ इंग्लंड आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलेंट्सकडे होता.

4 / 7
अनेक तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय 2022 मधील रशियाच्या परकीय गंगाजळी गोठवण्याशी संबंधित आहे. जेव्हा अमेरिकेसह काही युरोपियन देशांनी रशियाचे सोने आणि मालमत्ता गोठवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आपल्या देशाची संपत्ती, मालमत्ता आपल्याच देशात सुरक्षित ठेवण्याचे भान अनेक देशांना आले.

5 / 7
 भारत हा केवळ सोनेच परत आणत आहे असे नाही तर सोन्याची मोठी खरेदी सुद्धा करत आहे. कारण भारताला अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करायचे आहे. भारताने डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान दिले नाही. तर सोने सुरक्षा धोरणही चपखलपणे राबवले आहे

6 / 7
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. तेव्हाच भारताने अमेरिकेतील गुंतवणूक कमी करण्यास सुरुवात केली होती. भारताचे हे पाऊल हुशारीचे आणि शहाणपणाचे मानल्या जात आहे.

7 / 7
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.