AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टाटाने गेम पालटला… अर्ध्याहून अधिक लोक का खरेदी करत आहेत या कार?

टाटा मोटर्सने Q2 FY2027 मध्ये २ लाखाहून अधिक गाड्या विकून विक्रम केला आहे. EV आणि CNG मॉडेलच्या वाढत्या मागणीमुळे कंपनीच्या विक्रीत ४०% पेक्षा जास्त वाढ झाली. एकूण विक्रीपैकी ५१% गाड्या आता EV आणि CNG प्रकारातील आहेत, ज्यामुळे टाटाने बाजारात आपले स्थान मजबूत केले आहे. ग्राहक पसंतीमुळे टाटा पंच आणि नेक्सॉन आघाडीवर आहेत.

टाटाने गेम पालटला... अर्ध्याहून अधिक लोक का खरेदी करत आहेत या कार?
Tata Motors SalesImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 03, 2026 | 2:25 PM
Share

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकलसाठी मागची तिमाही अत्यंत धमाकेदार ठरली आहे. आर्थिक वर्ष 2027मध्ये दुसऱ्या तिमाहीत टाटा मोटर्सने 2 लाखाहून अधिक कार विकल्या. कंपनीने देशांतर्गत मार्केटमध्ये आणि ग्लोबल मार्केटमध्ये कंबाइन्ड 201,723 कार विकल्या आहेत. हे आकडे जुलै ते सप्टेंबर 2026च्या दरम्यानचे आहेत. देशातील जनतेने टाटा मोटर्स पॅसेंजरला सर्वाधिक पसंती दर्शविल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे टाटाची लोकप्रियता आणि विश्वासहार्यता अधोरेखित झाली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत टाटाने 40 टक्क्याहून अधिक कार विकल्या आहेत. आर्थिक वर्ष 2026मध्ये याच काळात कंपनीने 144,397 कार विकल्या आहेत. टाटा केवळ सेल्स वाढवत नाहीये तर या कारच्या सेल्सचा खरा गेम फ्यूल टाइपमध्ये झाला आहे.

कोणत्या कारची खरेदी सुरू?

टाटा मोटर्स इलेक्ट्रिकल, पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी चार फ्यूल टाइप असणाऱ्या कार विकते. गेल्या तिमाहीत मोटर्सच्या इलेक्ट्रिक कारची भागिदारी 23 टक्क्यावर पोहोचली आहे. कंपनीने दुसऱ्या तिमाहीत 47,150 इलेक्ट्रिक कार विकल्या आहेत. गेल्या वर्षी याच काळात 24,855 कार विकल्या गेल्या आहेत. म्हणजे 90 टक्क्यांची ग्रोथ आहे.

दुसरीकडे सीएनजीचे कॉन्ट्रिब्यूशन 28 टक्के आहे. ईव्ही आणि सीएनजी दोन्हींना एकत्र केलं तर टाटा मोटर्सच्या पोर्टफोलियोत 51 टक्के गाड्या सीएनजी आणि इव्हीवर आहेत. म्हणजे टाटा मोटर्सच्या सेल्सचं इंजिन आता मुख्यत्वे पेट्रोल आणि डीजलवर नाही चलात. तर, आता 49 टक्के विक्री दोन्ही फ्यूल टाइपवाल्या व्हेरिएंट्सची आहे.

गेल्या तिमाहीबाबत सांगायचं झालं तर, देशांतर्गत मार्केटमध्ये टाटा मोटर्सने 196,674 कार विकल्या आहेत. तसेच 5,049 यूनिट्स एक्सपोर्ट करण्यात आले आहेत. सप्टेंबरमध्ये टााटने एकूण 70,210 कार डिस्पॅच केल्या आहेत. त्यात 68,810 यूनिट्स देशातील मार्केटमध्ये विकले आहेत. मात्र, टाटाच्या मंथली सेल्सने 70 हजाराचा आकडा पार करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

देशात टाटाच

संपूर्ण तिमाहीच्या विक्रीवर नजर टाकली तर, जुलैमध्ये कंपनीने देशातील मार्केटमध्ये 62,611 कार विकल्या आहेत. ऑगस्टमध्ये हा आकडा 65,253 यूनिट्स आणि सप्टेंबरमध्ये 68,810 यूनिट्सवर गेला आहे. ईव्ही कारबाबत सांगायचं झालं तर, टाटाने जुलैमध्ये 15,217 इलेक्ट्रिक कार, ऑगस्टमध्ये 16,549 आणि सप्टेंबरमध्ये 15,384 यूनिट्स विकले आहेत.

टाटाच्या पोर्टफोलियोमध्ये पंच (Tata Punch) सर्वाधिक लोकप्रिय आहे. सप्टेंबर महिन्यातील पंचच्या सेल्सचा डेटा समोर आलेला नाही. पण जुलैमध्ये एसयूव्हीच्या 21,313 यूनिट्स आणि ऑगस्टमध्ये 21,320 यूनिट्स विकल्या आहेत. म्हणजे पंच विक्रीने सातत्याने 20 हजार यूनिट्स पार केल्या आहेत. तर टाटा नेक्सॉनचा हे सर्वाधिक विकलं जाणारं दुसरं प्रोडक्ट आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित..
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित पवारांना थेट सवाल!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची भेट
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची सांत्वनपर भेट; म्हणाल्या...
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक दावा; जात प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत
तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; राणेंचा दिपकेंवर निशाणा
Nitesh Rane : तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; नितेश राणेंचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच...
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच... माजी सरपंचांचा लजिरवाणा कारभार
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
Asian Games 2026 : अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी 212 रनांचं टार्गेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
Chhatrapati sambhajinagar : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू