लगेजला रिबिन लावल्याने विमाने लेट होत आहेत, काय आहे नेमके प्रकरण?

विमान प्रवासामुळे जग अगदी जवळ आले आहे. हल्ली विमानप्रवासालाच प्राधान्य दिले जात आहे. परंतू प्रवाशांच्या एका सवयीमुळे मात्र विमाने लेट होण्याचा प्रकार घडत आहे. काय आहे ने्मके हे प्रकरण पाहूयात....

लगेजला रिबिन लावल्याने विमाने लेट होत आहेत, काय आहे नेमके प्रकरण?
luggage at airportImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jun 10, 2024 | 10:41 PM

आजच्या युगात विमान प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. विमान प्रवासाची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. देशांतर्ग आणि विदेशात जाताना विमानाचा प्रवास वेळेची सर्वात बचत करणारा असतो. इंडिगो एअर लाईन ही आपल्या देशातील सर्वाधिक फायदा मिळविणारी विमान कंपनी आहे. मुंबईच्या विमानतळावरुन दर दोन ते अडीच मिनिटांना एक विमान उड्डाण घेत असते. परंतू अलिकडील एक सारख्या दिसऱ्या ट्रॉली बॅगांमुळे विमानप्रवाशांवर भलतीच आफत आली आहे. या एक सारख्या ट्रॉली बॅगामुळे विमाने लेट होऊ लागली आहेत, असे तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसेल काय ? तर पाहूयात काय आहे नेमके प्रकरण…

विमान प्रवासामुळे जग अगदी जवळ आले आहे. देशांतर्गत प्रवास करण्यासाठी देखील हल्ली विमानप्रवासाला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे जीवनाचा वेग प्रचंड वाढला आहे. परंतू या विमान प्रवासासाठी विमानतळावर सुरक्षा तपासणी करण्यासाठी आपल्याला दोन तास आधी पोहचावे लागते. आपली संपूर्ण तपासणी झाल्यानंतर आपल्या विमानात बसता येते. परंतू अलिकडे सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या चाके असलेल्या ट्रॉली बॅगांमुळे विमानांचे उड्डाण लेट होऊ लागली आहेत. प्रवासी विमानतळावर उतरल्यानंतर आपले लगेज येण्याची वाट पाहात असतात. परंतू हे लगेत तातडीने मिळत नसून त्यामुळे विमानाचे शेड्यल बिघडत चालले आहे. हा प्रकार नेमका का होत आहे. याचे वेगळेच कारण समोर आले आहे.

हा गोंधळ अशाप्रकारांमुळे होत आहे

ट्रॉली बॅगांचा आकार आणि बहुतेकवेळा रंग देखील सारखाच असतो. त्यामुळे विमान लॅंड झाल्यानंतर विमानतळावर आपले सामान किंवा आपली बॅग तातडीने ओळखता यावी म्हणून काही प्रवासी बॅगांना ओळखीचे खूण म्हणून रिबिन बांधत आहेत. या रिबिन किंवा बॅंड बांधल्याने प्रवाशांना एकसारख्याच दिसणाऱ्या ट्रॉली बॅगातून आपली बॅग चटकण ओळखता येऊ लागली खरी परंतू त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना एक वेगळीत समस्या जाणवू लागली आहेत. त्यामुळे विमान प्रवाशांना लगेज मिळण्याचा कालावधीत वाढत चालला आहे.त्यामुळे गोंधळ उडाला आहे. त्याचे झाले काय प्रवाशांनी त्यांच्या बॅगांना चटकण ओळखण्यासाठी लावलेले टॅग तसेच रिबिन यांच्यामुळे या बॅगांना आधुनिक स्नॅनर स्वयंचलितपणे तपासत नाही. स्नॅनिंग मशिन या बॅगाना वेगळे काही तरी समजून चेक करीत नाही. त्यामुळे या टॅग लावलेल्या बॅगांना सुरक्षा कर्मचाऱ्यांना मॅन्युअली तपासावे लागत आहे. त्यामुळे विमानाचे लगेज मिळण्यास उशीर होत असल्याचे उघडकीस आले आहे. प्रवाशांनी स्कॅनर स्वयंचलितपणे काम करण्यासाठी बॅगांना असे बाह्य स्वरुपातील टॅग वा रिबिन तर लावूच नये शिवाय आधीच स्टीकर्स देखील काढून टाकावेत त्यामुळे स्नॅनिंक मशिनचा गोंधळ उडणार नाही असे आर्यलंड येथील डबलिंग विमानतळ प्रशासनाने म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
युवक काँग्रेस आक्रमक, पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको
युवक काँग्रेस आक्रमक, पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको.
ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग, पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी
ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग, पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी.
नाशिकचा पेच शिंदे सोडवणार? उमेदवार मागे की दादांना विनंती?
नाशिकचा पेच शिंदे सोडवणार? उमेदवार मागे की दादांना विनंती?.
रत्नागिरीमध्ये मुसळधार, जगबुडी नदी इशारा पातळीवर, पाहा व्हिडीओ
रत्नागिरीमध्ये मुसळधार, जगबुडी नदी इशारा पातळीवर, पाहा व्हिडीओ.
उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या टीकेवरून जरांगेंना हाकेंचा सवाल
उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या टीकेवरून जरांगेंना हाकेंचा सवाल.
याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर लायकी..., हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल
याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर लायकी..., हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल.
आता सरकार तुम्हालाही पाणी पाजेल, जरांगेंचा हाकेंना सावधगिरीचा सल्ला
आता सरकार तुम्हालाही पाणी पाजेल, जरांगेंचा हाकेंना सावधगिरीचा सल्ला.
अटल सेतूवर पडल्या भली मोठी भेग, पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश
अटल सेतूवर पडल्या भली मोठी भेग, पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश.
आम्हाला फसवलं तर...,डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी गिरीश महाजनांना फटकारलं
आम्हाला फसवलं तर...,डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी गिरीश महाजनांना फटकारलं.
मर्द-षंढशिवाय ज्यांच्याकडे शब्द नाही, त्यांनी योग करावा, शेलारांचा रोख
मर्द-षंढशिवाय ज्यांच्याकडे शब्द नाही, त्यांनी योग करावा, शेलारांचा रोख.