मान्सून जोरदार, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट, नद्या भरभरुन वाहू लागल्या

Rain in Maharashtra: महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना ११ जून रोजी मान्सूनचा यलो अलर्ट दिला आहे. सोलापूर, लातूर, नांदेड, यवतामाळ, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. १२ जून रोजी महाष्ट्रात यलो अन् ऑरेंज अलर्ट दिला आहे.

मान्सून जोरदार, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट, नद्या भरभरुन वाहू लागल्या
राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले आहे.
Follow us
| Updated on: Jun 12, 2024 | 7:11 AM

मान्सूनची वाटचाल कोकणानंतर आता उर्वरित महाराष्ट्राकडे सुरु आहे. मान्सूनने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांशी भाग व्यापला आहे. तसेच मान्सूनला उर्वरित भागात प्रगती करण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यातील अनेक भागांत पाऊस सुरु आहे. धारधीव जिल्ह्यातील उगम पावणारी तेरणा नदी वाहू लागली आहे. यामुळे मदनसूरी बॅरेजचे दरवाजे उघडले आहे. हवामान विभागाने मुसळधार पावसासंदर्भात १२ जून रोजी राज्यातील अनेक भागांत यलो अलर्ट अन् ऑरेंज अलर्ट दिला आहे.

बीडमध्ये नदीला पूर

बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. मध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे माजलगाव तालुक्यात असलेल्या कोथळा गावातील नदीला पूर आला आहे. त्यामुळे दोन गावाचा संपर्क तुटला आहे खरीप हंगामाची सुरुवात होताच पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजा तूर्तास तरी सुखावला आहे.

हे सुद्धा वाचा

लातूरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस

लातूर जिल्ह्यातल्या कर्नाटक सीमावर्ती भागात असलेल्या नेलवाड गावावर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. नेलवाड गावची शेती आणि रस्त्यांवर पाणी पाणी झाले आहे. गावातून बाहेर पडणाऱ्या रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने गावकऱ्यांना बाहेर पडण्यास अडचण झाली आहे. शेतीमध्ये पाणी घुसल्याने माती वाहून गेली आहे. ओढ्यांना पूर आल्याने शेत रस्ते ठप्प झाले आहेत. परभणी जिल्ह्यात दीर्घ प्रतिक्षेनंतर पावसाला सुरुवात झाली आहे. परभणी शहरासह जिल्ह्यात अनेक भागात पावसाने जोरदार बॅटिंग केली.

खामगावमध्ये दुकानांमध्ये पाणी

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यासह शहरात मध्यरात्री दरम्यान ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. विजांच्या कडकडाटांसह खामगाव, नांदुरा, शेगांव परिसरात हा पाऊस धो धो स्वरूपात पाऊस बरसल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाले. या पावसामुळे खामगाव शहरातील फरशी भागातील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे अनेकांच्या दुकानात पाणी शिरले.

६ तासांत ५७.८ मिमी पाऊस

मुसळधार पावसासह संभाजीनगरात मान्सूनचे आगमन झाले. संभाजीनगरमध्ये रात्री दमदार पावसाने हजेरी लावली. रात्री ५७.८ मिमी. पावसाची नोंद झाल्याची माहिती चिकलठाणा वेधशाळेने दिली. तसेच नांदेड, बीड,जालना, परभणी, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

या जिल्ह्यांना अलर्ट

महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना ११ जून रोजी मान्सूनचा यलो अलर्ट दिला आहे. सोलापूर, लातूर, नांदेड, यवतामाळ, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. १२ जून रोजी महाष्ट्रात यलो अन् ऑरेंज अलर्ट दिला आहे.

Non Stop LIVE Update
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती.
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला...
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला....
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप.
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा.
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?.
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले.
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस.
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला.
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग.
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा.