हवामान विभागाची मोठी घोषणा, मॉन्सूनच्या पावसाचा परतीचा प्रवास सुरू, मुंबईसह..
India Meteorological Department Monsoon Update : राज्यात यंदा पावसाने पाठ फिरवली. अपेक्षित पाऊस राज्यात झाला नाही. एल निनोचा प्रभाव यंदाच्या मॉन्सूनवर बघायला मिळाला. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने मोठी घोषणा केली.

राज्यात यंदा पावसाने पाठ फिरवली. एल निनोचा प्रभाव मॉन्सूनवर बघायला मिळाला. राज्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. जगभरातील हवामान तज्ज्ञ भारतातील मॉन्सूनवर एल निनोचा प्रभाव असणार असल्याचा अंदाज देत होते. तो अंदाज खरा ठरला. राज्यात स्थिती गंभीर आहे. मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला, तरीही पाऊस काही होत नाही. राज्य सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर केला. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. ऑक्टोबर महिन्यातच अनेक भागात विहिरी आटल्या आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने मोठी घोषणा केली. 3 ऑक्टोबर रोजी मुंबईतून मॉन्सूनने माघार घेतली.
मुंबईसह राज्यातून मॉन्सूनने माघार घेण्यास सुरूवात केली. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने याबाबत मोठी घोषणा केली. पुढील दोन ते तीन दिवसात संपूर्ण राज्यातून मॉन्सून माघारी फिरण्याची स्थिती आहे. तसे अनुकूल वातावरण तयार झाले. राज्यातील मॉन्सून परतीचा प्रवास पूर्ण करेल. मोसमी वारे काही भागातून माघारी गेले. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने याबाबत माहिती दिली.
राज्यात पावसाने पाठ फिरवली आणि त्याच मॉन्सून परत जाणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यात मॉन्सूनने परतीचा प्रवासही सुरू केला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 48 तासांत 13 राज्यांमध्ये मॉन्सूनच परतीचा प्रवास सुरू होईल. राज्यातून पाऊस माघारी जात आहे.
🚨 IMD has announced the monsoon withdrawal from Mumbai today, on October 3.
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) October 3, 2026
उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, बिहार, उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड या राज्यातून मॉन्सून परतण्याच्या परिस्थितीत आहे. जून ते सप्टेंबर या हंगामात सरासरी 87.4 टक्के पाऊस झाला. 2001 नंतरचा हा देशातील चौथा सर्वात कमी पावसाचा मॉन्सून हंगाम ठरला आहे. चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. यासोबतच 2027 मध्ये यापेक्षाही भयंकर स्थिती असणार असल्याचा अंदाज आहे. त्याकरिता सरकारकडून महत्वाची पाऊले उचलली जात आहेत. दुष्काळ असल्याने शेतकरी शेतकरी आपली जनावरे विकण्याच्या तयारीत आहेत.