AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डंके की चोट पे… मातंग समाजाला धडकी भरवणारा वकिल गुणरत्न सदावर्तेंचा दावा, आरक्षण उपवर्गीकरणावरुन म्हणाले…

मी आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात असून मला त्याबद्दल विचाराल तर मी ते उद्या दुपारी ३ पर्यंत रद्द करुन दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा दावा वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

डंके की चोट पे... मातंग समाजाला धडकी भरवणारा वकिल गुणरत्न सदावर्तेंचा दावा, आरक्षण उपवर्गीकरणावरुन म्हणाले...
matang samaj upvargikarn gunratna sadavarteImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 03, 2026 | 6:17 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. विविध शहरांमध्ये मोर्चांचं आयोजन केलं जात आहे. मातंग आणि बौद्ध समाजामध्ये तणावाचं वातावरण झाल्याचं मानलं जात आहे. यावर अनेकजण विश्लेषण करत आहेत. पण आता आज नाशिकमध्ये आयोजित आंदोलनाला प्रसिद्ध वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थिती लावलेली पाहायला मिळाली. त्यांनी यावेळी जोरदार भाषण केलं. त्यांच्या भाषणात त्यांनी उपवर्गीकरण होऊच देणार नाही, असं म्हटलं आहे.

वर्गीकरण होऊ देणार नाही…

मी डंके की चोट पे बोलत असतो. वर्गीकरणाचं राजकारण चाललेलं आहे, पण मी वर्गीकरण होऊ देणार नाही. मी आंबेडकरी वकील आहे. मी जे बोलतो ते करतो. आमचा नाद करायचं नाही. आमचा नाद केला तर शिल्लक राहणार नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला, अस सांगत आहेत. गवई साहेब यांनी निकाल देताना काय लिहले आहे ते वाचलं का? वर्गीकरण backword क्लास रिपोर्ट वर होऊ शकतो, असे लिहले आहे. अनुसूचित जाती आयोग नसेल तर करता येणार नाही. आज तुम्ही वर्गीकरण केला तर उद्या दुपारी 3 वाजता रद्द करेन.

मातंग समाज अनुसूचित जातीतच राहू शकत नाही, सदावर्ते यांच मोठं वक्तव्य

मातंग समाज हलगी वाजवण्याचे काम करत होते. त्यामुळे ते माघे पण सत्तेत होते. पण बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना अनुसूचित जातीत आणले. ट्रिपल टेस्ट जर झाली तर मातंग समाज अनुसूचित जातीतून बाहेर जाईल, असा मोठा दावा सदावर्तेंनी केला आहे. पण ही काही दोन समाजात तेढ नाही. यात 59 जाती आहेत. 58 जाती एक बाजूला आणि एक जात बाजूला आहे.

अस्पृश्यतेला मातंग समाज सामोरे गेले नाही. त्यामुळे ते अनुसूचित जातीच्या बाहेर जातील. त्यामुळे मी मातंग समाजाच्या तरुणांना आवाहन करतो की कुणाच्या नादी लागू नका. मराठा समाजसोबत मातंग समाजाला सोबत घेण्याचा प्रयत्न एका नेत्याने एकनाथ शिंदे यांच्यासाठी केला, असाही दावा वकिल गुणरत्न सदावर्तेंनी केला आहे.

जरांगेला मुंबईत मी येउ दिले का, तर नाही. त्यामुळे वर्गीकरण देखील होऊ देणार नाही. एकनाथ शिंदे यांच्यासारखे पाच आले तरी वर्गीकरण होणार नाही. एकनाथ शिंदे यांनी दळभद्री राजकारण करू नये. शरद पवार 2 होऊ नये. midc मध्ये माझ्या लोकांना प्लॉट देण्याचे काम करा मातंग समाजाचा न भरून येणार नुकसान होईल. वर्गीकरण निर्णय 48 तासात रद्द करून दाखवेन, असाही दावा त्यांनी केला आहे.

Follow Us
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...