देशातील तरुणांना सर्वात मोठी संधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कल्याणच्या सभेत महत्त्वाचं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांना आज महत्त्वाचं आवाहन केलं आहे. मोदींची आज कल्याणमध्ये सभा पार पडली. या सभेत त्यांनी तरुणांना नाविण्यपूर्ण सल्ले सूचवण्याचं आवाहन केलंय.

देशातील तरुणांना सर्वात मोठी संधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कल्याणच्या सभेत महत्त्वाचं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 8:48 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कल्याणमध्ये सभा पार पडली. या सभेत नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांना महत्त्वाचं आवाहन केलं. आपण पुढच्या 100 दिवसांचं प्लॅनिंग करुन ठेवतो. पण देशातील तरुणांनी आपल्याला 125 दिवसात काय-काय करता येऊ शकतं, याचा प्लॅन सूचवण्याचा सल्ला नरेंद्र मोदी यांनी तरुणांना दिला आहे. तरुण पिढी ही हुशार आहे. तरुणांच्या विचारांमध्ये नाविण्य असतं. त्यामुळे अशा नाविण्यपूर्ण विचार आणि प्लॅनिंग आपल्याला पाठवण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे. तरुणांनी सूचवल्यानुसार आपण 25 दिवस त्यांनी सूचवल्यानुसार कामं करु, असं मोठं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी कल्याणच्या सभेत जाहीरपणे केलं.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीला नमन करतो, मी माँ दुर्गा, जरीमरी तिसाई माता आणि अंबरनाथ महादेवाला आदरपूर्वक प्रणाम करतो. मी पुज्य बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना श्रद्धांजली अर्पण करतो. मी कल्याणच्या भूमीवर राष्ट्र कल्याणासाठी आपला आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. राष्ट्राचा कल्याण, गरिबाचं कल्याण, मी गर्वाने सांगू शकतो, आजच्या राजकीय वातावरणात हा मुख्य कसोटीचा केंद्र बनला आहे. देशात पहिल्यांदाच 25 कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर पडताना देश बघत आहे. पहिल्यांदा प्रत्येक घराला नळातून पाणी मिळत आहे. हे अभियान यशाच्या नवी उंची गाठत आहे. हिल्यांदाच गरिबांना मोफत उपचारासांठी गॅरंटी कार्ड आहे. गरिबांच्या सरकारने गरिबांना सर्वात पहिली प्राथमिकता दिली आहे. मला यानंतर मुंबईच्या कार्यक्रमात जायचं आहे. मुख्यमंत्री देखील तिथे असतील. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनुमती देतो की त्यांनी जावं. मी इथे सांभाळून घेईन, असं मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

“आज पहिल्यांदाच भारतात आम्ही एक नवा आत्मविश्वास बघत आहोत. भारत आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणाने मोठे लक्ष्य गाठत आहे. सरकार बनल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत काय करायचं आहे, कोणते निर्णय घ्यायचे आहेत, यावर लगातार काम केलंय. असं नाही की, सरकार बनली, चला माळ घालून फिरत राहायचं. आज जितकी मेहनत करतोय तितकीच मेहनत 4 जूननंतरही राहील. त्यामुळे 100 दिवसांत काय करायचं आहे याची ब्लूप्रिंट ठरवून आलोय. मला ते लोक म्हणतात की, मोदीजी एवढा आत्मविश्वास? मुद्दा मोदींच्या आत्मविश्वासाचा नाही तर जनतेचा विश्वासाचा आहे”, असा दावा मोदींनी केला.

मोदी तरुणांना उद्देशून काय म्हणाले?

“मी काल काशीत होतो. मी पाहतोय की, देशातील तरुणाकडे नव्या आयडिया आहेत. प्रत्येक गोष्टीला नव्याने करण्याची त्यांची इच्छा आहे. मी त्यांच्यापासून भरपूर प्रभावित झालो. मी देशाच्या तरुणांना एक विनंती आणि आग्रह करु इच्छितो, मी ज्या तरुणांना भेटलो त्यांनी मला खूप चांगले सल्ले दिले आहेत. माझ्या 100 दिवसांच्या व्हिजनला 125 दिवस आणखी जोडत आहे. या दिवसांमध्ये मी काय करायला हवं याबाबत देशातील तरुणांनी मला सल्ला द्यावा. मी ते वाचून योग्य निर्णय घेईन. मला विश्वास आहे की, देशाचे तरुण मला ते सल्ले देतील ज्यामध्ये नाविण्य असेल. भविष्यासाठी भरपूर गोष्टी असव्यात”, असं मोदी म्हणाले आहेत.

“मी अतिरिक्त 25 दिवस वाढवले आहेत. मी असं फाउंडेशन तयार करु इच्छित आहे जेणेकरुन माझ्या 2047 चा टार्गेट पूर्ण होईल. तुमचे स्वप्न हा मोदीचा संकल्प आहे. तुमच्या स्वप्नांना, ज्यांना मी संकल्प बनवला आहे, त्यांना सिद्ध करण्यासाठी माझा प्रत्येक क्षण तुमच्या नावाला आहे. माझा प्रत्येक क्षण देशाच्या नावाला आहे. त्यामुळे मी म्हणतो 24 तास आणि 2047. आपण आज जिथे पोहोचलो आहेत त्याच्यापुढे देशाला कोण घेऊन जाऊ शकतं?”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

Non Stop LIVE Update
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक.
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?.
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?.
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य.
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन.
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.