Maharashtra Breaking News LIVE : ग्रुप बुकींगवरील 30 भाडेवाढीचा निर्णय रद्द, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

महाराष्ट्रातील शिक्षक भरती घोटाळा आणि शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारने कारवाई करण्यासाठी एसआयटी स्थापन केली. आता या एसआयटीच्या रडारवर अनेक संस्थांचालक आहेत. गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील धनराज हुकरे या संस्थापकाला यासाठी चौकशी करता ताब्यात घेण्यात आलय. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शिक्षक बोगस भरती प्रकरणातील संस्थाचालकाचे धाबेदणाणले आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंच आज राज्यभर चक्काजाम आंदोलन. अमरावती, चांदूरबाजार, संभाजीनगर, लातूर आणि नांदेड मधील चक्काजाम आंदोलनात बच्चू कडू सहभागी होणार. बच्चू कडूंच्या आंदोलनाला शेतकरी संघटना, महाविकास आघाडीतील अनेक आमदारांनी खासदारांचा पाठिंबा मनसेनेही दिला बच्चू कडू यांच्या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा. बच्चू कडू आज अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा या गावात भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार. आगामी काळामध्ये शेतकरी संपाबाबत चर्चा करणार.
LIVE NEWS & UPDATES
-
राजधानी दिल्लीत वाजणार मराठीचा डंका
दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्र’ सुरू होणार. 17 वर्षापासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागणार. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. एकीकडे महाराष्ट्रात त्रिभाषेवरून वाद सुरु असताना राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्र’ सुरू होणार.
Published On - Jul 24,2025 8:26 AM
